Skip to main content

महागाई

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी गुरुवार, 05/08/2010 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
महागाई...... महागाई केवढी वाढलेय न, २०० रुपये कधी खर्च झाले माहीत नाही. सकाळी कामाला निघाले. ऑटोत बसले १५ रु, परत मालाडहून ऑटो २५ रु दुपारी कॅफेटेरीयात लंच घेतला [ वेज ] - ५८ रु. इवनिंग टी १५ रु, परत जाताना ऑटोचा एकूण खर्च ४० येताना एक ब्रेड २०/- दुध २७/- लिटर. ७ वर्षांपूर्वी ब्रेड - १०/- दुध - १५/- लिटर घर ते स्टेशन ऑटो - ४/- बस - ३/- विजेचे बिल, केबलचे बिल, कडधान्य, फळे सर्व आताच्या तुलनेत स्वस्त होत लिहिण्याचे कारण म्हणजे काहींचे ठीक आहे पण ज्यांचा पगार ६ ते ७ हजार आहे. त्यांचे कसे होत असेल. अर्थात आपण लिहिण्याशिवाय व त्यावर प्रतिक्रिया देण्याशिवाय बाकी काही करू शकत नाही.

माझा खाद्यप्रवास

लेखक दिनेश यांनी गुरुवार, 05/08/2010 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम (जुने आणि नविन) मिपाकरहो, आम्ही बिल्ला नंबर १६. मिपा सुरू झाल्यापासून आम्ही तसे वाचनमात्रच, कधीतरी प्रतिसादांच्या एखाददोन पिंका टा़कणारे, अन्यथा झाडावर बसून पॉपकॉर्नची पोती आणि कोकची पिंपे रिचवण्यात, खरडवह्या चघळण्यात आणि कधीमधी व्यनिमनीच्या गोष्टी करण्यात आम्हाला रस! पण गेल्या काही दिवसातले धागे वाचताना मचाणच बांधून बसायची वेळ आली आणि त्यामुळेच आमची कैफियत आपणासमोर आणण्यास आम्ही उद्युक्त झालो. (हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने चु भू द्या घ्या) आम्ही जन्माने आणि कर्मानेही मुंबईकरच. चारचौघांसारखेच आमचेही बालपण होते पण एक मोठ्ठा फरक म्हणजे आमच्या घरात गाई म्हशी होत्या.

वर्गणी

लेखक कळस.. यांनी बुधवार, 04/08/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
वर्गणी घरी आलो तोच शेजारच्या घरात गोंगाट. वर्गणी मागणारी सोसायटी मधील पोर बडबड करीत होती. कमीत कमी ५०१ रुपये नाही तर वर्गणी नको. १०१ वर तडजोड करण्यास तयार नव्हती. आमच्या शेजारी गुप्ते काकी राहतात. २ वर्षांपूर्वीच गुप्ते काका वारले. ते lic मध्ये कामाला होते. त्यांचा नंतर काकी कामाला जाऊ लागल्या त्यांचा पाठी एक मुलगी आणि लहान मुलगा आहे. सध्या घर काकिंवरच आहे. मोठी मुलगी science दुसरे वर्ष चालू आहे. मुलगा १० वी त आहे. काकुंने त्यांना १०१ देऊ केले ते घेण्यास तयार नव्हते. शेवटी रागाने ती पोर तशीच निघून गेली.

कात्रज ते सिंहगड.

लेखक sandeepn यांनी बुधवार, 04/08/2010 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
जुलै महिन्याच्या सुरवातीला कात्रज ते सिंहगड असा ट्रेक करण्याचा योग आला होता. शनिवारचा दिवस होता. सकाळी ७ लाच जुन्या कात्रज बोगद्याच्या वरुन चढायला सुरवात केली. सकाळी सकाळी स्वारगेटवरून टमटम पकडुन आम्ही ८ लोक इथे पोहचलो होतो. आधिच ट्रेक खुप अवघड आहे असे सांगण्यात आले होते , पण उस्ताहाच्या भरात त्याचा सिरिअसनेस आम्हाला कळला नव्हता. पण पहिलाच डोंगर चढतानाच पुढच्या ट्रेक ची कल्पना आली.

एसटी पुराण

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/08/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
एसटी पुराण एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली.

नावड (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 03/08/2010 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नावड ============================= . . काही गोष्टी इतक्यांदा सांगितल्या ऐकल्या जातात की मग त्या आपल्या नसल्या तरी आपल्याशा होऊन जातात. त्या सांगणारी व्यक्ती जर नेहमी दिसणारी किंवा जवळच्या परिचयातली असली तर ती व्यक्ती समोर येताच त्या व्यक्तीने सांगितलेली त्या व्यक्ती संदर्भात घडलेली ती घटना जरा जास्तच लक्षात राहते.. ही सुद्धा तशीच एक मी न पाहिलेली घटना.. डब्यामध्ये निलगिरी तेलाचा वास भरून राहिला होता.. मी केव्हाची अस्वस्थ होते, तशी आता या वासाची सवय झाली आहे.. निलगिरी तेल सर्दी झाली असता वापरले जाते हे ही माहिती झालंय..

विरासत

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 03/08/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.

आयटीतल्या बायका

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 03/08/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेखनाची प्रेरणा एका वाक्यात सांगायची, तरः च्यायला, मग आम्हीच काय पाप केलं ? असे म्हणता येईल.) प्रविन्भप्कर आणि सुजय कुलकर्णींच्या लेखनाने आमचे डोळे खाडकन उघडले. आज जगातले सर्वात महत्वाचे प्रश्न, म्हणजे इंचाइंचाने मागे सरणारे कश्मीर (आणि वर सरकणारा हिमालय), ग्लोबल वॉर्मिंग, मेक्सिको खाडीतील तेल गळती, पुण्यातील परप्रांतीय मुलींची नशाखोरी, पॅराग्लायडिंगच्या छायाचित्रांमुळे वाढलेला इनोचा खप, ह्या सगळ्यांसाठी आयटीतल्या बायका जबाबदार आहेत, अशा आमच्या संशयावर जणू शिक्कामोर्तब झाले. आमचा हा संशय फार जुना आहे.