Skip to main content

आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो का?

लेखक आप्पा यांनी रविवार, 05/09/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्‍याच्या बायकोसारखा दुसर्‍याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा. आपणही विचार मांडा.

अलविदा त्या रुम मालकांना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 04/09/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील. बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली.

पारध

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 03/09/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्‍यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्‍यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले.

शाहीन..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी. "माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन. दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता.

दंगल-ए-खास

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 02/09/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....'' माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता. गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची!

भंभागिरी

लेखक हेम यांनी बुधवार, 01/09/2010 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
'सकाळी सहाऐवजी साडेसहाला हुतात्मा स्मारकाबाहेर जमायचे आहे' राहुलचा रात्री मेसेज मिळाल्यावर सुट्टीची साखरझोप अजून अर्ध्या तासाने वाढली. पहाटे खुडबुडत सॅक भरून अशोकस्तंभावर गाडी लावली. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, २६ जाने. यादिवशींच्या पहाटवेळांत खूप वेगळं चैतन्य असतं, त्यापैकीच एक १५ ऑगस्टचीही असते. एरवी दिसतात ते पोटार्थी (म्हणजे पोटासाठी कामाला लागलेले आणि पोट कमी करण्यासाठी नाईलाजाने चालणारे/ धावणारे). लहान मुलांची झेंडावंदनासाठी कडक कपड्यांत शाळेत जाण्याची लगबग सुरू होती.

बालकांचा चिम्मणचारा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 01/09/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे. त्यांनी पुरेसे म्हणजे एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा! खरे तर तासाभराने घासभर 'चरण्याची' बालकांची मूळ वृत्ती असते. परंतु आपण मोठी माणसं उगाचच त्यांचे खाणे वेळेत अन् वजनमापात तोलत बसतो. त्यांना वेळेनुसार खायला देण्याऐवजी वेळोवेळी द्यावे लागते तरच ते पचते, अंगी लागते.

वेल् ... मला वाटलं ते लिहीलं

लेखक शुचि यांनी सोमवार, 30/08/2010 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत. पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्‍याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच. नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल. परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का?