Skip to main content

प्राचीन हस्त लिखित भृगु संहिता

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 16/02/2013 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन हस्त लिखित भृगु संहिता व्हिडिओ ची लिंक कार्यशाळा २०११ च्या अंतर्गत होशियारपुरच्या महाशिव यांच्याशी बोलताना केलेले शूटींग. एका हातात कॅमेरा धरून दुसऱ्या हाताने पत्रे हाताळण्यामुळे जरा गचाळ झाले आहे. तरीही उत्सुक व्यक्तींना यावरून कल्पना येईल. पंजाबी ढंगातून बोलणारे महाशिवजी लगेच नाराज होताना 'बस करो' म्हणतात. तेवढ्यात एक जण मला हे फल ऐकायचे आहे किती फी वगैरे विचारत असताना मी पटकन संधी साधून माझे त्यादिवशी निघालेले भृगु फल पत्र व त्या पानावरील 'शशिकांत' नावाच्या उल्लेख मला हाताळायला मिळाला. एरव्ही फलपत्र हातात देण्यास ते फारसे राजी नसतात. व्यक्तीचे नाव भृगु संहिताच्या पट्टीत लिहिलेले असते काय? असे अनेकदा विचारले जाते म्हणून हा धागा. तरी ह्या ठिकाणी ते थोडे अस्पष्ट व ओळीत टोकाला शशि व पुढील ओळीत कान्त असे तोडून आले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4985
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

भुतकाळ मात्र नेमका सांगतात राव... एकदम बिंचुक.

In reply to by संजय क्षीरसागर

शशि*, *कान्त असे वाचावे.. अस्पष्ट आणि २ ओळीत असल्यामुळे शशि ने नाव सुरु होणारा वा कान्त ने नाव संपणारा कुठल्याही आडनावाचा "श्रद्धावान" मनुष्य ही हे भृगुफलपत्र वाचून खूष होतो. :-)

चला...चांगली सोय झाली. ;-) @ओक कुठाय? >>> =)) अहो सं.क्षी.,चारचौघात अपल्याला असं ओकणं शोभतं का? :-b

पुण्यात भानुविलास टोकिज जवळ घाणेकर म्हणुन भ्रुगु संहिता सांगायचे ,,त्या काळात{ ७२ साल }ते रु १००० घ्यायचे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

म्हणजे त्याकाळी करमणूकीसाठी म्हणा वा मानसिक समाधानासाठी म्हणा एवढे पैसे देणारे लोक होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हजार रुपये घेणारे घाणेकर मात्र `बस,.. करते रहो, ..करते रहो' म्हणत असतील

ओकसाहेब, ! तुमचा जीमेल आयडी आणि पासवर्ड विचारतंय आमचं टॅबडं.. व्यनितून कळवा