Skip to main content

निमित्त फक्त एका भेटीचे

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 08/04/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त फक्त एका भेटीचे परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर. निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.

अंड्याचे फंडे ५ - शर्यत

लेखक साळसकर यांनी सोमवार, 08/04/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/03/2013 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया. निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा. शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा! निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते? शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते.

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद

लेखक साळसकर यांनी रविवार, 31/03/2013 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं.. ऐन दुपारी.. नदी किनारी.. फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी.. तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने.. घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे.. "चांगली भरारी आहे राव, भिडली अगदी मनाला.

अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 29/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अंड्याचे फंडे - २" कडे वळायच्या आधी "अंड्याचे फंडे -१" खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीअर करू शकता. अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341 घाईत असाल तर तसे नाही केले तरी चालेल, कारण दोन्ही लेखांचा आपसात काडीचाही संबंध नाही. ती लिंक देण्याचे प्रयोजन वाचकांची सोय नसून स्वताच्या लेखाची जाहिरात हे आहे. .................................................................................................................................................... आपली मुंबई लोकल आणि भरगर्दीची वेळ.

गुंडा

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 28/03/2013 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सां

नाटेकर

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 28/03/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले.

सेन्टी मेन्टी : जखम आणि खपली

लेखक मन यांनी शनिवार, 23/03/2013 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी भस्सकन खुपतं. जखम होते. कधी वरवरची तर कधी खोल खोल रुतलेली. कधी साधसच खरचटत्;कधी बाहेरचं काहीतरी खोल आत रुतून बसतं. कधी आपलाच एखादा भाग हिसकटून, उचकटून बाहेर निघतो ना, तेव्हाची जखम तर जीवघेणी असते. जखम कसली, तेवढ्या प्रमाणात आलेला त्या भागाचा मृत्यूच की तो. तेव्हा ठणकतं; खुपतं; दुखतं. पण तरीही show goes on ह्या उक्तीप्रमाणे आहे तिथून आहे तशीच जमेल तितकी जखम हळूहळू भरुन यायला लागते. फार मोठ्ठा भाग गेला असेल तर शरीर तो संपूर्ण भाग पुन्हा बनवूही शकत नाही कित्येकदा. पण जगताना त्याचीही सवय करुन घ्यावी लागते; खरं तर सवय होउन जाते. वेदनेचा आणि तीव्र दु:खाचा तो क्षण मागे सरु लागतो.

लहान मुलांच्या बाबतीत

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 22/03/2013 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मूल गाढ झोपलय. कविला वाटतं त्याच्या झोपेत अजिबात व्यत्यय येऊ नये. म्हणून तो कुणाकुणाला काय काय सांगतो पहा. चंद्राला म्हणतो, नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू किंवा यक्ष-पर्‍यांनो स्वप्‍नीं नाचून नीज नका चाळवू म्हणजे अगदी स्वप्नात जाऊन सुद्धा कुणी त्याची झोपमोड करू नये. किती खोलवर विचार केलाय कविने. लहान मुलांची काळजी घेताना इतका खोलवर विचार व्हायला हवा. पण उदाहरणे मात्र उलट दिसतात. परवा एक प्रसंग पाहीला.

गपगार

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 22/03/2013 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली. शेताला गेल्ती सक्काळी. हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत. म्याबी चाल्ली व्हती. आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.” आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ. ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला. गजगं; फुटकी काकणं; चिचोके; गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं; – समदं फुकाट. म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती. “आता ईदद्याचं भूत व्हनार,” जग्या म्हन्ला. “हाडळ”, भान्या म्हन्ला. “हाडळ कशापायी?