Skip to main content

मेट्रो ट्रेनचा अनुभव

लेखक साधा मुलगा यांनी गुरुवार, 12/06/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते.

किस्से लाईव्ह चे...१

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 05/06/2014 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
हा किस्सा रेडियोवरच्या प्रसारणातला. खरं तर प्रसारण, मग ते थेट असो की मुद्रित, दोन्ही प्रकारांमध्ये सतत नवनवे किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा... नेहमीप्रमाणे थेट बातमीपत्रासाठी बातम्या काढणं, तयार करणं, टाईप झालेल्या बातम्या वाचून दुरूस्त करून घेणं अशी लगबग सुरू होती. बातमीपत्र तयार झालं आणि नेहमीप्रमाणे वरीष्ठांना सांगुन मी स्टुडियोमध्ये जायला निघाले. प्रसारणाच्या साधारण पाच मिनिटं आधी मी स्टुडियोमध्ये पोहोचले. सिग्नेचर ट्यून (बातम्या सुरू होण्यापूर्वीचं संगीत), माईक तपासणी असे नित्य सोपस्कार पार पडले आणि मी शांतपणे प्रसारणाच्या वेळेची वाट पाहू लागले. अचानक... मला उचकी लागली. एक...दोन...

बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 05/06/2014 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे.

पुन्हा..........

हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात.

नाटेठोम

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 29/05/2014 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमची सुट्टी झ्याक. राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ. दिवसभर आंबे, खेळ. अब्यास न्हाई. मार न्हाई. घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं. त्यांच्यासंग शुद्ध बोलते. अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत. मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे. ‘क्याट’ म्हनत्येत त्येला. खेळतात ती समदी. त्यादिशी बगत बस्ली. सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली. अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”. मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला. मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला. म्या इचारलं “नाटेठोम?

माझं सिंगल पॅरेंटिंग

लेखक सावत्या यांनी बुधवार, 28/05/2014 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
इथे अबुधाबीला सीबीएसइ बोर्डच्या शाळांना मार्चच्या दुसया आठवड्यात सुट्टी पडून मुलीच केजि १ पूर्ण झालं. बायको आणि मुलगी सुट्टीसाठी मुंबईला रवाना झाल्या. एकाकीपणा मला खायला उठला. रोज रात्री ८ वाजता घरी आल्यावर पप्पाssssss …. म्हणून मुलगी गळ्यात पडायची आणि रात्री झोपेपर्यंत तिची चिवचिव चालू असायची. मित्रांचे फोन येऊ लागले, विकांताचे बेत ठरू लागले पण या वेळी मला कशातच इंटरेस्ट नव्हता. बायको आणि मुलगी कधी एकदा परत येतात अस झालं होत. पण काही कारणाने त्याचं मुंबईतल वास्तव्य वाढलं. इथे शाळा सुरु होऊन २ आठवडे लोटले तरी त्याचं येण होईना. मी तर पार कंटाळून गेलो. रोज सकाळी ८ ते रात्री ७ ऑफिस.

सामान्य माणसासाठी साधा फोन

लेखक कंजूस यांनी बुधवार, 28/05/2014 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील . आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला . सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँग

उन्हाळी उद्योग : भाग २ आपले स्वतःचे दुकान चालवा

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 23/05/2014 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित) प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे " दुकान उघडल्यावर , ते चालवण्याच्या प्रक्रियेत आजी/आजोबांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांच्या कल्पना नातवंडांना (खेळता खेळता, नातवंडांवर फार भार न पडता) समजाऊन देता येतील. अर्थातच त्याकरता नातवंडांचे वय यथायोग्य असावे (आणि म्हणूनच हा "भाग २" चा पसारा "भाग १" पासून वेगळा केला आहे).

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/05/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

संग्रह

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 20/05/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही पण निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता... आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात १५ फेब १९९० . अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक . कसबा विधानसभा... . अण्णांची यशस्वी लोकस

भारतीय वकीलातीतला अनुभव

लेखक मालविका यांनी शनिवार, 17/05/2014 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो . मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे .