Skip to main content

बालपणीचा काळ सुखाचा....

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी गुरुवार, 15/05/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो… पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना … अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता … लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … ) असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं ….

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१

लेखक तिमा यांनी गुरुवार, 15/05/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती. गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.

दुस्री

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 15/05/2014 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू.

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/05/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

कॅम्पस प्लेसमेंट

लेखक जातवेद यांनी शनिवार, 10/05/2014 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.

पंगत

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 09/05/2014 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बर्याचश्या कार्यक्रमांमधे जेवणाच्या वेळी बुफे ही पद्धत रुड झालेली आहे . सोयीच्या दृष्टीने,अन्न वाया ना जाण्याच्या दृष्टीने ती निश्चीतच चांगली आहे.पण तरीही मला मात्र पुर्वी पासूनच पंगत हाच प्रकार खूप आवडतो . आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.एक तर सगळ्यानाच ते आवडत आणि दुसर महणजे इतके दिवसानंतर आता तस बसल्याशिवाय जेवण पोटभर होत नाही असाच वाटत.कदाचित हे वाटण मानसिक सुध्हा असेल .

संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती.

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 09/05/2014 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
संधीवात व पॅरालिसिस करीता संयुक्त उपचार पद्धती. आजच्या धक्काधक्कीच्या दैनंदिन जिवनात मानवाला भेडसावणारी नेहमीची समस्या म्हणजे,उठता बसता जाणवनारी सांध्यांची कुरकुर,कोणाचे गुडघे दुखत असतात,कोणाची कंबर, तर कोणाची मान दुखत असते,आपल्याकडेच नव्हे तर जगात सगळीच कडे या दररोजच्या वेदनांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते अथवा तात्पुरती वेदनाशामक औषधे घेतली जातात,आणी हाच प्रकार आयुष्याच्या शेवटच्या वळणावर अत्यंत त्रासदायक ठरतो.व कुंथत कुंथत आयुष्य जगण्याची वेळ आणतो.जर सुरुवातीसच म्हणजे ज्यावेळेस सांध्यांच्या तक्रारी सुरु झालेल्या असतात त्याच वेळी जर योग्य उपचार केले तर हा आजार फक्त आटोक्यातच

थरार : नको इतका जवळून !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/05/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

केंद्र परिघाचं नातं

लेखक आतिवास यांनी बुधवार, 30/04/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे) वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते. तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात.