Skip to main content

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

करू तो क्या करू ?

लेखक सुजल यांनी बुधवार, 30/09/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही. तर झाल काय एकदा मी मोठ्या कानातल्या रिंगा अशाच खरेदी केल्या . त्या रिंगा बर्याच म्हणजे अगदी बर्याच मोठ्या होत्या आणि तीन चतुर्थावश्य होत्या म्हणजे पूर्ण गोलाकृती नव्हे. घेतल्या घेतल्या आणि लगेच दुसर्या दिवशी ऑफिस ला जाताना घातल्या पण . काय ती हौस ताबडतोब वापरण्याची.

अनुभूती........................मच्छिंद्रगडावरची.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 30/09/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांपूर्वी नणंद म्हणाली,”हल्ली न् बऱ्याच वेळा मी माच्छिन्द्रगडावर जाऊन आले. खूप छान वाटतं तिथे.” “म्हणजेकुठे ग?” या माझ्या पृच्छेवर तिने सविस्तर उत्तर दिले. “अहमदनरच्या पुढे आष्टी तालुक्यात मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तिथे. अग, ठाण्यात घर घेतलं तेव्हा साबांनी दिराच्या मित्राशी बोलायला सांगितलं होतं, तो नवनाथ उपासक आहे. त्यावेळी मी खूप कठीण काळातून जात होते.त्याने मला नवनाथ कथासार वाचायला सांगितलं होतं. तो वास्तूशी संबधितही जाणकार आहे. त्याच्याबरोबर तो काही लोकांना तिथे घेऊन जातो. तशी मी आणि माझ्या काही मैत्रिणी त्या लोकांबरोबर जात असू.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....( वर्गणीचा हिशोब )

लेखक राजू यांनी बुधवार, 30/09/2015 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते. पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते. कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया. कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो. का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध? का. 2- तसं नाय ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय. का. 1-अरे पण आपण देखाव्याचा विषय का.

खरेच आपण डिजिटल झालो आहोत?

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/09/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत. तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे. एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत. खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे. शांताबाय ....शांताबाय ....या फॉरवर्ड होणाऱ्या गाण्याला व इतर अश्लील क्लिप्स,नॉन-वेज जोक्स आणि फालतू फॉरवर्ड जोक्सला वैतागलेला एक त्रस्त सोशल साईट्स वापरकर्ता..... ( विशेष सूचन

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/09/2015 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
असेच गप्पा टप्पा करायला चौकातल्या मित्रांमध्ये बसलो विषय असेच नेहमीचे दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे होते. असेच बोलता बोलता वादग्रस्त विषय आला विषय तसा भरपूर बोलण्याचा असल्याने गरमागरम चर्चा सुरु झाली बोलता बोलता नेहमी प्रमाणे डावे, उजवे व तटस्थ असे गृप पडले.

राग राजस्थानी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 24/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे. मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो .

काहीतरी करण्याची जिद्द

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 24/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण. अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही.

लुटारू..???

लेखक संजय पाटिल यांनी बुधवार, 23/09/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
ताई आणि भाऊजी उद्या येणार म्हणून फोन आला होता. मग काय आईला काय करू नी काय नको असं झालेलं. एक तर जावई पहिल्यांदाच घरी येत होते. त्यात त्यांना रजा नसल्यामुळे सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणार होते. तसेही बाइक वरून एक तासाचा रस्ता होता. त्यामुळे घरातून निघताना ताई फोन करणार होती. म्हणजे आम्ही तयारीत राहणार होतो. स्वागत, पाहुणचार शेजार पाजारी भेट, दुपारचं जेवण त्यानंतर घटकाभर विश्रांती, संध्याकाळी गावदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन, अन सहा- साडेसहाला प्रस्थान असा भरगच्च कार्यक्रम आई ने तयार करून ठेवला होता. ठेवणीतले बेडशीट - कव्हर बाहेर आले होते. इकडे तिकडे पडलेली रद्दी, कचरा साफ करून झाला होता.

चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी

लेखक खेडूत यांनी बुधवार, 23/09/2015 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी भाग -१ भाग -२ भाग -३ भाग -४ भाग -५ भाग -६ मागील सहा भागांमध्ये आपण ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या काही घडामोडी आणि त्याचं आर्थिक गणित थोडक्यात पाहिलं. सध्या कधी नव्हे तो वाहन उद्योग भारतात फोफावला आहे.