पुरूष इतर पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की इतर प्रसिद्ध, रफटफ, रगेल, रंगेल पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की सामान्य पुरूषांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. देव आनंद केसांचा कोंबडा ठेवायचा, मग करा त्याचे अनुकरण. अमिताभ मधोमध भांग पाडायचा, मग पाडा मधोमध भांग. कोहली बेकहॅमसारखे केस ठेवायचा, मग करा कोहलीचे अनुकरण. रितेश दाढी वाढवून केसांचा बुचडा बांधतो, मग करा तसे. प्रसिद्ध पुरूषांच्या केसांच्या शैलीची नक्कल करून आपल्याला त्या पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' इतर पुरूष देत असतात.