डोक्याला ताप (की शॉट)
करोनामुळे सध्या सगळे lockdown होऊन घरात आहेत.. अश्या परिस्थितीत खरेदी होणार कशी, बराच माल घरात भरायचा होता..
मग शेवटी उठलो आणि बाजारात निघालो. तेव्हढ्यात मला एका आठवडी बाजाराची माहिती कळली.. बरेच दिवड तो बाजार ऑनलाइन भरत होता. साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले.
मग म्हणले की आता या बाजारात जाऊयाच.
बाजारात प्रवेश केला आणि समोर बघतो तर काय, नुसत्या मालाच्या राशीच राशी. मला कळेना यात राशी कुठे आहेत आणि माल कुठे, म्हणून दुकानदाराला शोधायला गेलो तर दुकानदार ध्यानात मग्न होते.. सहाय्यकाला विचारले की बाबा ध्यानातून कधी उठतील, तर वेगळीच माहिती कळली.. 188बाबा म्हणे ध्यानातून कधीच उठत नाहीत. ते कायम ध्यानात असल्यामुळेच इतका माल तयार होतो.
हा पहिला धक्का पचवेपर्यंत पुढचा धक्का आला, हा माल म्हणे फुकट आहे, फक्त उचलून न्यायची तुमची क्षमता पाहिजे. सगळा माल एकसारखा, म्हणजे तुम्हाला चहा करायचा असेल, कॉफी करायची असेल किंवा पोळ्या, माल तोच असतो, फक्त आपण म्हणायचं की ही चहापावडर आहे आणि चहात घालायची , की झाला चहा तयार! पोळी हवी असेल तर फक्त पाणी घालून मळायचा, की झाला आटा तयार!
आणि त्यातून तुम्हाला नको असेल तर दुकानात पुढे जा, आमची एकूण 188 दुकाने आहेत.. जिथे जिथे तुम्हाला दुसऱ्या कोणाचा माल घ्यावासा वाटेल तिथे शेजारी आमचे दुकान असणारच, बघा तुम्ही.. कसा घेत नाही तेच आम्ही बघतो!!
आयला म्हणलं हे भारी आहे!!
थोडासा त्यातला माल मी उचलणार, तितक्यातच तिथे एक दुसरे बाबा महाराज आले. ते सगळ्या सगळ्या 188मालाला GI टॅग लावायचं काम करत होते. त्यांना विचारलं तुम्ही काय विकता, तर त्यांनी एका वाक्यात माझी सगळी हवाच काढुन टाकली.
"आम्ही घराणेशाही विकतो"
म्हणजे?
"सांप्रत घराणेशाही ला भरपूर मागणी आहे, त्यामुळे आम्ही ती विकायला काढली आहे.. फुकटच देतो, फक्त घेताना म्हणायचे, घराणेशाही मुरदाबाद!! मग जो हवा तो माल मिळेल. एका बाजूला पेंसे लावलेला माल आहे, एका बाजूला चुना लावलेला आहे, तर एका बाजूला सोनं लावलेला माल आहे. तुम्हाला हवे तसे आम्ही मिक्स करून पण देतो. पण एक मात्र आहे, घराणेशाहीचा GI टॅग लावल्याशिवाय काहीही मिळणार नाही. अजून एक आहे, तुम्हाला जर 188चा माल खाऊन अपचन झालं तर उत्तर म्हणून आमच्याकडे कायमचूर्ण पण मिळतं, ते 3 वाक्याचे चूर्ण गोल गोल फिरवून खाल्लं की काहीकाळ जुलाब थांबतात"
आम्ही पार चक्रावून गेलो हो, पण लगेच भानावर येऊन पुढचा रस्ता पकडला..
तेव्हढ्यात एका ठिकाणी गलका ऐकू आला, म्हणून बघायला गेलो, तर तिथे एक महान गुरुदेव बसले होते. जरा त्यांचे ज्ञान पण पाहूया म्हणून जवळ गेलो, तर त्यानी एकदम प्रश्नांचा भडिमारच केला..
"बंगाल की आयपीएल?"
मी म्हणालो महाराष्ट्र
"F20 की एम80"
मी म्हणालो दोन्ही. हे वाक्य ऐकले मात्र, आणि त्यांचा असला भडका उडाला, की शेजारचे दोन तीन दुकानदार धावत आले. एकाने त्यांच्यावर श्यामवर्णाचा धूर सोडला, त्याने काही होईना, मग एकाने सुकट टाकली, त्याने तर अजून भडका उडाला. मग आपणच काहीतरी करायला हवं, म्हणून मी त्यांना म्हणालो, असू दे मी तुम्हाला चाफ्याचे अत्तर देतो.
अरे देवा देवा देवा.. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी आज जिवंत आहे!!
तोपर्यंत श्यामवर्णीय धूर सोडणारे ते दुकानदार आलेच, ते म्हणाले सध्या हे असं चालू आहे बघा.. दोन वर्षांपूर्वी त्यांनी चाफ्याचे झाड खडसले, तेव्हापासून हे असे वागतात.. तुम्ही आपला माझा माल बघा. त्यांच्या दुकानात बघितलं तर ते तराजू टाकून बसले होते, त्यामध्ये सगळीकडे 20टक्के, 25 टक्के, 5 टक्के, 2टक्के वगैरे असे लिहिलेले ठोकळे होते..
बघा म्हणाले, हा खूप सोपा गेम आहे, हे सगळे ठोकळे गोळा करायचे आणि 40ची बेरीज करायची. फक्त आत एकच, की ठोकळे एकात एक बसणारे असले पाहिजेत.
मी बराच वेळ ते ठोकळे जुळवत बसलो, पण ते काही केल्या जुळेनात. तितक्यात अचानक तीव्र प्रकाशाचा एल झोत आला, आणि बघतो तर काय, चंद्र आणि सूर्य एकत्र उगवले होते.
हे बघून माझी बोबडीच वळली, आणि मी तिथून पळत सुटलो, तरी जी दोनचार वाक्य कानावर पडली, त्यात त्या श्यामवर्णी दुकानदाराचे कोडे चंद्रसूर्याच्या प्रकाशाने अचानक सुटले होते असे मला दिसले.
त्याने काय जादू केली म्हणून मी परत फिरणार, तर एकजण ट्युलिप ची फुले विकत होते. त्यांना विचारलं फुलं केव्हढ्याला? तर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून छातीच दडपून गेली.
ती फुलं दिल्लीच्या थंडीत अनेक दिवस ग्रीन house मध्ये थंडी वाऱ्याचा सामना करत होती, जवळ जवळ तीन महिने. तीन महिने ग्रीन हाऊस मध्ये काढणे म्हणजे सोपे काम आहे का? अहो म्हणालो किंमत काय? तर म्हणाले तुम्हाला परवडणार नाही.. भाकरी फिरली तरच ती किंमत वसूल होईल.. आम्ही पोळ्या खत असल्यामुळे हा भाकरी फिरण्याचा प्रकार काही आम्हाला पचला नाही, म्हणून परत निघालो, तर ते असले संतापले, म्हणाले त्या फुलांच्या चिकाटीचे काही कौतुक आहे की नाही? थंडी वारा, ऊन पावसात ती फुले ग्रीन हाऊस मध्ये राहिली, त्याला काही किंमत आहे की नाही?
मी घाबरलो, आणि बाहेर निघणार, तितक्यात एक जण एकटाच झब्बू खेळत बसलेला दिसला.
म्हटलो का रे बाबा एकटाच झब्बू खेळतोस? म्हणाला नाहीतर काय, सगळा नुसता डोक्याला शॉट आहे. पूर्वी झब्बूचा डाव काय रंगायचा म्हणून सांगू.. पण अकुनानांच दुकान अचानक बंद झालं, आणि आणि 1008 सर्वज्ञानी एका पो वरून घसरून पडले, तेव्हापासून कच्चा माल मिळणं बंद झालंय.
तरी मध्ये एकदा झब्बू लावला होता, पण सगळे नेहमीचे प्लेयर खेळ सोडून गेले, त्यामुळे आता एकटाच बसतो झालं.
आता मात्र कहर झाला, मलाच चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं, म्हणून डोळे मिटले, तर तोंडावर पाऊस पडायला लागला.. डोळे उघडले, तर बायको तोंडावर पाणी मारत होती
वर्गीकरण
वाचने
8493
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
बाजाराचं असंच असतंय.
In reply to बाजाराचं असंच असतंय. by कंजूस
:)
छान लिहिले आहे
In reply to छान लिहिले आहे by मुक्त विहारि
आजच बाजारात पाणी आले आहे ...
In reply to आजच बाजारात पाणी आले आहे ... by मुक्त विहारि
बाजारात बूट पण आले आहेत ...
In reply to छान लिहिले आहे by मुक्त विहारि
हलके घेतल्याबद्दल आभार!
In reply to हलके घेतल्याबद्दल आभार! by आनन्दा
काय आहे, की ....
In reply to काय आहे, की .... by मुक्त विहारि
आहे, गेलेत तिथे 2-3 वेळेस
In reply to आहे, गेलेत तिथे 2-3 वेळेस by आनन्दा
छान छान
ही ही ही...
In reply to ही ही ही... by खेडूत
भारी लिहीले आहे
हैहैह्ह
बोल्ड
अक्षरात लिहून फेकतो, मग कुठे जीवाची तगमग कमी हुते.In reply to हैहैह्ह by डॅनी ओशन
तुम्ही नका टेंशन घेऊ...
+१
In reply to +१ by वामन देशमुख
हो, विसरलोच!!
In reply to हो, विसरलोच!! by आनन्दा
असं विसरू नका ...
यातील काही संदर्भ समजले नाही.
मालवाले खूप हायती
मायला डोस्क्याला ताप