मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझ्या अतिशय अधीर आणि xxxxx स्वभावाचे काय करावे???

आनन्दा · · काथ्याकूट
प्रेरणा अर्थात - माझी सहनशक्ती खूप कमी आहे ,आणि राग आला की माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला लोकांचा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे लोकांचा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. दिल्लीत जरा कुठे खुट्ट झाले म्हणजे ' ये मोदी का षड्यंत्र है ' म्हणून देशभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील एकेदेखील माझ्यापेक्षा सहनशील असेल इतका मी अधीर आहे.आधीचाच लोकांचा असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा अधीर स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या अधीर स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका बोल्ड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता .मी लागलीच सावरले ,पण त्या प्रकरणात माझ्या कपड्यांवर जे डाग पडले,काही दिवस मला त्यामुळे लोक अमेरिकन पाय म्हणून चिडवत होते .माझं बोलणंच बंद झालं होतं. तर असा हा अधीर स्वभाव आहे,यातही भर म्हणून की काय ,मी अतिशय बेधडक देखील आहे.कुणी जरा प्रेमाने बोललं की माझ्या मनाला गुदगुल्या होतात, बराच काळ मी त्या विचारात राहतो,काय काय येते ते इथे सांगू शकत नाही येते. संयम सहन होत नाही. आजुबाजुला काही घडले ,वर्तमानपत्रातल्या खून ,बलात्काराच्या बातम्या वाचल्या,रस्त्यावरच्या प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो. तर माझे काही प्रश्न आहेत.आंतरजालावरच्या धुरीणांनी मार्गदर्शन करावे. १. अतिशय अधीर व बेधडक स्वभावाचे काय करावे? २. अति (xxxxx) वर कशी माती करावी? ३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय अधीर आणि xxxxx स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! कृपया मार्गदर्शन करावे.

वाचने 2832 वाचनखूण प्रतिक्रिया 8

यशोधरा 30/11/2016 - 17:08
काहीतरी चांगलं लिहा रे मिपावर. कोणीतरी काहीतरी टिनपाट धागा काढला की त्याच्या विडंबनाच्या धाग्यांची लोणची काय घालत बसता! त्यापेक्षा काहीतरी बरे लिहा ना. :(

ओम शतानन्द 04/12/2016 - 17:30
'द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् । एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः ।।" अर्थः---रावण माल्यवान् से कहता है---"मैं बीच में से दो टुकडे हो जाऊँगा, परन्तु किसी सामने झुकूँगा नहीं, यह मेरा स्वाभाविक दोष है और स्वभाव अपरिवर्तनशील होता है ।"

In reply to by ओम शतानन्द

रावण मल्ल्यासे से कहता है... असे वाचले. सद्य परिस्थितीचा परिणाम, दुसरे काय ? =)) (हघ्या)