डोक्याला ताप (की शॉट)

करोनामुळे सध्या सगळे lockdown होऊन घरात आहेत.. अश्या परिस्थितीत खरेदी होणार कशी, बराच माल घरात भरायचा होता.. मग शेवटी उठलो आणि बाजारात निघालो. तेव्हढ्यात मला एका आठवडी बाजाराची माहिती कळली.. बरेच दिवड तो बाजार ऑनलाइन भरत होता. साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले. मग म्हणले की आता या बाजारात जाऊयाच. बाजारात प्रवेश केला आणि समोर बघतो तर काय, नुसत्या मालाच्या राशीच राशी. मला कळेना यात राशी कुठे आहेत आणि माल कुठे, म्हणून दुकानदाराला शोधायला गेलो तर दुकानदार ध्यानात मग्न होते.. सहाय्यकाला विचारले की बाबा ध्यानातून कधी उठतील, तर वेगळीच माहिती कळली..

मिसळपाव updates आणि त्या सोबत एक गोष्ट मोफत: कॉपी टू कॉपी - माशी टू माशी

(कॉपी टू कॉपी - माशी टू माशी) बरेच लोक मिसळ खातात पण खाण्याच्या गडबडीत तर्री ऑर्डर करायची विसरून जातात म्हणून हा एक धागा तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० रुपयाला १ मसाला पाव आहे कोणी फीडबॅक देऊ शकेल? ह्या भागात ह्या वर्षी खाद्यजत्रा लागली होती का ? --------------------------------------- (अनेक बाबतीत लिहीता आले असते. पण टंकाळा केला. तुम्ही लिहा मात्र.) कॉपी टू कॉपी - माशी टू माशी - आजच्या पिढीसाठी गोष्ट (हेच नविन साहित्य आहे.) एका शाळेत वर्गशिक्षकांनी मुलांना गृहपाठ करायाला सांगितला होता. एका हुषार मुलाने तो करून आणला.

चार पाच प्लेट भाजी खरेदी

(हे या रेसेपीचे पुरस्कर्ते आहेत.) २०२० पर्यंत भाज्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, बिगर तेलाच्या भाज्या येणार आहेत तर आता भाजी घेणे किती सयुक्तिक आहे? रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते तर उकडलेली, तळलेली किंवा भाजलेली ह्यापैकी कशाने बनलेली भाजी सयुक्तिक आहे? अर्थात महिन्याभरात फारतर एखादे दुसरी भाजी महाराष्ट्रातील होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच भाज्या जास्त किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून वाढतील का? नवीन नॉर्म्समुळे शिळ्या भाज्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का?

पालक खाण्यामुळे झालेले बदल

संदर्भ पालक होण्यामुळे झालेले बदल मी एकेकाळी अगदी बेछूट माणूस होतो. काहीही खायचो - रात्री ९ वाजता सुरु झालेली खादाडी सकाळपर्यंत चालायची. ट्रेकला गेलो कि काहीही खायचे धाडस करायचो, शेकडो गोष्टी हादडायचो. मजबूत खादाडखाऊ होतो, गाडीत कायम एक शॉपिंग बॅग असायची आणि कुठेही रस्त्यावर टपरी दिसली तर ती काढण्याचीही तयारी असायची.

काही धाग्यांचा नक्की उद्देश काय!!!! टाईमपासची सोय? विचारमंथन ? की आणखी काय??????

आमची प्रेरणा =====> http://www.misalpav.com/node/39799 गाभा: संकेतस्थळे कशी अस्तित्वात आली? यावर समाजशास्त्रज्ञां(?)चं एकमत आहे.पुर्वापार सकल मानव-जात, हे अहंला पोसत असल्याने, मी म्हणतो तेच सत्य, हा रोख होता-आहे आणि असणार.त्यातूनही बुद्धीला गहाण ठेवले की, आपल्या मेंदूतून निघालेला प्रत्येक विचार हा परीपुर्णच असणार ह्याची १००% स्वखात्री. मराठी संकेतस्थळांचे उगम, अस्तित्व आणि त्यांची विचारसरणी, ह्यावर आमचा अभ्यास सुरु आहे. पण पुर्वी पारावरच्या गप्पा किंवा चाळीतल्या नळावरची भांडणे होत असत, असा उल्लेख काही साहित्य कृतीत वाचलेला आठवतो.

(वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये)

डिअर ऑल, मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Embarrassment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझी ग्राफिक डिझायनर मुलगी करेल.

माझ्या अतिशय अधीर आणि xxxxx स्वभावाचे काय करावे???

प्रेरणा अर्थात - माझी सहनशक्ती खूप कमी आहे ,आणि राग आला की माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला लोकांचा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे लोकांचा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. दिल्लीत जरा कुठे खुट्ट झाले म्हणजे ' ये मोदी का षड्यंत्र है ' म्हणून देशभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील एकेदेखील माझ्यापेक्षा सहनशील असेल इतका मी अधीर आहे.आधीचाच लोकांचा असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा अधीर स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील

पुरूष इतर पुरूषांची बरोबरी का करतात?????

पुरूष इतर पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की इतर प्रसिद्ध, रफटफ, रगेल, रंगेल पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की सामान्य पुरूषांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो. १. देव आनंद केसांचा कोंबडा ठेवायचा, मग करा त्याचे अनुकरण. अमिताभ मधोमध भांग पाडायचा, मग पाडा मधोमध भांग. कोहली बेकहॅमसारखे केस ठेवायचा, मग करा कोहलीचे अनुकरण. रितेश दाढी वाढवून केसांचा बुचडा बांधतो, मग करा तसे. प्रसिद्ध पुरूषांच्या केसांच्या शैलीची नक्कल करून आपल्याला त्या पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' इतर पुरूष देत असतात.

<पुरुष बायकांची बरोबरी का करतात>

प्रेरणा पुरुष बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. गेली काही वर्षं मी आजुबाजुला बघतो की बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की पुरुषांना आपलं मर्दानी सौंदर्य सिद्ध केल्याचा फील येतो. १. बायका दाढी करत नाही, मग करा त्यांचे अनुकरण. हल्ली बेफिकिरीत दाढी वाढवून पुरुष स्वतःला बायकांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' देत असतात. आता राहुल गांधी बरा दिसतो हाच एक त्याचा प्लस पॉइंट होता. पण नाही, बायकांची नक्कल करता करता त्याने तेवढंही गमावलं. २. बायका भरजरी कपडे वापरतात. मग पुरुषही त्यांचं अनुकरण करतात.
Subscribe to विडंबन