Skip to main content

ताज्या घडामोडी

ताज्या गैर-राजकीय घडामोडी भाग-१

लेखक अमितदादा यांनी शनिवार, 13/05/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी ची चर्चा करण्याकरता ताज्या घडामोडी हा धागा होता, परंतु सध्याची त्याची नवीन आवृत्ती फक्त राजकीय घडामोडी ची चर्चा करण्यासाठी असल्याने नवीन अराजकीय घडामोडी किंवा घटना तिथे टाकण्यास मर्यादा येत आहेत, त्यामुळे अराजकीय घडामोडी साठी हा नवीन धागा. नुकतीच एक चिंताजनक बातमी वाचली, हीच बातमी मी तीन कि चार वर्षपूर्वी वाचलेली, परंतु यातून सरकार ने कोणताही धडा घेतला नाही हे पाहून आणखी चिंताजनक वाटतेय. हि बातमी आहे भारतातील औषधनिर्माण कंपन्यातील औषध कचऱ्यापासून तयार होणार्या सुपरबग ची.

ताज्या घडामोडी : भाग ५

लेखक गॅरी ट्रुमन यांनी मंगळवार, 11/04/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे. दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता.