Skip to main content

ताज्या घडामोडी

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 06/02/2021 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते.

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 02/02/2021 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे. म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची.

ताज्या घडामोडी - भाग २५

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 11/03/2018 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली.

ताज्या घडामोडी - भाग २१

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 01/02/2018 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे. अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही.

ताज्या घडामोडी - भाग १८

लेखक गॅरी ट्रुमन यांनी सोमवार, 11/12/2017 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे. Rahul ते १६ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. राहुल गांधी गुजरातमधील मतदान पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बनणार नाहीत असे वाटतच होते. तसेच होणार असे दिसते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणे गुजरात मधील मतदानापर्यंत लांबविण्यासाठी कोणी डमी उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा केला जाईल असे वाटले होते तसे मात्र झालेले दिसत नाही.

ताज्या घडामोडी - भाग १५

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शुक्रवार, 03/11/2017 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्‍यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच.

ताज्या घडामोडी - भाग १४

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 26/10/2017 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-choha…

ताज्या घडामोडी: भाग ७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 20/07/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे. मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत. पुढच्या फेर्‍यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.