"एक बदक, एका मोराला 'कबुतर' म्हणाला" असे हंसाने बगळ्याला सांगितले; तर मोराला 'कबुतर' म्हणावयाची चूक कोणी केली? बदकाने का हंसाने ? कोणताही शहाणा माणूस चूक (असलीतर) बदकाची आहे म्हणेल, हंस बगळ्याला जे घडले आहे ते सांगतो आहे पण बगळा हंसाशी उलटा कसा भांडतो बघा बदकाचा संवाद माझ्या समोर कुणी म्हटला हंसाने म्हटला म्हणजे बदक नव्हे तर हंसच दोषी आहे.
असा विचीत्र न्याय लावून, आज राज्यसभेत काँग्रेसच्या आनन्द (??) शर्मा (?) नामक नेत्याने कमाल करून दाखविल्याचे येत असलेल्या बातम्यांवरुन दिसते (संदर्भ: एनडीटीव्ही डॉटकॉमवर बातमीतील ७वा मुद्दा २६/२.१६ दुपारी दिडवाजता जसा दिसला)
राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरीष्ठ सभागृह आहे. उर्वरीत भारतात आणिबाणी असेल तेव्हासुद्धा संसद सदस्यांचे संसद सभागृहातील म्हणजे लोकसभा अथवा राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य अबाधित असते. संदर्भ (सभागृहाने बनवलेल्या निती नुसार एखादा उल्लेख फारतर कामकाजातून वगळता येऊ शकतो) उद्देश सरळ आहे संसद सदस्यांना त्यांची जी काही बाजू असेल ती कोणत्याही आडकाठी शिवाय मांडता आली पाहीजे.
JNU मध्ये पौराणिक देवता दुर्गेच्या महिषासूरमर्दीनी रुपाचा काही विद्यार्थ्यांकडून अनमान केला जात होता असा उल्लेख राज्यसभेत मंत्रि स्मृती इराणींनी घेतला. JNUच्या 'त्या' डॉकुमेंटात जे काही आहे ते राज्यसभेत स्मृती इराणींनी वाचून दाखवले.
एनडीटीव्ही डॉटकॉमवर बातमीतील ७वा मुद्दा बरोबर असेल तर आता हे आनंद शर्मा तुम्ही राज्यसभेत वाचूनच कसे दाखवले म्हणून स्मृती इराणींच्या नावाने गहबज करत आहेत. म्हणजे त्यांना (की काँग्रेसला ?) राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य मान्य नाही, JNUती विद्यार्थ्यांनी भाषणस्वातंत्र्याचा अनावश्यक वापर केला तो मात्र मान्य आहे असा हा विचीत्र न्याय आहे. राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे ते हिरावून घेणे कुणाच्याही बसची बात नाही पण असे विचीत्र बादरायण संबंध दाखवून सर्वसामान्य जनतेला येडा का खुळा नेमके काय समजण्याचा प्रयत्न हि मंडळी करत आहेत ?
संसदेच्या ज्येष्ठ सभागृहात काहीतरी गुणात्मक चर्चा कराना देशाचा पैसा का वाया घालवतात ते आकलना पलिकडे आहे.
वाचन संख्या
4389
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा!
महात्मा गांधींची काँग्रेस
In reply to हाहाहा! by पैसा
लिप सर्विस = तोंडपुजेपणा
In reply to महात्मा गांधींची काँग्रेस by माहितगार
ओह धन्यवाद
In reply to लिप सर्विस = तोंडपुजेपणा by अभ्या..
पण माहितगार साहेब,
In reply to महात्मा गांधींची काँग्रेस by माहितगार
थोडी सुधारणा -
In reply to पण माहितगार साहेब, by बोका-ए-आझम
धन्यवाद गुरुजी.
In reply to थोडी सुधारणा - by श्रीगुरुजी
१९७७ मधील पराभवाची जबाबदारी
In reply to धन्यवाद गुरुजी. by बोका-ए-आझम
ज्याला आय (I) नाय त्याला काय नाय
In reply to थोडी सुधारणा - by श्रीगुरुजी
भाजपाकडे बोट दाखवुन त्यांना
स्मृती इराणींसारख्या एका
In reply to भाजपाकडे बोट दाखवुन त्यांना by मृत्युन्जय
स्मृती इराणींसारख्या एका कलावंताला तुच्छ ठरवण्याचा कट यामागे शिजतो आहे काय?फॅसीझमचे व्यवच्छेदक लक्षण नंबर ११उगाच हळहळु नका भाजपसाठी. सारे
In reply to भाजपाकडे बोट दाखवुन त्यांना by मृत्युन्जय
शुद्ध बावळटपणा चालू आहे.
!
भारतीय देवता काळ्यावर्णाचे
In reply to ! by चेक आणि मेट
ते पत्र वाचून दाखविण्याआधी
तुम्ही काँग्रेसींना खांग्रेसी
In reply to ते पत्र वाचून दाखविण्याआधी by श्रीगुरुजी
अानंद शर्मा आणि जयराम रमेश
किमान स्वरुपाची तर्कसुसंगतता
In reply to अानंद शर्मा आणि जयराम रमेश by बोका-ए-आझम
त्याच्या आधी मला राहुल
In reply to अानंद शर्मा आणि जयराम रमेश by बोका-ए-आझम
त्यांनी (सल्लागारांनी)
In reply to त्याच्या आधी मला राहुल by मोदक
त्यांचा मुद्दा काहीसा असा आहे
त्या गोष्टीचा उल्लेख संसदेत
In reply to त्यांचा मुद्दा काहीसा असा आहे by sagarpdy
हल्ली हेच राजकारण चाललेय आनंद
कँटिन मध्ये कुठले तरि चिंधि न्युज चॅनेल सुरु होते आत्ता
अहो, ते आधिपासुनच आहे
रावणावर महात्मा रावण पुस्तक
ब्राम्हणी समाजव्यवस्थेने
In reply to रावणावर महात्मा रावण पुस्तक by प्रतापराव
ब्राम्हणी समाजव्यवस्थेने आपल्यावर हे सर्व थोपले.आदर्श राजांना असुर म्हणुन हिणवले. रावणावर महात्मा रावण पुस्तक आहे. बळी, महिषासुर यांचीही गौरवपर पुस्तके आहेत, हिरण्यकश्यपुचेही गुणगाण आहे. मोदी यायच्या आधिपासुन अशा विचारधारा आहेतअहो पण मुळात रावण ब्राह्मण होता आणि अटलबिहारी वाजपेयी ज्या वंशाचे आहेत (कान्यकुब्जवंशीय कनौजी ब्राह्मण) ते लोक नियमीतपणे रावणाची पुजा करतात. :))अहो ते वाचले आहे मी तुम्हाला
मी कुठल्याही विचारसरणीच्या
In reply to अहो ते वाचले आहे मी तुम्हाला by प्रतापराव
मनोरंजन होते हे खरे पण या
In reply to अहो ते वाचले आहे मी तुम्हाला by प्रतापराव
मुळात हे वादच मनोरंजक असतात
In reply to मनोरंजन होते हे खरे पण या by sagarpdy