Skip to main content

क्रिकेट

विवादी सूर : चौकटीपालिकडले काही

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 23/08/2026 14:34 या दिवशी प्रकाशित केले.

ये मोह मोह के धागे 

तेरी उंगलियोंसे जा उलझे

कोई टोह टोह ना लागे

किस तरह गिरह ये सुलझे

है रोम रोम एक तारा.....

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ घोषित

लेखक वेडा बेडूक यांनी मंगळवार, 30/04/2024 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा धनी ठरत असलेल्या हार्दिक पंड्या याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

आय पी एल - दशकपूर्ती

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 06/04/2017 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सालाबादप्रमाणे यावर्षीही आमचे येथे श्री बीसीसीआय कृपेकरून दि. ५ एप्रिल ते २१ मे या काळात आयपीएल सारखी, क्रिकेट या खेळाचा सर्वांगीन विकास करणारी स्पर्धा भरवण्यात येत आहे, तरी प्रेक्षकांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा ही नम्र विनंती !! =)) अनेक संकटांवर मात करत आणि लोकप्रियतेचे नवे कळस गाठत(हं, आता काही लोकं याला नाकं मुरडतीलही ;)) या स्पर्धेने म्हणता म्हणता दहा वर्ष पूर्ण केली. दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरांनाही आयपीएल दहा वर्षांचा पल्ला गाठेल असं वाटलं नव्हतं. त्याचं कारण बरीच रामायणं-महाभारतं या दहा वर्षांच्या काळात या स्पर्धेमुळे घडली असं म्हणता येईल.

थेट गहुंजेवरून . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 22/02/2017 23:18 या दिवशी प्रकाशित केले.

भारत वि. ऑस्ट्रेलिया ४ कसोटी सामन्यांची मालिका

उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल. मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन.