मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव IPL ESPN Cricinfo Fantasy LEAGUE

साधा मुलगा · · क्रिडा जगत
क्रिकेट विश्वचषक २०१५ च्या वेळी मिपावरील काही जणांनी ESPN Cricinfo वरील fantasy league मध्ये भाग घेतला होता. खरेतर आयत्या वेळी मिपाचा ग्रुप तयार करून ३-४ जणच त्यात सहभागी झाले. म्हणून IPL साठी मी मुद्दामून वेगळा धागा काढत आहे. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी league name: misalpav password: misalpav ज्यांना fantasy league हि काय भानगड आहे माहिती नाही त्यांच्यासाठी पुढील माहिती : हि एक मनोरंजांसाठी काढलेली एक स्पर्धा अथवा खेळ आहे. आपण आपल्या आवडत्या खेळाडूंची निवड करू शकता आणि LIVE सामन्यातील त्यांच्या कामगिरीनुसार आपल्याला गुण मिळत जातात.स्पर्धेअखेरिस ज्याचे सर्वात जास्त गुण तो जिंकतो. प्रत्येक सामना सुरु होण्याआधी आपण आपली टीम निवडू शकता. त्याचे सर्व नियम येथे मिळतील http://games.espncricinfo.com/Fantasy/HowToPlay खरेतर ८ एप्रिल पूर्वी सांगायला हवे होते पण अजूनही बरेच दिवस आहेत, लवकर जॉईन झालात तर चांगले. कोणाला किती गुण मिळतील आणि अखेरीस कोण पहिला येईल हा सर्व नशिबाचा भाग आहे. league join करण्यासाठी सूचना १) पहिले espn cricinfo या साईट वर जा. fantasyपर्याय निवडा. या साईटचे सभासद नसाल तर register व्हा. यासाठी आपण आपला email id , facebook,twitter अथवा google + account वापरू शकता. २) नंतर आत प्रवेश मिळल्यावर उजव्या कोपर्यातील tutorial हा पर्याय आपल्याला मार्गदर्शन करेल. त्यानंतर टीम बनवायचे सर्व नियम बघा आणि आपली टीम निवडा. ३) एकदा आपली टीम बनवलीत कि मग league चा पर्याय उपलब्ध होईल. leagues option मध्ये जा. join league option madhe ja. league name: misalpav password: misalpav या league च्या विजेत्यास पुढील कट्ट्यावर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल. काहीही अडचण आल्यास जरूर विचारा. तेव्हा उत्सुक लोकांनी लवकरात लवकर सहभागी व्हा.

वाचन 23198 प्रतिक्रिया 0