आय पी एल - दशकपूर्ती
नमस्कार,
सालाबादप्रमाणे यावर्षीही आमचे येथे श्री बीसीसीआय कृपेकरून दि. ५ एप्रिल ते २१ मे या काळात आयपीएल सारखी, क्रिकेट या खेळाचा सर्वांगीन विकास करणारी स्पर्धा भरवण्यात येत आहे, तरी प्रेक्षकांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा ही नम्र विनंती !! =))
अनेक संकटांवर मात करत आणि लोकप्रियतेचे नवे कळस गाठत(हं, आता काही लोकं याला नाकं मुरडतीलही ;)) या स्पर्धेने म्हणता म्हणता दहा वर्ष पूर्ण केली. दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरांनाही आयपीएल दहा वर्षांचा पल्ला गाठेल असं वाटलं नव्हतं. त्याचं कारण बरीच रामायणं-महाभारतं या दहा वर्षांच्या काळात या स्पर्धेमुळे घडली असं म्हणता येईल.
मिसळपाव