नोंद : 'चर्चा' ह्या लेखन प्रकाराखाली दीलेले हे खालील आवाहन, सुचना वाचली आहे. व ते लक्षात ठेऊन लिहत आहे.
केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.नमस्कार मिपाकरांनो, मी विओन (WION) ह्या युट्युबवरील बातमी देणा-या चॅनलचा फॅन आहे म्हणजे मला ते चॅनल फार आवडते. त्यातल्या पल्की शर्मा ह्या आता ते चॅनल सोडुन गेल्या. झी न्युजचे एडीटर सुनील चौधरी (अकाली सफेद केस असणारे) हे ह्या चॅनलचे ही एडिटर आहेत असे मध्ये वाचनात आले होते. मुख्य एडिटर कि ज्युनिअर की संपादकीय हे ह्या धाग्याच्या स्कोपच्या बाहेर आहे व काही महत्वाचे नाही. महत्वाचे हे आहे की कुठे कुठली बातमी दीली जात होती. तर मी बोलतोय त्या ह्य खालील विओनवरच्या बातम्या: https://www.youtube.com/watch?v=JXQIGh-4i14&ab_channel=WION https://www.youtube.com/watch?v=PABFUzK34LQ&ab_channel=WION ह्या गुणी विओन चॅनेलला त्या भाड-गुणी गुगल कंपनीने ईतर बातमी देणा-या चॅनल्सबरोबर युक्रेन-रशिया युध्दादरम्यान बॅन केले होते. तेव्हा पल्की शर्मांचा 'आयकॉन' आणि वरती एक स्लोगन असा ट्वीट माझ्यासारख्या भावना असलेल्या व्यक्तीने ट्विटर वर फिरवला(?). ती बातमी व ती ईमेज पुढील बातमीत दीसते : https://www.wionews.com/india-news/ukraine-war-coverage-youtube-backs-d… आणि त्याला ईतका पाठींबा मिळाला की ईतर सर्व चॅनल्स बॅनच, बंदच राहीली. पण गुगलला त्या प्रचंड पाठींब्यापुढे झक मारुन मघार घ्यावी लागली, हरावे लागले. आणि आमच्या पल्की मॅडम पुन्हा विओनवर अवतरल्या. आणि आता त्यांचा वारसा ईतर व्यक्ती त्याच जोमाने चालवत आहेत हे बघुन उर भरुन येतो, हे सांगणे मला अतिशयोक्ती नाही वाटत. ते असो, तर ह्या दोन बातम्या बघुन ईतर कोणाच्याही, अगदी आपल्याही होतील अशा माझ्या भावना, समजुत झाल्या. त्या खालीलप्रमाणे: i. गेल्या वेळेला अगदी ह्याचप्रमाणे चायनाबद्द्ल बातम्या येत होत्या पण त्यावेळी २ ते ३ महीन्यांनी भारतात कोरोना आला. ह्यावेळी चायनाचा आकडा त्याहीपेक्षा मोठा आहे व ह्या बातम्या मी गेल्या १५ ते २० दीवसांपासुन बघत आहे, मग ह्यावेळी सुध्दा? पुन्हा?? कारण चीनमधली सध्याची स्थिती खुपच भयानक वाटत आहे, अगदी पहिल्यापेक्षा (ह्या भावना ह्यां बातम्यामुळे तयार झाल्या, ते साहजिकच आहे.) ii. ह्या बातम्या विओनवरच्या आहेत ह्याला सिरीयस घेउन पुढच्या कामांबद्दल निर्णय बदलावे का? काही एक, दोन महीन्यांकरता? म्हणजे एवढ्या गंभीरपणाने मी ह्या बातम्यांचा विचार करत होतो. कोणीही जी व्यक्ती सतर्क आहे ती असा विचार करेल, अश्या बातम्या विओनसारख्या गुणी चॅनेलने दील्या असल्याने. पण तेव्हाच........ अंड सडले की त्याचा जो दुर्गंध येतो व अशा घाण उपमा ज्यांना खर म्हणजे चांगल्या ठरतील त्यापेक्षा खालच्या दर्जाचेही न्युज मिडीया असते हे मला आठवले. अश्या काही चॅनल्सना अॅडब्लॉकर चिटकवुन बघु लागलो. तर हे टपकले; https://www.youtube.com/watch?v=7G-63oIHry0&ab_channel=ABPMAJHA हेभीपी म्हाजावर वरच्या अर्थाची बातमी ऐकली तेव्हा खरच खुप घाण शब्द तोंडात आले. नको तिथे सकारात्मकता पसरवणे, म्हणजे फसवणुक करणे अस मला वाटत, कळत व समजत. कोणाचे भले करणे ह्याला नाही बोलत. आता फक्त ही बातमी ज्यांनी बघितली त्यांच्या व माझ्या विचारांत, म्हणण्यात फरक असणार हे पण साहजिकच आहे. कृपया ह्या दोन बातम्यांमधील विरोधाभास कोणी स्वानुभवाने, विश्वासु (विओनसु) माहीतीने,आकलनावर आधारलेल्या ज्ञानाने देऊ शकेल काय?
वाचने
2514
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
३ ते १० मिनिटे ह्या बातममीमधली
चानेल मालकाचा /चालवणाऱ्या देशाचा कल असतोच.
तृष्णा - भाग ५
आपले ह्याबाबतचे विचार, मत तंतोतंत पटले, ते असो बाजुला.........
Gravitas: China sends infected flights to Milan..