Skip to main content

चालू घडामोडी

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 13/08/2021 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे.

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 05/08/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता.

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 13/05/2021 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. gouriamma गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या.

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग १)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 01/04/2021 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे. पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut… जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली ग

आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 15/03/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी प्रसिद्ध यूटुबर लिली सिंह ( अर्थात कॅनडात राहणारी ) हिने चक्क जगप्रसिद्ध अश्या ग्रामी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय शेतकरी आंदोलनाला साथ देणारा मास्क घातला" अहाहा धन्य धन्य.. काय बातमी आणि हो त्याला दिया मिर्झाने साथ दिली... आजचा दिवस सार्थक झाला ... ताजा कलाम : पुढील निवडणूक यु ट्यूब आणि फेकबुक वॉर घ्येण्यात येणार आहे

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 11/03/2021 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे.

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 08/03/2021 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते.

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 05/03/2021 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत.

चालू घडामोडी - मार्च २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 01/03/2021 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्च महिना सुरू झाल्याने या महिन्यातील घडामोडींसाठी नवा धागा काढत आहे. आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे लिहिताक्षणी राज्यपालांचे अभिभाषण सुरू आहे.

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 19/02/2021 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.