Skip to main content

चालू घडामोडी

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 16/02/2021 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत.

चालू घडामोडी - जानेवारी २०२१

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 10/01/2021 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेने तैवानवरील नियंत्रणे हटविल्याने चीनला संताप अनावर झालाय. मागील १-२ वर्षांपासून चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानला पाठबळ देतेय. अमेरिका व तैवानचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात अधिकृत भेट द्यायला लागल्याने चीन अत्यंत नाराज आहे. आता यापुढील पाऊल म्हणजे अमेरिकेने तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून अधिकृत मान्यता देणे. तसे झाले तर चीन संतापून तैवान ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू शकतो. आता भारताने सुद्धा वन चायना धोरणाला मूठमाती देऊन तैवानशी संबंध वाढवून तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी.

चालू घडामोडी : जून २०१९

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 05/06/2019 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.

चालू घडामोडी - एप्रिल २०१९

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 03/04/2019 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता.

चालू घडामोडी - जून २०१८

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 12/06/2018 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता.

ऑनलाईन खरेदी असाही एक अनुभव.

लेखक Nitin Palkar यांनी रविवार, 11/03/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
अॅमेझॉन या ऑन लाईन शॉपिंग साईट वरून एक टी शर्ट COD (Cash on Delivery) ने मागवला. डिलिव्हरी आल्यावर डेबिट कार्डने पैसे दिले. पार्सल उघडून बघताच टी शर्ट योग्य मापाचा नसल्याचे जाणवले. तो परत करण्याकरता अॅमेझॉनच्या वेब साईट वर विनंती केली व परतावा रक्कम ‘अॅमेझॉन पे बॅलन्स’ मध्ये जमा करण्याचा पर्याय दिला. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या कुरियरने पार्सल नेले. वेब साईट वरील माहितीनुसार पार्सल नेल्या पासून सहा तासात रक्कम माझ्या खाती जमा व्हायला हवी होती. ती न झाल्याने दोन दिवसांनी अॅमेझॉनच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी दूरध्वनिद्वारे संपर्क साधला.

मुंबई नेव्हर सेटल्स

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 03/09/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2017/09/mumbai-spirit-monsoon.html "काहीही म्हण हं, मुंबई नेव्हर स्टॉप्स" "काहीही म्हण हं, मुंबईच्या स्पिरिटला तोड नाही" "काहीही म्हण हं, अशा वेळी माणुसकी दिसते" असे संवाद गेले दोन दिवस ऐकायला येतायत, आणि प्रश्न पडतायत की, हे 'काहीही' जे आहे ते कधी म्हणायचं?, 'अशी वेळ' नसते तेंव्हा कुठे जातं हे 'स्पिरिट'? आणि शुड मुंबई नेव्हर स्टॉप? सोशल मिडिया वरच्या असंख्य संदेशांनी डोकं भंडावून सोडलं होतं.

संकटातून संधी

लेखक नाखु यांनी मंगळवार, 12/07/2016 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आडते आणि घाऊक दलाल यांनी बंद पुकारला निमित्त होते सरकारच्या शेतीमाल थेट (विनानियंत्रण) कुठे विकण्याच्या सुधारीत आदेश अंमलबजावणीचे. दुर्दैवाने ज्यांचे पोट रोजच्या हमालीवर/हजेरीवर अवलंबून आहे त्यांनीही (मापाडी/तोलारी/हमाल) विरोध दर्शवण्यासाठी बंद मध्ये भाग घेतला.

इजिप्त एयरलाइन्सचे विमान

लेखक स्मिता. यांनी शुक्रवार, 20/05/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं! लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असणार. पण आज या खेळाची आठवण आली ती कालच्या दुर्दैवी घटनेमुळे. इजिप्त एयरलाइन्सचं पॅरिसहून कैरोला निघालेलं विमान भूमध्य समुद्रात अचानक गायब झालं. ग्रीस एयर ट्रॅफिक कंट्रोलचं म्हणणं आहे की ग्रीसच्या एयरस्पेस मधून केवळ १० मैल दूर गेल्यावर विमानाचा रडारसोबत संपर्क तुटला. हे विमान अदृश्य झाले नसते तर त्या वेळेनंतर अवघ्या काही मिनिटात कैरोला पोहोचणार होते. उड्डाणाच्या सुरुवातीपासून तर ग्रीक एयरस्पेस सोडेपर्यंत कोठेही काहिही संशयास्पद नव्हतं.

स्वच्छ भारत अभियान

लेखक सत्य धर्म यांनी बुधवार, 02/12/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छ भारत अभियान आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदि यांच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत अभियान प्रकल्पासाठी निधी जमा करण्याचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने ०.५ % tax १५ नोव्हेंबर पासून लागू केला. हे जमा होणारे उत्पन्न स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्याच्या जाहिरातीसाठी खर्च होणार आहेत. आपल्या संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्व असताना सुद्धा आपल्या देशात त्याच महत्व न पटल्यामुळे कित्येक शहरे बकाल आणि गल्लीच्छ झालेली आहेत. पुणे,मुंबई सारख्या झपाटयाने वाढणाऱ्या शहराच्या आजुबाजुच्या भागातील आणि गावातील परिस्थिती पाहिली तर या अभियानाचे महत्व लक्षात येते.