Skip to main content

अध्यात्म

हनुमान अंश

लेखक निनाद यांनी गुरुवार, 03/09/2026 16:42 या दिवशी प्रकाशित केले.

नीम करोली बाबा ज्यांना आपण प्रेमाने 'महाराज जी' म्हणतो हे विसाव्या शतकातील भारतातील एक महान आणि चमत्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उत्तर भारतात फिरून घालवले आणि उत्तराखंडमधील कैंची धाम येथे आपला प्रसिद्ध आश्रम स्थापन केला. बाबांची प्रभू हनुमानावर अथांग भक्ती होती. त्यांची निस्सीम भक्ती, नम्रता आणि सेवाभाव पाहून लाखो भक्त त्यांना 'हनुमान अंश' म्हणजेच हनुमानाचे रूप  मानतात.

महोत्सव महामातेचा: वैदर्भी महालक्ष्मी सण

लेखक वृषभ खोंडे यांनी शनिवार, 29/08/2026 14:11 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणी शाळेत जायच्या वयात वडिलांनी सरकारी लायब्ररी लावून दिली होती. त्यातून उत्तमोत्तम पुस्तके आणून वाचणे आणि त्यावर त्यांच्याशी साप्ताहिक चर्चा करणे असा एक शिरस्ता लावून दिला होता. ह्यावेळी ना. धो. ताम्हणकरांची पुस्तके हाती लागली होती. गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर ह्यांच्याशी ओळख झाली होती. ह्यात एक मजेशीर भाग वाचला होता, गोट्या त्याची बहीण आणि दादा वहिनी दिल्लीला दाबके नावाच्या एका गृहस्थांकडे जातात तेव्हा गौरी गणपतीचा सीझन असतो, दाबक्यांचा तरुण गोष्टीवेल्हाळ जावई आलेला असतो आणि त्याची गोट्याने उडवलेली भंबेरी असा काहीसा त्या कथा भागाचा प्लॉट होता. 

"मुखवट्यांच्या मागे हरवलेली माणसं"

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 05/07/2026 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
जगात जगण्यासाठी आपल्याला मुखवटा घालावाच लागतो. हा मुखवटा म्हणजे फसवणूक नाही, तर एक सामाजिक गरज आहे. मुखवटा आत्मसंरक्षणाची कवच-कुंडले आहेत. रंगमंचावर आणि सिनेमात काम करणारे कलाकार तर रोजच वेगवेगळे मुखवटे घालतात—कधी राजा, कधी भिकारी, कधी खलनायक, कधी देवता. पण हे मुखवटे केवळ अभिनयापुरते मर्यादित नाहीत. खऱ्या आयुष्यातही प्रत्येकजण मुखवटे घालून अभिनय करत असतो.

नजीकची क्षितिजे - 'ऊर्जाणू' (The Energions): भाग 2

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/04/2026 12:45 या दिवशी प्रकाशित केले.

वाचकांनो, तुम्हाला काय वाटते? जर मानवाने कधी 'शुद्ध ऊर्जापाहण्याची क्षमता विकसित केली तर आपण या भौ

सावलीतले रक्षक

लेखक ताजे प्रेत यांनी सोमवार, 20/04/2026 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये राहुल एका प्रतिष्ठित कंपनीत 'सिस्टीम आर्किटेक्ट' म्हणून काम करत होता. त्याचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. त्याला आता लवकरात लवकर 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून प्रमोशन हवे होते. पण त्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा होता त्याचा बॉस, राजेश सिन्हा. राजेश मूळचा बिहारचा होता, कडक स्वभावाचा आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी. तो राहुलला सतत कामाचा त्रास द्यायचा.

करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 16/03/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या. अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला !

उपनिषदांत देव पडताळणे

लेखक शरद यांनी शुक्रवार, 09/03/2018 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
उपनिषदांत देव पडताळ्णे ? श्री. क्रिप्ट यांनी आस्तिक-नास्तिक या दोघांना देव आहे की नाही हे स्वत:पडताळून पहावयास सांगितले. छान. आजच्या काळात कोणावर विश्वास ठेऊन देव आहे की नाही हे ठरविण्याऐवजी स्वत: जर काही पडताळणे शक्य असेल तर उत्तमच की. पुढे जाण्या आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री. क्रिप्ट यांनी "देव" याची व्याख्या केली नाही. आपण असे धरून चालू की आज सर्वसाधारण माणुस ज्याला देव म्हणतो, ज्याची देवळे बांधतो, ज्याची पूजा करतो तो देव. मग तो विष्णु असेल, शंकर असेल वा देवी असेल. हा सर्वशक्तीमान देव दयाळू, भक्तांना मदत करणारा, भवसागरातून तारून नेणारा असतो. त्यालाच श्री.

दोन घटना

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 07/12/2017 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली हल्ली ऐकिवात आलेल्या दोन घटना. १. आमच्या शेजारच्या गावात एक वेडसर गृहस्थ होते, त्यांना वेड कधी लागले माहीत नाही, त्यापूर्वी गडगंज श्रीमन्त, कराराने आंब्याच्या बागा घेउन लाखो कमवायचे त्या काळात (१९८०), पण नंतर अचानक वेड लागले, आणि मग ते वेडाच्या भरात कसेही वागू लागले.. दणकट शरीर, कमरेला कायम कोयती, आणि शिवराळ भाषा यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नसे. बाबा डोक्टर होते, आणि तसा त्यांचा आणि बाबांची जुनी ओळख, त्यामुळे ते १५ दिवस, महिन्यातून एक फेरी घरी टाकायचेच.

गीता नामक एक पंचिंग बॅग

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 14/06/2017 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
गीता तत्वज्ञान : काही प्रश्न भाग -1 1 काही विषय हे वैचारिक पंचिंग बॅग म्हणून अनेकांना उपयोगी पडतात असे म्हणतात. पैकी एक विषय ‘फलज्योतिष’ आहे. तसा दुसरा विषय गीता नामक काव्यात्मक अध्यात्मिक तत्वज्ञान सुनावणारा महाभारतातील भाग असावा... शरद सोवनीं यांनी लिहिलेल्या लेखाला या 16 पानी पुस्तिकेच्या रुपात सुगावा प्रकाशनाने मार्च 2001 मधे छापले. त्या आधी हे विचार एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. काही काळानंतर सहज हे पुस्तक हाती आले.