भगवद्गीते माते ,सुखसरिते भरिते,
सांभाळी आम्हासी, ज्ञानाच्या सरिते |
जयदेवी जयदेवी जय भगवती गीते
पाळी अखंड आम्हा ज्ञानाच्या सरिते ||ध्रु||
रडता पडता घेते, उचलुनी आम्हांतें,
जगताच्या संघर्षि, आत्मिक बळ देते |
जयदेवी जयदेवी जय भगवती गीते
पाळी अखंड आम्हा, ज्ञानाच्या सरिते ||
कार्य करिता देते, मंत्र हा आम्हांतें
यत्न कसून करा , जरि त्यागुनि फलातें ||
जयदेवी जयदेवी जय भगवती गीते
पाळी अखंड आम्हा, ज्ञानाच्या सरिते ||
कर्मी निष्कामाचे , गुज आम्हा दावी
पैलतीरास जाण्या, नौका बनून पावी
सागर शत शत नमुन, गुण नित हे गाई
बंधमोक्ष घडण्या, तू सांभाळी आई ||
जयदेवी जयदेवी जय भगवती गीते
पाळी अखंड आम्हा ज्ञानाच्या सरिते ||
सागरलहरी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
21
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया