उपनिषदांत देव पडताळणे
उपनिषदांत देव पडताळ्णे ?
श्री. क्रिप्ट यांनी आस्तिक-नास्तिक या दोघांना देव आहे की नाही हे स्वत:पडताळून पहावयास सांगितले. छान. आजच्या काळात कोणावर विश्वास ठेऊन देव आहे की नाही हे ठरविण्याऐवजी स्वत: जर काही पडताळणे शक्य असेल तर उत्तमच की. पुढे जाण्या आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री. क्रिप्ट यांनी "देव" याची व्याख्या केली नाही. आपण असे धरून चालू की आज सर्वसाधारण माणुस ज्याला देव म्हणतो, ज्याची देवळे बांधतो, ज्याची पूजा करतो तो देव. मग तो विष्णु असेल, शंकर असेल वा देवी असेल. हा सर्वशक्तीमान देव दयाळू, भक्तांना मदत करणारा, भवसागरातून तारून नेणारा असतो. त्यालाच श्री. क्रिप्ट देव म्हणतात. याहून दुसर्या कशाला श्री क्रिप्ट यांना देव म्हणावयाचे असते तर त्यांनी तसे स्पष्ट केले असते. असो. तर आता ही व्याख्या स्विकारून पुढे सरकू.
आता श्री.क्रिप्ट यांना काय सांगावयाचे आहे ते त्यांच्याच शब्दांत बघू.
गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय?
भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो.
उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.
पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत.
"उपनिषदांचा अभ्यास करून "देव" आहे की नाही हे पडताळता येते" हे न पटल्याने मी त्यांना नम्रतेने विचारले की "असे कोणत्या उपनिषदात आहे त्याचे नाव, अध्याय, मंत्रक्रमांक द्या." प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी "108 उपनिष्दे आहेत; त्यातील ही दहा प्रमुख, या स्वामींचे व्याख्यान ऐका ,अभ्यास करा" असा उपदेश केला. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसल्याने मी परत तोच प्रश्न विचारला. ते तर रागावलेच. त्यांनी सांगितल्यातच माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे त्यांनी सांगितले. पण तरीही त्यांना माझ्या चिकाटीचे कौतुक वाटले असावे. त्यांनी "मांडुक्य व केन " ही उपनिषदे वाचावयास सांगितली "केन" मधील शेवट वाचा हे सांगितले पण हा चुकार विद्यार्थी कष्ट करण्याचे टाळेल म्हणून (त्यांना माहीत असूनही) ’मांडुक्य" मधील मंत्र क्रमांक मात्र दिले नाहीत. मलाच शोधाण्याचे कष्ट घ्यावयास सांगितले ही झाली ह्या लेखाची पूर्वपीठिका.
आता सुरवातीला ’देव" याची व्याख्या का करावी लागली याचे कारण बघा. उपनिषद्काली देव नव्हता. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादि वैदिक देवता होत्या. आज त्यांना कोणी देव म्हणून पडताळून बघावयाचा प्रश्नच नाही. तेव्हा उपनिषदांत देव पडताळता येईल हा पायाच चूकीचा आहे.
पण त्यांनी मांडुक्य उपनिषद पहा असे सांगितले आहे म्हणून तेथे पाहिले तर काय दिसते ? सहाव्या मंत्रात ॐ च्या तिसर्या पादाला लावलेले सर्वेश्वर हे एक विशेषण सोडले तर संपूर्ण बारा वाक्यात कोठेही "देव" हा शब्दच नाही. संपूर्ण उपनिषद ॐ ची महती सांगते. ॐ ला "ब्रह्म" म्हटले आहे. आता ब्रह्म म्हणजे देव नाही हे श्री क्रिप्टही मान्य करतील .
दुसरे उपनिषद "केनोपनिषद". येथे आपणास संपूर्ण उपनिषद बघण्याची खरी म्हणजे गरज नाही कारण श्री. क्रिप्ट यांनी, (माझ्यावर कृपा करून,) शेवट बघावयास सांगितले आहे. पण तेथे जाण्याआधी केनोपनिषदाचा गाभा पाहिला तर असे दिसते की संपूर्ण उपनिषद "ब्रह्म" चे महत्व शिष्याला पटविण्याकरिता आहे. शिष्याने "कोणत्या देवाने डोळे, कान यांचे कार्य सुरू केले " ?
( इथे देव म्हणजे वैदिक देवता) असा प्रश्न विचारल्यावर आचार्य, देवाला कटवून, "ब्रह्म"चे महत्व सांगतात व नीट ध्यानात यावे म्हणून परत सांगतात. हे देव "ब्रह्म "पुढे कसे निर्बळ आहेत हे तिसर्या खंडातील कथेवरून स्पष्ट केले आहे. इंद्र, वायू, अग्नी आदि प्रमुख देवता "ब्रह्म"समोर कस्पटाप्रमाणे आहेत हे स्पष्ट करून
"हे ब्रह्म भजनीय असल्यामुळे त्याची उपासना करतात. जो कोणी त्याची अशी उपासना करतो, त्याला सर्वही प्राणिमात्र आपले मानतात" असे सांगून आचार्य थांबतात.
या नंतर शिष्य त्यांना म्हणतो, "भगवन्, मला उपनिषद म्हणजे उपदेश द्या." आचार्य म्हणतात ,"तुला मी उपदेश दिला आहे. ब्रह्मज्ञान कथन केले आहे." म्हणजे येथे जे काही सांगितले आहे ते देव पडताळण्या करिता नसून "ब्रह्म " संबंधी आहे.
थोडक्यात श्री. क्रिप्ट यांनी सांगितलेल्या दोनही उपनिषदांशी "देव" पडताळून पाहण्याचा किंवा पद्धती स्विकारण्याचा दूरान्वयेही संबंध नाही.
आता वळू पातंजल योगदर्शनाकडे. तिसर्या सूत्रा संबंधी श्री. क्रिप्ट म्हणतात
...... " तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो." श्री. क्रिप्टजी, आम्हाला काय ठरवावयाला सांगता, तुम्हीच सांगा की तुम्हाला देव म्हणावयाचे आहे की शक्ती आणि शक्ती ही काय भानगड आहे ? येथे देव वगैरे काही नाही. द्रष्टा हा द्रष्टा-दृश्य-दर्शन या त्रिपुटीतील द्रष्टा आहे, म्हणजे ब्रह्म (येथे शरीरात आहे म्हणून जीवात्मा) जेव्हा तुम्ही सर्व चित्तवृत्तींचा निरोध करता तेव्हा तुम्ही बाह्य जगाकडे पाहण्याऐवजी दृष्टी अंतर्मनाकडे वळविता. तेथे चित्तनिरोधामुळे काहीच नाही. त्यामुळे त्रिपुटी नाहिशी होऊन आत्मा आता आपल्या "स्व"रूपात असतो. अवस्थित याचा अर्थ "प्रकट होतो" असा करणे योग्य नव्हे. आणि समजा केलात तरी " देव " प्रकट होत नाही, इथेही देव पडताळणे वगैरे काही भानगड नाही.
कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत. काही लोक "बिग बी" रजनीकांत", जयललिता" यांनाही देव मानतात. मग "ब्रह्म"ने काय घोडे मारले आहे ?
असो.
श्री. क्रिप्ट यांनी " थोडे कष्ट घेऊन उपनिषदे वाचण्याची सुरवात करा " हा उपदेश केल्याबद्दल आचार्यांना शिरसा नमस्कार.
शरद.
(समित्पाणी)
वर्गीकरण
याद्या
13513
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर माझा पण नमस्कार.
सुंदर
सुंदर विश्लेषण !
+१
In reply to सुंदर विश्लेषण ! by डॉ सुहास म्हात्रे
विनोदी उत्तरच द्यायचे झाले तर
या धाग्याच्या निमित्ताने....
हे श्री. क्रिप्ट कोण?
ष्री. क्रिप्ट
In reply to हे श्री. क्रिप्ट कोण? by दिगोचि
उत्तम.
उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक
ब्रम्ह कुठेय ?
In reply to उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक by आनन्दा
सर मागच्या वेळी तुम्ही
In reply to ब्रम्ह कुठेय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जरासे अवांतर
In reply to उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक by आनन्दा
पश्चिम आशियातून येणारी
In reply to जरासे अवांतर by माहितगार
आदी शंकराचार्यांनी
In reply to जरासे अवांतर by माहितगार
आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करुन त्यांच्या ततवज्ञानाने तत्कालीन विवीध मतप्रवाहीना खासकरून विरोधी प्रभावित केले तसे नंतरचा ते आता पर्यंत कुणाला का जमले नसावे ?त्या काळी "प्रामाणिक वादविवाद" होत असत. याचा उत्तम पुरावा म्हणजे महत्वाचा आणि गाजलेला "आदी शंकराचार्य आणि मंडनमिश्र वादविवाद", ज्याच्यात आदिशंकराचार्यांनी मंडनमिश्रांच्या पत्निला मध्यस्त नेमून निर्णयाचे अधिकार दिले होते. "नेता/गट/धर्म/जातीच्या/झेंडा/विचारप्रणाली/हितसंबंध/इत्यादींच्यापैकी जे फायद्याचे आहेत, त्यांच्या बाजूचे ते सगळे खरे आणि त्यांच्या विरुद्ध ते सगळे चूक" असा निर्णय प्रथम घेण्याची आणि मग मग त्याला उपयुक्त असे पुरावे जमवून/बनवून, ठासून सादर करून, एन केन प्रकारेन (गदारोळ (केऑस) , असंवैधानिक कारवाई, अहिंसा, इत्यादी काहीही करून) विरोधकाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करण्याची प्रथा सद्या प्रचारात आहे... सत्याचा शोध, समतोलपणा, सभ्यता, इत्यादी सर्व अंधश्रद्धा किंवा मूर्खपणा समजल्या जातात ! :) ;)@आनंदा, योग्य प्रतिसाद.
बाकी सगळे ठीक आहे, पण अनंता
In reply to @आनंदा, योग्य प्रतिसाद. by जानु
वाचतोय
सत् म्हणजे ....
धन्यवाद
In reply to सत् म्हणजे .... by गामा पैलवान
यात मी कशाला?
In reply to धन्यवाद by स्मिता.
आणि मुळात सत्याचा शोध घ्यायचा
In reply to यात मी कशाला? by आनन्दा
मी म्हणजे काय?
In reply to धन्यवाद by स्मिता.
विचार करतेय
In reply to मी म्हणजे काय? by गामा पैलवान
काही विचार करू नका.
In reply to विचार करतेय by स्मिता.
पडताळणी करण्याच्या भानगडीत न
In reply to काही विचार करू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्याअर्थी तुम्ही इतक्या
In reply to पडताळणी करण्याच्या भानगडीत न by बिटाकाका
ज्याअर्थी, त्याअर्थी म्हणजे
In reply to ज्याअर्थी तुम्ही इतक्या by सतिश गावडे
हा... हा... :-))
In reply to काही विचार करू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सत्य याचा अर्थ चिरकालापासून
In reply to धन्यवाद by स्मिता.
क्रिप्टजी
In reply to सत्य याचा अर्थ चिरकालापासून by क्रिप्ट
त्या ब्रह्माची अनुभूती येत नाही कारण आपण मायेने वेढले गेलेलो आहे. माया म्हणजे हा संसार, षड्रिपू किंवा तू आणि मी यातला भेद वगैरे.वरील विधान थोडे विस्तारपुर्वक उदाहरणा सहीत मांडावे ही विनंतीज्ञानेश्वरांनी
In reply to क्रिप्टजी by मारवा
परंतु केवळ एकच तत्व जे सर्व
In reply to सत्य याचा अर्थ चिरकालापासून by क्रिप्ट
परंतु केवळ एकच तत्व जे सर्व नष्ट झाले तरी राहील ते च केवळ सत्य. आणि जगातील सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाल्यात आणि त्यामद्येच विलय पावतील. परंतु त्या तत्वाचे अस्तित्व तसेच राहील (होते आणि आहे देखील. त्यात काहीच बदल नाही). तेच सत्य. त्यालाच दुसरे नाव म्हणजे ब्रह्म (किंवा ब्रह्मन). आता सत्याचा शोध घेणे म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेणे.हे तत्व कसे असते? त्यातून सर्व गोष्टी कशा काय निर्माण होतात आणि त्याच्यातच विनाश कशा पावतात? याबद्दल जरा अधिक खोलात लिहू शकाल का?सतिशजी, ब्रह्मतत्त्वाचे वर्णन
In reply to परंतु केवळ एकच तत्व जे सर्व by सतिश गावडे
शरदजी लेखाबद्दल धन्यवाद. या
अहो तुमची फिरकी घेतायत.
In reply to शरदजी लेखाबद्दल धन्यवाद. या by क्रिप्ट
आनंदा ते उपनिषदांचे अभ्यासक
In reply to अहो तुमची फिरकी घेतायत. by आनन्दा
माझी नम्र विनंती, आपणही वाचा
In reply to शरदजी लेखाबद्दल धन्यवाद. या by क्रिप्ट
विटगेन्स्टीन ! डिट्टो !!
In reply to माझी नम्र विनंती, आपणही वाचा by शरद
-- हो. ते माझे मत आहे आणि मी
In reply to माझी नम्र विनंती, आपणही वाचा by शरद
अहो क्रिप्ट महोदय
In reply to -- हो. ते माझे मत आहे आणि मी by क्रिप्ट
म्हणून मी आपणास पुढील दुवे पहावयाची विनंती करतो. आपला अभ्यास आहेच, नवीन काही सापडणार नाही पण येथेही अडाणी लोकांकरिता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करून देणारे लेख दिसतील.त्यांनी तुम्हाला किती सन्मानाने वागवलेले आहे तुमच्या लक्षात कसे येत नाहीत ? त्यांनी वर म्हटलेले आहे की आपला अभ्यास आहेच. शिवाय शरदजींनी अडाणी लोकांकरीता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करुन देणारे लेख लिहीलेत ते ही सांगितले त्याचे दुवेही दिलेत तरी तुम्ही ते वाचत नाहीत याला काय म्हणावे ? म्हणजे आपला अभ्यास आहे हा मान आपल्याला शरदजींनी दिला म्हणुन तुम्ही शरदजींनी अडाणी लोकांकरीता लिहिलेले लेख तुम्ही वाचणार नाहीत का ? खरच थुंकीचे वाक्य फारच विनम्रतेने लिहीलेले होते. पुन्हा शरदजी किती मोठ्या मनाने म्हणतातआग्रहाची विनंती की आपण दशोपनिषदातील उरलेल्या उपनिषदांची माहिती मिपाच्या वाचकांना कळेल अशा भाषेत अवष्य करून द्यावी.शिवाय शरदजींनी किती मोठ्या मनाने तुम्हाला उरलेल्या उपनिषदांची माहीती अडाणी मिपाकरांना करुन देण्याची परवानगी दिलेली आहे. ज्यावर ते अगोदरच बोललेले आहेत तो अंतिम शब्द आहेच हे सत्य तुम्ही एकदा समजुन घ्या. शरदजींनी भाष्य केल्यानंतर तुम्हाला असे त्यावर नविन लिहीण्यासारखे किंवा इतरही कोणाला सांगण्यासारखे काही शिल्लक आहे का ? असु शकते का ? अडाणी मिपा करा करीत इतके मोठे कार्य केल्यानंतर उरलेल्या उपनिषदांवर तुम्ही बोला हवे तर ती परवानगी तुम्हाला देणार्या शरदजींचा किमान मान तरी ठेवा त्यांची विनम्रता तरी बघामारवाजी, अहो त्यांच्या
In reply to अहो क्रिप्ट महोदय by मारवा
शंका
शरद सर देवता आणि देव मध्ये
In reply to शंका by माहितगार
माहितगार, उपनिषदात ईश्वर हा
In reply to शंका by माहितगार
आजकालचे देव
In reply to शंका by माहितगार
"देव, देवता, ईश्वर या
In reply to आजकालचे देव by शरद
मार्केटींगच्या पद्धती ?
In reply to "देव, देवता, ईश्वर या by क्रिप्ट
विचारांसोबत नामजप करा
ब्रह्म कुठे नाहीये?
सुभाषचंद्र बोसांंच्या आत्म चरित्र
मी मंकी नावाच्या एका
हाय रे दिल्लगी !
In reply to मी मंकी नावाच्या एका by जयंत कुलकर्णी
आणि हे मन जेव्हा शरण जाते
In reply to मी मंकी नावाच्या एका by जयंत कुलकर्णी
वा
In reply to आणि हे मन जेव्हा शरण जाते by शाम भागवत
पुस्तक कुठे मिळेल ?
In reply to मी मंकी नावाच्या एका by जयंत कुलकर्णी
मी २० प्रती तयार केल्या
In reply to पुस्तक कुठे मिळेल ? by माहितगार
देव नाही. विषय संपला.