Skip to main content

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

हॅकिंग एनिग्मा

लेखक आंद्रे वडापाव यांनी गुरुवार, 12/12/2024 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या महायुद्धात सांकेतिक कुट दळणवळणासाठी, जर्मन सैन्याने "एनिग्मा " नामक यंत्र बनवलेले असते, ज्याच्या कुट /सांकेतिक भाषेची उकल करणे अशक्य आहे असा समज असतो (आजच्या भाषेत त्याला "हॅक" करणे अशक्य आहे, असा समज असतो) यावर आधारित एक सत्यकथा सुंदर सिनेमा " द इमिटेशन गेम" म्हणून आला होता...अॅलन ट्युरिंग नामक ब्रिटिश गणित तज्ज्ञ , याची उकल यशस्वीरीत्या करतो .. परंतु ब्रिटिशांना जरी जर्मनांच्या प्रत्येक सांकेतिक दळणवळणाची उकल करून, प्रतिडावपेच टाकणे शक्य असते...

सोनू निगम, अभिजित आणि ट्विटरवरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य

लेखक सच्चिदानंद यांनी बुधवार, 24/05/2017 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
तर सोनू निगम ने भलं मोठ्ठं पत्र लिहून ट्विटर सोडण्याची घोषणा केली आणि आधीच सुरु असलेल्या गोंधळात अजून नवी भर पडली. पण यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. पार्श्वभूमी अशी की, भाजपाच्या काही लोकल नेत्यांचा एका सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या किती खर्‍या-खोट्या की नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरचे आरोप ते सिद्ध व्हायचे तेव्हा होइल.

एम. एफ. हुसेन चित्र विषयक दिल्ली उच्चन्यायालयाच्या निर्णयाच्या अनुवादात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी रविवार, 27/03/2016 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
संसद आणि संसद सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खात्री करणारा एक निकाल काटजूंच्या केसच्या निमीत्ताने या महिनाभरात आला आहे असे दिसते पण तो ऑनलाईन उपलब्ध होण्यास अद्याप अवकाश असावा. सर्व साधारण कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने न्यायालयांची भूमिका काय असेल ते जर वसंत गुर्जरांची केस सर्वोच्च न्यायालया पर्यंत पुन्हा एकदा गेली तर न्यायालयीन भूमिकेस अधिक स्पष्टता येईल असे वाटते. या संदर्भाने मी मागे एक धागा लेख काढला होता.

ओवेसीचे भाषणातील बोल आणि संविधान कोड

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 17/03/2016 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुका जवळ आल्या की अल्पसंक्यांच्या मतांसाठी नेहमीप्रमाणे परवा भाषणात तो YZ ओवेसी " मी भारतमाता की जय बोलणार नाही" तेव्हा माझ्यावर कोणी सक्ती करु नका. आणि आमदार वारिस पठाण यांनी याची री ओढली आणि मला कोणीतरी संविधानात "भारत माता की जय" बोलण्यासाठी तसे कोणते कलम असेल तर सांगा असे काहीसे बरळला.

महात्माजी तसेच नेताजींवरील टिका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अजून एक वाद

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 30/06/2015 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक पोस्टीमध्ये लिहिलेल्या मजकुराबद्दलच्या तिसर्‍या मोठ्यावादाने न्यायालयीन पायरी गाठली आहे. आधीच्या दोन केस मध्ये (मुंबई आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थी वयीन) सामान्य नागरीक होते. आता हि जी नवीनतम केस आली आहे, त्यात मात्र दिग्गज मंडळी आहेत. फेसबुक पोस्टीमध्ये ज्यांच्यावर टिका झाली ती नावे भारतीयांना परमपुज्य आहेतच, पण या वेळी टिका करणारी व्यक्ती भारतीय सर्वोच्च न्यायालयाची माजी न्यायाधीश आहे सोबतच प्रेस काऊंसीलचे माजी अध्यक्ष हे बिरूदही त्यांनी भुषवले आहे त्यांचे नाव आहे न्या.