नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी
नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी
अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी
माझी... ऐकून घ्या मागणी..
मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी
असा शिणगार, नव रत्नहार, गोर्या कांतीवरी
विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी
माझी... ऐकून घ्या मागणी..
गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी
मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी
कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी
माझी... ऐकून घ्या मागणी..
धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी
विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी
बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी
माझी... ऐकून घ्या मागणी..
- प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4597
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! वाचतानाच ठेका आपोआप येत
+१
In reply to वा! वाचतानाच ठेका आपोआप येत by रेवती
लावणी जमून गेली आहे! जरा
फेटे उडाले!
मान वळविते, जरा झटकते, डौल
लयदार लावणी आवडली!
+१
In reply to लयदार लावणी आवडली! by अनामिक
ठसकेदार लावणी
छान !
क्या बात !
एकदम मस्त
व्वा! मस्त जमले!!
प्राजु जोरदार शिट्या. मस्तच
प्रत्येक कडवे एक से बधकर एक
वाह वाह...
"म्हणे होनाजी हाsss!" सारखी तुझ्या नावाची एक ओळ हवी होती
जबरा !!
फ्फेटं उडलं च्याम्मारी.. लै
सर्वांचे मनापासून आभार.
लावणी मस्त झालीय, एकदम
लावणी सुंदर झाली आहे