मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

बहकलेले दिवस

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
काव्यरस
कसे ते बहकलेले दिवस अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री मोहर तुझ्या अवघ्या देहास अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री एवढे एवढे होत उरले होते जग फक्त आपल्या दोघांचे क्षणाक्षणांवर उमटले होते सुंदर ठसे आपल्या मिलनाचे सहवासी सुखाचा सोहळा निळ्या नभीचा निळा चांदवा अद्भुत अनुभव आगळा तुझ्या मिठीचा नवा गोडवा कंपित ओठांची धुंद सय थरथरते स्पर्श मोरपिशी गंधित श्वासांची संथ लय झरझरते हर्ष हृदयाशी झुगारून दे काळाची बंधने फिरून जागवं ते क्षणन् क्षण उभारून दे स्मरणांची स्पंदने भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०४/२०११)

पिंक जिव्हारी गर्दुल्ल्याचे नकादु चेण्यापका सके

शरदिनी ·
काव्यरस
नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके काफ़ी कॉफ़ी ब्राउन ग

रास

नगरीनिरंजन ·
काव्यरस
चांद रात मंद वात गंध श्वास टाकतो धुंद साथ उष्ण हात कंप हृदयी जागतो नील जल प्रतिबिंब चंद्र त्यात पाहतो लुब्ध मुग्ध शुभ्र पुष्प पारिजात ढाळतो रक्त ओष्ठ रक्त नेत्र भ्रमरही मोहतो मत्त वक्ष पुष्ट गात्र समीर हाताळतो एक भास एक ध्यास प्रेम वह्नी जाळतो व्यस्त केश भ्रष्ट वेश मुकुंद रास खेळतो धूम्र वर्ण पीत वस्त्र अधर तो चावतो मीलनातुर झाली राधा कृष्ण वेड लावतो. - (पूर्वप्रकाशित)

इतकी सुंदर तु दिसते कशी ???

पिनुपवार ·
लेखनविषय:
काव्यरस
बागेतल्या या फुलांना ही वाटेल हेवा जेव्हा जेव्हा तु हसते अशी गालावर माझ्या तु लाल ठसा ओठांचा द्यावा मनात माझ्या इच्छा अशी फुलातुन मधमाशीने जसा रस प्यावा डोळ्यत माझ्या तु बघते अशी तुझ्या छायेत पाण्याचा पेला थिजुन जावा

सर...

अज्ञात ·
लेखनविषय:
काव्यरस
तु पावसाच्या सरिसारखी अचानक येतेस...अंगावर कोसळतेस... कळत नाही काय होतंय ते... मी सुद्धा डोळे बंद करुन अथांग भिजण्याच स्वप्न पाहतो... भिजतोहि थोडा... पण अचानक हि सर निघून जाते... डोळे उघडतो... मी अर्धवट कोरडा... वाट पाहतो, पुन्हा ती सर येन्याचि... पण महित असत... ती सर आपल्यासाठी नाही...आणि येणारही नाही पण कोणास ठाऊक मी असा का वागतो... वाचता आल असत मला अर्धवट भिजन्यापसुन... टाळता आल असत हे पण माहित असून सुद्धा मी पुन्हा डोळे झाकतो... सर येण्याची वाट पाहतो, पुन्हा भिजण्यासाठी, अर्धवट का होईना... स्वप्न पाहतो, माहित असत कि फसवतोय स्वतःला, पण दुर्लक्ष्य करतो ह्या गोष्टीकडे.

पाहून सयीला माझ्या....

अज्ञात ·
लेखनविषय:
काव्यरस
हळुवार पावलांनी श्रावण आला अंगणी... सयेची पैन्जने मन तारा झ्हन्कारती... ओशाळतो पारिजातही पाहुनी सयेला माझ्या... अन्थरुनी नक्षत्रांचे देणे लगडतो तिच्या पाया... चिंब कुंतले तिची घेती चुंबने गालाची घुटमळतो अल्लड वारा उडणार्या तिच्या पदराशी... ......छान पाऊस पडतोय, खिडकीत आपण उभे, आणि समोर पारिजात चिंब न्हाऊन निघतोय त्या पावसाच्या सरीत, हळुवार पाणी ओघळतय पानावरून,.....अगदी तसच जस न्हाऊन आल्यावर सयेच्या गालावरून ओघळत... पाहून सयीला माझ्या मनी तारा झ्हन्कारती.

बाराची गाडीबी गेली

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
बाराची गाडीबी गेली
पाव्हणं र्‍हावा की इथंच, लई रात झाली आता जाशीला कसं?