Skip to main content

गर्द नजरेची नार..

मंगळवार, 10/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द नजरेची नार जणु चांदण्याची धार होता पैंजणांचा वार सार डोलतं शिवार कधी उसळता ज्वार कधी बावरी ती खार चिंब मोगर्‍यांचे हार हसु तिचं वाहणारं उंच उडणारी घार जशी तेज तलवार करी नजरांचे भार एका नजरेत गार गर्द नजरेची नार काय शब्द बोलणारं तिच्या नजरेतं सारं माझ्या मनातलं सार
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1562
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आवडली.

यालाच वग म्हणतात काय? संपेसंपेपर्यंत ढोलकीची टिप आणि घुंगरांचा खणखणाट ऐकू येणार की काय असे वाटत होते मस्त!

In reply to by यकु

वग वेगळा! तमाशामध्ये आधी नाटकात असते तशी नांदी, श्रीवंदना, गण गौळण, बतावणी नंतर टाईमपास वगैरे असतो. मध्यंतरानंतर एक छोटे करमणूक प्रधान नाटुकले असते त्याला वग म्हणतात! वरची लावणी छानच जमलीये. यकुंच्या भा. पो.