मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेरणात्मक

पाय सरावले रस्त्याला

पाषाणभेद ·
लेखनविषय:
-: पाय सरावले रस्त्याला :- मी चाललो, चाललो इतका की रस्ता ओळखीचा झाला दुसरी वाट धरावी तर पाय सरावले रस्त्याला ||ध्रू|| खाच खळगे नेहमीचे झाले नवे नव्हते वाटले अडथळे तसेच होते पायात काटे खुपसले काट्यांनी तरी जावे कोठे त्यांना कोण सोबती मिळाला? पाय सरावले रस्त्याला ||१|| अडचणी अनंत आल्या उभ्या राहील्या समोर नेट लावून सामोरी गेलो प्रश्न अनेक पुढे कठोर जंजाळ पसरले समोर असता एक पक्षी अचूक उडाला पाय सरावले रस्त्याला ||२|| "कसा आहेस तू ठिक आहेस ना?" "मदत लागली काही तर मी तयार आहे ना!" ना कुणी अशी उभारी दिली काय करायचे त्या ओळखीला? पाय सरावले रस्त्याला ||३|| मीच माझी केली मदत मग हात केला मलाच

ऑफिसात जाऊन आलो

महासंग्राम ·
ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे

आज मी पुन्हा नापास झालो

खिलजि ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज मी पुन्हा नापास झालो पुढल्या वेळेस नक्की पास होईन हीच अशा मनी बाळगून पुन्हा जोमात तयारीला लागलो मम्मी पप्पा दोघेही घरी चिंतातुर असतील मला वाईट वाटू नये म्हणून हळूच रडत असतील मी ठरवलंय मनाशी घट्ट हार मानायची नाही देत जायचं असेच पेपरवर पेपर जोपर्यंत नीट कळत नाही कधीतरी उगवेल सूर्य माझाही कधीतरी असें मीही कुणाचा तरी बाप पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं तर होईल नको तो ताप कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही बापाने एवढा पैसा लावलाय माझ्यावर फुक्कट घालवणार नाही माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय पण एक दिवस , व्याजासकट देईन परतावा त्याआधी मला या परीक्