मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस

माझे गाणे - 'ये ना तू सख्या' ...

गणेशा ·
या गाण्याला तसे खुप वर्ष झालीत. तसे पाहिले तर हे माझे पहिलेच गाणे आणि शेवटचे ही :-). 'Maroon color' या आठवणीतल्या लेखामुळे आणि ऑडिओ फाइल्स येथे देता येऊ लागल्याने पुन्हा हे गाणे देतोय.

नजर..

मन्या ऽ ·
नजर.. बालपणीचा पाऊस म्हणजे असे मजामस्ती, शाळेत जाण्याची धांदल ,वाहत्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या आणि अवखळ खेळ तारुण्यात तोच पाऊस म्हणजे गुलाबी जग सारे, प्रेमपत्र, चोरटी बावरलेली नजर आणि पावसातली ती घट्ट मिठी उतारवयात पाऊस तोच ; पण नेत्र असतात पाणावलेले, हक्काची नातीही दुरावलेली, कोणीच नसे सोबती; दोन शब्द बोलायला. पाऊस असे तोच. दरसाल तसाच बरसुन जाई वयाप्रमाणे बदलत जाई ती आहे 'नजर' पावसाला अनुभवण्याची! -दिप्ती भगत २५जून,२०१९

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी ·
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

सत्यजित... ·
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली!

गाण्यास पावसाच्या...

सत्यजित... ·
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!

ती अन् पाऊस..

मन्या ऽ ·
ती अन् पाऊस.. खूप दिवस झाले आता पावसात चिंब चिंब भिजून भरलेलं सावळ ते आभाळ नजरेत सामावणारी ती भिजावं का थोडतरी? ह्या येत्या पावसात चिंब चिंब घेऊ न्हाऊन असा विचार करणारी ती गेले कित्येक दिवस दिवस? छे!