मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ|| गेलो तुळशी मंजीरा घ्याया तेथे न तू गावला राया ||१|| गेलो राऊळी शोधाया शोध व्यर्थ गेला वाया ||२|| चंद्रभागेकाठी तू न सापडेना तुझ्याविण मन शांत होईना ||३|| शोध घेतला शोध घेतला अंती नाही तू भेटला ||४|| पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५|| - पाभे

वाचने 2551 वाचनखूण प्रतिक्रिया 8

चाणक्य 25/12/2013 - 07:02
हीच तर गोची झालीये. 'आत' विठ्ठल आहे हेच समजेपर्यंत निम्मं आयुष्य जातय आणि समजले तरी सापडता सापडत नाही.

मंगेश खैरनार 25/12/2013 - 11:47
चंद्रभागेकाठी तू न सापडेना
"सापडेना" लिहील्यावर "न" ची गरज नाही असे वाटते.. "चंद्रभागेकाठी तू सापडेना", असे असायला हवे कदाचित?

प्रभाकर पेठकर 25/12/2013 - 12:58
कवितेचे व्याकरण कळत नाही (तर ते जाऊदे तेल लावत....) पण कविता फार साधी, सरळ आणि समजायला फार सोपी. त्यामुळेच फार आवडली.