दूरवरची स्पष्ट प्रतिमा दाखवणार्या दुर्बीण किंवा बायनॉक्लर्स, बायनॉक्युलर्स Binoculars चर्चेसाठी हा धागा काढत आहे.
माझ्याकडे एक ऑलिंपस १०x५० आहे पण ती पडल्यामुळे जरा फोकस बिघडला आहे. म्हणजे दोन चित्रे दिसतात. कॉलिमेशम गेले आहे. एका डोळ्याने मात्र सुंदर स्पष्ट चित्र दिसते. चंद्र अप्रतिम दिसतो. गुरूचे चार चंद्र ही दिसतात. या शिवाय एक १२x५० ची जुनी झेनिथ आहे जपानी बनावटीची. पण त्यात प्रतिमेला हलक्याश्या सप्तरंगी कडा येतात. त्यामुळे ती जास्त चांगली असूनही अवकाश दर्शनासाठी फार वापरात येत नाही. आणि याशिवायही एक निकॉन ची ट्रॅव्हललाईट आहे. ही मी सदैव वापरतो. असो, मला वाटते की दुर्बीण हे केवळ एक साधन नसून एक वेगळी दृष्टी आहे. मग तुम्ही सह्याद्रीच्या कड्यावर पक्षी शोधत असाल किंवा क्रिकेटच्या मैदानात आवडत्या खेळाडूचा शॉट जवळून पाहू इच्छित असाल, एक चांगली दुर्बीण तुमच्या अनुभवात मोलाची भर घालते!
निकॉनची 8x25 ट्रॅव्हललाईट दुर्बीण प्रवासात नेहमी जवळ ठेवतो. अगदी हलकी आणि दणकट आहे. राजस्थानमध्ये फिरतांना दुर्बीण खूप वापरली आहे. राजवाडे आणि त्यातले निरनिराळे बारकावे पहायला फार उपयोगी आली. अगदी हलकी अगदी लहानशी तरी चांगली पॉवर आणि स्पष्ट चित्रं.
तरीही आता अजून एक चांगली १०x५० दुर्बीण घेण्याची इच्छा आहे.
दुर्बीण खरेदी करताना काय पाहावे यावर तज्ञ लोकांनी अधिक माहिती द्यावी ही विनंती. मला फार माहिती नाही पण मला समजलेल्या कोणतीही दुर्बीण घेताना प्रामुख्याने खालील गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या पुढील प्रमाणे.
मॅग्निफिकेशन म्हणजे दुर्बीणवर लिहिलेला गुणाकार. दुर्बीणवर 8x42 असे लिहिले असेल, तर '8x' म्हणजे ती वस्तू तुम्हाला ८ पट मोठी दिसेल. पक्षिनिरीक्षणासाठी ८x किंवा १०x सर्वोत्तम मानले जाते. यापेक्षा जास्त मॅग्निफिकेशन असल्यास हात जरा जरी हलला तरी प्रतिमा थरथरते. त्यामुळे ट्रायपॉद वापरावा लागतो.
ऑब्जेक्टिव्ह लेन्स: '8x42' मधील '42' म्हणजे समोरच्या काचेचा व्यास (मिमी मध्ये). ही काच जेवढी मोठी, तेवढा प्रकाश जास्त नळीच्या आत येतो आणि चित्र अधिक स्पष्ट दिसते. पहाटे किंवा संधिप्रकाशात पाहतांना हे जास्त महत्वाचे ठरते.
दुर्बीणीतील प्रिझम प्रकार: बाजारात दोन प्रिझम प्रकार मिळतात - 'पोरो' (Porro) दिसायला थोडी मोठी असते आणि 'रूफ' (Roof) प्रिझम ही दुर्बीण दिसायला सरळ आणि कॉम्पॅक्ट असते.
अगदी स्वस्त मिळणार्या चीनी बनावटीच्या दुर्बीणी टाळा असा (विकत घेतलेला सल्ला) मी फुकट देतो आहे. काहीही धड दिसत नाही!
माझी एंट्री लेव्हल पसंती म्हणजे बजेटमध्ये बसणारी 'निकाॅन' (Nikon)
जर तुम्ही सुरुवात करत असाल, तर Nikon Aculon किंवा Nikon Prostaff सिरीज एक उत्तम पर्याय आहे.
Nikon Aculon A211: ही एक मजबूत आणि स्वस्त दुर्बीण आहे. ज्यांना ट्रेकिंग किंवा खेळांच्या सामन्यांसाठी साधी पण टिकाऊ दुर्बीण हवी आहे, त्यांच्यासाठी हा 'पैसा वसूल' पर्याय आहे. पण ही वॉटरप्रूफ नाही.
Nikon Prostaff P3/P7: ही थोडी प्रगत आवृत्ती आहे. ही दुर्बीण वॉटरप्रूफ असते, त्यामुळे पावसाळ्यात गडकिल्ल्यांवर फिरताना लेन्सवर वाफ साचण्याची भीती राहत नाही.
जरा या पेक्षा वरची मिड-रेंज म्हणजे Nikon Monarch सिरीज. याची प्रतिमा अधिक स्पष्ट असते आणि रंगांची अचूकता खूप छान मिळते. या श्रेणीत Vortex Diamondback सारख्या कंपन्याही आहेत, ज्यांची वॉरंटी आणि बिल्ड क्वालिटी जबरदस्त असावी असे किंमत पाहून वाटते.
आता हाय-एंड दुर्बीणीचे राजपुत्र स्वारोवस्की! या अशा प्रकारांना 'ऑप्टिकल इंजिनिअरिंगचा चमत्कार' म्हटले जाते. स्वारोवस्की ची तुलना कॅमेऱ्यांच्या जगात जशी लायका शी होते, तशी आहे.
Swarovski EL किंवा NL Pure सारख्या दुर्बीणीची किंमत लाखांच्या घरात असते. पण एकदा तुम्ही यातून पाहिले की तुम्हाला साध्या डोळ्यांपेक्षाही अधिक 'रिअल' आणि लख्ख जग दिसते. अत्यंत हलकी वजन, हाताला मिळणारी पकड आणि काचेवर केलेले विशेष कोटिंग, ज्यामुळे अगदी अंधुक प्रकाशातही तुम्हाला पक्ष्याच्या पंखांवरील बारीक रेषा स्पष्ट दिसतात. अशी घेतली
तर मग ती भयंकर महाग दुर्बीण कपाटात पडून राहण्याची भीती वाटते. त्यामुळे निकॉनची ट्रॅव्हललाईट खूप आवडते. ही तशी माझी पहिली पसंती आहे.
तर दुर्बीण घेतांना दुर्बीण ही केवळ स्पेसिफिकेशन पाहून घेऊ नका. शक्य असल्यास दुकानात जाऊन ती हातात धरून पहा. तुमच्या डोळ्यांना ती सोयीस्कर वाटते का? बराच काळ पकडण्यासाठी तिचे वजन तुम्हाला पेलवेल का? आणि मुख्य म्हणजे, चष्मा लावणाऱ्यांसाठी 'आय रिलीफ' पुरेशी आहे का, हे नक्की तपासा.
सरते शेवटी असे म्हणतो की सर्वात उत्तम दुर्बिण तीच जी तुम्ही बिनधास्त पणे प्रत्येक प्रवासात तुमच्या गळ्यात असते!
तुम्हाला काय वाटते?
कोणती दुर्बीण तुमच्याकडे आहे?
वर्गीकरण
वाचने
3296
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
द्विनेत्री कितीही पॉवरफुल
आजोबांची एक पितळी परदेशी
साधारण ५वी ते पुढे १२वी या
In reply to आजोबांची एक पितळी परदेशी by गवि
अरे वा
In reply to साधारण ५वी ते पुढे १२वी या by युयुत्सु
प्रोजेक्टर
In reply to आजोबांची एक पितळी परदेशी by गवि
या धाग्याच्या निमित्त्याने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Con Calma... : Daddy Yankee & Snowमस्त फोटो!
In reply to या धाग्याच्या निमित्त्याने by मदनबाण
मला दुर्बिणीने आकाश निरीक्षण
तारांगण?
In reply to मला दुर्बिणीने आकाश निरीक्षण by अमरेंद्र बाहुबली
अवांतर : टेलिस्कोप ला मराठी प्रतिशब्द
दूरदर्शक
In reply to अवांतर : टेलिस्कोप ला मराठी प्रतिशब्द by गामा पैलवान
मी पवनचक्की कंपनीत कामाला
मला रोज नबीन नवीन पवनचक्कीत
In reply to मी पवनचक्की कंपनीत कामाला by अमरेंद्र बाहुबली
स्पष्टवक्तेपणाचे तोटे.
In reply to मला रोज नबीन नवीन पवनचक्कीत by युयुत्सु
मला नाही वाटत तसे... का ते
In reply to स्पष्टवक्तेपणाचे तोटे. by कंजूस
ह्म्म!!
एका मित्राच्या सॅमसंग फोनवर
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
द्विनेत्रि कालबाह्य
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
माझ्याकडे तीन होत्या./आहेत
१. vixen 10x21 कोणती आहे
In reply to माझ्याकडे तीन होत्या./आहेत by कंजूस
@ निनाद, क्रमांक तीनचा
ऑह!
In reply to @ निनाद, क्रमांक तीनचा by कंजूस
फोर्ट मध्ये K. Prabhakar
अरे वाह! माझ्या एका मित्राकडे
In reply to फोर्ट मध्ये K. Prabhakar by आग्या१९९०
स्पॉटिंग स्कोप
In reply to अरे वाह! माझ्या एका मित्राकडे by टर्मीनेटर
बायनोक्युलरच्या तुलनेत यांची
In reply to स्पॉटिंग स्कोप by निनाद
स्पॉटिंग स्कोपचा उपयोग प्राणी
In reply to बायनोक्युलरच्या तुलनेत यांची by टर्मीनेटर
नक्कीच होईल. मी एकदा घरीच
ओक्के... मी हवेतर
In reply to नक्कीच होईल. मी एकदा घरीच by आग्या१९९०
Address
In reply to ओक्के... मी हवेतर by टर्मीनेटर
धन्यवाद!
In reply to Address by निनाद
माझ्याकडे नंबर ( visit card )
ओके... वर निनाद साहेबांनी
In reply to माझ्याकडे नंबर ( visit card ) by आग्या१९९०
लेख आणि प्रतिसादांतून चांगली