सध्या मी काय पाहतोय ? भाग १२
कराटे गर्ल्स ही एक प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा वेब सिरीज आहे, जी हल्लीच माझ्या पाहण्यात आली. ही २०२४ मध्ये प्रदर्शित झाली वेब सिरीज असुन हा पहिला सिझन आहे.
ही कथा कोमल आणि आभा या दोन १८ वर्षांच्या मुलींभोवती फिरते, ज्यांची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. कोमल ही रागीट आणि बिनधास्त स्वभावाची मुलगी आहे, तर आभा ही तिच्या वडिलांच्या कराटे अकॅडमीचा वारसा पुढे नेणारी शिस्तबद्ध मुलगी आहे. [ सिरीज पाहताना आभाचे डोक्यावरील विविध हेअर बँड्स तिची स्टाईल सेन्स दाखवतात. ]
कथा मुख्यत्वे नाशिक मधील नवोदय कराटे अकॅडमी मध्ये घडते जिथे कोमल तिच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रवेश घेते.सुरुवातीला एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या या मुली नंतर कराटे स्पर्धेसाठी एकत्र येतात.
या मालिकेत अश्लेषा ठाकूर [ कोमल ] आणि सेलेस्टी बैरागी [ आभा ] यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
मानव गोहिल यांनी आभाच्या वडिलांची (सेन्सेई: अजय कदम) महत्त्वाची भूमिका निभावली आहे.ही सिरीज मैत्री, जिद्द आणि स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासावर आधारित आहे.खेळाच्या माध्यमातून सामाजिक अडथळे तोडणाऱ्या मुलींची ही गोष्ट अत्यंत प्रभावी आहे.ही वेब सिरीज Amazon MX Player वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ११
वाचने
1473
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
बॅड गर्ल आणि द गर्लफ्रेंड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super SharanyaIn reply to बॅड गर्ल आणि द गर्लफ्रेंड by मदनबाण
मुले-मुली इतक्या सहजतेने एकमेकांच्या हॉस्टेल ?
In reply to मुले-मुली इतक्या सहजतेने एकमेकांच्या हॉस्टेल ? by कपिलमुनी
मुनी मी स्पष्ट लिहले आहे की :
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]लोलिता
In reply to लोलिता by कॉमी
माझ्याच धाग्यात "लोलिता" या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]In reply to लोलिता by कॉमी
हताश ?
In reply to हताश ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या पुस्तकात असे काही प्रसंग
In reply to ह्या पुस्तकात असे काही प्रसंग by कॉमी
हे बरोबर....
माईंडहंटर
कधी कधी असं होतं की नक्की काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys