Skip to main content

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 20/07/2020 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
  • शहर - हैद्राबाद
  • बजेट - पाच ते सात लाख*
  • प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
  • प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
ऑफिस घरापासून ३८ किमी दूर आहे. लॉकडाउनपूर्वी मेट्रोने जायचो. सध्या डिसेम्बरपर्यंत WFH सुरु आहे. नंतरही काही रोज कार घेऊन जाणार नाही. वर्षातील चार-सहा महिने बाहेरगावी (बेन्गालुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता दिल्ली इ.) काम असतं. त्यावेळी शनिवार-रविवार घरी येतो. वर्षातून तीन-चार वेळा २८० किमी दूर गावी प्रवास होतो. सध्या रेल्वेने जातो. कार घेतल्यावर कारने जाईन. पूर्वीचा कार चालवण्याचा फारसा अनुभव नाही. ही पहिलीच कार विकत घेत आहे. पायी, सायकल, बाईक कार, रेल्वे विमान इ. च्या प्रवासाचा अनुभव आणि आवड आहे. सध्याच्या आणि आधीच्या बाईकांचा प्रवास अकरा वर्षांत ९०००० किमी झाला आहे. आधी, दोन-अडीच लाखांपर्यंतची एक जुनी गाडी घ्यावी असा विचार होता (अजूनही निर्णय होत नाहीये). पण ओएलेक्स / ट्रू वॅल्यू / इतर आणि प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो. किंमती जास्त वाटत आहेत. मी आइडेंटिफाय केलेल्या गाड्या - टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- ह्युंदाई सॅन्ट्रो स्पोर्ट्झ Hyundai Santro Sportz Petrol ₹६४३५२०/- ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - रेनॉ क्विड Renault Kwid RXT 1.0 ₹५१४६३९/-
  1. यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
  2. फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
  3. मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
  4. रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
  5. जुनी गाडी घ्यावी का?
  6. इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
सर्व ह्युंदाई गाड्यांचे माहितीपत्रके टाटा गाड्यांची माहिती मारुती गाड्यांची माहिती मदत, सल्ला, मार्गदर्शन इ.बद्धल मिपाकरांचे आगाऊ धन्यवाद.

वाचने 92090
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

अमेझ भारीच आहे. पण १० लाखापर्यंत बजेट म्हणाल्यावर खूप ऑप्शन उपलब्ध आहेत. आधीचे ५ ६ लाखाचे बजेट असलेने तुलनेने कमी ऑप्शन होते. बऱ्याच सेडान, मिनी एस्युवही किंवा टॉप एन्ड ह चबॅक १० लाखापर्यंत मिळू शकतात. अगदी स्कोडा रॅपिड रायडर सुध्दा ह्या विभागात येते

In reply to by अभ्या..

स्कोडा रॅपिड रायडर हि गाडी उत्तम आहे विशेषतः त्याच्या व्हेरिएबल जॉमेट्री टर्बोचार्जर मुळे त्याला जबरदस्त शक्ती आहे. परंतु या जास्त गुंतागुंतीच्या रचनेमुळे ( आणि फोक्सवागेन गटातील गाडी असल्यामुळे) त्याचे सुटे भाग भरपूर महाग आहेत. पाच वर्षात गाडी विकून टाकायची असेल तर विचार करावा

In reply to by कपिलमुनी

अमेझ ला होंडा सिटीचा ग्लॅमर नाही किंवा होंडा सिटीची मुलायमता हि नाही. केवळ स्वस्तात गाडी उपलब्ध करून द्यायची म्हणून होंडा सिटीची काटछाट करून ठोकळेबाज (BOXY) गाडी बनवली आहे हे मा वै म १० लाखाच्या बजेट मध्ये नेक्सन हि नक्कीच जास्त चांगली आहे.

In reply to by कांदा लिंबू

जबर आहे! घेऊन टाका! एक्सेंट काढल्यावर मी ती किंवा सेल्टॉस (बजेट मध्ये बसली तर) घ्यायच्या विचारात आहे!!

अभिनंदन आणि शुभेच्छा! बहुतांश गाड्यांची चर्चा झालेली असतांना नविन लॉन्च झालेली ऑरा, आणि जुलै मधला लाँच पुढे गेलीली आय २० मिस झालेली दिसते आहे. आय २० एक दोन महीन्यात लॉन्च होईल असे दिसते आहे. सुंदर गाडी. ऑटोमॅटीकच बघत असल्यास एएमटी च्या ऐवेजी सीव्हीटी अथवा डीसीटी बघणे. बाकी नेक्सॉन अतिषय खतरनाक गाडी आहे. दुकानात निर्ल्लज होउन डिस्काउंट घेणे. आत्ता सर्व ऑटो कंपन्या सेल्स नंबर कमी असल्याने प्रेशर मध्ये आहेत. जितक्या अ‍ॅक्सेसेरीज पदरात पाडता येतील त्या पाडणे. टाटा वाले शोरुम हॅन्डलींग चार्जेस च्या नावाखाली दहा एक हजार घेतात. ते घासाघीस करुन कमी करणे. शोरुम ने न ऐकल्यास कंपनीला मेल करणे. क्रिपा होनी चाहीये. शोरुम मधील अ‍ॅक्सेसेरीज महाग असतात. त्या गळ्यात मारायचा जोरदार प्रयत्न होईल. हाणून पाडणे. विमा ऑफ मार्केट कम्पेअर करणे. तिथे दोन पाच हजार कमी होउ शकतात. अ‍ॅन्टी रस्ट /टेफ्लॉन/ईतर कोटींग न घेणे. ते नवीन गाडीला कंपनीने देलेलं अस्तय. एक काही तरी वॉरंटी मध्ते पहील्या वर्षाचे किंवा पंधरा हजार कीमीचे ऑईल आम्ही देउ म्हणून काही तरी पैसे घेतात (गोल्ड किंवा एंजिन प्रोटेक्शन म्हणून) ते न घेणे. कारण ऑईल स्वस्त पडतं आणि त्यातून पहील्या वर्षात (दहा हजार किमी मध्ये ऑईल बदलावे लागत नाही. थोडक्यात एक्स शो रुम सोडल्यास प्रत्येक पैशाचे कारण आणि वर्थ चेकवणे आणि ठरवणे. सर्विसिंग चे लोक वेगळे असतात त्यामुळे नंतरच्या रिलेशन वर याचा परिणाम होणार नाही.

ऑटोमॅटीकच बघत असल्यास एएमटी च्या ऐवेजी सीव्हीटी अथवा डीसीटी बघणे. ए एम टी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) हे सर्वात स्वस्त ट्रान्समिशन आहे आणि त्यात तुम्ही गियर बदलण्याऐवजी योग्य वेळेस कॉम्प्युटर गिअर बदलतो. यामुळे गाडी तुम्हाला पाहिजे तेंव्हा आणि तेवढ्या पटकन वेग घेत नाही. परंतु गाडीचे ऍव्हरेज हे मॅन्युअल गियर इतकेच( आणि आपले ड्रायव्हिंग खराब असेल तर आपल्यापेक्षा जास्त) मिळते. सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) यात आपल्याला गिअर बदलल्याचे धक्के अजिबात बसत नाहीत आणि गाडी स्मूथ पणे वेग घेते. तुलनाच करायची असेल तर मोटार सायकल चे ट्रान्समिशन आणि ऍक्टिव्हा चे ट्रान्समिशन पहा. फरक हा आहे कि मोटारीला सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) बसवले तर इंजिनची शक्ती जास्त असावी लागते त्यामुळे त्याचे ऍव्हरेज कमी येते. ( त्याच सीसी च्या गाडीत सी व्ही टी ऍव्हरेज जास्त मिळते) आणि सी व्ही टी ( कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन) उत्पादन खर्च जास्त असल्याने गाडीची किंमत महाग असते शिवाय देखभालीचा खर्च जास्त येतो. परंतु गाडी अतिशय मुलायम चालते डीसीटी (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) यात गिअर पटकन बदलतो आणि यामुळे गाडीला वेग पटकन मिळतो पण गाडी ऍव्हरेज मध्ये मार खाते आणि अर्थात उत्पादन खर्च जास्त असल्याने गाडीची किंमत महाग असते शिवाय देखभालीचा खर्च जास्त येतो. शोरुम मधील अ‍ॅक्सेसेरीज महाग असतात. त्या गळ्यात मारायचा जोरदार प्रयत्न होईल. हाणून पाडणे. एक्स शो रुम सोडल्यास प्रत्येक पैशाचे कारण आणि वर्थ चेकवणे आणि ठरवणे. सर्विसिंग चे लोक वेगळे असतात त्यामुळे नंतरच्या रिलेशन वर याचा परिणाम होणार नाही. बाडीस

एक कल्पना ( भारतात उपलब्ध आहे कि नाही माहित नाही, नसल्यास दुर्लक्ष करा ) नवी कोरी किंवा दुसऱ्या हाती गाडी घेण्यापेक्षा शोरूम ची जी दाखवण्यासाठी वाहने ठेवलेली असतात ती पहिल्या वर्षात ते कमी किमतीत विकतात ! अर्थात त्यात उरलेली वॉरंटी जशीच्या तशी जिवंत राहते का ? हे सर्वात महत्वाचे आहे .. बघा विचारा .. मला तरी एकदा याचा चांगलं अनुभ आलं आहे , ५ पैकि चार वर्षाची आणि ट्रान्समिश् न ची १० पैकी ९ वर्षाची वॉरंटी ( मित्सुबिशी ३८०) मिळाली आणि पैसे चांगलेच वाचले

In reply to by चौकस२१२

भारतात हा पर्याय उपलब्ध आहे पण टेस्ट राईड साठी चालवणारे सगळेच उत्तम सारथी नसतात त्यामुळे क्लच आणि गियर बॉक्स चे काम निघते.

नमस्कार , आपल्या निवडक गाड्या उत्तम आहेत. सब ४ मीटर एस यु वी सेगमेन्टचा नक्की विचार करा, असे सुचवेन. ओटोमेटिक पण पहा. शहरातील गर्दी किन्वा रिकामा हायवे , ड्राईव आरामदाई एकदम. !! मी ग्र्यान्ड आय १० पेट्रोल - स्पोर्ट्स ओटोमेटिक २०१७ सप्टेम्बर पासून वापरत आहे. ओन रोड रु.७ लाख. २ एअर ब्याग्स, उत्तम सस्पेन्शन. [पण ए.बी.एस. नाही, आत्ता च्या मोडेलचे स्पेसिफिकेशन्स माहिती नाही] पुणे शहर तसेच , पुणे सोलापूर हायवे, लातूर , सातारा, गोवा, कर्णाटकात शिवमोग्गा पर्यन्त मित्र व कुटुम्बासोबत प्रवास झाला , एकूण २१+ ह. कि.मी. ओटोमेटीक मुळे थकवा कमी जाणवतो. माझा अनुभव. सलग १२ तास असा ३ वेळा प्रवास केला आहे. साधारण - एसी - १४-१६ कि.मी प्रती लीटर / विना एसी - १५-१७ कि.मी प्रती लीटर सरविसिन्ग चार्जेस पण कमी आहेत. नवीन कार साठी शुभेछा. शुद्ध् लेखन चुकान्साठी माफी असावी. ` अनय'

मी Eco Sport Titanium ही घेण्याचा विचार करत आहे. स्विफ्ट डिझायर गेल्या महिन्यात विकली आणि मारुती ने सर्व डिझेल गाड्या बंद केल्याने Brezza कॅन्सल. महिन्द्रा XUV 300 W6 Diesel च्या तुलनेत Eco Sport Titanium उजवी वाटतेय. Alloy Wheel, Inbuilt GPS, Projector Headlamp, Fog Lamp, DRL, Auto ORVM, Boot Space, Ground clearance, Key less entry, Dual tone Interior etc. याबाबत मला फरक जाणवला.

Xuv 300 W6 आणि Ecosport Titanium दोन्ही गाड्यांची किंमतीत With Accessories मला 50,000 फरक जाणवला. Ecosport Titanium जास्त फिचर्स देत आहे. कोणाला या गाडी चा अनुभव असेल तर कृपया मार्गदर्शन करावे

मिपाकरांच्या बहुमूल्य मार्गदर्शनानंतर, आज टाटा नेक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल ग्रे रंग बुक केली.‌ पुढचं अपडेट कार हातात आल्यावर करीन.

रच्याक, कारचा इन्शुरन्स अजून ठरायचा आहे. एक वर्ष पूर्ण अधिक दोन वर्ष थर्डपार्टी साठी, डीलर चाळीस हजार वजा दहा हजार डिस्काउंट = तीस हजार असे म्हणत आहे. त्याचसाठी, पॉलिसी बाजार वर तेवीस हजार असा आहे. नवीन वाहनासाठी, डीलरव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कुणी इन्शुरन्स घेतला आहे का? माझा सध्याचा हिशेब कारची किंमत: ७७०००० आरटीई: ९४०५० लॉजिस्टिक: ९५०० हायपोथिकेशन: १५०० फास्टटॅग: ५०० ------------------ एकूण: ८७५५५० वजा : ९५०० सूट ----------------- निव्वळ एकूण: ८६६०५० मोफत अक्सेसरी: १०००० याशिवाय- इन्शुरन्स: सुमारे २३००० अंतिम एकूण सुमारे: ८८९०५०

होऊ द्या खर्च. गाडी फारच छान आणि आरामशीर आहे. निदान ७ वर्षे तरी चिंता नाही. शिवाय पंचतारांकित सुरक्षा आहे. गाडी हातात आली कि पहा. चालवण्याचे काय सुख आहे ते.

हार्दिक अभिनंदन, कांदा लिंबूसाहेब ! आता होऊ द्या जोरदार आउटींग, टाटा नेक्सन संगे ! पुणे, पिंचिंवाडीत आला तर आम्हाला राईड द्यायची विसरू नकात ! आता आय डी बदलुन कांदा नेक्सन असं करायला हरकत नाही :-)

दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी काल टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल कार हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन. डॉ. खरे, श्री. विटेकर आणि अभ्याशेठ यांनी फोनवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांचे आणि सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. - कांदा लिंबू

उत्तम. पंच तारांकित गाडी हातात आली. त्यातील म्युझिक सिस्टीम अत्युत्कृष्ट आहे. अभिनंदन

अभिनंदन कांदा लिंबु! आता मी ही नवीन कार घ्यायचा विचार करतोय. नुकतीच लॉन्च झालेली किया सॉनेट कशी आहे? मार्कॅटींग तर जबरदस्त चालु आहे. २० लाखाच्या गाडीचे फिचर्स १० लाखात अशी मार्केटींग स्टेटमेंट वाचनात आले. घ्यावी का?

In reply to by कानडाऊ योगेशु

१० लाखात येणारी ८३ पी एस ची अंडर पॉवर वाटली . १.० टर्बो ची किंमत ११ च्या आस्पास आहे

Medium sized Automatic transmission असलेली सध्या चांगली फॅमिली कार कोणती?

@कांदा लिंबु गाडी घेऊन महिना झाला. रिव्यु लिहिणार होतात त्याची आठवण करुन देतो. मी ही गेले कित्येक दिवस कार घ्यायचा विचार करत आहे पण काहीनाकाही कारणाने निर्णय घेणे पुढे जात आहे. माझे मत अल्ट्रोझ्/टियागो/टिगोर आणि अगदीच जास्त झाले तर नेक्सॉन ह्या टाटा च्या गाड्याकडे झुकतेय पण कुटुंबाला सनरूफ हवे आहे आणि कार ऑटोमॅटीकच हवी आहे त्यामुळे अल्ट्रॉझचा पर्याय रद्द झाला. सेदान च्या ऐवजी कॉम्पॅक्ट एस.यु.वी घेण्याकडे जास्त कल आहे. वेन्यु,क्रेटा,एक्स.यु.वी ३००,नेक्सॉन आणि ब्रेझा ह्या सर्वांची टेस्ट ड्राईव्ज घेऊन झाल्यात. पण निर्णय होत नाही. माँ का आशिर्वाद आणि जेब मे कुछ पैसे लेकर एम.जी हेक्टर ही पाहुन आलो. भन्नाट गाडी आहे. (किंमत २० + लाख) क्रेटा घेण्याचा विचार करणार्यांनी हा पर्याय ही विचारात घ्यायला हरकत नाही. पण बजेट १४ लाख क्रॉस झाले तर पाच आसनी गाडी घेणे महागडे वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

सन रूफ हे गॅलरी गिमिक आहे निदान भारतात तरी. कारण गाडीत बसून ऊन खाता यावे हा हेतू भारतात अजिबात उपयोगी नाही. भारतात बहुसंख्य ठिकाणी वर्षात ९ महिने तरी ऊन असते आणि त्यातील ६ महिने भाजून टाकणारे. त्यासाठी बऱ्याच गाड्या भरपूर पैसे लावतात. अलास्का किंवा उत्तर युरोपीय देशांसाठी हि सुविधा उपयुक्त आहे "सौना" या सुखसोयीसाठी भारतात सोफिस्टिकेटेड माणसे भरपूर पैसे देतात तसेच आहे.

In reply to by सुबोध खरे

अगदी खरे ! शहरात शायनिंग करण्यासाठी उनछ्त उघडून एसीतून बाहेर डोकावून आनंदात पोल्युषन खात आनंदी होतात ते पाहून हसायला येते.

In reply to by कानडाऊ योगेशु

नेक्सॉन एक्स एम एस 10 लाख सोनेट 12 लाख या दोन गाड्या सन रुफ सहीत उत्तम आहेत .

भारतात इलेक्ट्रिक कार किती प्रमाणात दिसू लागल्या आहेत? अमेरिकेत काहे वर्षांत त्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. भारतीय मूळ असणार्‍या अमेरिकनांमध्येही हे प्रमाण उल्लेखनीयपणे वाढत आहे. मी जिथे राहतो तिथे वर्षातले अनेक महिने खूप थंड वातावरण असल्याने त्या काळात इलेक्ट्रिक कार्च एका चार्जवर चालण्याची क्षमता जवळपास निम्म्याने कमी होते. असे असूनही गेल्या दोन-तीन वर्षात इलेक्ट्रिक कार्सची संख्या वाढताना दिसत आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

थंड वातावरण असल्याने त्या काळात इलेक्ट्रिक कार्च एका चार्जवर चालण्याची क्षमता जवळपास निम्म्याने कमी होते. ! असे होते हे माहिती नवहते ! किती असते तापमान? आणि गाडीचा उत्पादक हे अधिकृत रित्या सांगतो! आणि कोणती गाडी ? टेस्ला ? अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत पण पूर्ण इलेकट्रीक आणि पेट्रोल चाय सामान शक्तीच्या गाडीत किमतीत किती फरक आहे ?

In reply to by श्रीरंग_जोशी

थंड वातावरण असल्याने त्या काळात इलेक्ट्रिक कार्च एका चार्जवर चालण्याची क्षमता जवळपास निम्म्याने कमी होते. ! असे होते हे माहिती नवहते ! किती असते तापमान? आणि गाडीचा उत्पादक हे अधिकृत रित्या सांगतो! आणि कोणती गाडी ? टेस्ला ? अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत पण पूर्ण इलेकट्रीक आणि पेट्रोल चाय सामान शक्तीच्या गाडीत किमतीत किती फरक आहे ?

In reply to by चौकस२१२

मी राहतो ते राज्य (मिनेसोटा) हिवाळ्यात अलास्कानंतर सर्वाधिक थंड असणारे अमेरिकेतले राज्य आहे. जानेवारी फेब्रुवारीत उणे २०~२५ फॅ काही वेळा असते. Polar Vortex आल्यास उणे ५० फॅ तापमान देखील मी अनुभवलेले आहे. गेल्या फेब्रुवारीत एका आठवड्यात कमाल तापमान १ फॅ होते. अतिशीत तापमानांत नव्या कार्सचे अथवा त्यांच्या आगामी मॉडेल्सचे परिक्षण करणार्‍या टेस्टिंग फॅसिलिटीज मिनेसोटामधे आहेत. मी आजवर स्वतः इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचारही मनात न आणल्याने आजवर फारशी माहिती काढली नाही. इलेकट्रीक कार बाळगणार्‍या परिचित व हापिसातल्या सहकर्‍यांकडून जे कळले ते म्हणजे मिनेसोटात राहणार्‍यांनी इलेक्ट्रीक कार बाळगायची असली तरी त्याखेरीज (स्वतःजवळ) पारंपारिक इंधनाची कार किंवा किमान हायब्रीड कार असावीच लागते. >> आणि गाडीचा उत्पादक हे अधिकृत रित्या सांगतो! नेमके माहित नाही पण अमेरिकेत उत्पादन किंवा सेवा विकताना (अन जाहिरातीतही) शक्य होईल तेवढी पारदर्शकता पाळली जाते. टिव्हीवरच्या औषधांच्या जाहिरातीत ते कुणी घ्यावे पेक्षा कुणी घेऊ नये व शक्य असणारे साइड इफेक्ट्स यावर जाहिरातीचा जवळपास निम्मा वेळ खर्च होतो :-) . >> अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत हा निष्कर्ष कुठल्या देशातल्या किमतींशी तुलना करुन काढला आहे? >> पूर्ण इलेकट्रीक आणि पेट्रोल चाय सामान शक्तीच्या गाडीत किमतीत किती फरक आहे ? पूर्ण इलेक्ट्रिक कार किमान दिड किंवा बहुतेकवेळा बजेट कारच्या दुपटीहून अधिक किमतीला असतात असे माझे (ढोबळ) निरीक्षण आहे. अनेक अमेरिकन मिपाकर टेस्ला कार्स बाळगत असणार त्यापैकी कुणी याबाबत नेमकी माहिती देऊ शकेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

>> अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत हा निष्कर्ष कुठल्या देशातल्या किमतींशी तुलना करुन काढला आहे? ऑस्ट्रेलिया , आता जवळ जवळ सर्व गाड्या येथे आयात होतात पूर्वी फोर्ड, टोयोटा होल्डन ( जि एम चा स्थानिक ब्रँड) आणि निसान बनयायच्या सर्व बंद पडल्या ... सुझुकी च्या काही गाड्या भारतातंतून येतात ! अमेरिकेच्या २/३ भूभाग आणि लोकसांख्या फक्त २६ मिलियन .. काय गाड्या बनवणार डोंबल ! काही लोक तर म्हनतात आता घ्या सामावून अमेरिकेचे ५२ वे राज्य ( देशद्रोही लेकाचे !) सोबत न्यू झीलंड फुकट देतो ...!

In reply to by चौकस२१२

अमेरिकेत सध्या नव्या कारची सरासरी किंमत ४०,८५७ डॉलर्स एवढी दिसत आहे जी ऑस्ट्रेलियन चलनात ५७,११८ डॉलर्स (या क्षणी असणार्‍या विनिमय दरानुसार) इतकी येत आहे. अमेरिका क्षेत्रफळाने मोठा वाटत असला तरी पूर्ण वर्षभर सहजपणे राहण्यासारखा भूभाग एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत बराच मोठा आहे. अमेरिकेत भरपूर खपणार्‍या कार ब्रॅन्ड्सचे पार्टस परदेशातून आयात केले जातात (जपान, द. कोरिया इत्यादी).

In reply to by सुबोध खरे

उत्तरासाठी धन्यवाद. अमेरिकेतही इलेक्ट्रिक कार खरेदी करणारे किमान मध्यम-मध्यम किंवा उच्च मध्यम आर्थिक गटात मोडतात असे माझे निरीक्षण आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

+१ सध्याच्या नजिकच्या काळात भारतातही या वर्गाला वीजगाडी घेणे परवडणारे असेल असे वाटत नाही.

वीजगाडी घेणे परवडणारे नाही पेक्षा चार्जिंग स्टेशन्स जोवर सहज उपलब्ध होत नाहीत तोवर लोक घेणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे आणि ती बदलायचा खर्च किती आहे याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही. टिगॊर ऑटोमॅटिक टॉप मोडेल साडे अकरा लाखात मिळते. त्यामुळे विकत घ्यायला परवडणार नाही असे नाही. https://www.cardekho.com/tata/tigor-ev/price-in-pune

In reply to by सुबोध खरे

दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे आणि ती बदलायचा खर्च किती आहे याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही. -------- हिरो लेक्ट्रो या इलेक्ट्रिक सायकलची किंमत सध्या २२,००० रु. आहे. तीच्या बॅटरीचे आयुष्य ५०० Charging Cycle आहे. बॅटरी बदली करायची तर तीचीच किंमत १२,००० रु. आहे. आता एका २२००० रु.च्या सायकलला इतका खर्च येतो तर ईलेक्ट्रिक कारला कीती खर्च येईल याचा विचार करावा लागेल.

In reply to by सुबोध खरे

एकंदरीत हे सर्व प्रकरणच खर्चिक आणि गैरसोयीचं असणार आहे बराच काळ ! .... आणि बॅटरी डिस्पोझलचं यंत्रणा खरंच नीट काम करणार हा मोठा प्रश्न आहे. हजारोंनी जुनाट कचरा वाहने जागा अडवून सडताहेत ... !

In reply to by चौथा कोनाडा

मला वाटत इतकी देखील गैरसोय होणार नाही. लवकरच पेट्रोल आणि डिझेल ऐवजी लोक CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देतील. कंपनी मध्ये 4 नवीन गाड्या आलेत as a cab म्हणून. कधी बसण्याचा योग नाही आला पण इलेक्ट्रिक बस मध्ये प्रवास केलाय. एकदम मस्का चालत होती बस. कोणातही डिस्टर्बन्स नाही आणि आवाज पण नाही. एकदम स्मूथ वाटली. सरकारने चार्जिंग स्टेशन्स अव्हेलेबल केल्यास लोक इलेक्ट्रिक कार्स नक्की घेतील असे वाटते. बाकी तांत्रिक बाबी बद्दल अनुभवीच सांगू शकतील.

In reply to by बाप्पू

सरकारने चार्जिंग स्टेशन्स अव्हेलेबल केल्यास लोक इलेक्ट्रिक कार्स नक्की घेतील असे वाटते
यासाठी पावर ग्रिड व टाटा पॉवर एकत्र येत आहेत, अस ऐकलं होतं

In reply to by बाप्पू

इलेकट्रीक कार हेच भविष्य आहे यात शंकाच नाही. आताच टाटाची टिगोर एका रिचार्ज मध्ये २१३ किमी जाते. म्हणजेच तुलनात्मक रित्या आज १५ ते १८ लिटर पेट्रोलची टाकी असल्यासारखे आहे. टिगॊर १५ अँपिअर च्या प्लग वर रिचार्ज होऊ शकते. याच्या बॅटरीची किंमत १०० $ / KWH म्हणजे साधारण १ लाख ६० हजार रुपये इतकी असावी असा अंदाज आहे. आणि १० वर्षांपूर्वी याच बॅटरीची किंमत १००० $/kwh होती. टेस्ला रोडस्टर गाडीचा पल्ला आताच १००० किमी जाण्याचा आहे म्हणजेच भविष्यात इलेक्ट्रिक कारचा पल्ला पेट्रोल कार पेक्षा जास्त असेलच https://www.tesla.com/roadster The drivetrain in an ICE vehicle contains 2,000+ moving parts typically, whereas the drivetrain in an EV contains around 20. म्हणजेच एकदा गाडी विकत घेतली कि त्याची सर्व्हिस करण्याचा कालावधी बराच लांब असेल. शिवाय स्पार्क प्लेग खराब झाला, टाकी गळू लागली, पेट्रोल चोरीला गेलं, PUC करायचं राहिलं, एक्झॉस्ट पाईपला भोक पडलं त्यामुळे आवाज फार होतो अशा असंख्य बारीक बारीक कटकटीपासून मुक्तता असेल. Contrary to what many believe, the batteries in electric vehicles don't degrade over time (or over miles/kilometers driven either). The graph of the battery capacity of Tesla Model S/X vehicles shows that after driving 270,000km (roughly 168,000 miles), the batteries still had 91% of their original capacity... the bottom line is that the batteries lose about 1% of capacity every 30,000km

In reply to by चौथा कोनाडा

हे अजुनहि हे अजूनही बऱ्याच देशात दिवास्वप्नं आहे खरे कारण चार्जिंग स्टेशन ,, अगदी इंच अन इंच जिथे मापलेले आहे त्या सिंगापुर मध्ये सुद्धा विजेवर चालणाऱ्या गाड्या एवढया सर्वत्र नाहीत!

माझ्या एका मित्राचा टाटा पंच Accomplished AMT घेण्याचा विचार आहे. परवा आम्ही टेस्ट राइड घेतली. मी मध्यम रहदारीच्या रस्त्यावर चालवली. पाच प्रवासी असताना सिटी मोडवर टाटा पंच बराच चांगला पिकअप घेते. पुढल्या सीट्स अगदी आरामशीर आहेत, मागच्या सीट्सना लेगरूम थोडी कमी वाटते. अर्थात ही निरीक्षणे, रस्त्यावरची केवळ पाच -सात किमी टेस्ट राईड आणि शोरूममधील अर्धा-एक तास पाहणी यावर आधारली आहेत. टाटा पंच विषयी सल्ला / मत / अहवाल याबद्धल मिपाकरांचे आभार.

टाटा पंच घेतली. १४ ऑक्टोबर ला टेस्ट ड्राइव्ह घेतली आणि लगेच बुक केली आणि १२ नोव्हेंबर ला हातात आली. मधले variant घेतले- ऍडव्हेंचर. डिलिव्हरी घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी २५० किमी लॉन्ग ड्राइव्ह झाली. आधीची गाडी सँट्रो झिंग आहे आणि १७ वर्षे रनिंग होऊनही उत्तम आहे आणि त्यांच्या "sheer driving pleasure" ह्या ब्रीदवाक्यास पूर्णपणे न्याय देते. नवीन गाडीत आवडलेले फीचर्स म्हणजे ड्रायव्हर सीट वरून मिळणारी उत्तम व्हिझिबिलिटी, अप्रतिम सस्पेन्शन, मुबलक ग्राउंड क्लीअरंस आणि सुंदर साऊंड सिस्टिम . बऱ्याचदा आई वडील आणि आम्ही दोघे असा प्रवास करत असल्याने ३६० लि ची बूट स्पेस खूप महत्वाचा फॅक्टर ठरला आणि मागे बसणाऱ्यांसाठी ऐसपैस लेगरूम आणि आरामदायी सीट्स ह्यामुळे प्रवासाचा शीण जाणवत नाही. सर्वात महत्वाचे पंचतारांकित सुरक्षा ! गाडीचा दणकट पणा अक्षरशः जाणवतो ! एक थोडी खटकणारी बाब म्हणजे गिअर शिफ्टिंग ह्युंडाई च्या तुलनेत मुलायम नाही ! कदाचित पहिल्या सर्व्हिसिंग नंतर ते सुधारेल अशी आशा आहे !

In reply to by रश्मिन

एक थोडी खटकणारी बाब म्हणजे गिअर शिफ्टिंग ह्युंडाई च्या तुलनेत मुलायम नाही ! कदाचित पहिल्या सर्व्हिसिंग नंतर ते सुधारेल अशी आशा आहे
बरोबर .. पहिल्या सर्विसिंगच्या वेळी सर्विस सेंटरला सांगा त्यानंतर सुधरेल. पेट्रोल आहे की डिजेल ?

In reply to by तर्कवादी

पेट्रोल आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशन घेतले ! आणि कांदा लिंबू ह्यांचे हा धागा काढल्याबद्दल विशेष आभार ! दिग्गज मंडळींची मतं कळाली.

एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णी यांनीच घेतलेली टाटा मोटर्स इआरसीचे आनंद कुलकर्णी यांची देखील पहावीच अशी सुंदर मुलाखत यू ट्यूबवर आहे (/ होती, आता शोधले तर सापडली नाही)

मध्ये डिझेल कार घ्यायची आहे, काहीतरी सुचवा की मंडळी @ कपिलमुनी @डॉ. सुबोध खरे आपणांकडून जास्त अपेक्षा आहेत बघा चांगल्या सल्ल्याच्या.

स्विफ्ट / स्विफ्ट डिझायर घ्या. याचे १.३ लिटर DDIS फियाटचे CRDI इंजिन अतिशय उत्तम आहे आणि ३-४ लाख किमी सुद्धा चालते. डिझायर ची डिकी/ बूट प्रशस्त आहे. ५० ते ६० हजार किमी पेक्षा जास्त चालली गाडी शक्यतो घेऊ नका कारण त्यानंतर बारीक बारीक काम निघते. मारुती ट्रू व्हॅल्यू कडून घेतल्यास आपल्याला ८-१० % महाग पडेल. परंतु १ वर्षाची वॉरंटी मिळते आणि गाड्या नीट पारखून घेतलेल्या असतात. टाटा च्या जुन्या गाड्या तेवढ्या चांगल्या राहत नाहीत. ह्युंदाईचे सुटे भाग फार महाग आहेत त्यामुळे सेकण्ड हॅन्ड गाडी शेवटी महाग पडते.

सेकंड हॅन्ड डिझेल हा निर्णय का घेतला आहे? सध्या डीझेल आणि पेट्रोलच्या किंमतीमध्ये फार फरक नाही. माझ्या मते सेकंडहॅन्ड गाडी घ्यायची असेल तर पेट्रोल घ्यावी. डिझेल गाडीचे रनिंग जास्त झालेले असते. 15 वर्षांनंतर रिन्यू होत नाही. इन्शुरन्स ,मेंटनन्स, सर्व्हीस कॉस्ट तुलनेने जास्त असते. गाड़ी घेताना लाखभर रुपये जास्त द्यावे लागतात. 5 वर्षांहून कमी वय आणि 50,000 पेक्षा कमी रनिंग असलेली गाडी डिझेल मध्ये मिळणे अवघड आहे. याच रेंज मध्ये पेट्रोल मध्ये खूप उत्तम ऑप्शन असतात. तरीही डिझेल हवी असा निर्णय असल्यास स्विफ्ट , स्विफ्ट डिझायर, ब्रेझ्झा , एस क्रॉस, नेक्सॉन, टोयोटा इटीऑस यांची डिझेल इंजिने उत्तम आहेत. सध्या फोर्ड ने प्रोडक्शन बंद केले आहे, त्यामुळे त्यांची मॉडेल स्वस्तात आहेत पण स्पेयर चा प्रॉब्लेम येउ शकतो. मारुतीने डिझेल इंजिन बंद केलीं आहेत त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला गाडी विकायची असल्यास त्याची किंमत कमी येऊ शकते. 15 वर्षा नंतर गाडी स्क्रॅप मध्ये जाणार हे ध्यानात ठेवून डिझेल गाडी घ्या.

In reply to by कपिलमुनी

+ १ १०१.९९% सहमत ! डिझेलपेक्षा सीएनजी हा पर्याय जास्त किफायतशीर असेल !

नेक्सॉन घेण्यापूर्वी A पिलर चा इशू बघून घ्यावा. शिवाय रिअर विन्डो मधील दृष्यमानता कमी आहे.

In reply to by कपिलमुनी

A पिलर चा इशू
सहमत. निक्सनमधला A पिलर हा बराच बोजड आणि उजवीकडे-पुढे पाहण्यात अडथळा आणणारा आहे. (उजवीकडचा आरसाही तसाच आहे.) सवय नसणाऱ्यांना क्वचित दुर्दैवी प्रसंगी अपघाताला निमंत्रण मिळू शकते. आपल्या उजव्या लेनमध्ये १५-२० फूट पुढे असणारा दुचाकीस्वार, पिलर आणि आरश्यामुळे जवळजवळ पूर्णतः झाकला जातो, आणि तो दुचाकीस्वार एकदम आपल्या लेनमध्ये आला तर आपली तारांबळ उडू शकते. अर्थात सवयीने यावर सहज मात करता येते. निक्सनचे पिलर्स मोठे असण्याचे कारण म्हणजे ते (या सेगमेंटमधील) इतर कार्सच्या पिलर्सच्या तुलनेत खूप जास्त मजबूत आहेत. डोक्यावरच्या आरशातून, मागची खिडकी तुलनेने लहान असल्यामुळे मागचा रास्ता थोडा कमी दिसतो, अर्थात रिव्हर्स करताना स्क्रीनवर पाहता येतेच. याशिवाय, (कदाचित ग्राउंड क्लिअरन्स चांगला ठेवलेला असल्यामुळे) गाडीत प्रवेश करताना तुलनेने लहान दारांतून आत गेल्यासारखे वाटते.