परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)
बर्याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.
आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.
हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परदेशात असणार्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
वाचने
119441
वाचनखूण
प्रतिक्रिया
340
In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
बुल्स आय!
In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
+१,००,०००. लाखाची गोष्ट !
समाजातल्या प्रत्येक घटकाला - अगदी बाहेरून आलेल्याला पण - एका ठराविक सन्मानाने जगता येईल अशा प्रकारची जीवनशैली ऑफर करण्याची ताकद त्या देशांमध्ये आहे - आपण आपल्या महान संस्कृतीमध्ये आपल्याच लोकांना तो सन्मान जेंव्हा देऊ तेंव्हाच यातुन बाहेर येऊ.+१,००,०००. लाखाची गोष्ट ! "कोणती गोष्ट कोठे किती प्रमाणांत आहे" आणि "हे जग केवळ काळ्या किंवा पांढर्या रंगाने बनलेले नसून, एकाच ठिकाणी एकाच जनसमुदायातसुद्धा ते रंग कुटुंब/व्यक्तीपरत्वे (सरसकटीपणा टाळून) कमीजास्त प्रमाणात आस्तित्वात असतात"; ही तथ्ये संस्कृतीच्या गोष्टी आल्या की, सहजपणे विसरल्या जातात आणि "आम्ही विरुद्ध ते" असा सामना सुरू होतो. अगदी "भले उसकी कमीज मेरे कमीज से अधिक सफेद कैसी हो सकती है ।" या तालावर :) गम्मत म्हणजे "अशी (किंवा कोणतिही) तुलना करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या विश्वासू तथ्यांचा अभ्यास किंवा स्वानुभव" याची किमान गरज आहे हे विसरले जाते... मुद्दा स्प्ष्ट करण्यासाठी जरासे टोकाचे पण त्याच पठडीतले उदाहरण द्यायचे झाले तर... हिंदू/मुस्लीम/ख्रिश्चन धर्मांबद्दल (दुर्)अभिमानाने बोलताना वेद-उपनिषद-पुराणे/कुराण/बायबल यांचे सार समजण्याइतका अभ्यास सोडाच पण वाचनही केलेले नसले तरी हरकत नसते. ;)In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
उत्तम प्रतिसाद आहे.
In reply to या ज्या स्टडीज असतात ना ते " by स्रुजा
त्या देशांनी जे करुन दाखवलंय
In reply to १. स्वतःच्या बारातेरा by गवि
आपण त्या ठिकाणी न राहता,
In reply to आपण त्या ठिकाणी न राहता, by रेवती
वरील स्रुजा यांच्या
In reply to आपण त्या ठिकाणी न राहता, by रेवती
माफी , अधिकार वगैरे वाचून
In reply to १. स्वतःच्या बारातेरा by गवि
अमेरिकेतील मुले मुली
In reply to अमेरिकेतील मुले मुली by ट्रेड मार्क
बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
मेरिकन भारतीय वर्सेस
In reply to मेरिकन भारतीय वर्सेस by स्रुजा
आमचे सुरुवातीपासून चे
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by गवि
मला नाही वाटत असं कुणीही
In reply to मला नाही वाटत असं कुणीही by पिलीयन रायडर
+१
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
टेराबायटी प्रतिसाद… टप्प्याटप्प्याने वाचला
दुसर्या विधानातल्या एन्लायटनमेन्टमुळे पहिल्या विधानातले मुलाखतीचे प्रकरण खोटे ठरते काय?खरं खोटं माहित नाही. पण मला तरी असं कुठे दिसलं नाही. एक मुलाखत आहे म्हणून अमेरिकेतल्या सर्वच मुली अश्या आहेत का? हे म्हणजे निर्भया प्रकरणावरून समस्त भारतीय पुरुष बलात्कारी आहेत असं म्हणणं झालं. माझ्या अगदी घरासमोर एक शाळा आहे. पण शाळेची वेळ संपली की काळं कुत्रं पण दिसत नाही. शाळेत रात्रंदिवस दिवे चालू असतात, पोलिसांची गाडी फेऱ्या मारून जाते त्यामुळे लपून काही करणं शक्य नाही. माझी मुलगी टीन एजर आहे. त्यांना शाळेत ५ मिनिटं पण मोकळा वेळ नसतो आणि घरी प्रोजेक्ट्स व इतर अभ्यास एवढा असतो की गोष्टींना वेळच मिळत नाही. आई वडील दोघेही काम करत असतील तर आफ्टरस्कूल क्लासमध्ये मुलं राहतात पण ते रूम्स Supervised CCTV वर असतात, ज्याचे फीड आईच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवर दिसते. हे प्रत्येक शाळेत आहे. आता याची तुलना भारतातल्या शाळांबरोबर करा.'इट्स इजी टू ब्लेम' का काय म्हणतात ते आठवलं.ब्लेम करत नाहीये पण वस्तुस्थिती सांगतोय. मी नेहमी म्हणतो की मनोवृत्तीमध्ये फरक पडणे आवश्यक आहे जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढील काही दशकात व्हावा अशी अपेक्षा. इथून लोक भरमसाठ पैसे पाठवून मनोवृत्तीमध्ये फरक पडणार नाही हे खरंच.. पण तशी अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे.खर्या समाजजीवनाशी नाळ तुटली की असे गैरसमज घट्ट होत जातात असे वाटते.म्हणजे आम्ही भारतीय समाजजीवन बघितलंच नाही काय?छान लग्नबिग्न (पण त्याच मुला-मुलीशी नाही) करुन सुखाने संसार करत आहेत सगळे.गुड फॉर देम. त्या मुलीने आणि मुलाने आपापल्या जोडीदाराला सगळं खरं सांगितलं असेल अशी अशा करतो.'आम्ही भारतास परकिय चलन पाठवतो' चा उपकारकर्पूरादि दर्प बरेचदा जाणवला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून.अशी फारच थोडी उदाहरणं असावीत. ज्यांचे भारतात आता कोणीच नाही ते पैसे पाठवत नसावेत. बादवे, आम्ही पैसे पाठवतो ते दान म्हणून नक्कीच नाही. त्यामुळे कोणाचा असा गैरसमज असेल तर तो मूर्खपणा आहे.सगळं जग फिरुनही आपल्यात 'उरतं ते भारतीयत्व' म्हणजे काय आणि ज्याच्या प्रत्येक बाबतीत समस्या दिसतात ते 'भारतीयत्व' म्हणजे कोणतं असाही एक प्रश्न पडलाय.उदाहरण देऊन पटकन समजेल बहुतेक - आपण अगदी कितीही मोठं आणि सर्व सोयींनीयुक्त घर जरी घेतलं तरी आपलं बालपण जिथे गेलं असतं ते घर आपल्याला जास्त प्रिय असतं. एवढंच काय ते जुनं घर सोडायचा विचारसुद्धा जसा क्लेशदायक असतो आणि जरी आपण नवीन ठिकाणी राहायला गेलो तरी आपले आईवडील मात्र जुनं घर सोडायला तयार नसतात. आपलं गाव सोडून एखाया शहरात एकदा नवीन घरात काही वर्ष राहिल्यावर परत जेव्हा आपण गावात जातो तेव्हा सगळं कसं बदललेलं दिसतं. आपण सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही. अमेरिकेतून परत भारतात येतानाचं तेच फीलिंग आहे. साध्यासाध्या गोष्टींत भांबावून जायला होतं. मी बरेच वर्ष भारतात २ व ४ चाकी गाडी चालवली आहे, पण मध्यंतरी भारतात आल्यावर गाडी चालवायची म्हणजे पोटात गोळा आला होता. प्रचंड ट्रॅफिक, वेड्यावाकड्या जाणाऱ्या गाड्या, हॉर्न्स, नियम तोडणारे लोक, त्यात मॅन्युअल गियर हे बघून भांबावून जायला होतं. ह्या प्रॅक्टिकल समस्या आहेत यात उगाच कोणाकडे बोट दाखवायचा, आरोप करायचा, भारतातल्या लोकांना नावं ठेवायचा किंवा बडेजाव दाखवायचा प्रयत्न नाही. पण एवढं असूनही आपण भारतीयच राहतो. घरात देव असतात, जमेल तेव्हा देवळात जातो, घरात फोडणीचे वास दरवळत असतात, मित्रमंडळी जमवून कट्टा करतो, गुढीपाडवा, होळी, शिवजयंती, गणपती, दसरा दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्त त्या त्या सणाचे पक्वान्न केले जातात. एवढंच काय अगदी संक्रांतीचे हळदीकुंकू पण केलं जातं. अमेरिकेतल्या इतक्याच भारतातल्या पण बातम्या वाचल्या/ बघितल्या जातात. मराठी/ हिंदी सिरिअल्स नेमाने बघितल्या जातात. एवढ्या की चला हवा येऊ द्या, चूकभूल द्यावी घ्यावी, माझ्या नवऱ्याची बायको, नकटीचं लग्न या सिरिअल्स माझ्या दोन्ही मुली आवडीने बघतात. ISRO ने केलेल्या कामगिरीचं कौतुक आम्हालाही असतं आणि ते इथल्या लोकांना सांगताना अभिमानही वाटतो. पण याच अनिवासी भारतीयांना मात्र भारतातल्या त्यांच्याच नातेवाईकांकडून व मित्रांकडून बाहेरच्या देशात राहण्यावर चित्रविचित्र कमेंट्स ऐकायला लागतात. भारताच्या बाजूने बोललं तरी प्रॉब्लेम असतो आणि विरुद्ध बोललं तर विचारूच नका. कशी गम्मत असते ना, भारतात राहून मग परदेशात आलेल्या भारतीयांनी भारताबद्दल तुलनात्मक गोष्टी सांगितल्या तर त्या मानल्या जात नाहीत. पण परदेशात कधीही न गेलेल्या भारतीयाने ऐकीव माहितीवर परदेशाबद्दल केलेलं भाष्य म्हणजे एकदम सत्य असतं.In reply to टेराबायटी प्रतिसाद… टप्प्याटप्प्याने वाचला by ट्रेड मार्क
मी बरेच वर्ष भारतात २ व ४
In reply to टेराबायटी प्रतिसाद… टप्प्याटप्प्याने वाचला by ट्रेड मार्क
टेराबायटीला टेराबायटीन उत्तर
In reply to बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो by संदीप डांगे
संदीपसेठ...
In reply to हम्म by विटेकर
नाही हो काका. उपमर्द वगैरे
अवांतरः-
अमेरिका - भारत वगैरे.
व्हय रं? कसं करु मग? बघती बघ
In reply to व्हय रं? कसं करु मग? बघती बघ by अभ्या..
=))
In reply to =)) by पैसा
=))
In reply to =)) by सतिश गावडे
होय.
In reply to होय. by पद्माक्षी
हा अजून एक गैरसमज !
In reply to हा अजून एक गैरसमज ! by डॉ सुहास म्हात्रे
अगदी नेमके ! =))
In reply to हा अजून एक गैरसमज ! by डॉ सुहास म्हात्रे
ह्या बातमीत असे म्हटले आहे
In reply to ह्या बातमीत असे म्हटले आहे by मराठी_माणूस
जे भारतिय (आणि इतर कोणत्याही
In reply to जे भारतिय (आणि इतर कोणत्याही by डॉ सुहास म्हात्रे
हे सगळे खरे असले तरीही, मुख्य
In reply to हा अजून एक गैरसमज ! by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to =)) by पैसा
मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा
In reply to मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा by स्रुजा
:)
In reply to मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा by स्रुजा
+१
In reply to +१ by ट्रेड मार्क
"भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या
In reply to "भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या by शब्दबम्बाळ
+ १
In reply to "भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या by शब्दबम्बाळ
हहपोदु
In reply to हहपोदु by आजानुकर्ण
हहपुवा.
In reply to "भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या by शब्दबम्बाळ
"अमेरिकेतून काम करून आलेल्या
In reply to "अमेरिकेतून काम करून आलेल्या by पिलीयन रायडर
अरेच्चा! :D
In reply to अरेच्चा! :D by शब्दबम्बाळ
प्रश्न असाय दादा:- माझं मुळ
संस्कार :
'काय ठरलं मग?' विचारायची वेळ
In reply to 'काय ठरलं मग?' विचारायची वेळ by रुपी
+100,
In reply to +100, by संदीप डांगे
अशी कुणी ही मांडणी करत नाहीये
In reply to +100, by संदीप डांगे
नै तर काय....
मी थोडासा संभ्रमात आहे !
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
धर्मराजा, प्रतिसाद आणि शंका
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
तिथल्या शिकलेल्या लोकांना
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
शिक्षणाच्या दर्जावरुन मी
In reply to शिक्षणाच्या दर्जावरुन मी by सुबोध खरे
माझ्या पुतणीला आय आय एम
In reply to शिक्षणाच्या दर्जावरुन मी by सुबोध खरे
सॉरी पण विचार पटले नाहीत
In reply to मी थोडासा संभ्रमात आहे ! by धर्मराजमुटके
धर्मराज
१. अमेरीकेच्या नागरिकांना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात नोकर्या उपलब्ध आहेत ?नोकऱ्या अगदी दुकानात काम करण्यापासून ते मोठ्या कंपनीतल्या उच्च पदापर्यंत सगळ्या आहेत. बॅंक्स, इन्शुरन्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल्स, मार्केटिंग अँड सेल्स इतकेच काय आयटी मधेही बिझनेस साईडला जॉब्स आहेत. तसेच शिक्षक, पोलीस, सैन्य व इतर सामाजिक क्षेत्रात पण बऱ्याच संधी आहेत.२. जर स्वस्तात मनुष्यबळ हवे असेल तरी अमेरीकेत शिकलेल्यापेक्षा इतर देशातील मनुष्यबळाला प्राधान्य दिले जाईल काय?शेवटी कंपन्या त्यांचा फायदा बघतात त्यामुळे असं प्राधान्य दिलं जात आहेच म्हणूनच भारतीय व इतर देशीय इथे आहेत. भारतासारख्या देशातून आलेला ५-६ वर्ष अनुभव असलेला इंजिनिअर वर्षाला जितका पगार मिळवतो तितक्या पगारात अमेरिकन इंजिनिअर तयार होत नाही. कारण त्याचा शिक्षणावरच भरमसाठ खर्च झालेला असतो. सध्याच्या नियमाप्रमाणे (जो १९९८ साली बनवला) कमीत कमी $ ६०,००० आहे.३. जर ट्रम्प ने स्थानिकांनाच रोजगार द्यायचे धोरण अवलंबले आणी पुढील राष्ट्राध्यक्षाने तेच धोरण कायम ठेवले तर आपण इथे ज्या स्पर्धेला घाबरतो तीच स्पर्धा उद्या तेथे निर्माण होईल काय?हे व्हायला बराच वेळ लागेल. मी अमेरिकेत जिथे जिथे काम केलंय तिथे जवळपास ५०-६०% तरी भारतीय व इतर आशियाई देशाचे लोक दिसले. जरी ट्रम्पने वा कोणीही हे सर्व जॉब अमेरिकनांना द्यायचे ठरवले तरी तेवढे अमेरिकन लोक तर उपलब्ध पाहिजेत. आता ब्लू कॉलर जॉब्स जे मेक्सिकन लोकांनी जास्त घेतलेत तिथे पण अमेरिकन पटकन शिरकाव करू शकतात पण कमी पगाराचा प्रश्न आहे.डांगे अण्णा
एकदा पाण्यात उतरल्यानंतर
चर्चा कुठुन कुठे गेली आहे.
In reply to चर्चा कुठुन कुठे गेली आहे. by पिलीयन रायडर
चर्चा तर होणारच !
In reply to चर्चा तर होणारच ! by धर्मराजमुटके
हे मात्र खरं बोल्लात की आप
In reply to हे मात्र खरं बोल्लात की आप by पिलीयन रायडर
दोनशे प्रतिसाद झाले पण शेवटी मी डे वनला सांगितलेलंच कामी येईल !
In reply to दोनशे प्रतिसाद झाले पण शेवटी मी डे वनला सांगितलेलंच कामी येईल ! by संजय क्षीरसागर
पाऊस पडला माझ्यामुळं. =))
In reply to पाऊस पडला माझ्यामुळं. =)) by बॅटमॅन
अर्थात !
In reply to चर्चा कुठुन कुठे गेली आहे. by पिलीयन रायडर
थांबा!!
In reply to थांबा!! by बाजीप्रभू
=)) लिहा लिहा!
In reply to थांबा!! by बाजीप्रभू
काळजी करू नका ! इतक्या लवकर
माझ्या वहीतून अजून थोडे...
In reply to माझ्या वहीतून अजून थोडे... by समर्पक
अत्यंत आवडलेला अजुन एक
समर्पक
काय ठरलं म? जायचं का नाही
"लग्न करणे" आणि "देश/परदेशात
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
क्या बात है!!
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद.
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
+१०००
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
+१०००
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
>>एखादी आवडणारी वैध गोष्ट
In reply to >>एखादी आवडणारी वैध गोष्ट by राजाभाऊ
भारत आणि अमेरिका दोन्ही वैधच
In reply to >>एखादी आवडणारी वैध गोष्ट by राजाभाऊ
वैध = कायदेशीर ! :)
In reply to "लग्न करणे" आणि "देश/परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
हा विचार म्हणून थोर दिसला तरी निर्णय घेण्यासाठी निरुपयोगी आहे
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.वैध गोष्टींचीच चर्चा चालू आहे तस्मात पहिल्या वाक्याला अर्थ नाही. संधी गमावली असं वाटणं हे निवडलेला पर्याय आनंद देत नाही याचं लक्षण आहे आणि फायनली, खंत वाटणं हे स्वतःला स्वतःच्याच निर्णयामुळे हतबल झालो असं समजल्यामुळे होतं."लग्न करणे" आणि "देश/परदेशात राहणे" यांची इथे तुलना चालली आहे म्हणून काही थोडेसे... त्यामुळे, त्या दोघांच्या निर्णयप्रक्रियेत जमीनअस्मानाचा फरक असतो... हे समजण्यात गफलत केली की मग घोळ सुरु होतो.अजिबात नाही. मी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी बोलतोयं आणि लग्नाचा निर्णय हे निर्णयप्रक्रियेतल एक उत्तम उदाहरण म्हणून दिलंय. माझं म्हणणं असंय की पोस्टवर आलेले सत्राशे पन्नास विचार डोक्यात असल्यावर निर्णय असंभव आहे, मग ते विचार कितीही उच्च असोत. प्रत्येक योग्य निर्णय हा विचार प्रक्रिया संपूर्णपणे थांबल्यावरच होतो. मनाच्या तौलनिक अवस्थेत घेतलेला निर्णय म्हणजे मनाच्याच एका बाजूला दाबून, दुसरी वरचढ झालेली असते. दाबलेली बाजू केव्हाही वरचढ होऊ शकते. आणि मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे संधी गमावल्याची खंत वाटते.The Only Thing That Is Constant Is Change ― Heraclitusयात हेराक्लीटस काही विशेष सांगत नाही. परिस्थिती बदलते म्हणूनच मनाला आधीचा निर्णय अयोग्य होता, संधी गमावली वगैरे सुनवायचा चान्स मिळतो. पण बदललेल्या परिस्थितीत फेरनिर्णय घेण्याची स्थिती आली तरी पुन्हा निर्णय प्रक्रिया सेमच असते ! म्हणजे त्यावेळी चालू असलेल्या सत्राशे पन्नास विचारांचा कोलाहल थांबल्याशिवाय योग्य निर्णय होत नाही. थोडक्यात, तुम्ही निर्णय कशाविषयी घेता हे कायम गौण आहे, तो कसा घेता ते महत्त्वाचंय. मनानं निर्माण केलेले सर्व विकल्प एकदाच निरखून, मनाला संपूर्णपणे बाजूला करुन, जो स्वतःच्या हंचला योग्य वाटतो तो तत्कालीक निर्णय कायम समाधान देतो कारण तो तुम्ही स्वतःच्या जवाबदारीनं घेतलेला असतो. त्या निर्णयाबद्दल मन खंत निर्माण करुच शकत नाही कारण मनाचा (थोडक्यात डेटाचा) उपयोग करुन तुम्ही स्वतःच्या समग्रतेनं तो घेतलेला असतो. परिस्थितीनुरुप फेरनिर्णय करावा लागला तरी तुम्हाला खंत वगैरे वाटत नाही कारण घडून गेलेल्या गोष्टींचा उहापोह केवळ कालापव्यय आहे याची तुम्हाला कल्पना असते. तस्मात, नव्या परिस्थितीत तुम्ही मनानं दिलेला नवा डेटा व्हेट करता आणि मग मनाला बाजूला सारुन पुन्हा स्वतःच्या अंतःप्रेरणेनं निर्णय घेता.In reply to हा विचार म्हणून थोर दिसला तरी निर्णय घेण्यासाठी निरुपयोगी आहे by संजय क्षीरसागर
हेराक्लीटस सुद्धा तुमच्यासाठी
बदलणारी काळ-स्थळ-परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी साधने/प्रतिक्रिया बदलण्याची सजग निर्णयप्रक्रिया करण्याची क्षमता फक्त आणि फक्त सजीवांमध्ये असते... तर मग सर्वात जास्त विकसित व सर्वात जास्त विचार करण्याची क्षमता असलेल्या जीवाने (पक्षी : माणसाने) तसे न वागणे कसे योग्य होईल ? किंबहुना तसा बदल करण्याच्या माणसाच्या अतुलनिय क्षमतेमुळेच तो आज जगातला सर्वात प्रगत आणि प्रबळ प्राणी झाला आहे....हे एक सबळ शास्त्रीय सत्य आहे आणि त्यावर माझा अचल विश्वास आहे ! :)In reply to हेराक्लीटस सुद्धा तुमच्यासाठी by डॉ सुहास म्हात्रे
उगाचच आपली, एक धोक्याची सूचना
In reply to उगाचच आपली, एक धोक्याची सूचना by डॉ सुहास म्हात्रे
फ्लेक्सिबिलीटीचा विषय नंतर येईल
पूर्वी चालू केलेलेच औषध कायमस्वरूपी चालू ठेवेन" असा (दुर्)आग्रह धोकादायक असतो, असे (सकारण) म्हणतात.हे विधान, वरचा प्रतिसाद वाचल्यावर गैरलागू आहे असं लक्षात येईल. आणि सगळी चर्चा मूळ निर्णयावर चालू आहे, फेरनिर्णयावर नाही हे देखिल कळेल.In reply to फ्लेक्सिबिलीटीचा विषय नंतर येईल by संजय क्षीरसागर
मला अध्यात्मात गती नाही.
आणि माझं साधं म्हणणं आहे की जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही.हे "मनाचा कंप्युटरसारखा उपयोग करणे" पण तो "कंप्लीटली शटडाऊन करून मगच त्याचा वापर करणे" (!!!) आणि "वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबवून निर्णय घेणे"... हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे. ******"हा निर्णय आपण अंतःप्रेरणेनं (हंच) घेतलेला असतो. या निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात."???!!! याला साध्या मराठीत "अशास्त्रीय निर्णयप्रक्रिया" म्हणतात. प्रत्येक गोष्टीचे "प्रोस आणि कॉन्स" पडताळून त्यांचा तर्कशास्त्राच्या पायावर विचार करून निर्णय घ्यावा, अशी सर्वमान्य शास्त्रिय पद्धत आहे. अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकते, पण केवळ एकमेव इनपुट नसते, त्या हंचला आधार देणारे काहीतरी पुरावे असावे, असा शास्त्रिय दंडक आहे. विनापुरावा हंचला फारतर "unknown-unknown factor" असे समजून त्याच्यासाठी धोकप्रबंधक उपायांचा ('रिस्क मॅनेजमेंट' उर्फ तसे घडलेच तर, त्यापासून होणारा धोका टाळणार्या आणि/किंवा त्या परिस्थितीचा फायदा घेणार्या उपायांचा) विचार करून ठेवावा असे समजतात. ******तो नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो, मग मनाकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा नवा निर्णय घेतो !१. एकदा निर्णय घेतल्यावर इतर सगळे विसरून त्या निर्णयाप्रमाणेच पुढे चालावे असे तुम्हीच म्हटले आहे. मग, "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" हे आपल्या सतत सजगपणे निरिक्षण न करता कसे साधेल बरे ?! २. नवीन निर्णय घेताना "कंप्लीटली शटडाऊन केलेल्या मनाच्या कंप्युटरमध्ये" हे नवीन फॅक्टर्स कसे इनपुट करणार ? ३. तुम्हीच म्हणता की "निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात" आणि त्याबरोबरच म्हणताहात की "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" ! "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?! ****** असो. तुमची आणि माझी वैचारीक पद्धती वेगळी आहे हे पुरेसे सिद्ध झाले आहेच. तुम्हाला तुमची विचारपरंपरा कायम ठेवण्याचा लोकशाही हक्क आहेच ! मात्र, एकमेकाला समांतर जाण्यार्या व एकमेकाला कधीच न भेटणार्या स्तरांवर चर्चा चालू ठेवण्यात काही हशिल आहे का ?In reply to मला अध्यात्मात गती नाही. by डॉ सुहास म्हात्रे
"लग्न आणि देशाची निवड"
In reply to "लग्न आणि देशाची निवड" by डॉ सुहास म्हात्रे
अंतःप्रेरणा !
मला अध्यात्मात गती नाही. तेव्हा तुमचा प्रतिसाद तुमच्या वैयक्तिक अध्यात्मिक विचारावर आधारीत असल्यास माझा पास समजा.मग हा प्रतिसाद जरी तुमच्या प्रतिसादाला लिंक केला असला तरी तो तुमच्यासाठी नाही असं समजा. (यात कोणताही उपहास नाही, कृपया गैरसमज करुन घेऊ नका.)हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे.डोक्यात अनंत विचार असतांना घेतलेला निर्णय (प्रोस अँड कॉन्स अॅनालिसिस) नेहमी द्वंद्वातून निर्माण झालेला असतो. अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला ध्यानप्रक्रिया (मेडिटेशन) समजावून घ्यावी लागेल. तो प्रयत्न मी मनावरच्या लेखमालेतून करत होतो (रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा) पण अशा विषयांसाठी हा फोरम नाही हे लक्षात आल्यावर लिहीणं बंद केलं. तरीही मूळ मुद्दा उरतोच : मानसिकप्रक्रिया थांबल्याशिवाय एकात्म निर्णय होत नाही. त्यामुळे सोडून दिलेल्या विकल्पांच्या बाबतीत संधी हुकली आणि खंत वाटली हे प्रश्न निर्माण होतात.अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकतेहंच हा कधीही इनपुट नसतो. तो मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे अस्तित्वानं दिलेला कौल असतो.नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?!जीवन कॅलिडोस्कोपिक आहे त्यामुळे फॅक्टर्स बदलत राहाणारच. ते पूर्वी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा परिणाम करु शकतात. जगाच्या अंतापर्यंत टिकणारा निर्णय हा विपर्यास आहे. फेरनिर्णयाच्या वेळी सुद्धा त्या समयी असलेले फॅक्टर्स व्हेट करुन पुन्हा अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला काहीच अडचण नसते.लग्न आणि देशाची निवड" याबाबतच्या निर्णयांची तुलना योग्य नाही असे मी (माझ्या कारणांसह) म्हटल्याने तुम्हाला बहुतेक राग आला आहे असे दिसते आहे.लग्न काय, देशाची निवड काय, की दोन बॉल आणि आठ रन्स या सिचुएशनमधे बोलरला पडलेला पेच काय, मूळ प्रश्न `संभ्रमात निर्णय कसा घ्यावा' हा आहे. आणि त्याला हंच हे एकमेव उत्तर आहे !लेट अस अॅग्री टू डिसअॅग्री" आणि धाग्याचे काश्मीर करण्याचे टाळूया, काय म्हणता ?पहिला भाग कायम मान्य आहे कारण हंच काय असतो याची तुम्हाला कल्पना दिसत नाही आणि मानसिक उहापोहातून निर्णय घेण्याची प्रक्रिया मी केव्हाच सोडून दिली आहे. बाकी धाग्याचं काश्मिर वगैरे करण्याचा माझा उद्देश कधीही नसतो, फक्त माझा प्रतिसाद दुनियेपेक्षा वेगळा असतो हे नक्की.In reply to अंतःप्रेरणा ! by संजय क्षीरसागर
ऑल डिसिजन्स आर इम्पल्सिव...
In reply to ऑल डिसिजन्स आर इम्पल्सिव... by संदीप डांगे
येस!
जिथे तुल्यबळ पर्याय असतात किंवा पर्यायच नसतात तिथे इम्पल्सिव डिसिजन घेतला जातो..सांप्रत चर्चा ही पहिल्या सिच्युएशन मधे मोडते !In reply to मला अध्यात्मात गती नाही. by डॉ सुहास म्हात्रे
जो भविष्याचा विचार करतो तोच
In reply to जो भविष्याचा विचार करतो तोच by सतिश गावडे
नव्या शब्दांच्या खास वापरासाठी दिला असला तरी
In reply to मला अध्यात्मात गती नाही. by डॉ सुहास म्हात्रे
दादासाहेब...
In reply to दादासाहेब... by अर्धवटराव
फंडातच गोंधळ आहे !
शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे.मन शट डाऊन होणं म्हणजे शांतचित्त ! ते मनाचं कार्य नाही.मनाला शटडाऊन करणे / मनाला इग्नोर करणे /अस्तीत्वाने इंपल्स देणे वगैरे भानगडी कुठुन आल्या हा परत एक प्रश्न उरतोच.मन शट डाऊन झाल्याशिवाय अंतःप्रेरणा जागृत होत नाही.सहज सोप्या मानकीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा का पांघरला जातो कोण जाणे.अध्यात्म हा बुरखा आहे ? ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे. फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.In reply to फंडातच गोंधळ आहे ! by संजय क्षीरसागर
बरं
In reply to बरं by अर्धवटराव
पुन्हा तोच घोळ !
विचारांचं काहुर थांबणं म्हणजे शांतचित्त. ते मनाचच कार्य आहे.विचार मनाव्यतिरिक्त कुठे असतात ? जर विचार थांबले तर मन कुठे असतं?अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं.अंतःप्रेरणा मेंदूत प्रकट होत असली तरी ती मनाच्या शून्य अवस्थेशिवाय प्रकट होत नाही. ही अंतःप्रेरणा एक गूढ आहे. तीचा उगम शोधता येत नाही. मेंदूत ती फक्त प्रकट होते.जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.मागच्या प्रतिसादात तुम्ही असा ज्योक मारला होताशांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे !आता म्हणतायंजागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं.म्हणजे तुम्ही मनाच्या सुप्त अवस्थेत (झोपेत) स्वेच्छेनं विचार करु शकता का ? झोपेत जागृत होत असलेल्या मनाच्या प्रेरणेला स्वप्न म्हणतात. जागृत अवस्थेत आणि मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे आपल्याला जी उमगते ती अंतःप्रेरणा असते.मानसीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा पांघरणे...ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे.... सदर चर्चेत याबद्दल नो कमेण्ट्स.अंतःप्रेरणा ही `मानसिक थिअरी' आहे असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे कारण ती नक्की काय आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. शिवाय ध्यान ही अध्यात्मिक क्रिया मनाचा आवेग थांबवू शकते याचीही तुम्हाला माहिती दिसत नाही.फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.अर्थात ! या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरावरुन सुद्धा जर ते तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.In reply to पुन्हा तोच घोळ ! by संजय क्षीरसागर
पुढे...
In reply to पुढे... by अर्धवटराव
.
तुम्हाला विचार आणि मन यातला फरक कळत नाहि किंव विचार म्हणाजेच मन अशी तुमची धारणा आहे. अर्थात, ति चुकीची आहे.शरीरशास्त्र दृष्टीने अंतःप्रेरणा, विचार, भावना.. सर्व काहि मेंदुतच तयार होताततुम्हाला मन आणि जाणीव यातला फरक माहिती नाही. जाणीवेनं मनातले विचार जाणले जातात. तद्वत अंतःप्रेरणेची जाणीव होते.बघा ना. तुमच्या व्यतिरीक्त कोणाला अंतःप्रेरणेचा अनुभव येणं शक्यच नाहि. आणि अंतःप्रेरणेसंबंधी कुणी काहि अभ्यास केला असण्याचाही संभव नाहि.अंतःप्रेरणा हा मनाचाच भाग आहे म्हणणारा अंतःप्रेरणे विषयी अनभिज्ञ आहे.तुमच्याशिवाय कोणाला अध्यात्मीक माहिती असणं शक्य तरी आहे काय ?ज्याला ध्यानाविषयी शून्य माहिती आहे त्याला अध्यात्माबद्दल काहीही माहिती नाही.मानसशास्त्राला तुम्ही आध्यात्म म्हणुन कवटाळुन बसला आहात. त्याला तुमचा आणि इतर सर्वांचाच नाइलाज आहे. असो.अध्यात्म हा प्रथम चरणात मनाला शट डाऊन करण्याचे मार्गांचा (ध्यानप्रणाली) अभ्यास आहे. तुम्ही मनातच अडकला आहात त्यामुळे तुमचे फार बेसिक गैरसमज आहेत.In reply to . by संजय क्षीरसागर
बाय द वे
अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.In reply to बाय द वे by संजय क्षीरसागर
बघतो.
In reply to . by संजय क्षीरसागर
बरं
In reply to बरं by अर्धवटराव
जाऊं द्या !
विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात.तेही कळेल. अर्थात, तुम्ही पोस्ट लिहीण्यापूर्वीच, उपरोल्लेखित फंडा संपूर्ण चुकीचा आहे हे नमूद करतो.एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी
In reply to एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी by रेवती
आयुष्याच्या शेवटी आपल्याला
माझा अनुभव
In reply to माझा अनुभव by उपाशी बोका
+१००
In reply to माझा अनुभव by उपाशी बोका
+१०००
In reply to +१००० by ट्रेड मार्क
+१००० धन्यवाद !!!!
In reply to माझा अनुभव by उपाशी बोका
हा प्रतिसाद पूर्णतः पटला! तो
स्थलांतर
In reply to स्थलांतर by ट्रेड मार्क
उगाच तणतण
In reply to उगाच तणतण by अनुप ढेरे
=))
In reply to स्थलांतर by ट्रेड मार्क
ती नवीन बांगड्या घेतलेल्या
मिपा आणि मुपि, काही फरक नाही. हमेरिकेवर धागा आला कि कल्ला झालाच.
हा लेख सल्ला मागण्यासाठी
In reply to हा लेख सल्ला मागण्यासाठी by वेशीवरचा म्हसोबा
तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल
In reply to तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल by पिलीयन रायडर
तुम्ही
In reply to तुम्ही by धर्मराजमुटके
नाही हो!! त्रास बिस अजिबात
In reply to नाही हो!! त्रास बिस अजिबात by पिलीयन रायडर
माझा प्रश्न केव्हाच मागे पडलाय.
In reply to तुम्ही by धर्मराजमुटके
त्रास ? कसला? कुणाला? ;)
In reply to त्रास ? कसला? कुणाला? ;) by अभ्या..
बरोबर...
In reply to बरोबर... by वेशीवरचा म्हसोबा
अगं बाई, पलिकडच्या वेशीवरचे
In reply to तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल by पिलीयन रायडर
<<<<तो ही गेल्या २४ तासात अ
In reply to <<<<तो ही गेल्या २४ तासात अ by विशुमित
बरं! =))
वर कोणीतरी
In reply to वर कोणीतरी by धर्मराजमुटके
सर...
In reply to सर... by विशुमित
"अपनी गली मे कुत्ता शेर" हे
In reply to सर... by विशुमित
दोन घटनांची तुलना होऊ शकत
In reply to दोन घटनांची तुलना होऊ शकत by संदीप डांगे
जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे
In reply to जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे by सतिश गावडे
तरीही नाही...
In reply to तरीही नाही... by संदीप डांगे
मुद्दा समजला. अशा घटनांमागे
In reply to मुद्दा समजला. अशा घटनांमागे by सतिश गावडे
नवाच मुद्दा !
In reply to नवाच मुद्दा ! by संजय क्षीरसागर
होय. हा नविनच मुद्दा आहे.
In reply to होय. हा नविनच मुद्दा आहे. by सतिश गावडे
तुमच्या ही लक्षात येऊ नये म्हणजे कमाले !
हा मुद्दा कसा चुकीचा आहे ?मुद्दा बरोबरचे. पण असले १९५७ मुद्दे इथल्या सदस्यांनी मांडलेत त्यामुळेच तर गोंधळ वाढतोयं. आणि इतक्या गोंधळात निर्णय कसा घ्यावा हे मी सांगतोयं !In reply to तुमच्या ही लक्षात येऊ नये म्हणजे कमाले ! by संजय क्षीरसागर
एक प्रश्न!
In reply to एक प्रश्न! by शब्दबम्बाळ
आधीच १७५६ झाले होते
In reply to तरीही नाही... by संदीप डांगे
........गोरे असतात काय
In reply to तरीही नाही... by संदीप डांगे
डांगे जी..
In reply to डांगे जी.. by विशुमित
तुमचे उदाहरण, हे "माझ्या
In reply to तुमचे उदाहरण, हे "माझ्या by संदीप डांगे
शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या
In reply to शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या by मराठी_माणूस
नाही समजले? माझे काही चुकले
In reply to सर... by विशुमित
काय राव
In reply to काय राव by वरुण मोहिते
सर सलामत...
बरीच चर्चा झाली
In reply to बरीच चर्चा झाली by वरुण मोहिते
योग्य प्रतिसाद...
In reply to योग्य प्रतिसाद... by अभिदेश
तशी शुद्ध हवा तर आमच्या
In reply to तशी शुद्ध हवा तर आमच्या by विशुमित
खरे आहे हो! नाशकातल्या
In reply to खरे आहे हो! नाशकातल्या by संदीप डांगे
काहीच्या काहीच. जर मला नाशकात
In reply to तशी शुद्ध हवा तर आमच्या by विशुमित
हे खरं आहे का?
In reply to हे खरं आहे का? by अर्धवटराव
तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे
In reply to तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे by विशुमित
पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या
In reply to पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या by अप्पा जोगळेकर
मी कुठे म्हणालो शहरात हे मिळत