मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

धर्मराजमुटके · · काथ्याकूट
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.

वाचने 61554 वाचनखूण प्रतिक्रिया 405

In reply to by फेदरवेट साहेब

पैसा हे एक दुखणे आहेच पण त्यापेक्षाही मुंबईसारख्या भारतातील एका अतिमहत्त्वाच्या शहरावर कोणाची सत्ता राहते हे सगळ्याच पक्षांना जास्त महत्त्वाचे वाटते. शिवसेनेसाठी मुंबई / ठाणे जिंकणे म्हणजे महाराष्ट्राचे राज्य मिळविण्यासारखे आहे तर भाजपाला राज्य मिळुनही मुंबई नाही मिळाली तर बरेच काही गमावल्यासारखे वाटेल. तर राष्ट्रवादीला / काँग्रेसला मागील निवडणूकीपेक्षा १ ही सीट जास्त मिळणे ही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नवसंजिवनी फुंकण्यासारखे आहे. रिपाईंना त्यांचे ठराविक पॉकेट सोडले तर कोठेही वाव नाही. यात सगळ्यात जास्त मज्जा आहे ती एमआयएमची. काँग्रेसची / सपाची जागा ते घेऊ शकतात. अर्थात मुंबईतील मुस्लीम मतदारांची आणि तुलनेने एखाद्या छोट्या शहरातल्या मुस्लीम मतदारांचे विचार सारखेच असतात असे म्हणणे चुकीचे ठरेल.

गॅरी ट्रुमन 27/01/2017 - 20:54
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
मलाही. उद्धव ठाकरे म्हणत आहेत की युतीमुळे शिवसेनेची २५ वर्षे सडली. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा मतीतार्थ हा की युती झाली त्यावेळी शिवसेनेपेक्षा भाजपचे अस्तित्व नगण्य होते आणि शिवसेनेमुळेच भाजप महाराष्ट्रात फोफावला. हे म्हणणे अर्धसत्य नसून पूर्णच असत्य आहे.या उधोजीरावांच्या समर्थकांना काहीही वाटत असले तरी आकडे काहीतरी वेगळेच बोलत आहेत. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा दिला.इतकी वर्षे भाजपने शिवसेनेला इतके मोठे स्थान का दिले हे कोडेच आहे. शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड कसा होता? युतीच्या काळातही प्रत्येक वेळी भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त होता.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये २००२ चा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेने भाजपने उभ्या केलेल्या उमेदवाराविरोधात मत दिले आहे.शरद पवार जर पंतप्रधान होणार असते तर मराठीपणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पवारांनाही पाठिंबा दिला असता यात अजिबात शंका नाही.पुण्यातील शिवाजीनगरसारखा भाजपचा हक्काचा मतदारसंघ युतीत असताना शिवसेनेने दादागिरी करून इतकी वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवला होता.पण २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर या मतदारसंघात भाजपने अगदी आरामात विजय मिळवला. इतकी वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ मध्ये शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा मिळविल्या या कारणावरून लगेचच १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितला.रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे ज्या मतदारसंघातून निवडून येत असत तो मतदारसंघ भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या 'राजहट्टाखातर' सोडून द्यावा लागला होता.तसे असेल तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेमुळेच इतके मोठे यश मिळाले होते हे अगदी कोणीच नाकारू शकत नाही.तरीही शिवसेना भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये ४ जागाही जास्त द्यायला तयार नव्हती.भाजपने यांची दादागिरी का सहन केली हा प्रश्नच आहे. १९९० मध्ये विधानसभेच्या १७४ जागा शिवसेनेने तर उरलेल्या ११४ जागा भाजपने लढविल्या होत्या. अगदी २००९ पर्यंत भाजपने लढविलेल्या जागांचे प्रमाण जवळपास तितकेच राहिले. फार तर ३-४ जागा जास्त मिळाल्या. तर लोकसभेत मात्र शिवसेनेला मिळालेल्या जागांचे प्रमाण लक्षणीय वाढले. १९८९ मध्ये शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना तर धनुष्यबाण हे चिन्हही मिळालेले नव्हते. १९८९ पासून २०१४ पर्यंत शिवसेनेला लोकसभेच्या जागा मात्र वाढवून मिळाल्या पण भाजपच्या विधानसभेच्या जागा मात्र फार वाढल्या नाहीत. काल उद्धव ठाकरे म्हणाले की १९९८-९९ मध्ये जयललिता आणि ममता बॅनर्जी वाजपेयींना त्रास देत असताना शिवसेना मात्र वाजपेयींच्या पाठीशी खंबीरपणे होती आणि शिवसेनेने कधीच वाजपेयींना त्रास दिला नाही. उलट आपल्या कोट्यातली मंत्रीपदे जयललितांना द्यायची तयारीही बाळासाहेबांनी दाखवली होती. हे बोलताना उध्दव एक गोष्ट सोयीस्करपणे विसरले.आणि ती म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रातले मनोहर जोशींचे सरकार भाजपबरोबर होते आणि दिल्लीत वाजपेयींना त्रास दिला असता तर त्याचे परिणाम मुंबईत भोगावे लागले असते. मुंबईतील सत्ता गेल्यावर शिवसेना तितकी सज्जन राहिली होती का? वाजपेयींची १९९९ नंतरची टर्म त्यापूर्वीच्या टर्मपेक्षा बरीच जास्त स्थिर होती. तरीही केंद्राच्या 'जागतिकीकरणाच्या' धोरणामुळे कामगारांपुढच्या अडचणी वाढत आहेत असे म्हणत त्याविरूध्द एप्रिल २००१ मध्ये शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचवेळी मनोहर जोशी अवजड उद्योगमंत्री होते याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. सुरेश प्रभू हे वाजपेयींच्या मर्जीतले मंत्री होते. त्यांना बाळासाहेबांनी राजीनामा द्यायला लावला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने जास्त जागांची मागणी केली (ज्या आधारावर १९९६ मध्ये शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला होता) तेव्हा शिवसेना अजिबात तडजोड करायला तयार नव्हती. मग प्रचारात "नरेंद्र मोदींचे मंत्रीमंडळ म्हणजे अफझलखानाचे सैन्य","जसे आदिलशहा, कुतुबशहा तसे अमित शहा" असे मोती त्याच उध्दव ठाकरेंनी काढले होते. नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांचा उल्लेख प्रचारसभेत करून खास शिवसेना स्टाईल असंस्कृतपणाचे प्रत्यंतर आणून दिले. त्यानंतर सत्तेत असून शिवसेना विरोधी पक्षांपेक्षाही वाईट पध्दतीने वागत आलेली आहे. दिल्लीत केजरीवाल जिंकल्यावर मुद्दामून केजरीवालांचे अभिनंदन करायचा फोन उध्दव ठाकरेंनी केला. आता गोव्यामध्ये भाजपमधून बाहेर पडलेल्या गटाबरोबर युती करून भाजपचा पराभव करायची कारस्थाने चालू आहेत. असला बेजबाबदार मित्रपक्ष दूर झाला हे चांगलेच झाले. असे म्हणतात की पाठीत खंजीर खुपसणार्‍या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला.शिवसेनेविषयी नेमके हेच मलाही वाटत आहे. ही गोष्ट बरीच आधी व्हायला हवी होती ती आता झाली आहे. अपेक्षा एकच की शिवसेना बाहेर पडल्यावर त्याजागेवर राष्ट्रवादी काँग्रेस नको. तसे झाले तर विधानसभा निवडणुकांमध्ये तरी माझे मत भाजपला नक्कीच नाही.गरज पडल्यास सत्ता गेली तरी हरकत नाही पण शिवसेना नको आणि राष्ट्रवादीही नको.

गॅरी ट्रुमन 27/01/2017 - 21:07
मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील असे वाटते. याचे कारण म्हणजे महापालिका निवडणुका स्थानिक पातळीवरच लढविल्या जातात. त्यामुळे स्थानिक पातळीवर लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे इत्यादी गोष्टी महापालिका निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त महत्वाच्या ठरतात. मुंबईत या दोन्ही गोष्टींमध्ये शिवसेनेचा हात इतर कोणता पक्ष धरू शकणार नाही. एक उदाहरण द्यायचे झाले तर मी शाळेत असताना ठाण्याला राहायला होतो. आमच्या भागातून १९८६ पासून शिवसेनेचे विलास सामंत हे महापालिकेवर निवडून जात आहेत. आमच्या भागात अनेक नागरीकांना ते नावाने ओळखतात. असाच जनसंपर्क मुंबईतही शिवसेनेच्या नगरसेवकांचा, कार्यकर्त्यांचा आहे हे नक्कीच. त्याचा फायदा महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला होईलच. भाजपने कितीही जोरदार टक्कर दिली तरी या बाबतीत शिवसेनेचे पारडे जड असेल असे वाटते. त्यातूनही शिवसेनेविरूध्द "अ‍ॅन्टी इन्कबन्सी" येऊ शकेल ही शक्यता आहेच. १९८५ पासून १९९२ ते १९९६ हा अपवाद वगळला तर शिवसेनेची सत्ता मुंबईत राहिली आहे. मुंबईतले रस्ते, झोपडपट्ट्या इत्यादी गोष्टी कशा आहेत हे मुंबईकरांना चांगलेच माहित आहे. आणि निवडणुका जवळ आल्यावर शिवसेनेला पंचवार्षिक मराठी उमाळे येतात तसे यायला लागलेही आहेत. पण त्यातून निष्पन्न काही होत नाही हे लक्षात येऊन पूर्वीइतक्या प्रमाणावर लोक त्या उमाळ्यांना भूलले नाहीत तर मात्र शिवसेनेला जास्त नुकसान होऊ शकेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

रमेश आठवले 28/01/2017 - 22:14
मुंबई मधे मराठी भाषिकांची संख्या २७ % आहे. भाजपाशी युती होती तेंव्हा इतर भाषीय मते त्यांना मिळत होती. आत्ता ही शक्यता कमी. २७% मराठी मते चार पाच पक्षात विभागली जाणार . शिवसेनेने सुरवातीच्या दिवसात लुंगीवाल्यांचा ( दाक्षिणात्य ) मंडळींचा आणि नन्तरच्या काळात भय्या ( उत्तर भारतीय ) मुंबईकरांचा विरोध केला. गुजराती, जैन, मारवाडी हे नेहमी भाजपाच्या बाजूने असतात. बाळासाहेब आता नाहीत. या सर्व गोष्टी शिवसेनेचा मुंबईत मोठा पराभव दर्शवितात.

आजचा प्रवाह असेच सांगतो, मात्र यावेळेस खरोखरीच चुरशीची लढाई असल्यामुळे काही सांगणे शक्य होणार नाही. माझ्या एका मित्राने मागील निवडणुकांत एक सॉफ्टवेअर बनविले होते त्यात प्रत्येक वॉर्डाची लोकसंख्या, धर्माप्रमाणे लोकसंख्या, भाषेप्रमाणे लोकसंख्या, त्या त्या वार्डातील गेल्या काही निवडणुकींचे निकाल, प्रत्येक वेळ प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते असा बराच विदा होता. इतके सुक्ष्म काम बघून मी थक्कच झालो होतो. अर्थात प्रत्येक वॉर्डातील उमेदवार जाहिर होईपर्यंत काही अंदाज लावणे अवघड आहे.

वरुण मोहिते 27/01/2017 - 21:41
निश्चितच चांगला नाही . भ्रष्टाचाराचा बोलायचं तर भाजप पण सत्तेत होती . आजही असलेल्या ३५ नागरसेवकांपैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत भाजप चे नगरसेवक कार्यक्षम आहेत. अमराठी वस्तीत किंवा गुजराती बहुल भागात मिळणारी मत आणि तिथल्या कामाची टक्केवारी टेंडर ह्यात अमराठी कंत्राटदार जास्त आहेत . आज केवळ मोदींच्या नावावर सगळीकडे मत मागणं चालू आहे. कोणीही पक्षात या पावन करून घ्या चालायचा .वैयक्तिक मत म्हणाल तर भाजप बिलकुल स्वच्छ नाही. त्यामुळे माफियाराज वैग्रे बाता त्यांनी बंद कराव्यात . दुसरा असा आपण जे पूर्वीचे मतदारसंघ म्हणत आहेत तिथे जनसंघाची विचारसरणी पूर्वीपासून रुजलेली होती . त्यामुळे त्यांचे हक्काचे मतदार संघ होते. १९९६ ला ठाण्यात आनंद दिघ्यांचा खूप प्रस्थ होता त्यामुळे ती जागा सोडावी लागली पण त्यानंतर गेल्या २१ वर्षात एक अपवाद वगळता शिवसेना ती जागा हरलेली नाही . रामभाऊंना नंतर राज्यसभेवर पाठवण्यात आलं. लोकसभेसाठी एकही जागा मिळाली नाही का रामभाऊंसाठी भाजप ला? . तेव्हाच भाजप आणि आताचा ह्यात खूप फरक आहे . प्रश्न मोठ्या भावाचा तर निश्चित पणे ठाकरे आणि दुसरी गोष्ट १९९५ ला सिंगल पार्टी म्हणून काँग्रेस च्या जागा जास्त होत्या मतांची टक्केवारी पण जास्त होती तरी युती होती म्हणून सत्ता आली आणि मा=हत्वाचा म्हणजे कधी नव्हे ते ४५ अपक्ष आमदार निवडून आले . ते सर्व युतीत सहभागी झाले कारण बाळासाहेब ठाकरे . त्यामुळे मोठा भाऊ छोटा हे सर्वं चालू झालं. पुढे शिवसेनेतली फाटाफूट आणि ४-२ जागा वरखाली इतकाच भाजप सेनेचा चालू होता आता जे आहे भाजप ते मोदींची कृपा . भाजप नेतृत्व मुंबईतला तर हास्यास्पद आहे . देशपातळीवर आणि महानगर पालिकांसारख्या ठिकाणी वेगळा विचार होत असतो त्यामुळे सगळीकडे मोदींच्या नावावर मत मागणं भाजप ला परवडणार नाही भविष्यात . अवांतर - आजच संघाच्या मा गो वैद्यांनी सांगितलं कि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यात चूक काय ?? तस पाहता बरोबर आहे कारण राष्ट्रवादीतले अनेक भाजपात आहेत सध्या :)))

मनसेने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याचा बातम्या माध्यमे दाखवत आहेत. विनाशर्त युतीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्या दाखवत असल्यामुळे माध्यमांची "सूत्रे" विश्वसनीय वाटत नाहीयेत. जर युतीची चर्चा सुरु असेल तर दादरच्या जागांच्या पुढे कशी सरकणार हाच प्रश्न आहे.

जानु 27/01/2017 - 22:22
मुंबई सेनेकडे रहावी हे मला देखील वाटते. भाजपा त्या बाबत महाराष्ट्राच्या मताशी फारशी प्रामाणिक नाही असे दिसते. भाजपाला सेना नको आहे. कारण हिंदु मतात सरळ भागीदार त्यांना नको आहे. आता युती तुटलीच आहे. सेनेला मागील कारभाराचा परीणाम आणि सत्तेविरोधी मतांचा सामना करावा लागेल. त्यातच राष्ट्रवादीशी चोरुन चाललेले प्रकरण लोकांपासुन लपुन नाही. मराठा समाजाला सत्तेपासुन फारकाळ लांब राहणे शक्य होणार नाही. ही मंडळी भाजपाकडे जाण्यासाठी एक कारण शोधत आहेत. ते या निवडणुकीने मिळु शकते. मनसे आणि राष्ट्रवादी युती न करता भाजपाला मदत करतील, असे झाले तर सेना मागे पडते. मनसे आणि राष्ट्रवादीला असे केले तर भविष्यात उभे रहायला जागा राहिल. दोघांना गमवण्यासाठी काही नाही. मदत केली तर काही हातात पडण्याची शक्यता. सेनेला जागा दाखवली की त्यांची वायफळ बडबड बंद होईल. पण जर का यातुन सेना मोठी झाली तर मग मात्र बरीच खळबळ होणार हे नक्की.

अमितदादा 27/01/2017 - 23:50
मुंबई आणि ठाण्यातील निवडणुका युती तुटल्यामुळे खूप रोचक झाल्या आहेत. अर्थात सगळेच पक्ष बेईमान आणि भ्रष्ट असल्यामुळे कोण जिंकेल यात जास्त इंटरेस्ट नाहीये, पण मुंबई आणि ठाण्यात ताकद कोणाची हे जाणून घ्यायची मात्र उस्तुकता आहे. भाजप हा संधिसाधू लोकांचा पक्ष झाला आहे, आयाराम आणि गयाराम यांना महत्व देवून हा पक्ष स्वताचा जनाधार तात्पुरत्या लाभासाठी गमावून बसणार आहे. शिवसेनेची अवस्था तर अवघड वाटत होती, शिवसेनेत दोन गट असल्यासारखे वाटत एक ज्यांना सत्तेची फळे मिळतात तो आणि दुसरा ज्यांना मिळत नाही तो. उध्दव ठाकरेंनी युती तोडून शिवसेनेतील मोठ्या अस्वस्थेला मोकळी वाट करून दिली अस वाटतय, आता शिवसेना मराठी मते एकवटेल आणि भाजप विरोधी जागा व्यापून घेयील. मात्र सरकार मध्ये राहून हा स्वाभिमान तकलादू आहे हे हि दिसून येतंय. कॉंग्रेस ला युती तुटल्यामुळे मोठा तोटा होईल असे दिसतंय, कॉंग्रेस ने समाजवादी पक्षाबर आघाडी करायला हवी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष खायाला फार आणि भुई ला भार आहे. जर मुंबई आणि ठाणे निवडणुका शिवसेना जिंकली तर सरकार मधून बाहेर पडणार नाही मात्र आक्रमक होईल. पण जर निवडणूक हरली तर मात्र रडीचा डाव करून सरकार मधून बाहेर पडू शकते (अंदाज). मला ह्या निवडणुकीत उस्तुकता मनसे किती जागा मिळवतेय ह्यावर आहे, कारण ह्या पक्षाच भविष्याच एकप्रकारे ह्या निवडणुकीवर अवलंबून आहे. खर तर राज ठाकरे नि मोदी वर जपून टीका करायला हवी कारण शिवसेना पेक्षा मनसे ला भाजप बरोबरची युती फायद्याची होईल. भाजप ला एक मराठी पक्ष चेहरा म्हणून सोबतीला लागणार आहे भविष्यात, यामध्ये मनसे अगदी फिट्ट बसतोय. शिवसेना-मनसे युती मला तरी प्रोमिसिंग वाटत नाही कारण दोघांचा मतदार एकच आहे. त्यात उध्दव ठाकरेंना राज ठाकरे बद्दल असुरक्षिता वाटत असणार कि मनसे बर युती केल्यास शिवसेना हि राज यांच्या प्रभावा खाली येयील (माझा अंदाज). पहिल्यांदा राज ठाकरे यांचाविषयी विरोध वाटायचा कारण त्यांची भाड्खावू भाषणे आणि फक्त भावनिक आवाहने, नंतर जेंव्हा राज ठाकरे यांनी बनवलेली ब्लू प्रिंट पहिली तेंवा मात्र आपुलकी वाटू लागली, आज मनसेची दयनीय अवस्था पाहून सहानभूती वाटतेय.

गामा पैलवान 28/01/2017 - 02:10
गॅरी ट्रुमन,
इतकी वर्षे भाजपने शिवसेनेला इतके मोठे स्थान का दिले हे कोडेच आहे.
त्याचं काय आहे की शिवसेना हा भाजपप्रमाणे राजकीय पक्ष नाही. ती एक चळवळ आहे. १९८० च्या मध्यावर राजीव लाट जोरात होती. तेंव्हा काँग्रेसविरोधी जागा पुलोदने व्यापलेली होती. मात्र पवारांनी काँग्रेसविरोधी भूमिका सोडून राजीव गांधींच्या पायी विलीन होणं पत्करलं. मग काँग्रेसविरोधी राजकीय अवकाश उत्पन्न झाला तो व्यापण्यासाठी भाजपकडे ना मनुष्यबळ होतं, ना धडाडी. नेमक्या याच पोकळीत शिवसेना लहानाची मोठी (म्हणजे मुंबईठाण्यातून बाहेर पडून राज्यव्यापी) बनली. आमदार खासदारांचा हिशोब नंतर चित्रात येतो. भाजप जर मोठा भाऊ असेल तर मोदी येईपर्यंत स्वबळावर सत्तेत का येऊ शकला नाही? आ.न., -गा.पै. जाताजाता : युती भाजपने तोडली आहे, शिवसेनेने नाही.

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन 28/01/2017 - 11:14
मात्र पवारांनी काँग्रेसविरोधी भूमिका सोडून राजीव गांधींच्या पायी विलीन होणं पत्करलं. मग काँग्रेसविरोधी राजकीय अवकाश उत्पन्न झाला तो व्यापण्यासाठी भाजपकडे ना मनुष्यबळ होतं, ना धडाडी.
हो शरद पवार १९८७ मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यावर शरद पवारांच्या कंपूतील काँग्रेसविरोधी मतदार शिवसेनेकडे गेले. शिवसेनेला हा फायदा विशेषतः मराठवाड्यात झाला. जयप्रकाश मुंदडा हे पवारांकडून शिवसेनेत आलेले नेते मला नक्कीच माहित आहेत. इतरही असतील. अशा तरूण नेत्यांना बाळासाहेब ठाकर्‍यांची आक्रमक आणि खळ ख्ट्याक शैली अधिक आकर्षक वाटली. आजही मनसेला तरूणांचा अधिक पाठिंबा मिळतो त्याचे कारणही हेच आहे--तरूणांना आक्रमकपणा जास्त आकर्षित करतो. भाजपकडे त्या अर्थी धडाडी नव्हती असे म्हणता येईल पण मनुष्यबळ नव्हते हे म्हणणे तथ्याला धरून नाही.
भाजप जर मोठा भाऊ असेल तर मोदी येईपर्यंत स्वबळावर सत्तेत का येऊ शकला नाही?
हा प्रश्न समजला नाही. भाजप शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष असला तरी काँग्रेसपेक्षा नक्कीच मोठा नव्हता. त्यामुळे १९८० च्या दशकात थोडीच सत्तेत येऊ शकणार होता?
जाताजाता : युती भाजपने तोडली आहे, शिवसेनेने नाही.
हो भाजपनेच तोडली.पण ती शिवसेनेने आडमुठेपणा दाखविल्यामुळे. जर कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या या कारणावरून १९९६ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने मागून घेतला असेल तर त्याच न्यायाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणे शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे आणि शिवसेनेला कधी नव्हे एवढ्या १८ जागा मिळाल्या त्या मोदीलाटेमुळे हे स्पष्ट झालेले असतानाही शिवसेनेने भाजपला जास्त जागा द्यायची तयारी दर्शवायला हवी होती. ते न झाल्यामुळे युती तोडली. एक भाजपसमर्थक म्हणून त्याचे अजिबात वाईट मला वाटत नाही. पण उद्या तिथे राष्ट्रवादी येऊन बसला तर नक्कीच वाईट वाटेल.

बाकी सत्तेत कोणीही येवो, मी त्या 'खंजीर' नावाच्या हत्यारावर कायमची बंदी घालणारे निवेदन सरकारला द्यायचा विचार करतोय. नेहमीच कोणता तरी पक्ष, नेता आपल्या मित्रांच्याच पाठीत खंजीर खुपसतो म्हणजे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

गॅरी ट्रुमन 28/01/2017 - 12:22
मी त्या 'खंजीर' नावाच्या हत्यारावर कायमची बंदी घालणारे निवेदन सरकारला द्यायचा विचार करतोय.
चीनने भारतावर १९६२ मध्ये हल्ला केला तेव्हा चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले गेले होते. पाकिस्तानने १९९९ मध्ये कारगील घडवून आणले तेव्हाही पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला (पीठ मे छुरी की असे काहीतरी) म्हटले गेले होते. १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे महाराष्ट्रातील सरकार पाडले तेव्हाही "शरद पवारांनी माझ्या पाठित खंजीर खुपसला" अशी प्रतिक्रिया वसंतदादांनी दिली होती. तेव्हा सांगायचा उद्देश हा की खंजीर खुपसणे या वाक्प्रचाराचा राजकारणात केला जाणारा उपयोग बराच जुना आहे :)
बाकी सत्तेत कोणीही येवो..
हे बाकी खरे. महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी बिल्डरकडून पैसे खाऊन अनधिकृत बांधकामे उभी करून देणे, कंत्राटदारांकडून टक्केवारी वसूल करून कंत्राटे देणे इत्यादी प्रकार थांबणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेत सत्तेत कोणीही आले तरी सामान्यांना फार फरक पडणार नाही. राज्यात किंवा केंद्रात कोणी सत्तेवर आले तर आपल्या आयुष्यात थोडा तरी बदल घडायची शक्यता असते.पण महापालिकेत अगदी कोणीही आले तरी त्यामुळे काही फरक पडेल असे वाटत नाही. तरीही शिवसेनेचा राज्यपातळीवरच्या माजाचा स्त्रोत मुंबई महापालिका या देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेतील सत्तेत आहे. तो शिवसेनेच्या माजाचा स्त्रोत मात्र बंद व्हावा असे फार वाटते.

वरुण मोहिते 28/01/2017 - 12:53
१९९६ चा उदाहरण द्यायचा आणि आता मोदीलाट मुळे सगळं मलाच वाढवून द्या असा नसता . युती आहे कित्येकदा एकमेकांची मदत होत असते एकमेकांना ,. ह्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी हुशार . भाजप आणि सेनेच्या काही वाचाळ लोकांना आवरला असता तर नीट जमलं असतं. पण कधी काहीतरी करून मोदींना दाखवतो अशी घाई झालीये भाजपाला . बहुमत कोणालाच मिळणार नाहीये .पण भाजप च्या हातात मुंबई नको असे मनापासून वाटते कारण त्यांचे अर्थकारण आणि गुजराती समाजाच्या सुप्त इच्छा संदर्भ अनेक आहेत कधी विषय निघाला तर सांगेन. मुंबई महानगरपालिकेसारखा अजस्त्र कारभार सांभाळणं खायचं काम नाही आहे . त्यातकेंद्र सरकार च्या परवानग्या ,एमएमआरडीए ,राज्य सरकार परवानग्या, महापौरांना असलेले कमी अधिकार अश्या एक ना दोन अनेक कटकटी आहेत. अजूनतरी भाजप ने पूर्ण बहुमतात एकतरी महानगर पालिका चांगली चालवली आहे असं उदाहरण नाही . दिल्ली महानगर पालिकेत १४ वर्ष सत्तेत असलेल्या भाजपने मुबई पेक्षा अधिक भ्रष्टाचार करून ठेवलाय . राज ठाकरेंना सध्यातरी सेनेसोबत जुळवून घ्यावा लागणार आहे .कारण नाशिक मध्ये त्यांना मदत होऊ शकते त्याची आणि इथे आता पर्यायच नाहीये त्यांना.आहेत तितक्या जागा वाचल्या तरी पक्षाला संजीवनी मिळेल . काय होता पाहणं रोचक आहे . कारण अनेक वॉर्डांची पुर्नरचना झालेली आहे . एमायएम ला जागा निश्चित मिळेल एक दोन तरी .

NiluMP 06/02/2017 - 20:27
निवडणुकीत उभा राहलेला प्रत्येक उमेदवार म्हणतो मी मुंबईचा विकास करणार मी म्हणलो ५ वर्षानी या माझं मत तुमालाच

गॅरी ट्रुमन 07/02/2017 - 15:05
गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलन फेम हार्दिक पटेल मातोश्रीवर उध्दव ठाकरेंना भेटायला जाणार आणि शिवसेनेला पाठिंबा देणार अशा बातम्या आहेत. स्वतः बाळासाहेबांनी आयुष्यभर कधी जातीवर आधारीत आरक्षणाला पाठिंबा दिला नव्हता आणि अशा जातीवर आधारीत आरक्षणाची मागणी करणारा आज शिवसेनेला पाठिंबा द्यायला मातोश्रीवर येणार हे बघून बाळासाहेब "कुठे नेऊन ठेवलीय शिवसेना माझी" असे म्हणाले असते की काय असे वाटू लागले आहे. हार्दिक पटेलच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेला किती गुजराती मते मिळतात हे बघायचे. पण शिवसेनेच्या मतदारांमध्ये 'भय्यां'प्रमाणेच 'गुजर**' चाही राग आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी शिवसेनेकडून त्या निवडणुकीला मराठी विरूध्द गुजराती असा रंग द्यायचाही प्रकार झाला होता. तेव्हा शिवसेनेच्या कट्टर समर्थकांना हा निर्णय रूचतो का हे बघायचे.

In reply to by गॅरी ट्रुमन

रमेश आठवले 07/02/2017 - 21:50
हार्दिक आणि उद्धव यांच्या भेटी नन्तर हार्दिक हे गुजरात मधे शिवसेनेचा प्रचार करतील असे जाहीर झाले आहे. याचा अर्थ हार्दिक हे जरी भाजपाचे विरोधी असले तरी त्यांच्या मुंबईतील प्रचाराचा गुजराती मते शिवसेनेकडे वळवण्यासाठी उपयोग होईल असे या दोघांनाही वाटत नाही.

गॅरी ट्रुमन 07/02/2017 - 15:05
भाऊ तोरसेकर म्हणत आहेत की अमराठी मतांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली तर शिवसेना ही निवडणुक स्वबळावरही जिंकू शकेल. मला इन जनरल भाऊंचे लेख आवडतात पण त्यांची शिवसेनेविषयीची मते पटत नाहीत.बहुदा ते मार्मिकचे उपसंपादक असताना त्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केले होते त्याचा परिणाम असावा. तरीही सगळी मराठी मते एकगठ्ठा शिवसेनेकडे गेली आणि अमराठी मतांमध्ये फाटाफूट झाली तर हा परिणाम बघायला मिळू शकेल. प्रश्न हा की सगळी मराठी मते एकगठ्ठा शिवसेनेकडे जातील का? मनसेने काही भागांमध्ये हजार-दोन हजार मते घेतली तरी तो निकाल फिरवू शकेल. तसेच आज मुंबईत पराग आळवणी,आशिष शेलार, अतुल भातखळकर असे मराठी आमदारही आहेतच.तेव्हा भाजपलाही काही प्रमाणावर मराठी मते मिळतीलच. त्याचप्रमाणे सर्वच पक्षांनी थोड्याबहुत प्रमाणावर मराठी उमेदवार उभे केले आहेत. अशावेळी मराठी मतांवर शिवसेनेची मोनोपॉली असेल हे १००% खात्रीने सांगता येणार नाही. तसेच काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली असल्यामुळे अमराठी मतेही काँग्रेसकडे तितक्या प्रमाणावर जातील का हा पण प्रश्नच आहे. एकूणच रंगतदार परिस्थिती असणार आहे असे दिसते. शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला व्यक्तिशः कितीही वाटत असले तरी शिवसेनेच पारडे इतरांपेक्षा जड आहे असे दिसते.

विशुमित 07/02/2017 - 17:39
बऱ्याच जणांना आपण फेकींग न्युज तर वाचत नाही ना याचा प्रत्येय येईल पण.... मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस धक्कादायक विजय नोंदवणार असे वाटते. त्याची कारण मीमांसा अशी आहे- १) गेली २ वर्षापासून शरद पवार "गोविंद बाग" येथे जास्त राहत नाहीत. ते मुंबईमध्ये राहण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. भले वैद्यकीय उपचार हे कारण दिले असलेले तरी पवार साहेब तिथे स्वस्त बसले नसणारच. संघटन अधिक मजबूत कशी होईल यावर नक्कीच काम केले असणार. (वांगी आणि डाळिंबाची बाग बघायला येतात कधी कधी) २) मुंबई आणि विदर्भात कधीच आपले बस्तान मांडता आले नाही, ही खंत या आशावादी आणि महत्वाकांक्षी नेत्याला स्वस्त बसून देणार नाही. ३) नवी मुंबई मध्ये केलेला विकास जुन्या मुंबईतील जुन्या खोडांच्या डोळ्यासमोर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे करायचे याचा हातखंडा फक्त पवारांकडे आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यासारख्या येड्या गबाळ्याचे ते काम नाही. काँग्रेस, मनसे आणि एम आई एम सारखे चुटुरफुटूर पक्ष विकासाच्या बाबतीत खिजगिणतीत पण नाही. ४) सचिन अहिर सारख्या तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात संघटनेचे नेतृत्व ही सुद्धा जमेची बाजू आहे. ५) माथाडी कामगार, गिरणी कामगार, गोदी कामगार आणि त्यांच्या संघटनांवर पवारांचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. त्याचा देखील फायदा होऊ शकतो. ६) पवार स्पर्श म्हणजे मिडास टच...जैन, गुजराती आणि सिंधी समाज हे जाणून आहेत. त्यांच्या जुन्या मित्रांची पण आता चांगली बैठक बसत असेल. ७) परप्रांतीय लोकांना पवारांनी नेहमीच आधार दिला आहे. निरूपमला त्यांनी मुर्खात काढून त्याचे महत्व कमी करून टाकले आहे. ८) आता राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा. त्यांच्याकडे कोणताच चांगला पर्याय नाहीये. एम आई एम थोडीफार वळवळ करेल पण राष्ट्रवादीसाठी ते लाभदायक असेल. एक राहिलं आहे मराठा मोर्चा, पण पवारांचा त्यासंबंधी किती हात आहे हे मला माहित नाही. (अवांतर: पवार एवढं नाव वाचल तरी नेटकरी चवताळून उठतील. १९८० पासून चे खंजीर, एन्रॉन, मैद्याचा पोतं, दाऊद, लवासा, क्रिकेट, न सिद्ध झालेले घोटाळे, वगैरे वगैरे चालू होईल. पण त्याच्या आधी मी माझ्या घरला पळालेलो असेल)

In reply to by विशुमित

चिनार 07/02/2017 - 17:49
विशुमित भाऊ.. जिथे कुठे असतील तिथे पवार साहेब स्वस्थ तर बसले नसतीलच ह्याबद्दल सहमत आहे. साहेब बहुमत किंवा गेलाबाजार किंगमेकर तरी बनतील असे आपल्याला म्हणायचे आहे का ? मुंबईत दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. पण तो किती आणि कोणाचा हा प्रश्न महत्वाचा आहे.

In reply to by विशुमित

राष्ट्रवादी ने उभे केले? कधी? इतिहास चाळता नवी मुंबई ही 'प्लॅन सिटी' उर्वरित मुंबई वरील ताण कमी करायला सिडको ने विकसित केल्याचे माहिती होते. त्याचे काम काँग्रेस/युती काळात झालेले असल्यामुळे श्रेय काँग्रेस अन युतीचे असेल पण खरे कौतुक सिडकोचेच व्हायला हवं की साहेब. शिवाय, मध्यंतरी नवी मुंबई महापालिका भवनावर संगमरवर लावायचे एक भ्रष्टाचाराचे उदाहरण आहेच की. शिवाय विकास हे ध्येय असणाऱ्या पक्षाने तुकाराम मुंढे ह्यांच्यासारख्या सक्षम आयएएस अधिकाऱ्याला नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून घालवायला केलेला आटापिटा काय सांगतो ?

In reply to by विशुमित

कैच्या कै! श्रीकर परदेशींना "घालवल्या"वर जनतेसकट इतर सर्व विरोधी पक्षांनी केलेले आंदोलन विसरलात कि काय? http://indianexpress.com/article/cities/pune/pcmc-chief-shrikar-pardeshi-shunted-out-pimpri-erupts-in-anger/

In reply to by अनुप ढेरे

विशुमित 08/02/2017 - 15:01
जे इतर पक्ष होते त्यात जगताप साहेब गेले आहेत, हे कृपया विसरू नका. सगळे माहिती आहे हो पिंकरी चिंचवडकरांना. जाऊ द्या तुम्ही वृत्तपत्रिकेवरच विश्वास मंदिरी मंडळी आहेत म्हंटल्यावर काय बोलायचं ?

In reply to by विशुमित

विशुमित 08/02/2017 - 15:03
जे इतर पक्ष होते त्यात जगताप साहेब गेले आहेत, हे कृपया विसरू नका. सगळे माहिती आहे हो पिंपरी चिंचवडकरांना. जाऊ द्या तुम्ही वृत्तपत्रिकेवरच विश्वास ठेवणारी मंडळी आहेत म्हंटल्यावर काय बोलायचं ?

In reply to by विशुमित

अनुप ढेरे 08/02/2017 - 18:16
जगताप आता भाजपात गेले म्हणून परदेशींना हटवलं ते बरोबर?? काय राव... अनधिकृत बांधकामं पाडायला सुरूवात केली म्हणून परदेशींना हटवलं हे अगदी उघड आहे. तुम्ही करत बसा समर्थन.

In reply to by अनुप ढेरे

विशुमित 09/02/2017 - 10:32
अनधिकृत बांधकामं पाडायला सुरूवात केली म्हणून परदेशींना हटवलं हे अगदी उघड आहे.>>> -- मग मी काय वेगळं म्हणालो. अनधिकृत बांधकामे फक्त काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नव्हती, सामान्य माणसांची बांधकामे सर्वात जास्त होती आणि अजून ही बऱ्याच ठिकाणी चालू सुद्धा आहेत. जी बांधकामे पाडण्याचे काम परदेशींनी चालू केले होते ते सामान्य जनेत्याच्या घरांनाच प्राधान्य दिले होते. म्हणून जनतेच्या रेट्याने परदेशींची गच्छन्ती झाली होती. या साठी राष्ट्रवादीने उघड समर्थन दिले नव्हते. विधान सभेच्या निवडणुकीमध्ये पार्टी विथ डिफरेन्स वाले शास्तीकर करवी प्रश्न सोडवणार होते, याला तुम्ही सोयीस्कर बगल दिली आहे. तसं परदेशी साहेबांचं उलट चांगलंच झालं PMO मध्ये जाऊन. आता समस्त भारतीयांना त्यांच्या सक्षम आणि कर्तव्यनिष्ठेचा फायदा होईल. होतं ते चांगल्यासाठीच होता, असं कुठेतरी वाचलं होतं.

In reply to by विशुमित

विशुमित 09/02/2017 - 11:12
जी बांधकामे पाडण्याचे काम परदेशींनी चालू केले होते ते सामान्य जनेत्याच्या घरांनाच प्राधान्य दिले होते.>>> -- कृपया वरील प्रतिसादातील हे वाक्य असे बदलावे. "" जी बांधकामे पाडण्याचे काम परदेशींनी चालू केले होते त्यामध्ये सामान्य जनतेची घरे होती.""

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 09/02/2017 - 10:37
विशुमतीसाहेब, डोळ्यांनी पहिले आहे ते आंदोलन! त्यामुळे, असो!>>> -- हप्र साहेब दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं..!! आम्ही पण असली मेणबत्ती वाले आंदोलने खूप पाहिली आहेत. (अवांतर: तुमच्या आंदोलनातील सहभागाने थांबले का हो परदेशी साहेब ? आमच्या "मूक मोर्चाने" तरी कुठे काय मिळाले?)

In reply to by विशुमित

आंदोलनांनेही परदेशी थांबले नाहीत म्हणजे? परदेशींच्या हातात होते का ते? आंदोलन आणि तीव्र विरोध असूनही ज्यांचा हातात होते त्यांनी परदेशींना हलवले हाच तर मुद्दा आहे. आणि विशुमती साहेब, दिसतं तसं खरंच नसतं हे वेगळे सांगणे न लागो!

In reply to by फेदरवेट साहेब

विशुमित 08/02/2017 - 14:46
सिडको च कौतुक नक्कीच व्हायला हवं. पण कोणी सांगू शकेल जुन्या मुंबई मध्ये पवारांना कधीच आपलं बस्तान मांडता आलं नाही पण १० वर्ष पासून नवी मुंबई मध्ये राष्ट्रवादीला का बरं निर्विवाद यश मिळत असेल ? पूर्वग्रहदूषित विचार ठेवून उत्तर दिलं तरी चालेल. तुकाराम मुंढे ना हटवण्यासाठी राष्ट्रवादी बरोबर शिवसेना आणि काँग्रेस पण अग्रेसर होती. नुसता सक्षम अधिकारी असून चालत नाही. लोकप्रतिनिधींकडून जास्तीत जास्त लोक कल्याणाची कामे करून घेण्याचं कसब पण हवे असते. असले स्टेण्टबाज अधिकारी फक्त प्रसिद्धीच्या झोतात असतात.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 08/02/2017 - 14:54
शहराच्या बाहेर असलेल्या ग्रामीण भागात काँग्रेस पूर्वीपासूनच होती. त्यातले बरेचसे शिलेदार राष्ट्रवादीत गेल्याने जरी शहरात नाही तरी शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीला बर्‍यापैकी यश मिळते. पुणे शहराचा विचार केला तर शहराच्या मुख्य भागात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही. पुण्यात पूर्वी फक्त ८५ प्रभाग होते. परंतु १९९९ नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर विशेषतः अजित पवारांनी जाणीवपूर्वक पुणे शहराच्या सीमेवर असलेली अनेक छोटी गावे महापालिका हद्दीत भरती केली (उदा. कळस, धानोरी, वडगाव शेरी, पाषाण इ.) त्यामुळे आता तब्बल १६२ प्रभाग झाले आहेत. या गावातून जास्त प्रमाणात राष्ट्रवादीचेच नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काँग्रेसला मागे सारून पुण्यात राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर आली.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 08/02/2017 - 15:06
गावाकडची माणसं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला का बरं मानत असावीत? हे मोठं कोडं पडलंय मला. मला वाटतं गावाकडच्या लोकांचा IQ कमी असावा बहुतेक शहरी लोकांपेक्षा.

In reply to by विशुमित

अनुप ढेरे 08/02/2017 - 18:13
मोदी भक्त हा प्रकार तयार व्हायच्या बराच आधी महाराष्ट्रात पवार-भक्त हा प्रकार तयार झाला आहे. म्हणूनच "शेतकर्‍याकडे दुर्लक्ष!!", "शेतकरी आत्महत्या करतायत!!!" हे ओरडणारे लोक पवार महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री, केंद्रात १० वर्ष कृषीमंत्री, राज्यात १५ वर्ष सरकारात होते हे विसरून त्यांना शेतकर्‍यांचे कैवारी वगैरे म्हणत असतात.

In reply to by अनुप ढेरे

विशुमित 09/02/2017 - 10:51
म्हणूनच "शेतकर्‍याकडे दुर्लक्ष!!", "शेतकरी आत्महत्या करतायत!!!" हे ओरडणारे लोक पवार महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री, केंद्रात १० वर्ष कृषीमंत्री, राज्यात १५ वर्ष सरकारात होते हे विसरून त्यांना शेतकर्‍यांचे कैवारी वगैरे म्हणत असतात.>>> -- कृपया हा ऍग्रोवन चा लेख वाचा. म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांसाठी पवारांनी काय केले ते कळेल. फक्त म्हणू नका ऍग्रोवन पवारांचा पेपर आहे. तुमच्याकडे काही आकडेवारी असेल तर त्याने ती खोडून टाकली तर मला खूप आनंद होईल. कारण पवारांना आणखी भरीव कामगिरी करता येऊ शकेल. http://www.agrowon.com/Agrowon/20170131/4998508586890975862.htm

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 08/02/2017 - 18:29
खेड्यापाड्यातील सरंजामशहा सुरवातीपासूनच काँग्रेस समर्थक होते. पवारांनी वेगळा पक्ष काढल्याबरोबर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील बरेचसे सरंजामशहा पवारांबरोबर गेले. त्यामुळेच शहराच्या सीमेवरील खेडी शहराच्या महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी जोरदार प्रयत्न करीत होती.

In reply to by विशुमित

शलभ 08/02/2017 - 18:08
असले स्टेण्टबाज अधिकारी फक्त प्रसिद्धीच्या झोतात असतात.
-१ राष्ट्रवादीला साथ नाही तर लगेच स्टंटबाज..

In reply to by विशुमित

शरद पवार म्हणजे कोणीतरी जादूगार, अगदी काहीही करु शकतील असं कसब अंगी असणारी व्यक्ती अस मानणार्‍या काही लोकांपैकी तुम्ही दिसता (निदान प्रतिसाद तसा वाटतो) पवारांची ताकद इतकी अफाट असती तर ते पंतप्रधानपदी पोहोचू शकले असते. फार काय काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापल्यावर त्यांना स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही.

In reply to by मराठी कथालेखक

विशुमित 08/02/2017 - 14:57
शरद पवार म्हणजे कोणीतरी जादूगार, अगदी काहीही करु शकतील असं कसब अंगी असणारी व्यक्ती अस मानणार्‍या काही लोकांपैकी तुम्ही दिसता >> -- बिलकुल नाही. शरद पवारांना कधीच मी जादूगार किंवा कोणी मसीहा किंवा कोणी अवतार मानत नाही. ज्या व्यक्तीनेच कधी असल्या अंध श्रद्धाळू कल्पनांना थारा दिला नाही. पवारांची ताकद इतकी अफाट असती तर ते पंतप्रधानपदी पोहोचू शकले असते>>> -- खंत वाटते की गुदगुल्या होतायत ? त्या पण बऱ्याच अंशी आपली महाराष्ट्रीय खेकडी विचारसरणी कारणीभूत आहे. (मला माहीतच होतं बरेच जण ९० च्या दशकात जाणार ते ). एका दृष्टीने बरंच झालं पवार पंतप्रधान झाले नाही ते. त्यांचा पण कधीच नरसिंह राव आणि मनमोहन सिंग झाला असता. फार काय काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापल्यावर त्यांना स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही.>>> -- लागा तयारीला मग. पुढची विधान सभा राष्ट्रवादीच्या गळयात टाकुयात.

In reply to by विशुमित

खेडूत 08/02/2017 - 14:02
आपण कशाला घरला पळताय? कुणी आले तरी आपल्याला काही फरक पडत नाय. रस्त्यातले खड्डकाविशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून हळूच पाडणार नाहीत, की ट्राफिक ठराविक पक्षाच्या लोकांना ज्याम करणार नाही. बाकी मुंबईत निकालाचा ढोबळ अंदाजच व्यक्त करायचा तर ७०, ५५, ४५.४०,१७ असे लागतील असे वाटते. त्यातले कुणाला किती मिळतील अंदाज ठरवा.

In reply to by खेडूत

विशुमित 08/02/2017 - 15:10
७०, ५५, ४५.४०,१७ असे लागतील असे वाटते. त्यातले कुणाला किती मिळतील अंदाज ठरवा.>>> -- तुमचा हा आकड्यांचा अंदाज जर खरा ठरला तर हि सिरीज अशी असावी.... राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस , भाजप, इतर

In reply to by श्रीगुरुजी

हैला भारीच की! माझा अंदाज - शिवसेना - ७५-८५, भाजप - ४५-५५, काँग्रेस - ३५-४५, मनसे - २०-३०, राष्ट्रवादी - १०-१२, सपा - ५-१०, अपक्ष - ३५-४०. अपक्षातले शिवसेनेचे बंडखोर किती येतात यावर बरंचसं अवलंबून असेल असं दिसतं. शिवसेनेला कुणाचा पाठिंबा घ्यायचा(यापुढे युती नाही म्हटल्यामुळे) हा प्रश्न मात्र नक्की पडेल असं मला वाटते.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 08/02/2017 - 15:11
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस धक्कादायक विजय नोंदवणार असे वाटते. अशक्य
त्याची कारण मीमांसा अशी आहे- १) गेली २ वर्षापासून शरद पवार "गोविंद बाग" येथे जास्त राहत नाहीत. ते मुंबईमध्ये राहण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. भले वैद्यकीय उपचार हे कारण दिले असलेले तरी पवार साहेब तिथे स्वस्त बसले नसणारच. संघटन अधिक मजबूत कशी होईल यावर नक्कीच काम केले असणार. (वांगी आणि डाळिंबाची बाग बघायला येतात कधी कधी)
आयसीसीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर पवारांना परत क्रिकेटमध्ये घुसायचे होते. एखाद्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर पोहोचून निवृत्त झाल्यावर परत सर्वात खालच्या पदावर पुन्हा जाणे हे पदासाठी अत्यंत हपापलेले असल्याचे लक्षण आहे. असे करणे म्हणजे नारायण मूर्तींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा इन्फोसिसमध्ये ट्रेनी प्रोग्रॅमरचा जॉब घेण्यासारखं आहे. एकतर आपलं वय झालेलं आहे, दुसरं म्हणजे आपला क्रिकेटचा काहीही संबंध नाही, तिसरं म्हणजे आपण या क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर पोहोचलो होतो, चौथं म्हणजे आपण या क्षेत्रात तब्बल १२ वर्षांहून अधिक काळ असल्याने आता इतरांना संधी द्यायला हवी. पण असला विचार करतील ते पवार कसले? यांना सगळं स्वतःलाच हवं असतं. बीसीसीआयमध्ये घुसण्यासाठी पवारांना मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व्हायचे होते. आधी मुंबई क्रिकेट संघटनेत घुसूया व नंतर पुन्हा एकदा बीसीसीआय घुसावे आणि नंतर जमलं तर पुन्हा एकदा आयसीसीत तंबू टाकावा अशी त्यांची योजना होती. मुंबई क्रिकेट संघटनेत घुसण्यासाठी त्यांचे नाव मुंबईच्या मतदार यादीत असणे अनिवार्य होते व त्यासाठी आपण मुंबईत निवासस्थान आहे (मालकीचे/भाड्याचे) हे दाखविणे अनिवार्य होते. म्हणून ते मुंबईत आले. तिथे येण्याचा उद्देश बीसीसीआय मध्ये पुन्हा एकदा घुसावे एवढाच होता. त्यामुळे मुंबईत संघटना मजबूत करणे वगैरे असली कामे त्यांनी केलेली नाहीत.
२) मुंबई आणि विदर्भात कधीच आपले बस्तान मांडता आले नाही, ही खंत या आशावादी आणि महत्वाकांक्षी नेत्याला स्वस्त बसून देणार नाही.
आपली विश्वासार्हता शून्य आहे व आपण आयुष्यभर कोलांट्या उड्या मारणे व काड्या घालणे यापलिकडे काहीही केलं नाही ही खंत ज्या व्यक्तीला कधी वाटली नाही तिला इतर गोष्टींची खंत काय वाटणार? ३) नवी मुंबई मध्ये केलेला विकास जुन्या मुंबईतील जुन्या खोडांच्या डोळ्यासमोर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे करायचे याचा हातखंडा फक्त पवारांकडे आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यासारख्या येड्या गबाळ्याचे ते काम नाही. काँग्रेस, मनसे आणि एम आई एम सारखे चुटुरफुटूर पक्ष विकासाच्या बाबतीत खिजगिणतीत पण नाही. काय विकास केला पवारांनी नवी मुंबईत? ४) सचिन अहिर सारख्या तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात संघटनेचे नेतृत्व ही सुद्धा जमेची बाजू आहे. हहपुवा ५) माथाडी कामगार, गिरणी कामगार, गोदी कामगार आणि त्यांच्या संघटनांवर पवारांचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. त्याचा देखील फायदा होऊ शकतो. त्यांचा शून्य फायदा झाला. मुंबईत पवारांना स्थान नाही. ६) पवार स्पर्श म्हणजे मिडास टच...जैन, गुजराती आणि सिंधी समाज हे जाणून आहेत. त्यांच्या जुन्या मित्रांची पण आता चांगली बैठक बसत असेल. मिडास टच म्हणजे हात लावतील त्याचे भाव वाढतील ७) परप्रांतीय लोकांना पवारांनी नेहमीच आधार दिला आहे. निरूपमला त्यांनी मुर्खात काढून त्याचे महत्व कमी करून टाकले आहे. निरूपम हा मूर्ख आहे हा पवारांना इतक्या उशीरा साक्षात्कार झाला! २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच पवारांनी व त्यांच्या पक्षाने निरूपमला पाठिंबा दिलेला होता. ८) आता राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा. त्यांच्याकडे कोणताच चांगला पर्याय नाहीये. एम आई एम थोडीफार वळवळ करेल पण राष्ट्रवादीसाठी ते लाभदायक असेल. इशरत जहांसारख्या अतिरेक्याला पाठिंबा देणे (दस्तुरखुद्द पवारांनी तिला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे), तिच्या घरच्यांना १ लाखाची मदत देणे (डावखरे व आव्हाड), शहीद इशरत जहां असे नाव रंगविलेली अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणे (आव्हाड) असली घॄणास्पद कृत्ये करणारी राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिमांसाठी उत्तम पर्याय असणारच.

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिसाद आवडला.
आपली विश्वासार्हता शून्य आहे व आपण आयुष्यभर कोलांट्या उड्या मारणे व काड्या घालणे यापलिकडे काहीही केलं नाही ही खंत ज्या व्यक्तीला कधी वाटली नाही तिला इतर गोष्टींची खंत काय वाटणार?
हे एकदम पटले !!

In reply to by खेडूत

विशुमित 09/02/2017 - 11:03
फोटोमध्ये दाखवलेल्यांच्या मते असेल सुफी संत वगैरे... मला याबद्दल नाही माहिती. मग पुढे काय झाले या आंदोलनाचे? प्रदर्शित झाला का पिक्चर? औरंगझेब, बाजीराव मस्तानी, पद्मावती, राजसंन्यास याला विरोध करणाऱ्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी चे नाव ऐकले होते का नाही कधी? तुच्छ मेले...!!

In reply to by विशुमित

सुबोध खरे 09/02/2017 - 12:03
पण ते राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली उपोषण करत आहेत ना? एम आय एम च्या नाही. साहेबांची याला संमती होती म्हणायचे का?

In reply to by विशुमित

संदीप डांगे 09/02/2017 - 15:37
श्या! असं कसं व्हायचं विशुमित... इतकं स्पष्ट बोलाल तर पद मिळणं मुश्किल आहे बॉ! सांगायचं ना "हे स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्ते काय उपक्रम करतात त्याला राष्ट्रिय नेतृत्वाची सहमती असेलच असे नसते, स्थानिक नेत्यांच्या बावळटपणा म्हणजे पक्षाची अधिकॄत भूमिका, धोरणं नाहीत इ. इ. ब्ला ब्ला ब्ला!" शिका काहीतरी गुरुजनांकडून....

In reply to by संदीप डांगे

विशुमित 09/02/2017 - 15:53
असं म्हणता..!! असलं जमलंच नाही राव आपल्याला कधी. त्यात मी गुरुशिष्य परंपरेला कधीच तिलांजली दिली आहे.

In reply to by अनुप ढेरे

संदीप डांगे 23/02/2017 - 17:02
मिपाकर मंदार भालेराव यांचे फेसबुक पोस्ट मार्मिक आहे ह्यावरः तिकडे 'साहेब' म्हणत असतील, कोणीही जिंकलं तरी 'गुलाल' आम्हीच उधळणार पक्ष बदलला तरी सगळीकडे माझीच माणसं !!!

In reply to by संदीप डांगे

विशुमित 02/03/2017 - 16:36
आता पुण्यामध्ये शेवटच्या क्षणी भाजप मध्ये सामील झालेल्या सौ. रेश्मा भोसले यांनी तर विजय झाल्या झाल्याच महापौर होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. कडी म्हणजे काकडे त्यांचे व्याही आहेत वाटतं. बिचाऱ्या मुक्त टिळकांचे तिकीट कापू नये म्हणजे मिळवले.

नोटबंदीनंतर मुंबईकरांना प्रत्यक्षात किती त्रास झाला,यावर सारं डिपेन्ड आहे,जर फारसा त्रास झाला नसेल तर कोणालाही बहुमत मिळणार नाही.आणि जर त्रास झाला असेल तर शिवसेनेचे चान्सेस ज्यादा आहेत,नाही म्हटलं तर सत्तावीस टक्क्यापैंकी वीस टक्के मराठी मते शिवसेनेला मिळायला हवीत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस धक्कादायक विजय नोंदवणार असे वाटते.
राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये अजिबात नाही.त्यापेक्षा काँग्रेस धक्का देवू शकली असती,पण त्यांच्यातसुद्धा फूट आहे अन् एकमेकांची तोंडे विपरीत दिशेला आहेत,त्यामुळे शक्यता कमी आहे.
शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला व्यक्तिशः कितीही वाटत असले तरी शिवसेनेच पारडे इतरांपेक्षा जड आहे असे दिसते.
मला भाजपचा पराभव व्हावा असे व्यक्तीशः वाटते. भाजप जर जिंकली तर तमाम मराठी बांधवांनी आपला गाशा गुंडाळून उपनगरांमध्ये यावे.(ऑलरेडी बरेच आले आहेत)

In reply to by निष्पक्ष सदस्य

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 10:10
भाजप जर जिंकली तर तमाम मराठी बांधवांनी आपला गाशा गुंडाळून उपनगरांमध्ये यावे.
असल्या भितीचे बागुलबोवे उभे करण्यात शिवसेनेचा हात कित्येक दशकांमध्ये कोणी धरू शकलेले नाही. दक्षिण मुंबईतून मराठी माणूस उपनगरांमध्येच नव्हे तर सुरवातीला ठाण्याला, मग डोंबिवली-कल्याणला आणि त्यानंतर थेट अंबरनाथ-बदलापूरला स्थलांतरीत व्हायची प्रक्रीया गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.आणि त्यापैकी कित्येक वर्षे शिवसेनेचाच महापौर मुंबईत होता. मराठी माणसाच्या या स्थलांतराविरूध्द शिवसेनेने काय मोठे तीर मारले होते? बरं महापालिकेला या बाबतीत मर्यादीत अधिकार असतील आणि फार काही करता येत नसेल तर मग भाजप जिंकल्यास मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार व्हावे लागेल अशी कोल्हेकुई कशाकरता? जे काही होईल त्याविषयी महापालिकेला काहीही करता येणार नाही-- मुळातल्या स्थलांतराविषयी नाही आणि ते स्थलांतर थांबविण्याविषयीही नाही-- अगदी कोणीही सत्तेत आले तरी--- शिवसेना/भाजप किंवा काँग्रेसही. एकूणच कुठल्या तरी समाजगटाविरूध्द लोकांच्या मनात विनाकारण भिती निर्माण करायची आणि मग त्या समाजगटापासून तुमचे संरक्षण करणारा तारणहार आपणच अशा पध्दतीने स्वतःला पुढे आणायचे आणि त्या निमित्ताने मतांची झोळी भरून घ्यायची या प्रकारात शिवसेनेला इतर कोणताही पक्ष पुरा पडू शकणार नाही. 'परप्रांतियांनी' (गुजर**सह) मुंबईची कशी वाट लावली याचा घोषा शिवसेना वर्षानुवर्षांपासून लावत आली आहे. आणि ही वाट कशी लावली हे मराठी माणसाला सांगायला परत एका गुजराथ्यालाच बोलावून घेतले. पण काय करणार. शिवसेना म्हटली की निवडणुक काळात मराठीचे पंचवार्षिक उमाळे येणे आणि त्या खोट्या भावनिक आवाहनाला मराठी माणसाने बळी पडणे आणि परत परत शिवसेनेलाच निवडून देणे हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आला आहे. यावेळी काही बदल होतो का तेच बघायचे.

In reply to by विशुमित

ते राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये पक्षाच्या कार्यक्रमातच स्टेजवरच काहीतरी बंदूक तलवारीने भांडण झाल्याचं ऐकले होते, पुढे काय झाले कोणाला माहिती आहे का?

In reply to by गॅरी ट्रुमन

३८००० कोटीच्या बजेटच्या २ टक्के कमिशन जरी धरले तरी वार्षिक १००० कोटी होतातच. त्या कमिशनचा मोह सुटत नाही आणि त्या कमिशनच्या जोरावर मसल पावर उभी करता येते म्हणून मग मराठी माणूस वगैरे बोलबच्चन द्यावे लागतात. ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराची नोकरी सोडल्या नंतर कोणता उद्योग धंदा केला आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय होता हा प्रश्न आजवर कोणी विचारला नसावा. विचारला असता तर मुडदाच पडला असता. इंदिरा गांधींच्या समोर वाघाचे भिजके मांजर झाले होते असे मात्र कुठेतरी वाचले आहे. बाईंना सुद्धा कट मिळत असेल कदाचित.

In reply to by अप्पा जोगळेकर

विचारला असता तर मुडदाच पडला असता.
हे कोणत्या राजकीय पक्षाच्या बाबतीत खरे नाही?
इंदिरा गांधींच्या समोर वाघाचे भिजके मांजर झाले होते असे मात्र कुठेतरी वाचले आहे.
याचा संदर्भ देता का प्लिज? बाकी कटचं म्हणाल तर मग काही लाख कोटींचा कट किती निघेल बरे?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कुठेतरी वाचले आहे असे म्हटले याचा अर्थच मला कुठे वाचले ते नीट आठवत नाही. केंद्र आणि महापालिका यांची तुलना करु शकत नाही. शिवाय केंद्राला आर्थिक पाहणी अहवाल द्यावा लागतो. क्वचित कॅगला वगैरे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे २जी सारखे भ्रष्टाचार उघडकीला येतात. महापालिकेत असे काही नसते बहुधा. तसे असावे यासाठीच पारदर्शकता हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला गेला आहे. थर्ड पार्टी ऑडिटरचा नेमावा हा मुद्दा किरीट सोमैय्या यांनी काढल्यावर उधोजीराजेंचे पित्त खवळले ना ?

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 08/02/2017 - 14:31
केंद्र आणि महापालिका यांची तुलना करु शकत नाही. शिवाय केंद्राला आर्थिक पाहणी अहवाल द्यावा लागतो. क्वचित कॅगला वगैरे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे २जी सारखे भ्रष्टाचार उघडकीला येतात. महापालिकेत असे काही नसते बहुधा.
आप्पा, असे काही नसते हो. वीस टक्के कमीशन आहेच सरकारी खात्यांमधे. ह्या वीसटक्क्यांत बाबू पासून मंत्र्यांपर्यंत (विरोधी पक्षनेतेही) सर्वजण वाटा घेतात... कॅगचे आर्थिक पाहणी अहवाल हे सरकारने खर्च कुठे कसा केला हे दाखवणार. कॉन्ट्रॅक्टरने खर्च कसा केला हे नाही दिसत त्यात. तसेच उघडकीस येत नाही म्हणून भ्रष्टाचार होत नाही असे नसते. पकडला तर चोर असेही नसते. भ्रष्टाचार उघडकीस आणणारे असंतुष्टच असतात बहुधा ( प्रामाणिक विसल्ब्लोअरांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी.). आदर्श घोटाळा बाहेर येण्यास तिथे कंत्राट मिळण्यास असफल झालेले कंत्राटदार कारणीभूत होते, अन्यथा आदर्श इमारत उभी राहून सगळे सुखनैव पिढ्यांपिढ्या राहिले असते. भ्रष्टाचार करण्यात व तो उघडकिस आणण्याची धमकी देऊन त्यावर मलिदा खाण्यास सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्ष बरोबरीने सामिल असतात.

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 09/02/2017 - 12:19
वीस टक्के कमीशन आहेच सरकारी खात्यांमधे.
भारताच्या जीडीपीच्या ४५% टक्के तिन्ही प्रतलांवरच्या शासनांचा खर्च असतो. तर येत्या काळात बाबू आणि राजकारणी ४५%* १२५ लाख कोटी *( १+ (१+७%)+ (१+७%)^२+ ....) इतके पैसे कमवणार आहेत? तुम्ही काय म्हणताय त्यात २०% जरी तथ्य निघाले तरी देशात २-३ वर्षांत हुकुमशाही आणि न भूतो न भविष्यति अशी विषमता* येईल.
कॉन्ट्रॅक्टरने खर्च कसा केला हे नाही दिसत त्यात.
हे वाक्यच विचित्र आहे. एकतर असं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तर अजिबात नाही. पण जरी असेल तर योग्य आहे. कंत्राटदाराचा खर्च स्टॅट्यूटरी ऑडिटर पाहतोच. पण तो कॅगने देखिल का पाहावा म्हणे? शिवाय अलिकडे ज्या १७ लाख कोटी प्रकल्प इ थकले होते , त्यातले अनेक पीपीपी पॉलिसीतून एस पी व्ही माध्यमातून केलेले होते. या एस पी व्ही चा मूळ उद्देशच काय आहे? बिड करणार्‍या कंपनीच्या बाकी साडेसातींपासून मुक्ती आणि अक्सेस टू अकाउंट्स फॉर द पब्लिक ऑथॉरिटी.
भ्रष्टाचार करण्यात व तो उघडकिस आणण्याची धमकी देऊन त्यावर मलिदा खाण्यास सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्ष बरोबरीने सामिल असतात.
व्यवसाय आणि राजकारणाबद्दल अशी मते असतील तर मुंबईत मते देण्यापेक्षा त्याच्या शेजारी पुरेशी खोली असलेला अरबी समुद्र आहे, तिथे जाऊन चिंतन करावे. डांगे सायेब, जास्ती गॉसिप करायचं काम नाय!!! ========== *विशुमित शब्दाचा काय संबंध आहे का विषमतेशी?

In reply to by arunjoshi123

संदीप डांगे 09/02/2017 - 15:56
भारताच्या जीडीपीच्या ४५% टक्के तिन्ही प्रतलांवरच्या शासनांचा खर्च असतो. तर येत्या काळात बाबू आणि राजकारणी ४५%* १२५ लाख कोटी *( १+ (१+७%)+ (१+७%)^२+ ....) इतके पैसे कमवणार आहेत?
>> आम्हाला गणितात बोर्डाने ५२ मार्क्स देऊन उपकृत केले होते, असली गणितं समोर आली की त्याची कचकून आठवण येते. काही हरकत नाही, तुम्ही गणित गणित खेळा....
तुम्ही काय म्हणताय त्यात २०% जरी तथ्य निघाले तरी देशात २-३ वर्षांत हुकुमशाही आणि न भूतो न भविष्यति अशी विषमता* येईल.
>> बंधो! तुम्हीच सांगा मग किती भ्रष्टाचार आहे भारतात आणि विषमता किती आहे ती? बाबू लोकांची हुकूमशाहीही तुम्हीच सांगा....
हे वाक्यच विचित्र आहे. एकतर असं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तर अजिबात नाही. पण जरी असेल तर योग्य आहे. कंत्राटदाराचा खर्च स्टॅट्यूटरी ऑडिटर पाहतोच.
>> आपण छगन भुजबळ हे नाव ऐकलंय का?
पण तो कॅगने देखिल का पाहावा म्हणे?
>> कॅगने काय करावे हे मी कुठेच म्हटले नाही. तुम्हीच म्हणालात कॅगमुळे भ्रष्टाचार बाहेर येतो ते....
शिवाय अलिकडे ज्या १७ लाख कोटी प्रकल्प इ थकले होते , त्यातले अनेक पीपीपी पॉलिसीतून एस पी व्ही माध्यमातून केलेले होते. या एस पी व्ही चा मूळ उद्देशच काय आहे? बिड करणार्‍या कंपनीच्या बाकी साडेसातींपासून मुक्ती आणि अक्सेस टू अकाउंट्स फॉर द पब्लिक ऑथॉरिटी.
>> मी काय म्हणतो, एक दहा-बारा सरकारी कंत्राटं घेणार्‍या ठेकेदारांशी भेटून घ्या ना! म्हणजे कसं हे जार्गन ऑन द ग्राऊंड किती अकाऊंटेबल आहे ते कळून येईल...

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 09/02/2017 - 16:09
तुम्हीच म्हणालात कॅगमुळे भ्रष्टाचार बाहेर येतो ते....
नाय हो असं दुसरे सायेब म्हणालेत, मी नै.
एक दहा-बारा सरकारी कंत्राटं घेणार्‍या ठेकेदारांशी भेटून घ्या ना!
अरे भाय, आप समंदरी मछली को बाल्टीभर पानी देख कर आने को बोल रहे है.

In reply to by arunjoshi123

संदीप डांगे 09/02/2017 - 16:22
असं आहे होय! मग समंदरी मच्छलीने प्रश्न-शंका विचारण्यापेक्षा थेट अनुभव-उत्तरं दिलीत तर बरं होईल... आमच्याही बाल्टीभर पाण्यात भर पडेल!

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 09/02/2017 - 16:29
आम्हाला गणितात बोर्डाने ५२ मार्क्स देऊन उपकृत केले होते, असली गणितं समोर आली की त्याची कचकून आठवण येते. काही हरकत नाही, तुम्ही गणित गणित खेळा....
गंभीर नोटेवर म्हणतो .... १. देशाचा जीडीपी १२५ लाख कोटी इ इ आहे. २. यात सरकारचा उत्पन्न (वा खर्च वा हिस्सा) ४५% असतो. ३. यातले २०% तुमच्या मते बाबू नि राजकारणी यांचा भ्रष्ट हिस्सा आहे. ४. जी डी पी अंदाजे सात टक्क्याने वाढणार आहे. ५. आतापर्यंत केलेला भ्रष्टाचार शून्य मानू. ६. हुतात्मा होणारे सैनिक ते रूळ तपासणारे कामगार ते सफाई कर्मचारी ते राष्ट्रपती सगळेच झाडून करप्ट आहेत असे मानू. ७. राजकारणी आणि बाबू हे लोकसंख्यच्या किती प्रमाणात असावेत? तर २.५/१३० = २% ८. आजचे संपत्तीचे विभाजन सर्वांना स्वीकार्य आहे असे मानू. मग पुढे या लोकांकडे किती पैसे करप्शनचे जमा होणार आहेत (पगाराचे वेगळे, सरकारी अधिकृत सोयी वेगळ्या) त्याचे गणित मी वर लिहिले आहे. २% लोकांना हे लै जास्त पैसे झाले. वास्तविक असं होतं असं मानलं तर ३-४ वर्षांत देश फुटेल, बुडेल, इ इ असं मानल्यासारखं होतं. असो.

In reply to by संदीप डांगे

arunjoshi123 09/02/2017 - 17:16
अर्थातच. शक्य तितकी सुस्पष्ट, लॉजिकली वाटर्टाइट आणि संख्यात्मक अर्थाची विधाने करण्याकडे माझा कल असतो. ( आता हे गमतीने घ्या - त्यामुळे लोकांच्या मनात माझ्या शिक्षणाबद्दल संभ्रम निर्माण होतात.) मात्र लातूरकडचा खेडूत असल्यामुळे मात्र पुणे-मुंबईकरांसमोर भाशेचा घोळ होतो.

In reply to by संदीप डांगे

ओके. म्हणूनच एकाच पक्षाची किंवा कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चालू नये. केंद्रात जसे गांधी घराणे होते तसे मुंबईत ठाकरे घराणे बस्तान बसवून आहे. ही जहागीर नष्ट झालीच पाहिजे. उद्या केंद्रात जर मोदींनी स्वतःची जहागीर सुरु केली तर त्यांना पण विरोधच असेल. यासाठी मुंबई महापालिकेत खांग्रेस आले तरी चालेल पण शिवसेनारुपी रावण महापालिका निवडणुकीत मेलाच पाहिजे अशी इच्छा आहे. शिवसेनेचे मंत्री सीएमना भेटून आले म्हणे आणि सरकार नोटिस वर आहे असे सांगितले. लाळ अजून गळतेच आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 09/02/2017 - 12:54
जहागिरी नष्ट झाल्याचे बघायला नक्कीच आवडेल.... जिथे जिथे सरकारात सामील आहेत तिथून संबंध तोडले असते तर मानले असते उधोजीला...

In reply to by अप्पा जोगळेकर

CAG ला उत्तर द्यावे लागते म्हणून भ्रष्टाचार सापडतो हा मुद्दा बाजूला ठेवुयात, यावर सहमती होणार नाही. तुम्ही सरसकटपणे २% कट मिळत असेल असे गृहीत धरले आहे म्हणून म्हणालो. थर्ड पार्टी ऑडिटर किंवा CAG महापालिकांसाठीही असावा यावर दुमत असण्याचे कारण नाही. मुद्दा साधा आहे, भाजप हा महत्वाचा मुद्दा मानतो तर नेमकी कोणती पारदर्शिकता अपेक्षित आहे याचे उदाहरण त्यांनी लोकांसमोर ठेवणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेमध्ये यासाठी कोणत्या स्टेप्स घेण्यात आल्या(का?) हे सांगणे गरजेचे आहे. हे न सांगता फक्त पारदर्शिकता हवी असे म्हणणे संदिग्ध आहे. शिवाय आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने भाजपला हा मुद्दा अशा संदिग्ध अर्थासह फार परिणामकारकपणे वापरता येईल असे वाटत नाही. अवांतर : संदर्भ म्हणजे कुठली लिंकच असावी असे नाही, गॅरीसरानी खाली संदर्भ दिला आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने नाय नाय. तो अहवाल सोयीनुसार वापरला जातोय. काल फडणवीस यांनी बरीच चिरफाड केली. तुमचे दुमत नसेल कदाचित. उद्धव ठाकरे तर तयार नाहीत ना थर्ड पार्टी ऑडिटला.

In reply to by अप्पा जोगळेकर

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 12:49
आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने
एक गोष्ट समजत नाही. अफझलखानाने नेमलेल्या कुठल्या समितीने पाठ थोपटलेली पेंग्विनसेनेला कशी चालते?

In reply to by गॅरी ट्रुमन

मुद्दा मिस होतोय. बिएमसी पारदर्शक आहे कि नाही हे मला सिद्ध करायचं नाहीये. "बिएमसीत पारदर्शक व्यवहार हवा आहे" म्हणजे नेमके काय हवे आहे याबद्दल भाजप ने जास्त बोलावे असे माझे मत आहे. भाजप जर फक्त मतांकडे डोळा ठेवून हे व्यक्त्यव्य परत परत पुढे आणणार असेल तर ते खोडून काढायला सर्वेचा वापर होणारच आहे. भाजपने नागपूर महानगरपालिकेत पारदर्शिकतेसाठी नेमके काय केले हे सांगायलाच नको का? अवांतर : फडणवीसांनी केलेली चिरफाड परिणामकारक होती का हा प्रश्नच आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात, पान नं ३०७वर "रँकिंग ऑफ यूएलबीज ऑन ट्रान्स्परन्सी, अकाऊंटेबिलिटी अँड पार्टीसिपेशन" या ग्राफ मध्ये मुंबई नं १ ला दाखवलेली आहे. आता याचा अर्थ ज्याने त्याने आपापल्या परीने लावावा.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 13:37
"बिएमसीत पारदर्शक व्यवहार हवा आहे" म्हणजे नेमके काय हवे आहे याबद्दल भाजप ने जास्त बोलावे असे माझे मत आहे.
तसे भाजपने केले पाहिजेच. ही अपेक्षा ठेवली तर त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. या आणि दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे माझा या निवडणुकांमध्ये एकच इंटरेस्ट आहे. शिवसेनेचा पराभव व्हायला हवा.कोणीही जिंकले तरी सामान्य मुंबईकराच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडेल असे वाटत नाही. तरीही उध्दव ठाकरेंनी २०१४ पासून जे एकेक प्रकार चालविले आहेत त्या माजाचा स्त्रोत असलेली मुंबई महापालिकेची सत्ता गेली पाहिजे. बाकी ताकाला जाऊन भांडे लपविणे, उगीच पोलिटिकली करेक्ट वागणे, गुळमुळीतपणे काहीतरी लिहिणे किंवा ज्याला बिटिंग अराऊंड द बुश म्हणतात तसले प्रकार मला तरी जमत नाहीत (या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) ) त्यामुळे या आणि याच कारणावरून शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. बाकी friends turned enemies असतात त्यांच्यावर मुळातल्या शत्रूपेक्षा अधिक राग असणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनीही शिवसेनेचा पराभव व्हावा याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित केले होते, वाघेलांनी गुजरातमध्ये तसेच लक्ष भाजपचा पराभव होण्यावर केंद्रित केले होते आणि राष्ट्रवादीनेही १९९९ मध्ये तसेच लक्ष काँग्रेसचा पराभव व्हावा याकडे केंद्रित केले होते. त्याच धर्तीवर शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

arunjoshi123 09/02/2017 - 11:57
आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे इंग्रजीत काय? महापालिकेत देखिल दुसरे का होईना (कॅगसारखेच) ऑडिट असायचेच. अलिकडे कॅगचेच असते.

In reply to by arunjoshi123

इकॉनॉमिक सर्वे :):). सध्या महापालिकेतील ऑडिट हे स्थायी समिती, आयुक्त आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र अकाउंटंट्स जनरल इथंपर्यंत असते. CAG बहुतेक पालिकांचं करत नसावं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 13:44
शिवसेनेने इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन केले होते. बाळासाहेबांचा एकाधिकारशाहीवर विश्वास असल्यामुळे इंदिरा गांधींची आणीबाणी त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच होती. १९७७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि त्याबद्दल वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यात काँग्रेसने पाठिंबा दिला होता. १९८० च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीही शिवसेनेने काँग्रेसलाच पाठिंबा दिला होता. याविषयी अधिक इथे . तसेच मुंबईचे शिवसेनेचे महापौर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेतून बाहेर का पडले? कारण १९७७ मध्ये शिवसेनेने महापौर निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मुरली देवरांना पाठिंबा दिला होता ते हेमचंद्र गुप्तेंना पटले नव्हते.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 08/02/2017 - 14:48
२००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर पुण्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन उपमहापौरपद पदरात पाडून घेतले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

आणीबाणीला समर्थन - बाळासाहेबांच्या काही न आवडलेल्या निर्णयांपैकी तो एक होता आणि याचा नेहमी खेद वाटतो. दुर्दैवाने बाळासाहेबांचं त्यामागचं लॉजिक काय होत यावर फारसं वाचायला मिळत नाही. तुम्ही वर दिलेल्या या सगळ्या राजकीय खेळ्या (भलेही स्वार्थासाठी) होत्या असा निष्कर्ष निघू शकतो. पण म्हणून वाघ मांजर झाला वगैरे पटण्यासारखे नाही. अशा युती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवर केल्या जातात, सर्व पक्ष करतात. काश्मीरमधली सध्याची युती सगळ्यांनाच पटली आहे असे नाही. शिवाय शिवसेनेला सुरुवातीच्या दिवसात मोठे करण्याचे काम काँग्रेसनेच केले असावे असे मला वाटते (कम्युनिस्टांवर कुरघोडी करण्यासाठी, वसंतसेना त्यातूनच आले होते का?). मग अशा काँग्रेसच्या जवळ असलेल्या, आणीबाणीचे समर्थन केलेल्या पक्षाशी भाजपनेही इतकी वर्षे युती केलीच की!

निवडणूकीनिमित्त सगळीकडून नुसती प्रचाराची राळ अन आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. एक सामान्य माणूस म्हणून मुर्खपणे बरळणार्‍यांचा अगदी संताप येतो. बरं राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे आणि राजकारण बदलावे असे म्हणतात पण चांगल्या व्यक्तींच्या संयमाचा बांध फुटावा अशी परिस्थिती आणतात हे लोक !

कपिलमुनी 08/02/2017 - 13:21
सध्या किंवा मागच्या टर्ममध्ये भाजपा मुंबई - ठाणे - कंडोमपा महापालिकेमधे सत्तेत सहभागी आहे का ?

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 14:14
शिवसेनेचे फ्लिपफ्लॉप--- १. राजकारण म्हणजे गजकरण त्यामुळे आपण राजकारणापासून दूर राहणार याचा एका बाजूने घोषा लावत असतानाच शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर वर्षातच निवडणुकांच्या राजकारणात उतरणे. २. मुस्लिम लीगच्या नगरसेवकांनी (तत्कालीन भाषेत-- नगरपित्यांनी) महापालिका सभागृहात वंदेमातरमला विरोध केला. हा मुद्दा १९६७ च्या महापालिका निवडणुकांमध्ये गाजला होता. अर्थातच शिवसेनेने वंदे मातरमच्या बाजूने भूमिका घेतली होती. पण नंतर त्याच मुस्लिम लीगचा पाठिंबा घेऊन शिवसेनेचे सुधीर जोशी महापौरपदी विराजमान झाले. ३. १९७९ मध्ये मुस्लीम लीगबरोबर परत एकदा युती करून बाळासाहेबांनी जी.एम.बनातवालांबरोबर नागपाड्यामध्ये सभाही घेतली होती. ४. बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे हे जाहिर वक्तव्य करणार्‍या बाळासाहेबांनीच त्या जागेवर मंदिरही नको मशीदही नको तर मंगल पांडेचे स्मारक बांधा असेही म्हटले. अशी इतरही उदाहरणे आहेतच. सर्वच राजकीय पक्षांनी असे फ्लिपफ्लॉप कधीनाकधी केले आहेत. पण आपला पक्ष आणि आपला नेता म्हणजे ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळ आणि त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे कधीच न बदलणारा असतो अशा स्वरूपाचा एक गैरसमज शिवसेना समर्थकांमध्ये इतर पक्षांच्या समर्थकांपेक्षा अधिक प्रमाणावर असतो. अर्थातच शिवसेनेच्या नेतेमंडळींमध्ये चांगले शिकलेले, इंटलेक्च्युअल्स फारसे कोणी नाही. एक सुरेश प्रभू होते त्यांचेही भाजपने अपहरण केले. सामान्य शिवसैनिक म्हणाल तर मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांची भाषा अधिक भावणारे लोक हे. त्यामुळे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचे ठरविले की मग त्याला कोणतेही प्रश्न न विचारता विश्वास ठेवला जायचे प्रमाण सर्वात जास्त!!

In reply to by गॅरी ट्रुमन

अलीकडे गुद्दे वगैरे सगळेच संपून निव्वळ पेट्यांचे गणित सुरु आहे. बाळासाहेब अ‍ॅक्टिव्ह असताना शिवसेनेत फक्त इनकमिंग होते. नंतर काय झाले ते ठाऊक आहेच जनतेला.

In reply to by गॅरी ट्रुमन

arunjoshi123 09/02/2017 - 11:35
पण आपला पक्ष आणि आपला नेता म्हणजे ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळ आणि त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे कधीच न बदलणारा असतो अशा स्वरूपाचा एक गैरसमज...
आपल्याला कधीकधी ज्या संदर्भात ज्या वाक्यरचना सुचतात त्या जाँ फिदा टाईपच्य असतात. (आता गैरसमज नक्की शिवसेनेत सर्वाधिक असावा तुम्ही म्हणत आहात तर ) पण अशा गैरसमजाचा प्रादुर्भाव तरुण शिक्षित लोकांत जास्त असावा. मोदींचे भक्त देखिल यातच मोडतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

५. सुपारी घेऊन कामगारांचे संप फोडणे. ६. एन्रॉन- याबद्दल गॅरी भाउनी किंवा श्रीगुरुजींनीच अधिक लिहावे. ७. जावेद मियांदाद भेट आणि बरेच आहे. तूर्तास एवढे पुरे.

गामा पैलवान 08/02/2017 - 18:54
गॅरी ट्रुमन,
शिवसेना म्हटली की निवडणुक काळात मराठीचे पंचवार्षिक उमाळे येणे आणि त्या खोट्या भावनिक आवाहनाला मराठी माणसाने बळी पडणे आणि परत परत शिवसेनेलाच निवडून देणे हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आला आहे. यावेळी काही बदल होतो का तेच बघायचे.
तुम्हाला स्थानीय लोकाधिकार समिती माहीत असेल. ही नसती तर आज मराठी माणूस मुंबईतल्या सरकारी कार्यालयांत केंव्हाच हद्दपार झाला असता. रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणावर चालवणं शिवसेनेने सुरू केलं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन 08/02/2017 - 22:15
स्थानिय लोकाधिकार समितीचे सुरवातीच्या काळातील काम नक्कीच चांगले होते. पण त्या चांगल्या कामाबद्दल मुंबईकरांनी शिवसेनेला महापालिकेमध्ये कित्येक वर्षे सत्ताही दिली आहे. १९९२ ते १९९६ ही चार वर्षे वगळता १९८५ पासून आजपर्यंत मुंबईत शिवसेनेचाच महापौर आहे. १९८५ पूर्वीही शिवसेनेचे महापौर मुंबईत झाले होते.त्या कामासाठी दशकानुदशके सत्ता मिळणे हे जरा जास्त झाले नाही का? गांधी घराण्याने जो काही थोडाफार त्याग केला त्याबद्दल काँग्रेसला कित्येक दशके सत्ता मिळालीच होती त्यापेक्षा हे नक्की कसे वेगळे आहे? सरकारी नोकर्‍यांमध्ये मराठी माणसाला स्थान मिळणे हा मुद्दा १९६० आणि १९७० च्या दशकात नक्कीच महत्वाचा होता कारण त्या काळात सरकारी नोकर्‍या हाच महत्वाची रोजगाराची संधी होती.पण आता तशी परिस्थिती नक्कीच नाही. त्यामुळे ४०-५० वर्षे जुने मुद्दे आणि त्याकाळात केलेले चांगले काम शिवसेना किती वर्षे उगाळत राहणार?

In reply to by गॅरी ट्रुमन

गामा पैलवान 08/02/2017 - 23:41
गॅरी ट्रुमन,
त्याकाळात केलेले चांगले काम शिवसेना किती वर्षे उगाळत राहणार?
एकदा केलेलं असलं म्हणून काय झालं. सदिच्छा मिळतातच ना. शिवाय इतर कामं पण चालू असतातच की. मी सांगत नाही सगळी. ज्याच्यामुळे मतदाराच्या नजरेत राहता येतं अशी काम हुडकून काढण्यात शिवसैनिक तरबेज आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 10:17
एकदा केलेलं असलं म्हणून काय झालं. सदिच्छा मिळतातच ना.
या न्यायाने विन्स्टन चर्चिल इंग्लंडमध्ये आजीव पंतप्रधान व्हायला हवे होते. इतकेच नाही तर पुढील जन्मात जन्माला आल्यावरही ताबडतोब पंतप्रधानपदीच विराजमान व्हायला हवे होते. पण ब्रिटिश जनतेने कर्तुत्वाच्या परमोच्चबिंदूवर असताना विन्स्टन चर्चिल यांना घरी बसविले कारण युध्द सुरू असताना चर्चिल कितीही चांगले नेते असले तरी युध्दोत्तर काळात त्यांच्यापेक्षा अ‍ॅटली जास्त चांगले नेते होतील!! असे काही भारतात आपल्या जिवीतकाळात तरी होणे कठिणच दिसते. स्थानिय लोकाधिकार समितीने ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळे लोकांना शिवसेनेविषयी आत्मीयता असेल तर मग शिवसेनेने केलेल्या इतर प्रकारांमुळे दुरावा कसा वाटत नाही हेच समजत नाही. ग.वा.बेहरेंसारख्यांना शिवसैनिकांनी नक्की कशी वर्तणूक दिली होती? जे शब्द मी मिपासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लिहूही शकत नाही ते शब्द दसरा मेळाव्यांतून आणि इतर भाषणांमधून स्टेजवरून वापरले जात होते. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते? असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

arunjoshi123 09/02/2017 - 11:26
पण ब्रिटिश जनतेने कर्तुत्वाच्या परमोच्चबिंदूवर असताना विन्स्टन चर्चिल यांना घरी बसविले कारण युध्द सुरू असताना चर्चिल कितीही चांगले नेते असले तरी युध्दोत्तर काळात त्यांच्यापेक्षा अ‍ॅटली जास्त चांगले नेते होतील!! असे काही भारतात आपल्या जिवीतकाळात तरी होणे कठिणच दिसते.
१९४५ च्या ब्रिटिश मतदात्यांना २०१७ च्या भारतीय मतदात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवण्याआधी या ऑफन कोटेड जगाला मूर्खात काढणार्‍या विधानाचा अभ्यास व्हायला हवा. शांती काळात चर्चिल नको असण्याचा आणि त्याचा हरण्याचा संबंध ही त्या लोकांनी उथवलेली हूल आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते?
हे काही पटले नाही. हे प्रकरण या चर्चेत ओढण्याचे कारण समजले नाही. बाळासाहेबांचे या प्रकरणाआधीचे आणि नंतरचे पुलंबद्दलचे मत काहीच महत्वाचे नाहीये का? आणि हे प्रकरण घडले तेव्हा त्याला एक पार्श्वभूमी नव्हती का? आपल्या विचारसरणीच्या विरोधातील असले तरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर करण्याचा सुज्ञपणा युतीच्या सरकारने दाखवला होता (सोयीकर व्यक्तींना पुरस्कार देण्याचा ट्रेंड असतानाही). त्यानंतर हे शिवशाहीचे नाही ठोकशाहीचे सरकार आहे असे राजकीय दृष्टिकोनातून मत व्यक्त करणे बाळासाहेबांना खटकले नसते तरच नवल होते (बाळासाहेबांनी वापरलेल्या वाक्याचे समर्थन करण्याचा हेतु नाही). त्यावेळी वापरली जाणारी भाषा हि त्यावेळच्या एकूण राजकीय वातावरणाला आणि ऐकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला धरून वापरली जात नव्हती का? असाच हिशोब आपण अत्रेंच्या भाषणांनाही लावणार का? त्या भाषेला आजच्या दृष्टीने बघितले तर ती योग्य नाहीच वाटू शकत. पण शेवटी शेवटी बाळासाहेबांच्या भाषणांमध्ये तशीच भाषा आपल्याला दिसून येत होती का? असो, अवांतर होतंय. पण बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे आणि कृती आजच्या चष्म्याने बघितल्या गेल्या तर त्या पटणार नाहीत एवढेच म्हणणे.

In reply to by गॅरी ट्रुमन

शिवसेनेच्या कोलांटीउड्या याबाबतीतल्या मुद्द्यांबद्दल विचारत आहात का? तर मी वर म्हटल्याप्रमाणे सगळे पक्ष याबतीत एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व मतांशी सहमत. फरक इतकाच कि कोलांट्याउड्या हा निकष लावायचा असेल तर तो सगळ्याच पक्षांना लावून मग कल ठरवायला हवा. कोणीही जिंकले तरी फार फरक पडणार नाही ह्या तुमच्या मताशीही काही अंशी सहमत! पण मुंबईत शिवसेनाच असावी असे माझे वैयक्तिक मत आहे ते भाजपवर अंकुश म्हणून! आणि त्याच न्यायाने त्यांची एकट्याची सत्ता असू नये ती शिवसेनेवर अंकुश म्हणून! मनसेच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मुंबईत सत्ता हा माझा आवडता पर्याय आहे :):).

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 09/02/2017 - 14:29
त्यावेळी वापरली जाणारी भाषा हि त्यावेळच्या एकूण राजकीय वातावरणाला आणि ऐकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला धरून वापरली जात नव्हती का>>> -- अजित पवारांच्या वेळेस असली वाक्य कोणाला नाही सुचली. अजून ही बिचारे आत्मक्लेश करत असतात.

In reply to by विशुमित

परत एकदा प्रतिसाद वाचा विशुमती साहेब! "पण बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे आणि कृती आजच्या चष्म्याने बघितल्या गेल्या तर त्या पटणार नाहीत एवढेच म्हणणे." याचा काही बोध लागत असेल तर बघा. आज काय ज्यांचा वाक्यांवर गदारोळ झाला आहे असे अजित पवार एकटेच नाहीत. आताचे समाजकारण, राजकारण व मतदार सगळेच बदलले आहे. त्यामुळे तेव्हाइतके जहाल होता येत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 09/02/2017 - 15:32
स्थानिय लोकाधिकार समितीने ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळे लोकांना शिवसेनेविषयी आत्मीयता असेल तर मग शिवसेनेने केलेल्या इतर प्रकारांमुळे दुरावा कसा वाटत नाही हेच समजत नाही. ग.वा.बेहरेंसारख्यांना शिवसैनिकांनी नक्की कशी वर्तणूक दिली होती? जे शब्द मी मिपासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लिहूही शकत नाही ते शब्द दसरा मेळाव्यांतून आणि इतर भाषणांमधून स्टेजवरून वापरले जात होते. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते?
राणे २००५ मध्ये पक्ष सोडून गेल्यानंतर "सामना"मध्ये त्यांच्याविरूद्ध इतकं घाण लिहून आलं होतं की वाचतानाच शरम वाटत होती. "मी ह्याला मोठा केला, पण हा चड्डीत चिरकला","या डेडफुट्याचं **त नाही" अशासारखी अनेक अत्यंत घाण वाक्ये लिहिली गेली होती. आपल्या पक्षातील एखादा नेता पक्ष सोडून दुसरीकडे गेल्यानंतर सेना इतकी का बिथरते हे एक गूढच आहे. थोडी परिपक्वता दाखवून हा निर्णय मान्य करायला हवा. जसे तुमच्या पक्षातून काही जण बाहेर जातात तसेच बाहेरचेही काही जण आत येतात. त्याबद्दल इतका थयथयाट व विखारी भाषा कशासाठी? २००९ मध्ये बिजदच्या नवीन पटनाईकांनी स्वतःहून भाजपबरोबरची युती तोडल्यानंतर दोन्ही पक्षांनी समंजसपणे हा निर्णय स्वीकारला. आपल्याशी युती तोडली म्हणून ना भाजपने थयथयाट केला होता ना बिजदने युती तोडल्यानंतर अभद्र भाषा वापरली होती. शिवसेनेचं बांगलादेशाच्या क्रिकेट संघासारखं आहे. स्वतः लिंबूटिंबू असले तरी त्यांना पराभव अजिबात सहन होत नाही. त्यामुळे स्वतःचा खेळ उंचावण्याऐवजी दुसर्‍या संघाला खिजविणे, अभद्र भाषा वापरून अवमान करणे यातच ते धन्यता मानतात.

खेडूत 08/02/2017 - 21:18
मुंबईमध्ये भाजप व रिपाईची आज पहिली प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, 'मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना, हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना... :)) चॅनेलवाले पण लाईव्ह भाषणं दाखवून टीआरपी मिळवतायत..

In reply to by फेदरवेट साहेब

चिनार 09/02/2017 - 10:40
आयला ह ह पु वा.. पण मेगाबायटी प्रतिसादांमध्ये विशुमित भाऊंना अजून बरीच मजल गाठायची आहे असे निरीक्षण नोंदवतो. राष्ट्रवादीचे 'होऊ घातलेले श्रीगुरुजी' असे पद देऊ इच्छितो.

विशुमित 09/02/2017 - 11:24
फेदरवेट साहेब, अनुप जी आणि चिनार जी लाख लाख धन्यवाद..!! पण मी एव्हढा पात्र नाही हो गुरुजींसारखा होण्याला. त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे. जे समोर अनुभवतोय, थोडे फार वाचतोय आणि तुमच्या सारख्या दिगाजांकडून धडे घेतोय त्याच्यातुनच हा तुटपुंजा लेख प्रपंच चालवला आहे. पदरात घ्या.

In reply to by विशुमित

चिनार 09/02/2017 - 11:45
तेच म्हणतो भाऊ..श्रीगुरुजी पद निभावणं लय कठीण..वर्ष वर्ष धागा लढवावा लागतो त्यासाठी..गरज पडल्यास किलोकिलोंनी लिंका द्याव्या लागतात..आणखीही बरंच आहे..

In reply to by चिनार

सगळ्यात मुख्य म्हणजे, काहीही विचार न करता बेंबीच्या देठापासून ठो ठो करताच आले पाहिजे. पुढीलांचे कर्तृत्व इतके महान आहे की त्यांच्यावर दशखंडी श्रीगुर्जी मिपालीलामृत नावाचा एखादा ग्रंथ पडावा , असे भारदस्त भविष्य घडवण्याकरतासुद्धा विशुमित भाऊंना हार्दिक शुभेच्छा.

In reply to by फेदरवेट साहेब

अस्वस्थामा 09/02/2017 - 20:36
बाकी काही म्हणा, पण 'फेदरवेट साहेब' यावेळेस किमान टेस्ट खेळायच्या प्लॅनिंग ने आलेत असं दिसतंय. नाही तर आत्तापर्यंत दर वेळेस टी-२० पण पुरी होत नव्हती आणि पावसात सगळंच वाहून जात होतं. हो की नै हो ? ;)

In reply to by अस्वस्थामा

बाकी मी इथे टेस्ट खेळायला आलो असेन वा एक टप्पा आऊट खेळायला, किंवा ग्राउंड विकत घ्यायला, तुम्हाला चोंबडेपण करायचं कारण कळलं नाही ते? दूर दूर पर्यंत मुद्द्याला धरून नसलेले कैच्याकै (माझ्याशी) बोलायच्या अगोदर ह्यापुढे १० वेळा विचार करायचा.

arunjoshi123 09/02/2017 - 13:10
निवडणूकांत लोक कसे मतदान करतात, त्याची कशी गणिते मांडता येतात हे मन विषण्ण करणारे आहे. त्याची तशीच विश्लेषणं करणं हे अजूनच दुखावून जातं. बेरजा वजाबाक्या कशा होतील यात असलेला रस आणि कोणता घोडा जिंकणार आहे, कोणता घोडा जिंकजिं, इ इ वाटणे हे अशाच मनोवृत्तीचे द्योतक आहे. अत्यंत आदराने केलेल्या तुलना समजून घेता येतील परंतु अत्यंत अनादराने केलेल्या तुलना (मला आवडणारा पक्ष सर्वात कमी अनादरणीय कसा आहे, इ इ सूर) कशा समजून घ्यायच्या? असल्या लोकशाहीला काही अर्थ आहे का? आणि निकालाची उत्कंठा का असावी? आपला बलात्कारी (?!?) कोण असणार याबद्दल कसची उत्कंठा? ज्या मूलभूत अस्मितांना घटनात्मक संरक्षण आहे त्यांच्यातच गुरफटून कसले ते निवडणूकांकडे पाहणे?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

arunjoshi123 09/02/2017 - 16:39
शहराची राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, इ इ प्राधान्ये काय आहेत आणि ती पूर्ण करायचा उमेदवारांचा काय प्लॅन आहे.

वरुण मोहिते 09/02/2017 - 13:13
परत सगळी चर्चा शिवसेना कशी चुकली यावरच का?असो पण सेनाप्रमुखांचे किंवा पवारसाहेबांचे नाव काढले कि अनेक लोकांच्या मनात काय विद्वेष आहे कळत नाही . ज्यांचे मोठेपण निश्चितच आहे आणि बहुतेक सर्वानी ते मान्य केले आहे अगदी विरोधी पक्षातीलही सर्व लोकांनी . आता राजकारण म्हटलं कि काही चाली चुकायच्याच काही बरोबर पडायच्या तरीही विशेषकरून आंतरजालावर तर अशी गरळ ओकली जाते कि ज्याचे नाव ते. काटेकोर समीक्षा होते अगदी मराठी माणसाचा स्वभावच तो.कित्येक वकुबाने खुजे असलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यात पूर्ण सत्ता मिळाली पण महाराष्ट्रात ते होणे नाही. अजून एक मुद्दा स्थलांतराचा तर मुंबई हि आर्थिक राजधानी आहे त्यामुळे मराठी माणसाचे स्थलांतर होणे स्वाभाविक देशात कुठल्याही शहरात हे झाले असत . पण काही मर्यादांचे भान ठेवणे आवश्यक आहे . मांसाहाराला विरोध हा मुद्दा अनेक मराठी लोकांना पटला नाही मराठीच काय बंगाली आणि दाक्षिणात्य लोकांनाही नाही पटला इतर अनेक मुद्दे आहेत .लॉबिंग करणं मराठी माणसाला कधीच जमलं नाही ती गोष्ट शिवसेनेने एनकॅश केली . त्यामुळे सेनेने बागुलबुवा दाखवला नाही परिस्थितीतील खदखद हेरली . कुठल्या धर्माला दुखावण्याचा हेतू नाही पण आजही मुंबईतील मुस्लिमांवर सेनेचा धाक आहे हि वस्तुस्थिती आहे . अवांतर - भाजप हरावी असं वाटत ह्याचा कारण सेनेचं समर्थन नाही पण बरीच वर्ष मलिदा खाऊन आता उलट्या बोंबा मारायच्या ह्याला नालायक पणा म्हणतात आणि भाजप चे मुंबईतील नेते अजून नालायक आहेत .

In reply to by वरुण मोहिते

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 14:06
पण बरीच वर्ष मलिदा खाऊन आता उलट्या बोंबा मारायच्या ह्याला नालायक पणा म्हणतात आणि भाजप चे मुंबईतील नेते अजून नालायक आहेत .
आणि असाच नालायकपणा उद्धव ठाकरे २०१४ पासून राज्य सरकारमध्ये सत्तेत बसून करत आहेत. एकीकडे भाजपबरोबर सत्तेत बसायचे आणि दुसरीकडे मधूनमधून भाजपला सामनामधून टोले द्यायचे, ज्या पक्षाबरोबर महाराष्ट्रात सत्ता उपभोगायची त्याच पक्षाचा गोव्यात पराभव व्हावा म्हणून कारस्थाने करायची हा पण नालायकपणाच झाला. कित्येकवेळा म्हटल्याप्रमाणे मुंबई महापालिकेत कोणीही जिंकले तरी सामान्य लोकांना फार काही फरक पडणार नाहीये पण मुंबई महापालिकेतल्या सत्तेमुळे राज्य आणि केंद्र पातळीवर नालायकपणा उधोजीरावांना करता येत आहे म्हणून तिथे सेना हरावी.
कित्येक वकुबाने खुजे असलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यात पूर्ण सत्ता मिळाली पण महाराष्ट्रात ते होणे नाही.
मतदार नक्की काय बघून मते देतात हा एक गुंतागुंतीचा विषय आहे.वाजपेयींच्या सरकारने अर्थकारण नक्कीच चांगले सांभाळले तरीही त्यांचा पराभव व्हायचा तो झालाच. 'वकूबाने' खुज्या असलेल्या नेत्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये मतदारांवर अधिक प्रभाव टाकला म्हणून ते निवडून आले. तसा प्रभाव शिवसेनेला महाराष्ट्रात टाकता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मराठी लोकांच्या मानसिकतेला दोष देणे हा थोडासा 'elitist' प्रकार झाला. हे थोडेसे ट्रम्पला मत दिलेल्या सगळ्या अमेरिकन्सना 'racist' म्हणण्यासारखे झाले.

In reply to by गॅरी ट्रुमन

वरुण मोहिते 09/02/2017 - 14:32
पक्ष वाढीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही एकमेकांवर टीका केली आहे . पण मर्यादेत . काँग्रेस , राष्ट्रवादी कित्येक ठिकाणी वेगवेगळे लढले आहेत .पण आज केंद्रात आणि राज्यात भाजप आहे म्हणून काहीही बोलेले पटत नसावे . हे कुरघोडीचे राजकारण आहे तितकीच बोलताना पातळी भाजप ने हि सोडली आहे .विरोधी भूमिका घेणं वेगळं आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ओरडणं वेगळं . भाजप च्या ताब्यात असलेल्या महानगर पालिका भ्रष्टाचाराची चांगली उदाहरण आहेत. मुंबईचा मलिदा खाता यावा जास्त यासाठी हि भाजप ची धडपड चालू आहे . मुंबईत सेनेकडे ४ गोष्टी सांगण्यासारख्या तरी आहेत भाजप ची तर ती पाटी पण कोरी आहे .उगाच नाही विधानसभेच्या वेळी गुजरात वरून ७० च्या वर आमदार प्रचाराला आले तसेच कित्येक पदाधिकारी . त्यामुळे जर काहीच फरक पडणार नसेल असं असेल तर भाजप पेक्षा सेनेला मत का देऊ नये .केवळ सत्तेच्या विरोधात काही बोले म्हणून महानगर पालिकेत हरावी अशी इच्छा असेल तर ओक्के .बाकी मराठी लोकांच्या मानसिकतेचा प्रश्न नाही आणि केवळ मतपेटीतूनच ते दिसावे अशी अपेक्षाही नाही . पण पवार आणि ठाकरे म्हटलं कि काय वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे . ह्या उलट परिस्थिती बाळासाहेबांचं नाव भारतातल्या कुठल्याही राज्यात घेतलं तरी लोक मानतात .पवारसाहेबाना सर्वपक्षीय नेते मान देतात .त्याला अनुसरून हे विधान आहे .

In reply to by वरुण मोहिते

गॅरी ट्रुमन 09/02/2017 - 15:09
मुंबईचा मलिदा खाता यावा जास्त यासाठी हि भाजप ची धडपड चालू आहे .
आणि मुंबईचा मलिदा कायम आपल्यालाच मिळत राहावा यासाठी शिवसेनेची धडपड चालू आहे.
त्यामुळे जर काहीच फरक पडणार नसेल असं असेल तर भाजप पेक्षा सेनेला मत का देऊ नये
हे आतापर्यंत कित्येकवेळा लिहिले आहे. उधोजीरावांनी २०१४ पासून जे काही प्रकार चालवले आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. आता परत हे लिहिणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी कटूता आली ती जाऊ दे-- झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत जरी उधोजीराव सरळ वागले असते तर ही वेळ आली नसती.
पण पवार आणि ठाकरे म्हटलं कि काय वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे
पवार आणि ठाकरे काय टिकेच्या वर आहेत की काय?

In reply to by गॅरी ट्रुमन

वरुण मोहिते 09/02/2017 - 15:32
त्यातही आता भाजप चा जास्त आहे .हे त्यांच्याच मुंबईतील वाचाळवीरांवरून स्पष्ट झाले आहे . भाजप सरळ वागत आहे उद्धव काय ते चूक वागत आहेत म्हणून सेना हरावी.(उत्तम विश्लेषण ) भाजप चे अनेक भ्रष्टाचार बाजूला ठेऊन आता काहीच फरक पडणार नाही महापालिकेत कारभाराचा पण उद्धव नीट वागत नाही म्हणून हरावी सेना हे पण उत्तम . टीकेच्या वर कोणीच नाही हो पण टीका मर्यादेत असावी यावरून विधान आहे .(वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे हे मूळ विधान आहे )

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 09/02/2017 - 16:02
हे आतापर्यंत कित्येकवेळा लिहिले आहे. उधोजीरावांनी २०१४ पासून जे काही प्रकार चालवले आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. आता परत हे लिहिणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी कटूता आली ती जाऊ दे-- झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत जरी उधोजीराव सरळ वागले असते तर ही वेळ आली नसती.
शिवसेना नेते हे अत्यंत माजलेले आणि अपरिपक्व हे शिवसेना हरावी असे वाटण्यामागे एक कारण आहे. परंतु ते तेवढेच कारण नाही. एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक इ. धोरणे नाहीत. प्रक्षोभक भाषणे करणे, "सामना"तून अभद्र लिहिणे आणि फुशारक्या व बढाया मारणे एवढेच सेनेला जमते. "मला फक्त १ दिवस भारताचा पंतप्रधान करा. काश्मिर प्रश्न २४ तासांचा आत सोडवून दाखवितो.", "पाकिस्तानवर अणुबाँब टाकून नष्ट का करीत नाही" अशा तर्‍हेच्या वल्गना करणारे वास्तवापासून शेकडो कोस दूर असतात. ४० लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घरे देणार, शेतकर्‍यांना फुकट वीज देणार अशी त्यांची आर्थिक धोरणे. अशा टोळीच्या हातात अजिबात सत्ता नसावी.

In reply to by श्रीगुरुजी

वरुण मोहिते 09/02/2017 - 16:28
स्विस बँकेतून आणतो, तसेच नाही का २४ तासात पाकिस्तान घालवतो . काश्मीर प्रश्न लगेच सोडवतो असेही एक आश्वासन होत कोणाचेतरी:))मनमोहन प्रधानमंत्री असताना जे आता सर्वोच्च पदावर आहेत .ते तरी सत्तेत आहेत तरी जमलं नाही.अश्या वक्तव्यांना भावनेचा निकष असतो आणि सगळेच ते करतात . बाकी राम मंदिराचे काय झाले ??झोपडपट्टी वासियांना घरे किंवा वीज हे प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे .असो आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक धोरणावरून आठवले काही आर्थिक धोरण -नोटबंदी सामाजिक धोरण -राम मंदिर ,हिंदूने १० मुले जन्माला घालावीत शैक्षणिक धोरण -स्मृती इराणींना मंत्री करणे .

In reply to by वरुण मोहिते

arunjoshi123 09/02/2017 - 16:34
बाकी राम मंदिराचे काय झाले ?
पाहिजे आहे का?
सामाजिक धोरण -राम मंदिर ,हिंदूने १० मुले जन्माला घालावीत
मंदिर फायजेल का नको, कायतरी एक सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

NiluMP 09/02/2017 - 21:44
एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक इ. धोरणे नाहीत. प्रक्षोभक भाषणे करणे.... +१

In reply to by वरुण मोहिते

चिनार 09/02/2017 - 14:37
परत सगळी चर्चा शिवसेना कशी चुकली यावरच का?असो पण सेनाप्रमुखांचे किंवा पवारसाहेबांचे नाव काढले कि अनेक लोकांच्या मनात काय विद्वेष आहे कळत नाही . ज्यांचे मोठेपण निश्चितच आहे आणि बहुतेक सर्वानी ते मान्य केले आहे अगदी विरोधी पक्षातीलही सर्व लोकांनी .
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे, त्यामुळे फक्त मुंबई,पुणे,नाशिक ह्याविषयीच बोलू नये. शिवाय "त्यांचं जाऊद्या, तुमच्या नेत्याने काय दिवे लावले " टाईप प्रतिसाद देऊ नये ही विनंती. एक वेगळा धागा काढला तरी चालेल. हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्यांना विचारू इच्छितो.

In reply to by चिनार

वरुण मोहिते 09/02/2017 - 14:56
चष्मा काढून वाचायला हवेत . सगळंच बरोबर असं कोणीच म्हणत नसत पण केलं ते सगळंच चूक आहे हे दाखवण्यात काही लोकांना बर वाटत,काहींचे हिडन अजेंडे असतात ,काहींचे फॅड असते,काहीजण उगाच सगळे बोलतात म्हणून बोलत असतात . आता काहीच योगदान नाही असं म्हणायचं असेल तर प्रश्नच मिटला . बाकी इथे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरच्या पण काही प्रतिक्रिया किंवा पवारांवर हल्ला झाला त्यावेळच्या प्रतिक्रिया वाचून आम्ही धन्य झालोय त्यामुळे योगदानवीर हि नवीन मालिका आपण चालू करावीत असे आम्ही सुचवतो :))आमच्यात ती ताकद नाय

In reply to by चिनार

अभ्या.. 09/02/2017 - 15:00
इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे,
माझा जिल्हा सोलापूर. लागून असलेला व सांस्कृतिक जवळीक असलेला जिल्हा म्हणजे उस्मानाबाद. ह्याबाबत बोलायचे झाले तर ठाकरे आणि पवारसाहेबांचाच प्रभाव दिसलेला आहे. स्व. महाजन साहेब व स्व. मुंडेसाहेबांचे राजकारण सेनेला जोडीने घेऊन व मुंडेसाहेंबाचे तर सेनेसारखेच राजकारण होते. काँग्रेसला प्रभावी टक्कर द्यायचे काम सेनेनेच केलेले ८५ सालापासून दिसलेले आहे. मुंबई पुण्यासारखे प्रप्रांतीय वगैरे विषय नसताना कट्टर हिंदुत्व, बाळासायेबांना मानणारे कट्टर कार्यकर्ते ह्यांच्या जीवावर सेनेने प. महाराष्ट्राचा थोडा भाग व मराठवाड्याचा थोडा भाग यशस्वीरित्या लढवलेला आहे. मिपावर भाजपविषयी कट्टरपणा दाखवताना बिनदिक्कत खोटे रेटायचा व मुंबईपुण्याबाहेरची पुस्तकी माहीतीवर दुसर्‍यांना खोटे ठरवायचा भंपक प्रकार काही आयडीकडून वारंवार होत आहे. त्यांच्या तोंडी लागण्यातही अर्थ नाही हे कळून चुकलेले आहे. काहीही करुन सेना हरावीच अशा मानसिकतेला उत्तर देणे अवघड आहे. तस्मात... काळच ठरवेल जे काही होईल ते. जय महाराष्ट्र.

In reply to by अभ्या..

ह्याबाबत बोलायचे झाले तर ठाकरे आणि पवारसाहेबांचाच प्रभाव दिसलेला आहे. स्व. महाजन साहेब व स्व. मुंडेसाहेबांचे राजकारण सेनेला जोडीने घेऊन व मुंडेसाहेंबाचे तर सेनेसारखेच राजकारण होते.
म्याबी तिकडलाच, सहमत तुमच्या मताशी.

In reply to by वरुण मोहिते

वकूबाचीच गोष्ट करायची झाली तर मोदी सलग ३ टर्म गुजरातेत निवडून येत होते पण इथे शिवसेनेला मुंबई महापालिकेतसुद्धा निवडून येताना सुद्धा दम लागतो ही वस्तुस्थिती पुरेशी बोलकी आहे. मालवणच्या आव्हान दिल्या गेलेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी परशुराम उपरकरचे डिपॉझिटसुद्धा जप्त केले होते. बहुधा खुद्द बाळासाहेबांना देखील प्रचारासाठी मैदान मिळाले नव्हते. एवढी नारायण राणेंची दहशत होती. उगाच इतर नेते खुज्या वकुबाचे होते म्हणण्यापेक्षा आणि मराठी माणसाच्या नावे खडे फोडण्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रात धनुश्य बाणाच्या नावावर आमदार निवडून येतील एवढा बाळासाहेबांचा वकूब नव्हता हे मान्य का करत नाही. तरीही विशेषकरून आंतरजालावर तर अशी गरळ ओकली जाते कि ज्याचे नाव ते सामना मधून गरळ ओकले तर चालते असे काही आहे का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

वरुण मोहिते 09/02/2017 - 20:19
कोणी खडे वैग्रे फोडत नाहीये .पुढेच मी सांगितलंय कि मतपेटीतून हे दिसावं अशी अपेक्षाही नाही माझा मुद्दा खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याबाबत होता आणि जे लॉबिंग बाहेरच्या प्रांतात जमत ते महाराष्ट्रात कधीच जमत नाही हा होता . त्यामुळे खडे वैग्रे फोडणं राहूद्या . मतपेटीतून दिसावं अशी अपेक्षा नाही म्हटल्यामुळेच मोदी ३ वेळा जिंकत कि ३० वेळा तो हि मुद्दा नाही . हरण जिंकणं होत असतं. नको ते जिंकले आणि भले भले हरले असं कित्येकदा झालाय भारतात .महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत वेगळा आहे इतकाच म्हणायचं होत . आणि त्यासाठी नारायण राणेंचा उदाहरण द्यावं हे अजून हास्यास्पद आहे . सामना मधून गरळ ओकणे हा माझा मुद्दा नव्हता सामना मी वाचत नाही कारण त्या पेपर ला मूल्य नाही .किंबहुना कुठल्याही राजकीय पक्षाचे पेपर, पाक्षिक आम्ही वाचत नाही . तरीही सामनामधून कोणावर गरळ ओकल्याने आपणास त्रास झाला हे सांगितलं तर मत मांडता येईल .

विशुमित 09/02/2017 - 15:05
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल.>> -- समाज माध्यमांमध्ये भरपूर लिखाण आहे यांच्या वर. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे, त्यामुळे फक्त मुंबई,पुणे,नाशिक ह्याविषयीच बोलू नये. >>> -- ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ जिल्यातील लोक अनंतर्भूत झाले आहेत. बराय किमान ही शहरं तरी विकसित केली नाही तर काय अवस्था झाली असती देव जाणे. शिवाय "त्यांचं जाऊद्या, तुमच्या नेत्याने काय दिवे लावले " टाईप प्रतिसाद देऊ नये ही विनंती.>> -- मराठवाडा आणि विदर्भातल्या नेत्यांनी नीट दिवे लावले नाहीत म्हणून तर या दोघांना विचारलं जातंय तुमचे योगदान काय आहे. एक वेगळा धागा काढला तरी चालेल>> -- किती ही धागे काढले तरी लोक पूर्वग्रहदूषितपणा सोडणार आहेत का? देईल का कोणी याची ग्यारंटी ?

In reply to by विशुमित

चिनार 09/02/2017 - 15:25
ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ जिल्यातील लोक अनंतर्भूत झाले आहेत. बराय किमान ही शहरं तरी विकसित केली नाही तर काय अवस्था झाली असती देव जाणे.
धन्य झालोय हे वाक्य वाचून ! परमेश्वराने आम्हाला उरलेल्या बत्तीस जिल्ह्यांपैकी एकात जन्माला घातले ही त्याचीच चूक म्हणावी लागेल. आणि त्यातही हा प्रश्न विचारायला आम्ही जिवंत राहिलो ही महाराष्ट्राच्या ह्या दोन सन्माननीय नेत्यांची कृपा !! असो. थोडक्यात म्हणजे जे आहे ते गोड मानायचे.