मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७
In reply to ह्या महापालिकेत असलेला पैसा by फेदरवेट साहेब
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.मलाही. उद्धव ठाकरे म्हणत आहेत की युतीमुळे शिवसेनेची २५ वर्षे सडली. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा मतीतार्थ हा की युती झाली त्यावेळी शिवसेनेपेक्षा भाजपचे अस्तित्व नगण्य होते आणि शिवसेनेमुळेच भाजप महाराष्ट्रात फोफावला. हे म्हणणे अर्धसत्य नसून पूर्णच असत्य आहे.या उधोजीरावांच्या समर्थकांना काहीही वाटत असले तरी आकडे काहीतरी वेगळेच बोलत आहेत. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा दिला.इतकी वर्षे भाजपने शिवसेनेला इतके मोठे स्थान का दिले हे कोडेच आहे. शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड कसा होता? युतीच्या काळातही प्रत्येक वेळी भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त होता.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये २००२ चा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेने भाजपने उभ्या केलेल्या उमेदवाराविरोधात मत दिले आहे.शरद पवार जर पंतप्रधान होणार असते तर मराठीपणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पवारांनाही पाठिंबा दिला असता यात अजिबात शंका नाही.पुण्यातील शिवाजीनगरसारखा भाजपचा हक्काचा मतदारसंघ युतीत असताना शिवसेनेने दादागिरी करून इतकी वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवला होता.पण २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर या मतदारसंघात भाजपने अगदी आरामात विजय मिळवला. इतकी वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ मध्ये शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा मिळविल्या या कारणावरून लगेचच १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितला.रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे ज्या मतदारसंघातून निवडून येत असत तो मतदारसंघ भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या 'राजहट्टाखातर' सोडून द्यावा लागला होता.तसे असेल तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेमुळेच इतके मोठे यश मिळाले होते हे अगदी कोणीच नाकारू शकत नाही.तरीही शिवसेना भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये ४ जागाही जास्त द्यायला तयार नव्हती.भाजपने यांची दादागिरी का सहन केली हा प्रश्नच आहे. १९९० मध्ये विधानसभेच्या १७४ जागा शिवसेनेने तर उरलेल्या ११४ जागा भाजपने लढविल्या होत्या. अगदी २००९ पर्यंत भाजपने लढविलेल्या जागांचे प्रमाण जवळपास तितकेच राहिले. फार तर ३-४ जागा जास्त मिळाल्या. तर लोकसभेत मात्र शिवसेनेला मिळालेल्या जागांचे प्रमाण लक्षणीय वाढले. १९८९ मध्ये शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना तर धनुष्यबाण हे चिन्हही मिळालेले नव्हते. १९८९ पासून २०१४ पर्यंत शिवसेनेला लोकसभेच्या जागा मात्र वाढवून मिळाल्या पण भाजपच्या विधानसभेच्या जागा मात्र फार वाढल्या नाहीत. काल उद्धव ठाकरे म्हणाले की १९९८-९९ मध्ये जयललिता आणि ममता बॅनर्जी वाजपेयींना त्रास देत असताना शिवसेना मात्र वाजपेयींच्या पाठीशी खंबीरपणे होती आणि शिवसेनेने कधीच वाजपेयींना त्रास दिला नाही. उलट आपल्या कोट्यातली मंत्रीपदे जयललितांना द्यायची तयारीही बाळासाहेबांनी दाखवली होती. हे बोलताना उध्दव एक गोष्ट सोयीस्करपणे विसरले.आणि ती म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रातले मनोहर जोशींचे सरकार भाजपबरोबर होते आणि दिल्लीत वाजपेयींना त्रास दिला असता तर त्याचे परिणाम मुंबईत भोगावे लागले असते. मुंबईतील सत्ता गेल्यावर शिवसेना तितकी सज्जन राहिली होती का? वाजपेयींची १९९९ नंतरची टर्म त्यापूर्वीच्या टर्मपेक्षा बरीच जास्त स्थिर होती. तरीही केंद्राच्या 'जागतिकीकरणाच्या' धोरणामुळे कामगारांपुढच्या अडचणी वाढत आहेत असे म्हणत त्याविरूध्द एप्रिल २००१ मध्ये शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचवेळी मनोहर जोशी अवजड उद्योगमंत्री होते याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. सुरेश प्रभू हे वाजपेयींच्या मर्जीतले मंत्री होते. त्यांना बाळासाहेबांनी राजीनामा द्यायला लावला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने जास्त जागांची मागणी केली (ज्या आधारावर १९९६ मध्ये शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला होता) तेव्हा शिवसेना अजिबात तडजोड करायला तयार नव्हती. मग प्रचारात "नरेंद्र मोदींचे मंत्रीमंडळ म्हणजे अफझलखानाचे सैन्य","जसे आदिलशहा, कुतुबशहा तसे अमित शहा" असे मोती त्याच उध्दव ठाकरेंनी काढले होते. नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांचा उल्लेख प्रचारसभेत करून खास शिवसेना स्टाईल असंस्कृतपणाचे प्रत्यंतर आणून दिले. त्यानंतर सत्तेत असून शिवसेना विरोधी पक्षांपेक्षाही वाईट पध्दतीने वागत आलेली आहे. दिल्लीत केजरीवाल जिंकल्यावर मुद्दामून केजरीवालांचे अभिनंदन करायचा फोन उध्दव ठाकरेंनी केला. आता गोव्यामध्ये भाजपमधून बाहेर पडलेल्या गटाबरोबर युती करून भाजपचा पराभव करायची कारस्थाने चालू आहेत. असला बेजबाबदार मित्रपक्ष दूर झाला हे चांगलेच झाले. असे म्हणतात की पाठीत खंजीर खुपसणार्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला.शिवसेनेविषयी नेमके हेच मलाही वाटत आहे. ही गोष्ट बरीच आधी व्हायला हवी होती ती आता झाली आहे. अपेक्षा एकच की शिवसेना बाहेर पडल्यावर त्याजागेवर राष्ट्रवादी काँग्रेस नको. तसे झाले तर विधानसभा निवडणुकांमध्ये तरी माझे मत भाजपला नक्कीच नाही.गरज पडल्यास सत्ता गेली तरी हरकत नाही पण शिवसेना नको आणि राष्ट्रवादीही नको.
In reply to मलाही by गॅरी ट्रुमन
In reply to फार छान प्रतिसाद गॅरीभाऊ! by आदूबाळ
In reply to मलाही by गॅरी ट्रुमन
In reply to शिवसेना सर्वात मोठा पक्ष? by गॅरी ट्रुमन
इतकी वर्षे भाजपने शिवसेनेला इतके मोठे स्थान का दिले हे कोडेच आहे.त्याचं काय आहे की शिवसेना हा भाजपप्रमाणे राजकीय पक्ष नाही. ती एक चळवळ आहे. १९८० च्या मध्यावर राजीव लाट जोरात होती. तेंव्हा काँग्रेसविरोधी जागा पुलोदने व्यापलेली होती. मात्र पवारांनी काँग्रेसविरोधी भूमिका सोडून राजीव गांधींच्या पायी विलीन होणं पत्करलं. मग काँग्रेसविरोधी राजकीय अवकाश उत्पन्न झाला तो व्यापण्यासाठी भाजपकडे ना मनुष्यबळ होतं, ना धडाडी. नेमक्या याच पोकळीत शिवसेना लहानाची मोठी (म्हणजे मुंबईठाण्यातून बाहेर पडून राज्यव्यापी) बनली. आमदार खासदारांचा हिशोब नंतर चित्रात येतो. भाजप जर मोठा भाऊ असेल तर मोदी येईपर्यंत स्वबळावर सत्तेत का येऊ शकला नाही? आ.न., -गा.पै. जाताजाता : युती भाजपने तोडली आहे, शिवसेनेने नाही.
In reply to शिवसेना आणि भाजप by गामा पैलवान
मात्र पवारांनी काँग्रेसविरोधी भूमिका सोडून राजीव गांधींच्या पायी विलीन होणं पत्करलं. मग काँग्रेसविरोधी राजकीय अवकाश उत्पन्न झाला तो व्यापण्यासाठी भाजपकडे ना मनुष्यबळ होतं, ना धडाडी.हो शरद पवार १९८७ मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यावर शरद पवारांच्या कंपूतील काँग्रेसविरोधी मतदार शिवसेनेकडे गेले. शिवसेनेला हा फायदा विशेषतः मराठवाड्यात झाला. जयप्रकाश मुंदडा हे पवारांकडून शिवसेनेत आलेले नेते मला नक्कीच माहित आहेत. इतरही असतील. अशा तरूण नेत्यांना बाळासाहेब ठाकर्यांची आक्रमक आणि खळ ख्ट्याक शैली अधिक आकर्षक वाटली. आजही मनसेला तरूणांचा अधिक पाठिंबा मिळतो त्याचे कारणही हेच आहे--तरूणांना आक्रमकपणा जास्त आकर्षित करतो. भाजपकडे त्या अर्थी धडाडी नव्हती असे म्हणता येईल पण मनुष्यबळ नव्हते हे म्हणणे तथ्याला धरून नाही.
भाजप जर मोठा भाऊ असेल तर मोदी येईपर्यंत स्वबळावर सत्तेत का येऊ शकला नाही?हा प्रश्न समजला नाही. भाजप शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष असला तरी काँग्रेसपेक्षा नक्कीच मोठा नव्हता. त्यामुळे १९८० च्या दशकात थोडीच सत्तेत येऊ शकणार होता?
जाताजाता : युती भाजपने तोडली आहे, शिवसेनेने नाही.हो भाजपनेच तोडली.पण ती शिवसेनेने आडमुठेपणा दाखविल्यामुळे. जर कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या या कारणावरून १९९६ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने मागून घेतला असेल तर त्याच न्यायाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणे शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे आणि शिवसेनेला कधी नव्हे एवढ्या १८ जागा मिळाल्या त्या मोदीलाटेमुळे हे स्पष्ट झालेले असतानाही शिवसेनेने भाजपला जास्त जागा द्यायची तयारी दर्शवायला हवी होती. ते न झाल्यामुळे युती तोडली. एक भाजपसमर्थक म्हणून त्याचे अजिबात वाईट मला वाटत नाही. पण उद्या तिथे राष्ट्रवादी येऊन बसला तर नक्कीच वाईट वाटेल.
In reply to बाकी सत्तेत कोणीही येवो by धर्मराजमुटके
मी त्या 'खंजीर' नावाच्या हत्यारावर कायमची बंदी घालणारे निवेदन सरकारला द्यायचा विचार करतोय.चीनने भारतावर १९६२ मध्ये हल्ला केला तेव्हा चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले गेले होते. पाकिस्तानने १९९९ मध्ये कारगील घडवून आणले तेव्हाही पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला (पीठ मे छुरी की असे काहीतरी) म्हटले गेले होते. १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे महाराष्ट्रातील सरकार पाडले तेव्हाही "शरद पवारांनी माझ्या पाठित खंजीर खुपसला" अशी प्रतिक्रिया वसंतदादांनी दिली होती. तेव्हा सांगायचा उद्देश हा की खंजीर खुपसणे या वाक्प्रचाराचा राजकारणात केला जाणारा उपयोग बराच जुना आहे :)
बाकी सत्तेत कोणीही येवो..हे बाकी खरे. महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी बिल्डरकडून पैसे खाऊन अनधिकृत बांधकामे उभी करून देणे, कंत्राटदारांकडून टक्केवारी वसूल करून कंत्राटे देणे इत्यादी प्रकार थांबणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेत सत्तेत कोणीही आले तरी सामान्यांना फार फरक पडणार नाही. राज्यात किंवा केंद्रात कोणी सत्तेवर आले तर आपल्या आयुष्यात थोडा तरी बदल घडायची शक्यता असते.पण महापालिकेत अगदी कोणीही आले तरी त्यामुळे काही फरक पडेल असे वाटत नाही. तरीही शिवसेनेचा राज्यपातळीवरच्या माजाचा स्त्रोत मुंबई महापालिका या देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेतील सत्तेत आहे. तो शिवसेनेच्या माजाचा स्त्रोत मात्र बंद व्हावा असे फार वाटते.
In reply to हार्दिक पटेल by गॅरी ट्रुमन
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
In reply to नवी मुंबई मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर by फेदरवेट साहेब
In reply to श्रीकर परदेशीपण! by अनुप ढेरे
In reply to श्रीकर परदेशींना पिंपरी by विशुमित
In reply to कैच्या कै! श्रीकर परदेशींना by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हा हा हा. पण लक्ष्मण जगताप by अनुप ढेरे
In reply to जे इतर पक्ष होते त्यात जगताप by विशुमित
In reply to जे इतर पक्ष होते त्यात जगताप by विशुमित
In reply to जगताप आता भाजपात गेले म्हणून by अनुप ढेरे
In reply to <<<<अनधिकृत बांधकामं पाडायला by विशुमित
In reply to जे इतर पक्ष होते त्यात जगताप by विशुमित
In reply to विशुमतीसाहेब, डोळ्यांनी पहिले by हतोळकरांचा प्रसाद
In reply to <<<<विशुमतीसाहेब, डोळ्यांनी by विशुमित
In reply to आंदोलनांनेही परदेशी थांबले by हतोळकरांचा प्रसाद
In reply to नवी मुंबई मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर by फेदरवेट साहेब
In reply to सिडको च कौतुक नक्कीच व्हायला by विशुमित
In reply to शहराच्या बाहेर असलेल्या by श्रीगुरुजी
In reply to गावाकडची माणसं शरद पवारांच्या by विशुमित
In reply to हा हा हा by अनुप ढेरे
In reply to गावाकडची माणसं शरद पवारांच्या by विशुमित
In reply to सिडको च कौतुक नक्कीच व्हायला by विशुमित
असले स्टेण्टबाज अधिकारी फक्त प्रसिद्धीच्या झोतात असतात.-१ राष्ट्रवादीला साथ नाही तर लगेच स्टंटबाज..
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
In reply to अतिशयोक्तीपुर्ण प्रतिसाद. by मराठी कथालेखक
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
In reply to आपण कशाला घरला पळताय? by खेडूत
In reply to <<<७०, ५५, ४५.४०,१७ असे by विशुमित
In reply to अशक्य. मुंबईत अशी क्रमवारी by श्रीगुरुजी
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
त्याची कारण मीमांसा अशी आहे- १) गेली २ वर्षापासून शरद पवार "गोविंद बाग" येथे जास्त राहत नाहीत. ते मुंबईमध्ये राहण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. भले वैद्यकीय उपचार हे कारण दिले असलेले तरी पवार साहेब तिथे स्वस्त बसले नसणारच. संघटन अधिक मजबूत कशी होईल यावर नक्कीच काम केले असणार. (वांगी आणि डाळिंबाची बाग बघायला येतात कधी कधी)आयसीसीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर पवारांना परत क्रिकेटमध्ये घुसायचे होते. एखाद्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर पोहोचून निवृत्त झाल्यावर परत सर्वात खालच्या पदावर पुन्हा जाणे हे पदासाठी अत्यंत हपापलेले असल्याचे लक्षण आहे. असे करणे म्हणजे नारायण मूर्तींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा इन्फोसिसमध्ये ट्रेनी प्रोग्रॅमरचा जॉब घेण्यासारखं आहे. एकतर आपलं वय झालेलं आहे, दुसरं म्हणजे आपला क्रिकेटचा काहीही संबंध नाही, तिसरं म्हणजे आपण या क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर पोहोचलो होतो, चौथं म्हणजे आपण या क्षेत्रात तब्बल १२ वर्षांहून अधिक काळ असल्याने आता इतरांना संधी द्यायला हवी. पण असला विचार करतील ते पवार कसले? यांना सगळं स्वतःलाच हवं असतं. बीसीसीआयमध्ये घुसण्यासाठी पवारांना मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व्हायचे होते. आधी मुंबई क्रिकेट संघटनेत घुसूया व नंतर पुन्हा एकदा बीसीसीआय घुसावे आणि नंतर जमलं तर पुन्हा एकदा आयसीसीत तंबू टाकावा अशी त्यांची योजना होती. मुंबई क्रिकेट संघटनेत घुसण्यासाठी त्यांचे नाव मुंबईच्या मतदार यादीत असणे अनिवार्य होते व त्यासाठी आपण मुंबईत निवासस्थान आहे (मालकीचे/भाड्याचे) हे दाखविणे अनिवार्य होते. म्हणून ते मुंबईत आले. तिथे येण्याचा उद्देश बीसीसीआय मध्ये पुन्हा एकदा घुसावे एवढाच होता. त्यामुळे मुंबईत संघटना मजबूत करणे वगैरे असली कामे त्यांनी केलेली नाहीत.
२) मुंबई आणि विदर्भात कधीच आपले बस्तान मांडता आले नाही, ही खंत या आशावादी आणि महत्वाकांक्षी नेत्याला स्वस्त बसून देणार नाही.आपली विश्वासार्हता शून्य आहे व आपण आयुष्यभर कोलांट्या उड्या मारणे व काड्या घालणे यापलिकडे काहीही केलं नाही ही खंत ज्या व्यक्तीला कधी वाटली नाही तिला इतर गोष्टींची खंत काय वाटणार? ३) नवी मुंबई मध्ये केलेला विकास जुन्या मुंबईतील जुन्या खोडांच्या डोळ्यासमोर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे करायचे याचा हातखंडा फक्त पवारांकडे आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यासारख्या येड्या गबाळ्याचे ते काम नाही. काँग्रेस, मनसे आणि एम आई एम सारखे चुटुरफुटूर पक्ष विकासाच्या बाबतीत खिजगिणतीत पण नाही. काय विकास केला पवारांनी नवी मुंबईत? ४) सचिन अहिर सारख्या तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात संघटनेचे नेतृत्व ही सुद्धा जमेची बाजू आहे. हहपुवा ५) माथाडी कामगार, गिरणी कामगार, गोदी कामगार आणि त्यांच्या संघटनांवर पवारांचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. त्याचा देखील फायदा होऊ शकतो. त्यांचा शून्य फायदा झाला. मुंबईत पवारांना स्थान नाही. ६) पवार स्पर्श म्हणजे मिडास टच...जैन, गुजराती आणि सिंधी समाज हे जाणून आहेत. त्यांच्या जुन्या मित्रांची पण आता चांगली बैठक बसत असेल. मिडास टच म्हणजे हात लावतील त्याचे भाव वाढतील ७) परप्रांतीय लोकांना पवारांनी नेहमीच आधार दिला आहे. निरूपमला त्यांनी मुर्खात काढून त्याचे महत्व कमी करून टाकले आहे. निरूपम हा मूर्ख आहे हा पवारांना इतक्या उशीरा साक्षात्कार झाला! २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच पवारांनी व त्यांच्या पक्षाने निरूपमला पाठिंबा दिलेला होता. ८) आता राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा. त्यांच्याकडे कोणताच चांगला पर्याय नाहीये. एम आई एम थोडीफार वळवळ करेल पण राष्ट्रवादीसाठी ते लाभदायक असेल. इशरत जहांसारख्या अतिरेक्याला पाठिंबा देणे (दस्तुरखुद्द पवारांनी तिला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे), तिच्या घरच्यांना १ लाखाची मदत देणे (डावखरे व आव्हाड), शहीद इशरत जहां असे नाव रंगविलेली अॅम्ब्युलन्स सुरू करणे (आव्हाड) असली घॄणास्पद कृत्ये करणारी राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिमांसाठी उत्तम पर्याय असणारच.
In reply to मुंबई महानगरपालिका by श्रीगुरुजी
आपली विश्वासार्हता शून्य आहे व आपण आयुष्यभर कोलांट्या उड्या मारणे व काड्या घालणे यापलिकडे काहीही केलं नाही ही खंत ज्या व्यक्तीला कधी वाटली नाही तिला इतर गोष्टींची खंत काय वाटणार?हे एकदम पटले !!
In reply to प्रतिसाद आवडला. by मराठी कथालेखक
In reply to मुंबई महानगरपालिका by श्रीगुरुजी
In reply to एव्हडंच नाही, तर औरंगजेबाला by खेडूत
In reply to फोटोमध्ये दाखवलेल्यांच्या मते by विशुमित
In reply to पण ते राष्ट्रवादीच्या by सुबोध खरे
In reply to खरे जी... by विशुमित
In reply to श्या! असं कसं व्हायचं विशुमित by संदीप डांगे
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
In reply to =)) काय आजचा हालहवाल? by अनुप ढेरे
In reply to मिपाकर मंदार भालेराव यांचे by संदीप डांगे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस धक्कादायक विजय नोंदवणार असे वाटते.राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये अजिबात नाही.त्यापेक्षा काँग्रेस धक्का देवू शकली असती,पण त्यांच्यातसुद्धा फूट आहे अन् एकमेकांची तोंडे विपरीत दिशेला आहेत,त्यामुळे शक्यता कमी आहे.
शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला व्यक्तिशः कितीही वाटत असले तरी शिवसेनेच पारडे इतरांपेक्षा जड आहे असे दिसते.मला भाजपचा पराभव व्हावा असे व्यक्तीशः वाटते. भाजप जर जिंकली तर तमाम मराठी बांधवांनी आपला गाशा गुंडाळून उपनगरांमध्ये यावे.(ऑलरेडी बरेच आले आहेत)
In reply to नोटबंदीनंतर मुंबईकरांना by निष्पक्ष सदस्य
भाजप जर जिंकली तर तमाम मराठी बांधवांनी आपला गाशा गुंडाळून उपनगरांमध्ये यावे.असल्या भितीचे बागुलबोवे उभे करण्यात शिवसेनेचा हात कित्येक दशकांमध्ये कोणी धरू शकलेले नाही. दक्षिण मुंबईतून मराठी माणूस उपनगरांमध्येच नव्हे तर सुरवातीला ठाण्याला, मग डोंबिवली-कल्याणला आणि त्यानंतर थेट अंबरनाथ-बदलापूरला स्थलांतरीत व्हायची प्रक्रीया गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.आणि त्यापैकी कित्येक वर्षे शिवसेनेचाच महापौर मुंबईत होता. मराठी माणसाच्या या स्थलांतराविरूध्द शिवसेनेने काय मोठे तीर मारले होते? बरं महापालिकेला या बाबतीत मर्यादीत अधिकार असतील आणि फार काही करता येत नसेल तर मग भाजप जिंकल्यास मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार व्हावे लागेल अशी कोल्हेकुई कशाकरता? जे काही होईल त्याविषयी महापालिकेला काहीही करता येणार नाही-- मुळातल्या स्थलांतराविषयी नाही आणि ते स्थलांतर थांबविण्याविषयीही नाही-- अगदी कोणीही सत्तेत आले तरी--- शिवसेना/भाजप किंवा काँग्रेसही. एकूणच कुठल्या तरी समाजगटाविरूध्द लोकांच्या मनात विनाकारण भिती निर्माण करायची आणि मग त्या समाजगटापासून तुमचे संरक्षण करणारा तारणहार आपणच अशा पध्दतीने स्वतःला पुढे आणायचे आणि त्या निमित्ताने मतांची झोळी भरून घ्यायची या प्रकारात शिवसेनेला इतर कोणताही पक्ष पुरा पडू शकणार नाही. 'परप्रांतियांनी' (गुजर**सह) मुंबईची कशी वाट लावली याचा घोषा शिवसेना वर्षानुवर्षांपासून लावत आली आहे. आणि ही वाट कशी लावली हे मराठी माणसाला सांगायला परत एका गुजराथ्यालाच बोलावून घेतले. पण काय करणार. शिवसेना म्हटली की निवडणुक काळात मराठीचे पंचवार्षिक उमाळे येणे आणि त्या खोट्या भावनिक आवाहनाला मराठी माणसाने बळी पडणे आणि परत परत शिवसेनेलाच निवडून देणे हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आला आहे. यावेळी काही बदल होतो का तेच बघायचे.
In reply to स्थलांतर by गॅरी ट्रुमन
In reply to गॅरी भाऊ... by विशुमित
In reply to ते राष्ट्रवादीच्या दोन by हतोळकरांचा प्रसाद
In reply to स्थलांतर by गॅरी ट्रुमन
In reply to ३८००० कोटीच्या बजेटच्या २ by अप्पा जोगळेकर
विचारला असता तर मुडदाच पडला असता.हे कोणत्या राजकीय पक्षाच्या बाबतीत खरे नाही?
इंदिरा गांधींच्या समोर वाघाचे भिजके मांजर झाले होते असे मात्र कुठेतरी वाचले आहे.याचा संदर्भ देता का प्लिज? बाकी कटचं म्हणाल तर मग काही लाख कोटींचा कट किती निघेल बरे?
In reply to विचारला असता तर मुडदाच पडला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कुठेतरी वाचले आहे असे म्हटले by अप्पा जोगळेकर
केंद्र आणि महापालिका यांची तुलना करु शकत नाही. शिवाय केंद्राला आर्थिक पाहणी अहवाल द्यावा लागतो. क्वचित कॅगला वगैरे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे २जी सारखे भ्रष्टाचार उघडकीला येतात. महापालिकेत असे काही नसते बहुधा.आप्पा, असे काही नसते हो. वीस टक्के कमीशन आहेच सरकारी खात्यांमधे. ह्या वीसटक्क्यांत बाबू पासून मंत्र्यांपर्यंत (विरोधी पक्षनेतेही) सर्वजण वाटा घेतात... कॅगचे आर्थिक पाहणी अहवाल हे सरकारने खर्च कुठे कसा केला हे दाखवणार. कॉन्ट्रॅक्टरने खर्च कसा केला हे नाही दिसत त्यात. तसेच उघडकीस येत नाही म्हणून भ्रष्टाचार होत नाही असे नसते. पकडला तर चोर असेही नसते. भ्रष्टाचार उघडकीस आणणारे असंतुष्टच असतात बहुधा ( प्रामाणिक विसल्ब्लोअरांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी.). आदर्श घोटाळा बाहेर येण्यास तिथे कंत्राट मिळण्यास असफल झालेले कंत्राटदार कारणीभूत होते, अन्यथा आदर्श इमारत उभी राहून सगळे सुखनैव पिढ्यांपिढ्या राहिले असते. भ्रष्टाचार करण्यात व तो उघडकिस आणण्याची धमकी देऊन त्यावर मलिदा खाण्यास सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्ष बरोबरीने सामिल असतात.
In reply to केंद्र आणि महापालिका यांची by संदीप डांगे
In reply to डांगेंजी, बहुतेक मुद्द्यांशी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to केंद्र आणि महापालिका यांची by संदीप डांगे
वीस टक्के कमीशन आहेच सरकारी खात्यांमधे.भारताच्या जीडीपीच्या ४५% टक्के तिन्ही प्रतलांवरच्या शासनांचा खर्च असतो. तर येत्या काळात बाबू आणि राजकारणी ४५%* १२५ लाख कोटी *( १+ (१+७%)+ (१+७%)^२+ ....) इतके पैसे कमवणार आहेत? तुम्ही काय म्हणताय त्यात २०% जरी तथ्य निघाले तरी देशात २-३ वर्षांत हुकुमशाही आणि न भूतो न भविष्यति अशी विषमता* येईल.
कॉन्ट्रॅक्टरने खर्च कसा केला हे नाही दिसत त्यात.हे वाक्यच विचित्र आहे. एकतर असं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तर अजिबात नाही. पण जरी असेल तर योग्य आहे. कंत्राटदाराचा खर्च स्टॅट्यूटरी ऑडिटर पाहतोच. पण तो कॅगने देखिल का पाहावा म्हणे? शिवाय अलिकडे ज्या १७ लाख कोटी प्रकल्प इ थकले होते , त्यातले अनेक पीपीपी पॉलिसीतून एस पी व्ही माध्यमातून केलेले होते. या एस पी व्ही चा मूळ उद्देशच काय आहे? बिड करणार्या कंपनीच्या बाकी साडेसातींपासून मुक्ती आणि अक्सेस टू अकाउंट्स फॉर द पब्लिक ऑथॉरिटी.
भ्रष्टाचार करण्यात व तो उघडकिस आणण्याची धमकी देऊन त्यावर मलिदा खाण्यास सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्ष बरोबरीने सामिल असतात.व्यवसाय आणि राजकारणाबद्दल अशी मते असतील तर मुंबईत मते देण्यापेक्षा त्याच्या शेजारी पुरेशी खोली असलेला अरबी समुद्र आहे, तिथे जाऊन चिंतन करावे. डांगे सायेब, जास्ती गॉसिप करायचं काम नाय!!! ========== *विशुमित शब्दाचा काय संबंध आहे का विषमतेशी?
In reply to वीस टक्के कमीशन आहेच सरकारी by arunjoshi123
भारताच्या जीडीपीच्या ४५% टक्के तिन्ही प्रतलांवरच्या शासनांचा खर्च असतो. तर येत्या काळात बाबू आणि राजकारणी ४५%* १२५ लाख कोटी *( १+ (१+७%)+ (१+७%)^२+ ....) इतके पैसे कमवणार आहेत?>> आम्हाला गणितात बोर्डाने ५२ मार्क्स देऊन उपकृत केले होते, असली गणितं समोर आली की त्याची कचकून आठवण येते. काही हरकत नाही, तुम्ही गणित गणित खेळा....
तुम्ही काय म्हणताय त्यात २०% जरी तथ्य निघाले तरी देशात २-३ वर्षांत हुकुमशाही आणि न भूतो न भविष्यति अशी विषमता* येईल.>> बंधो! तुम्हीच सांगा मग किती भ्रष्टाचार आहे भारतात आणि विषमता किती आहे ती? बाबू लोकांची हुकूमशाहीही तुम्हीच सांगा....
हे वाक्यच विचित्र आहे. एकतर असं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तर अजिबात नाही. पण जरी असेल तर योग्य आहे. कंत्राटदाराचा खर्च स्टॅट्यूटरी ऑडिटर पाहतोच.>> आपण छगन भुजबळ हे नाव ऐकलंय का?
पण तो कॅगने देखिल का पाहावा म्हणे?>> कॅगने काय करावे हे मी कुठेच म्हटले नाही. तुम्हीच म्हणालात कॅगमुळे भ्रष्टाचार बाहेर येतो ते....
शिवाय अलिकडे ज्या १७ लाख कोटी प्रकल्प इ थकले होते , त्यातले अनेक पीपीपी पॉलिसीतून एस पी व्ही माध्यमातून केलेले होते. या एस पी व्ही चा मूळ उद्देशच काय आहे? बिड करणार्या कंपनीच्या बाकी साडेसातींपासून मुक्ती आणि अक्सेस टू अकाउंट्स फॉर द पब्लिक ऑथॉरिटी.>> मी काय म्हणतो, एक दहा-बारा सरकारी कंत्राटं घेणार्या ठेकेदारांशी भेटून घ्या ना! म्हणजे कसं हे जार्गन ऑन द ग्राऊंड किती अकाऊंटेबल आहे ते कळून येईल...
In reply to भारताच्या जीडीपीच्या ४५% by संदीप डांगे
तुम्हीच म्हणालात कॅगमुळे भ्रष्टाचार बाहेर येतो ते....नाय हो असं दुसरे सायेब म्हणालेत, मी नै.
एक दहा-बारा सरकारी कंत्राटं घेणार्या ठेकेदारांशी भेटून घ्या ना!अरे भाय, आप समंदरी मछली को बाल्टीभर पानी देख कर आने को बोल रहे है.
In reply to तुम्हीच म्हणालात कॅगमुळे by arunjoshi123
In reply to भारताच्या जीडीपीच्या ४५% by संदीप डांगे
आम्हाला गणितात बोर्डाने ५२ मार्क्स देऊन उपकृत केले होते, असली गणितं समोर आली की त्याची कचकून आठवण येते. काही हरकत नाही, तुम्ही गणित गणित खेळा....गंभीर नोटेवर म्हणतो .... १. देशाचा जीडीपी १२५ लाख कोटी इ इ आहे. २. यात सरकारचा उत्पन्न (वा खर्च वा हिस्सा) ४५% असतो. ३. यातले २०% तुमच्या मते बाबू नि राजकारणी यांचा भ्रष्ट हिस्सा आहे. ४. जी डी पी अंदाजे सात टक्क्याने वाढणार आहे. ५. आतापर्यंत केलेला भ्रष्टाचार शून्य मानू. ६. हुतात्मा होणारे सैनिक ते रूळ तपासणारे कामगार ते सफाई कर्मचारी ते राष्ट्रपती सगळेच झाडून करप्ट आहेत असे मानू. ७. राजकारणी आणि बाबू हे लोकसंख्यच्या किती प्रमाणात असावेत? तर २.५/१३० = २% ८. आजचे संपत्तीचे विभाजन सर्वांना स्वीकार्य आहे असे मानू. मग पुढे या लोकांकडे किती पैसे करप्शनचे जमा होणार आहेत (पगाराचे वेगळे, सरकारी अधिकृत सोयी वेगळ्या) त्याचे गणित मी वर लिहिले आहे. २% लोकांना हे लै जास्त पैसे झाले. वास्तविक असं होतं असं मानलं तर ३-४ वर्षांत देश फुटेल, बुडेल, इ इ असं मानल्यासारखं होतं. असो.
In reply to आम्हाला गणितात बोर्डाने ५२ by arunjoshi123
In reply to हे आपण खरंच गंभीरपणे लिहिले by संदीप डांगे
In reply to केंद्र आणि महापालिका यांची by संदीप डांगे
In reply to ओके. म्हणूनच एकाच पक्षाची by अप्पा जोगळेकर
In reply to ओके. म्हणूनच एकाच पक्षाची by अप्पा जोगळेकर
In reply to कुठेतरी वाचले आहे असे म्हटले by अप्पा जोगळेकर
In reply to CAG ला उत्तर द्यावे लागते by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आर्थिक सर्वेक्षण अहवालात by अप्पा जोगळेकर
आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्यानेएक गोष्ट समजत नाही. अफझलखानाने नेमलेल्या कुठल्या समितीने पाठ थोपटलेली पेंग्विनसेनेला कशी चालते?
In reply to एक गोष्ट कळत नाही by गॅरी ट्रुमन
In reply to मुद्दा मिस होतोय. बिएमसी by हतोळकरांचा प्रसाद
"बिएमसीत पारदर्शक व्यवहार हवा आहे" म्हणजे नेमके काय हवे आहे याबद्दल भाजप ने जास्त बोलावे असे माझे मत आहे.तसे भाजपने केले पाहिजेच. ही अपेक्षा ठेवली तर त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. या आणि दुसर्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे माझा या निवडणुकांमध्ये एकच इंटरेस्ट आहे. शिवसेनेचा पराभव व्हायला हवा.कोणीही जिंकले तरी सामान्य मुंबईकराच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडेल असे वाटत नाही. तरीही उध्दव ठाकरेंनी २०१४ पासून जे एकेक प्रकार चालविले आहेत त्या माजाचा स्त्रोत असलेली मुंबई महापालिकेची सत्ता गेली पाहिजे. बाकी ताकाला जाऊन भांडे लपविणे, उगीच पोलिटिकली करेक्ट वागणे, गुळमुळीतपणे काहीतरी लिहिणे किंवा ज्याला बिटिंग अराऊंड द बुश म्हणतात तसले प्रकार मला तरी जमत नाहीत (या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) ) त्यामुळे या आणि याच कारणावरून शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. बाकी friends turned enemies असतात त्यांच्यावर मुळातल्या शत्रूपेक्षा अधिक राग असणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनीही शिवसेनेचा पराभव व्हावा याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित केले होते, वाघेलांनी गुजरातमध्ये तसेच लक्ष भाजपचा पराभव होण्यावर केंद्रित केले होते आणि राष्ट्रवादीनेही १९९९ मध्ये तसेच लक्ष काँग्रेसचा पराभव व्हावा याकडे केंद्रित केले होते. त्याच धर्तीवर शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते.
In reply to कुठेतरी वाचले आहे असे म्हटले by अप्पा जोगळेकर
In reply to आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे by arunjoshi123
In reply to विचारला असता तर मुडदाच पडला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to शिवसेना-काँग्रेस समीकरण by गॅरी ट्रुमन
In reply to शिवसेना-काँग्रेस समीकरण by गॅरी ट्रुमन
In reply to ३८००० कोटीच्या बजेटच्या २ by अप्पा जोगळेकर
In reply to ३८००० कोटीच्या बजेटच्या २ by अप्पा जोगळेकर
In reply to ३८००० कोटीच्या बजेटच्या २ by अप्पा जोगळेकर
In reply to स्थलांतर by गॅरी ट्रुमन
असल्या भितीचे बागुलबोवे उभे करण्यात शिवसेनेचा हात कित्येक दशकांमध्ये कोणी धरू शकलेले नाही.+११११११
In reply to फ्लिपफ्लॉप by गॅरी ट्रुमन
In reply to फ्लिपफ्लॉप by गॅरी ट्रुमन
पण आपला पक्ष आणि आपला नेता म्हणजे ध्रुवतार्याप्रमाणे अढळ आणि त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे कधीच न बदलणारा असतो अशा स्वरूपाचा एक गैरसमज...आपल्याला कधीकधी ज्या संदर्भात ज्या वाक्यरचना सुचतात त्या जाँ फिदा टाईपच्य असतात. (आता गैरसमज नक्की शिवसेनेत सर्वाधिक असावा तुम्ही म्हणत आहात तर ) पण अशा गैरसमजाचा प्रादुर्भाव तरुण शिक्षित लोकांत जास्त असावा. मोदींचे भक्त देखिल यातच मोडतात.
In reply to फ्लिपफ्लॉप by गॅरी ट्रुमन
शिवसेना म्हटली की निवडणुक काळात मराठीचे पंचवार्षिक उमाळे येणे आणि त्या खोट्या भावनिक आवाहनाला मराठी माणसाने बळी पडणे आणि परत परत शिवसेनेलाच निवडून देणे हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आला आहे. यावेळी काही बदल होतो का तेच बघायचे.तुम्हाला स्थानीय लोकाधिकार समिती माहीत असेल. ही नसती तर आज मराठी माणूस मुंबईतल्या सरकारी कार्यालयांत केंव्हाच हद्दपार झाला असता. रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणावर चालवणं शिवसेनेने सुरू केलं. आ.न., -गा.पै.
In reply to स्थालोस आणि रुग्णवाहिका by गामा पैलवान
In reply to स्थानिक लोकाधिकार समिती by गॅरी ट्रुमन
त्याकाळात केलेले चांगले काम शिवसेना किती वर्षे उगाळत राहणार?एकदा केलेलं असलं म्हणून काय झालं. सदिच्छा मिळतातच ना. शिवाय इतर कामं पण चालू असतातच की. मी सांगत नाही सगळी. ज्याच्यामुळे मतदाराच्या नजरेत राहता येतं अशी काम हुडकून काढण्यात शिवसैनिक तरबेज आहेत. आ.न., -गा.पै.
In reply to एकदा केलेलं काम by गामा पैलवान
एकदा केलेलं असलं म्हणून काय झालं. सदिच्छा मिळतातच ना.या न्यायाने विन्स्टन चर्चिल इंग्लंडमध्ये आजीव पंतप्रधान व्हायला हवे होते. इतकेच नाही तर पुढील जन्मात जन्माला आल्यावरही ताबडतोब पंतप्रधानपदीच विराजमान व्हायला हवे होते. पण ब्रिटिश जनतेने कर्तुत्वाच्या परमोच्चबिंदूवर असताना विन्स्टन चर्चिल यांना घरी बसविले कारण युध्द सुरू असताना चर्चिल कितीही चांगले नेते असले तरी युध्दोत्तर काळात त्यांच्यापेक्षा अॅटली जास्त चांगले नेते होतील!! असे काही भारतात आपल्या जिवीतकाळात तरी होणे कठिणच दिसते. स्थानिय लोकाधिकार समितीने ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळे लोकांना शिवसेनेविषयी आत्मीयता असेल तर मग शिवसेनेने केलेल्या इतर प्रकारांमुळे दुरावा कसा वाटत नाही हेच समजत नाही. ग.वा.बेहरेंसारख्यांना शिवसैनिकांनी नक्की कशी वर्तणूक दिली होती? जे शब्द मी मिपासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लिहूही शकत नाही ते शब्द दसरा मेळाव्यांतून आणि इतर भाषणांमधून स्टेजवरून वापरले जात होते. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते? असो.
In reply to चर्चिल by गॅरी ट्रुमन
पण ब्रिटिश जनतेने कर्तुत्वाच्या परमोच्चबिंदूवर असताना विन्स्टन चर्चिल यांना घरी बसविले कारण युध्द सुरू असताना चर्चिल कितीही चांगले नेते असले तरी युध्दोत्तर काळात त्यांच्यापेक्षा अॅटली जास्त चांगले नेते होतील!! असे काही भारतात आपल्या जिवीतकाळात तरी होणे कठिणच दिसते.१९४५ च्या ब्रिटिश मतदात्यांना २०१७ च्या भारतीय मतदात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवण्याआधी या ऑफन कोटेड जगाला मूर्खात काढणार्या विधानाचा अभ्यास व्हायला हवा. शांती काळात चर्चिल नको असण्याचा आणि त्याचा हरण्याचा संबंध ही त्या लोकांनी उथवलेली हूल आहे.
In reply to चर्चिल by गॅरी ट्रुमन
महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते?हे काही पटले नाही. हे प्रकरण या चर्चेत ओढण्याचे कारण समजले नाही. बाळासाहेबांचे या प्रकरणाआधीचे आणि नंतरचे पुलंबद्दलचे मत काहीच महत्वाचे नाहीये का? आणि हे प्रकरण घडले तेव्हा त्याला एक पार्श्वभूमी नव्हती का? आपल्या विचारसरणीच्या विरोधातील असले तरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर करण्याचा सुज्ञपणा युतीच्या सरकारने दाखवला होता (सोयीकर व्यक्तींना पुरस्कार देण्याचा ट्रेंड असतानाही). त्यानंतर हे शिवशाहीचे नाही ठोकशाहीचे सरकार आहे असे राजकीय दृष्टिकोनातून मत व्यक्त करणे बाळासाहेबांना खटकले नसते तरच नवल होते (बाळासाहेबांनी वापरलेल्या वाक्याचे समर्थन करण्याचा हेतु नाही). त्यावेळी वापरली जाणारी भाषा हि त्यावेळच्या एकूण राजकीय वातावरणाला आणि ऐकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला धरून वापरली जात नव्हती का? असाच हिशोब आपण अत्रेंच्या भाषणांनाही लावणार का? त्या भाषेला आजच्या दृष्टीने बघितले तर ती योग्य नाहीच वाटू शकत. पण शेवटी शेवटी बाळासाहेबांच्या भाषणांमध्ये तशीच भाषा आपल्याला दिसून येत होती का? असो, अवांतर होतंय. पण बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे आणि कृती आजच्या चष्म्याने बघितल्या गेल्या तर त्या पटणार नाहीत एवढेच म्हणणे.
In reply to महाराष्ट्राच्या लाडक्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to इतर मूद्द्यांविषयी काय? by गॅरी ट्रुमन
In reply to महाराष्ट्राच्या लाडक्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to <<<<त्यावेळी वापरली जाणारी by विशुमित
In reply to परत एकदा प्रतिसाद वाचा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to चर्चिल by गॅरी ट्रुमन
स्थानिय लोकाधिकार समितीने ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळे लोकांना शिवसेनेविषयी आत्मीयता असेल तर मग शिवसेनेने केलेल्या इतर प्रकारांमुळे दुरावा कसा वाटत नाही हेच समजत नाही. ग.वा.बेहरेंसारख्यांना शिवसैनिकांनी नक्की कशी वर्तणूक दिली होती? जे शब्द मी मिपासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लिहूही शकत नाही ते शब्द दसरा मेळाव्यांतून आणि इतर भाषणांमधून स्टेजवरून वापरले जात होते. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते?राणे २००५ मध्ये पक्ष सोडून गेल्यानंतर "सामना"मध्ये त्यांच्याविरूद्ध इतकं घाण लिहून आलं होतं की वाचतानाच शरम वाटत होती. "मी ह्याला मोठा केला, पण हा चड्डीत चिरकला","या डेडफुट्याचं **त नाही" अशासारखी अनेक अत्यंत घाण वाक्ये लिहिली गेली होती. आपल्या पक्षातील एखादा नेता पक्ष सोडून दुसरीकडे गेल्यानंतर सेना इतकी का बिथरते हे एक गूढच आहे. थोडी परिपक्वता दाखवून हा निर्णय मान्य करायला हवा. जसे तुमच्या पक्षातून काही जण बाहेर जातात तसेच बाहेरचेही काही जण आत येतात. त्याबद्दल इतका थयथयाट व विखारी भाषा कशासाठी? २००९ मध्ये बिजदच्या नवीन पटनाईकांनी स्वतःहून भाजपबरोबरची युती तोडल्यानंतर दोन्ही पक्षांनी समंजसपणे हा निर्णय स्वीकारला. आपल्याशी युती तोडली म्हणून ना भाजपने थयथयाट केला होता ना बिजदने युती तोडल्यानंतर अभद्र भाषा वापरली होती. शिवसेनेचं बांगलादेशाच्या क्रिकेट संघासारखं आहे. स्वतः लिंबूटिंबू असले तरी त्यांना पराभव अजिबात सहन होत नाही. त्यामुळे स्वतःचा खेळ उंचावण्याऐवजी दुसर्या संघाला खिजविणे, अभद्र भाषा वापरून अवमान करणे यातच ते धन्यता मानतात.
In reply to विशुमित भाऊ राष्ट्रवादीचे by फेदरवेट साहेब
In reply to विशुमित भाऊ राष्ट्रवादीचे by फेदरवेट साहेब
In reply to फेदरवेट साहेब, अनुप जी आणि by विशुमित
In reply to तेच म्हणतो भाऊ..श्रीगुरुजी पद by चिनार
In reply to होय by फेदरवेट साहेब
In reply to होय by फेदरवेट साहेब
In reply to बाकी काही म्हणा, पण 'फेदरवेट by अस्वस्थामा
In reply to बाकी काही म्हणा, पण 'फेदरवेट by अस्वस्थामा
In reply to निवडणूकांत लोक कसे मतदान by arunjoshi123
In reply to तात्विक दृष्ट्या तुमचे म्हणणे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to अरेच्या by वरुण मोहिते
पण बरीच वर्ष मलिदा खाऊन आता उलट्या बोंबा मारायच्या ह्याला नालायक पणा म्हणतात आणि भाजप चे मुंबईतील नेते अजून नालायक आहेत .आणि असाच नालायकपणा उद्धव ठाकरे २०१४ पासून राज्य सरकारमध्ये सत्तेत बसून करत आहेत. एकीकडे भाजपबरोबर सत्तेत बसायचे आणि दुसरीकडे मधूनमधून भाजपला सामनामधून टोले द्यायचे, ज्या पक्षाबरोबर महाराष्ट्रात सत्ता उपभोगायची त्याच पक्षाचा गोव्यात पराभव व्हावा म्हणून कारस्थाने करायची हा पण नालायकपणाच झाला. कित्येकवेळा म्हटल्याप्रमाणे मुंबई महापालिकेत कोणीही जिंकले तरी सामान्य लोकांना फार काही फरक पडणार नाहीये पण मुंबई महापालिकेतल्या सत्तेमुळे राज्य आणि केंद्र पातळीवर नालायकपणा उधोजीरावांना करता येत आहे म्हणून तिथे सेना हरावी.
कित्येक वकुबाने खुजे असलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यात पूर्ण सत्ता मिळाली पण महाराष्ट्रात ते होणे नाही.मतदार नक्की काय बघून मते देतात हा एक गुंतागुंतीचा विषय आहे.वाजपेयींच्या सरकारने अर्थकारण नक्कीच चांगले सांभाळले तरीही त्यांचा पराभव व्हायचा तो झालाच. 'वकूबाने' खुज्या असलेल्या नेत्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये मतदारांवर अधिक प्रभाव टाकला म्हणून ते निवडून आले. तसा प्रभाव शिवसेनेला महाराष्ट्रात टाकता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मराठी लोकांच्या मानसिकतेला दोष देणे हा थोडासा 'elitist' प्रकार झाला. हे थोडेसे ट्रम्पला मत दिलेल्या सगळ्या अमेरिकन्सना 'racist' म्हणण्यासारखे झाले.
In reply to नालायकपणा by गॅरी ट्रुमन
In reply to नालायकपणा by गॅरी ट्रुमन
In reply to म्हणजेच भाजपही नालायक आहे by वरुण मोहिते
मुंबईचा मलिदा खाता यावा जास्त यासाठी हि भाजप ची धडपड चालू आहे .आणि मुंबईचा मलिदा कायम आपल्यालाच मिळत राहावा यासाठी शिवसेनेची धडपड चालू आहे.
त्यामुळे जर काहीच फरक पडणार नसेल असं असेल तर भाजप पेक्षा सेनेला मत का देऊ नयेहे आतापर्यंत कित्येकवेळा लिहिले आहे. उधोजीरावांनी २०१४ पासून जे काही प्रकार चालवले आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. आता परत हे लिहिणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी कटूता आली ती जाऊ दे-- झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत जरी उधोजीराव सरळ वागले असते तर ही वेळ आली नसती.
पण पवार आणि ठाकरे म्हटलं कि काय वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहेपवार आणि ठाकरे काय टिकेच्या वर आहेत की काय?
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to :) by गॅरी ट्रुमन
हे आतापर्यंत कित्येकवेळा लिहिले आहे. उधोजीरावांनी २०१४ पासून जे काही प्रकार चालवले आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. आता परत हे लिहिणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी कटूता आली ती जाऊ दे-- झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत जरी उधोजीराव सरळ वागले असते तर ही वेळ आली नसती.शिवसेना नेते हे अत्यंत माजलेले आणि अपरिपक्व हे शिवसेना हरावी असे वाटण्यामागे एक कारण आहे. परंतु ते तेवढेच कारण नाही. एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक इ. धोरणे नाहीत. प्रक्षोभक भाषणे करणे, "सामना"तून अभद्र लिहिणे आणि फुशारक्या व बढाया मारणे एवढेच सेनेला जमते. "मला फक्त १ दिवस भारताचा पंतप्रधान करा. काश्मिर प्रश्न २४ तासांचा आत सोडवून दाखवितो.", "पाकिस्तानवर अणुबाँब टाकून नष्ट का करीत नाही" अशा तर्हेच्या वल्गना करणारे वास्तवापासून शेकडो कोस दूर असतात. ४० लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घरे देणार, शेतकर्यांना फुकट वीज देणार अशी त्यांची आर्थिक धोरणे. अशा टोळीच्या हातात अजिबात सत्ता नसावी.
In reply to हे आतापर्यंत कित्येकवेळा by श्रीगुरुजी
In reply to ५० दिवसात काळा पैसा आणतो by वरुण मोहिते
बाकी राम मंदिराचे काय झाले ?पाहिजे आहे का?
सामाजिक धोरण -राम मंदिर ,हिंदूने १० मुले जन्माला घालावीतमंदिर फायजेल का नको, कायतरी एक सांगा.
In reply to हे आतापर्यंत कित्येकवेळा by श्रीगुरुजी
In reply to अरेच्या by वरुण मोहिते
परत सगळी चर्चा शिवसेना कशी चुकली यावरच का?असो पण सेनाप्रमुखांचे किंवा पवारसाहेबांचे नाव काढले कि अनेक लोकांच्या मनात काय विद्वेष आहे कळत नाही . ज्यांचे मोठेपण निश्चितच आहे आणि बहुतेक सर्वानी ते मान्य केले आहे अगदी विरोधी पक्षातीलही सर्व लोकांनी .महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे, त्यामुळे फक्त मुंबई,पुणे,नाशिक ह्याविषयीच बोलू नये. शिवाय "त्यांचं जाऊद्या, तुमच्या नेत्याने काय दिवे लावले " टाईप प्रतिसाद देऊ नये ही विनंती. एक वेगळा धागा काढला तरी चालेल. हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्यांना विचारू इच्छितो.
In reply to परत सगळी चर्चा शिवसेना कशी by चिनार
In reply to परत सगळी चर्चा शिवसेना कशी by चिनार
इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे,माझा जिल्हा सोलापूर. लागून असलेला व सांस्कृतिक जवळीक असलेला जिल्हा म्हणजे उस्मानाबाद. ह्याबाबत बोलायचे झाले तर ठाकरे आणि पवारसाहेबांचाच प्रभाव दिसलेला आहे. स्व. महाजन साहेब व स्व. मुंडेसाहेबांचे राजकारण सेनेला जोडीने घेऊन व मुंडेसाहेंबाचे तर सेनेसारखेच राजकारण होते. काँग्रेसला प्रभावी टक्कर द्यायचे काम सेनेनेच केलेले ८५ सालापासून दिसलेले आहे. मुंबई पुण्यासारखे प्रप्रांतीय वगैरे विषय नसताना कट्टर हिंदुत्व, बाळासायेबांना मानणारे कट्टर कार्यकर्ते ह्यांच्या जीवावर सेनेने प. महाराष्ट्राचा थोडा भाग व मराठवाड्याचा थोडा भाग यशस्वीरित्या लढवलेला आहे. मिपावर भाजपविषयी कट्टरपणा दाखवताना बिनदिक्कत खोटे रेटायचा व मुंबईपुण्याबाहेरची पुस्तकी माहीतीवर दुसर्यांना खोटे ठरवायचा भंपक प्रकार काही आयडीकडून वारंवार होत आहे. त्यांच्या तोंडी लागण्यातही अर्थ नाही हे कळून चुकलेले आहे. काहीही करुन सेना हरावीच अशा मानसिकतेला उत्तर देणे अवघड आहे. तस्मात... काळच ठरवेल जे काही होईल ते. जय महाराष्ट्र.
In reply to इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले by अभ्या..
In reply to इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले by अभ्या..
ह्याबाबत बोलायचे झाले तर ठाकरे आणि पवारसाहेबांचाच प्रभाव दिसलेला आहे. स्व. महाजन साहेब व स्व. मुंडेसाहेबांचे राजकारण सेनेला जोडीने घेऊन व मुंडेसाहेंबाचे तर सेनेसारखेच राजकारण होते.म्याबी तिकडलाच, सहमत तुमच्या मताशी.
In reply to अरेच्या by वरुण मोहिते
In reply to वकूबाचीच गोष्ट करायची झाली तर by अप्पा जोगळेकर
In reply to <<<महाराष्ट्राच्या आर्थीक, by विशुमित
ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ जिल्यातील लोक अनंतर्भूत झाले आहेत. बराय किमान ही शहरं तरी विकसित केली नाही तर काय अवस्था झाली असती देव जाणे.धन्य झालोय हे वाक्य वाचून ! परमेश्वराने आम्हाला उरलेल्या बत्तीस जिल्ह्यांपैकी एकात जन्माला घातले ही त्याचीच चूक म्हणावी लागेल. आणि त्यातही हा प्रश्न विचारायला आम्ही जिवंत राहिलो ही महाराष्ट्राच्या ह्या दोन सन्माननीय नेत्यांची कृपा !! असो. थोडक्यात म्हणजे जे आहे ते गोड मानायचे.
ह्या महापालिकेत असलेला पैसा