Skip to main content

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 27/01/2017 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.

वाचने 61707
प्रतिक्रिया 405

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक इ. धोरणे नाहीत. प्रक्षोभक भाषणे करणे.... +१

In reply to by वरुण मोहिते

परत सगळी चर्चा शिवसेना कशी चुकली यावरच का?असो पण सेनाप्रमुखांचे किंवा पवारसाहेबांचे नाव काढले कि अनेक लोकांच्या मनात काय विद्वेष आहे कळत नाही . ज्यांचे मोठेपण निश्चितच आहे आणि बहुतेक सर्वानी ते मान्य केले आहे अगदी विरोधी पक्षातीलही सर्व लोकांनी .
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे, त्यामुळे फक्त मुंबई,पुणे,नाशिक ह्याविषयीच बोलू नये. शिवाय "त्यांचं जाऊद्या, तुमच्या नेत्याने काय दिवे लावले " टाईप प्रतिसाद देऊ नये ही विनंती. एक वेगळा धागा काढला तरी चालेल. हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्यांना विचारू इच्छितो.

In reply to by चिनार

चष्मा काढून वाचायला हवेत . सगळंच बरोबर असं कोणीच म्हणत नसत पण केलं ते सगळंच चूक आहे हे दाखवण्यात काही लोकांना बर वाटत,काहींचे हिडन अजेंडे असतात ,काहींचे फॅड असते,काहीजण उगाच सगळे बोलतात म्हणून बोलत असतात . आता काहीच योगदान नाही असं म्हणायचं असेल तर प्रश्नच मिटला . बाकी इथे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरच्या पण काही प्रतिक्रिया किंवा पवारांवर हल्ला झाला त्यावेळच्या प्रतिक्रिया वाचून आम्ही धन्य झालोय त्यामुळे योगदानवीर हि नवीन मालिका आपण चालू करावीत असे आम्ही सुचवतो :))आमच्यात ती ताकद नाय

In reply to by चिनार

इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे,
माझा जिल्हा सोलापूर. लागून असलेला व सांस्कृतिक जवळीक असलेला जिल्हा म्हणजे उस्मानाबाद. ह्याबाबत बोलायचे झाले तर ठाकरे आणि पवारसाहेबांचाच प्रभाव दिसलेला आहे. स्व. महाजन साहेब व स्व. मुंडेसाहेबांचे राजकारण सेनेला जोडीने घेऊन व मुंडेसाहेंबाचे तर सेनेसारखेच राजकारण होते. काँग्रेसला प्रभावी टक्कर द्यायचे काम सेनेनेच केलेले ८५ सालापासून दिसलेले आहे. मुंबई पुण्यासारखे प्रप्रांतीय वगैरे विषय नसताना कट्टर हिंदुत्व, बाळासायेबांना मानणारे कट्टर कार्यकर्ते ह्यांच्या जीवावर सेनेने प. महाराष्ट्राचा थोडा भाग व मराठवाड्याचा थोडा भाग यशस्वीरित्या लढवलेला आहे. मिपावर भाजपविषयी कट्टरपणा दाखवताना बिनदिक्कत खोटे रेटायचा व मुंबईपुण्याबाहेरची पुस्तकी माहीतीवर दुसर्‍यांना खोटे ठरवायचा भंपक प्रकार काही आयडीकडून वारंवार होत आहे. त्यांच्या तोंडी लागण्यातही अर्थ नाही हे कळून चुकलेले आहे. काहीही करुन सेना हरावीच अशा मानसिकतेला उत्तर देणे अवघड आहे. तस्मात... काळच ठरवेल जे काही होईल ते. जय महाराष्ट्र.

In reply to by अभ्या..

ह्याबाबत बोलायचे झाले तर ठाकरे आणि पवारसाहेबांचाच प्रभाव दिसलेला आहे. स्व. महाजन साहेब व स्व. मुंडेसाहेबांचे राजकारण सेनेला जोडीने घेऊन व मुंडेसाहेंबाचे तर सेनेसारखेच राजकारण होते.
म्याबी तिकडलाच, सहमत तुमच्या मताशी.

In reply to by वरुण मोहिते

वकूबाचीच गोष्ट करायची झाली तर मोदी सलग ३ टर्म गुजरातेत निवडून येत होते पण इथे शिवसेनेला मुंबई महापालिकेतसुद्धा निवडून येताना सुद्धा दम लागतो ही वस्तुस्थिती पुरेशी बोलकी आहे. मालवणच्या आव्हान दिल्या गेलेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी परशुराम उपरकरचे डिपॉझिटसुद्धा जप्त केले होते. बहुधा खुद्द बाळासाहेबांना देखील प्रचारासाठी मैदान मिळाले नव्हते. एवढी नारायण राणेंची दहशत होती. उगाच इतर नेते खुज्या वकुबाचे होते म्हणण्यापेक्षा आणि मराठी माणसाच्या नावे खडे फोडण्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रात धनुश्य बाणाच्या नावावर आमदार निवडून येतील एवढा बाळासाहेबांचा वकूब नव्हता हे मान्य का करत नाही. तरीही विशेषकरून आंतरजालावर तर अशी गरळ ओकली जाते कि ज्याचे नाव ते सामना मधून गरळ ओकले तर चालते असे काही आहे का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

कोणी खडे वैग्रे फोडत नाहीये .पुढेच मी सांगितलंय कि मतपेटीतून हे दिसावं अशी अपेक्षाही नाही माझा मुद्दा खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याबाबत होता आणि जे लॉबिंग बाहेरच्या प्रांतात जमत ते महाराष्ट्रात कधीच जमत नाही हा होता . त्यामुळे खडे वैग्रे फोडणं राहूद्या . मतपेटीतून दिसावं अशी अपेक्षा नाही म्हटल्यामुळेच मोदी ३ वेळा जिंकत कि ३० वेळा तो हि मुद्दा नाही . हरण जिंकणं होत असतं. नको ते जिंकले आणि भले भले हरले असं कित्येकदा झालाय भारतात .महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत वेगळा आहे इतकाच म्हणायचं होत . आणि त्यासाठी नारायण राणेंचा उदाहरण द्यावं हे अजून हास्यास्पद आहे . सामना मधून गरळ ओकणे हा माझा मुद्दा नव्हता सामना मी वाचत नाही कारण त्या पेपर ला मूल्य नाही .किंबहुना कुठल्याही राजकीय पक्षाचे पेपर, पाक्षिक आम्ही वाचत नाही . तरीही सामनामधून कोणावर गरळ ओकल्याने आपणास त्रास झाला हे सांगितलं तर मत मांडता येईल .

महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल.>> -- समाज माध्यमांमध्ये भरपूर लिखाण आहे यांच्या वर. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे, त्यामुळे फक्त मुंबई,पुणे,नाशिक ह्याविषयीच बोलू नये. >>> -- ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ जिल्यातील लोक अनंतर्भूत झाले आहेत. बराय किमान ही शहरं तरी विकसित केली नाही तर काय अवस्था झाली असती देव जाणे. शिवाय "त्यांचं जाऊद्या, तुमच्या नेत्याने काय दिवे लावले " टाईप प्रतिसाद देऊ नये ही विनंती.>> -- मराठवाडा आणि विदर्भातल्या नेत्यांनी नीट दिवे लावले नाहीत म्हणून तर या दोघांना विचारलं जातंय तुमचे योगदान काय आहे. एक वेगळा धागा काढला तरी चालेल>> -- किती ही धागे काढले तरी लोक पूर्वग्रहदूषितपणा सोडणार आहेत का? देईल का कोणी याची ग्यारंटी ?

In reply to by विशुमित

ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ जिल्यातील लोक अनंतर्भूत झाले आहेत. बराय किमान ही शहरं तरी विकसित केली नाही तर काय अवस्था झाली असती देव जाणे.
धन्य झालोय हे वाक्य वाचून ! परमेश्वराने आम्हाला उरलेल्या बत्तीस जिल्ह्यांपैकी एकात जन्माला घातले ही त्याचीच चूक म्हणावी लागेल. आणि त्यातही हा प्रश्न विचारायला आम्ही जिवंत राहिलो ही महाराष्ट्राच्या ह्या दोन सन्माननीय नेत्यांची कृपा !! असो. थोडक्यात म्हणजे जे आहे ते गोड मानायचे.

In reply to by चिनार

लैच आवडल्यागेला आहे तुमचा प्रतिसाद चिनार साहेब. @विशुमित जी आणि @मोहिते साहेब, कोणी प्रश्न उभा केला तर 'चष्मा काढून वाचावे' 'पूर्वग्रह बाजूला ठेऊन वाचले तरी चालेल' वगैरे भाजपे प्रकार तुम्ही दोघे तरी करणार नाही अशी अपेक्षा होती. पण कसलं काय, पळसाला पाने तीनच ही म्हण परत एकदा सिद्ध झाली. काही माननीय जनतेला वाटते की भाजपला विरोध म्हणजे धर्माला, राष्ट्रप्रेमाला विरोध , तसेच काहीसे ग्रह तुम्हा दोघांचे पवार ह्यांच्यावर टीका किंवा गेला बाजार त्यांच्या कार्याबद्दल प्रश्न विचारणे ह्या बद्दल झालाय का? असल्यास तो काढून टाकावा ही नम्र विनंती.

In reply to by फेदरवेट साहेब

काहीसे ग्रह तुम्हा दोघांचे पवार ह्यांच्यावर टीका किंवा गेला बाजार त्यांच्या कार्याबद्दल प्रश्न विचारणे ह्या बद्दल झालाय का?>> -- बिलकूल नाही. प्रश्न विचारले म्हणून मी आदळ आपट केली असे कधी नाही झाले. मागे काही धाग्या वरती पवारांबाबत गुरुजींनी सडेतोड उत्तरे दिली होती ती मी मान्य देखील केली होती. त्यामुळे भाजप समर्थकांसारखं आंधळे समर्थन कधीच नाही दिले. आता योगदान काय असा जर प्रश्न या २ महारथी नेत्यांबद्दल कोणी विचारला तर त्याला आम्ही भाबडे काय उत्तर देणार? जरी तो प्रयत्न केला तरी तो फाट्यावरच मारला जाणार. (((साहेबानी ऑर्डर द्याची असते विनंती नव्हे. मराठीची पदवी मिळवल्या पासून तुमचा कणा वाकला आहे, एक निरीक्षण. (हलके घ्या ) ))))

In reply to by फेदरवेट साहेब

कसलेही अंध समर्थन आम्ही करत नाही म्हणूनच लिहिलेय कि कोणीच पूर्ण चूक बरोबर नसतो .पण झालय असं कि काही चांगलं सांगायला गेलं तरी लोक पूर्वग्रह मनात ठेऊन बोलतात . माझी विधाने वाचा. लिहिलं जरूर असत पण ज्या खालच्या पातळीला जाऊन टीका होणारे माहित असत त्यामुळे कशाला उगाच लिहा . प्रत्येकाची चांगली वाईट बाजू असतेच कि .उद्या जे चूक आहे त्याला चूकच म्हणणार ना . ते हि झाकायला किंवा मुद्दा भरकटवायला आम्ही भाजपेयी नाही:)माझं विधान मराठी माणसाचं लॉबिंग आणि मर्यादा टीका करताना पाळावी ह्याबद्दल होत .

In reply to by फेदरवेट साहेब

धन्यवाद फेवे भाऊ... हेच्च म्हणतो. काहीही विचारलं तर लगेच आमचा चष्मा, त्याचा नंबर वगैरे प्रतिसाद सुरु होतात.

In reply to by चिनार

भादरायला सुरुवात करणारे महनीय मिपावरचेच होते. मोहिते अन विशुमित साहेबांनी ठेवलेच तर 'पुढीलांच्या' पावलावर पाऊल ठेवले आहेत, पण दोघे बोलतात बरे म्हणून फक्त मी विनंती केली. बाकी तुमचं लेखन सुरु ठेवा हा शिमगा सुरूच राहणार.

परमेश्वराने आम्हाला उरलेल्या बत्तीस जिल्ह्यांपैकी एकात जन्माला घातले ही त्याचीच चूक म्हणावी लागेल.>> -- कोणत्याही क्षेत्राचा विकास हा तेथील फक्त नेता नव्हे तर तेथील जनता करत असते. माझे एक निरीक्षण सांगतो, भले पवारांनी बारामती मध्ये सुविधा आणल्या पण त्याच बरोबर येथील जनतेने देखील त्याला सकारात्मक साथ दिली म्हणून शेती बरोबर, दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन यामध्ये तेथील जनतेने खूप कष्टाने यश मिळवले आहे. १०-१५ लाख रुपये कर्जे काढून लोकांनी ४-५ किमी पाईपलाईन करून शेती पिकवत आहेत. आणि ती कर्जे देखील यशस्वी रित्या फेडली आहेत. तुमचा कोणता जिल्ला आहे मला माहित नाही पण तुमच्याकडे जर काही विकास झाला नसेल तर तुमच्या भागातील नेत्या बरोबर तेथील जनता ही तेवढीच कारणीभूत असावी. आणि त्यातही हा प्रश्न विचारायला आम्ही जिवंत राहिलो ही महाराष्ट्राच्या ह्या दोन सन्माननीय नेत्यांची कृपा !!>>> -- हे वाक्य नाही समजलं थोडक्यात म्हणजे जे आहे ते गोड मानायचे.>> -- काही लोकांना साखरेच्या पाकात जरी भिजवून ठेवलं तरी कडूच लागणार.

In reply to by विशुमित

कोणत्याही क्षेत्राचा विकास हा तेथील फक्त नेता नव्हे तर तेथील जनता करत असते
याच न्यायाने आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या मृत्युची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच ना..?

In reply to by विशुमित

यूरोप मधील कित्येक चॉकोलेट कंपन्यांना दुधाची जी भुकटी असते ज्यातून चॉकोलेट बनते ती भुकटी आंतरराष्ट्रीय निकष पाळून बारामतीहून निर्यात होते . (त्यात पण पैसे देऊन काम झालं असं म्हणतील)फेरेरो चॉकोलेट ब्रँड चा क्रमांक २ चा निर्यातदार आहे बारामती . अशी कित्येक गाव शहर कोल्हापूर असो नाशिक असो अकलूज असो वा आणखी काही . प्रगतीचे अनेक निकष असतात लोकांची पण तितकीच साथ लागते .आणि नेतेही ..विशेषकरून कृषी क्षेत्र ,किंवा दुग्धव्यवसाय हा खूप गुंतागुंतीचा आहे त्यामुळे तेथील चांगल्या गोष्टीही बसून समजत नाहीत . प्रत्यक्ष जे त्या व्यवसायात आहेत त्यांच्याकडून कळत.

In reply to by विशुमित

विशुमित भाऊ.. कृपया माझा प्रश्न परत एकदा वाचून उत्तर द्यावे. ऍटलीस्ट पवार साहेबांच्या बाबतीत माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता असा माझा अन्दाज आहे. पवारांनी बारामतीला किती सुविधा आणल्या हा माझा प्रश्न नाही.पवारांना राष्ट्रीय नेते उगाचच म्हणत नसतील असे मला वाटते. बाकी विकास हा जनता आणि नेते ह्या दोहोंच्या प्रयत्नातून होतो याबद्दल सहमत आहे. माझा प्रश्न,
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे
-- काही लोकांना साखरेच्या पाकात जरी भिजवून ठेवलं तरी कडूच लागणार.
हा प्रतिसाद मला उद्देशून असेल तर, आम्हाला साखरेच्या पाकात बुचकळून मारायचे आणि गुलाबजाम दुसऱ्याला द्यायचे, परत वरतून "तुम्हालाच पोहता येत नाही" अश्या बोंबा मारायच्या हा प्रकार थांबायला हवा

In reply to by चिनार

महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल>> -- पवार साहेबांच्या बाबतीत खालील योगदान मला महत्वाच वाटतं. ते जिल्ला निहाय कसे द्याचे हे आता तरी मला सुचत नाही. मी फक्त मुद्दे देऊ शकतो डिटेल वार विश्लेषण करण्या इतक्या पात्रतेचा नाही. तरी जिथे शक्य आहे तिथे देण्याचा प्रयत्न करेन. धागा काढणे तूर्तास तरी मला जमेल की नाही याची शाश्वती नाही. आर्थिक - साखर कारखानदारी, जिल्ला बँकांचे जाळे, सहकार, रिअल इस्टेट, IPL , हिंजेवाडी IT पार्क, MIDC विकास. सामाजिक- मराठवाडा युनिव्हर्सिटी नामकरण, पुरोगामी चळवळ, सुसंस्कृतपणा, साहित्यिक- नाट्य - सिनेमा यथोयचीत सम्मान, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची जोपासना, नेहमी जुन्या बरोबर प्रागतिक विचारांची कास. शेती- महत्व पूर्ण योगदान. (वर ऍग्रोवन मधील 'तांबे' चे संपादकीय दिले आहे) माझ्या ऐकण्यानुसार कृषी मंत्रांच्या कार्य काळात जवळ पास ५५०० शास्त्रज्ञांशी मीटिंग घेतल्या. आता मीटिंग मध्ये त्यांनी नुसत्या माना नाही डोलावल्या. (लिंक मिळाली कि चिटकवतो). शैक्षणिक- रयत शिक्षण संस्था आणि वेग वेगळ्या जिल्ह्यांमध्ये इतर शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक शोध कार्याला नेहमी सढळ हाताने मदत. राजकारण- सलग ५० वर्ष कायदेमंडळमध्ये कार्यरत, सद्यस्थितीत ही रोज कमीत कमीत २००-३०० लोक समस्या सोडवण्यासाठी सकाळी सकाळी साहेबांच्या ऑफिस मध्ये उपस्थित असतात. विशेष म्हणजे सामान्य माणसांना पहिली प्रायोरिटी असते, राजकारणातील दुसरी फळी बनवण्यात बऱ्याच अंशी सफल. स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच. अजून बऱ्याच हुकले असेल पण आठवतील तश्या टाकतो. ह्या ज्या सर्व बाबी मी सांगितल्या त्या सर्व सकारात्मक आहेत, हे मान्य करतो. ज्या नकारात्मक होत्या त्याला शक्यतो मी समर्थन देणार नाही याची काळजी घेतो आणि घेईल. साखरेचे प्रकरण पोटात घाला, ही विनंती.

In reply to by विशुमित

आर्थिक - साखर कारखानदारी, जिल्ला बँकांचे जाळे, सहकार, रिअल इस्टेट, IPL , हिंजेवाडी IT पार्क, MIDC विकास.
त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते? आयपीएल हे पवारांचे योगदान समजणे हा गैरसमज आहे. एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे. दुसरं म्हणजे आयपीएलची कल्पना ललित मोदीची होती. पवारांचा त्याच्याशी संबंध नाही. तिसरं म्हणजे 'झी' च्या सुभाष चंद्र यांनी बर्कले प्रिमिअर लीगच्या धर्तीवर आयसीएल सुरू केलं होतं. त्यात भाग घेणार्‍या कपिलसारख्या अनेक वरीष्ठ क्रिकेटपटूंना बीसीसीआयने सूडबुद्धीने बहिष्कृत केलं होतं (तेव्हा पवारच बीसीसीआयचे अध्यक्ष होते). आयसीएलच्या कल्पनेतूनच ललित मोदीने आयपीएल जन्माला घातले.
सामाजिक- मराठवाडा युनिव्हर्सिटी नामकरण, पुरोगामी चळवळ, सुसंस्कृतपणा, साहित्यिक- नाट्य - सिनेमा यथोयचीत सम्मान, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची जोपासना, नेहमी जुन्या बरोबर प्रागतिक विचारांची कास.
१९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पवार मुख्यमंत्रीपदावर आले तेव्हा दलित मतपेढी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आंबेडकरांविषयी प्रेम, दलित अस्मितेचा सन्मान, पुरोगामी विचारसरणी असले काहीही नसून फक्त दलित मते डोळ्यांसमोर होती. त्यानंतर प्रत्यक्ष नामांतर व्हायला १६ वर्षे लागली. १९९२-९३ च्या दंगलींमुळे महाराष्ट्रात कॉग्रेसविषयी अत्यंत चीड निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा १९९५ ची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवूनच १९९४ मध्ये नामांतर करण्यात आले होते. यावेळीही फक्त निवडणुकच डोळ्यासमोर होती. पुरोगामी विचार वगैरे कधीच नव्हते. "हाताला लकवा", "पेशवे-शाहू महाराज", "राजू शेट्टींवर जातीवरून टीका", "ब्राह्मणांवर जातीयवादी टीका", इशरत जहांसारख्या अतिरेकीचे कौतुक इ. गोष्टींतून यांचा सुसंकृतपणा, प्रागतिक विचारांची कास अनेकवेळा दिसून आलेली आहे.
शेती- महत्व पूर्ण योगदान. (वर ऍग्रोवन मधील 'तांबे' चे संपादकीय दिले आहे) माझ्या ऐकण्यानुसार कृषी मंत्रांच्या कार्य काळात जवळ पास ५५०० शास्त्रज्ञांशी मीटिंग घेतल्या. आता मीटिंग मध्ये त्यांनी नुसत्या माना नाही डोलावल्या. (लिंक मिळाली कि चिटकवतो).
याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.
शैक्षणिक- रयत शिक्षण संस्था आणि वेग वेगळ्या जिल्ह्यांमध्ये इतर शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक शोध कार्याला नेहमी सढळ हाताने मदत.
कोणत्या वैज्ञानिक कार्याला सढळ हाताने मदत केली?
राजकारण- सलग ५० वर्ष कायदेमंडळमध्ये कार्यरत, सद्यस्थितीत ही रोज कमीत कमीत २००-३०० लोक समस्या सोडवण्यासाठी सकाळी सकाळी साहेबांच्या ऑफिस मध्ये उपस्थित असतात. विशेष म्हणजे सामान्य माणसांना पहिली प्रायोरिटी असते, राजकारणातील दुसरी फळी बनवण्यात बऱ्याच अंशी सफल.
दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?
स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.
काय जगजाहीर आहे?

In reply to by श्रीगुरुजी

त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते?>>> -- मग साखरेचा आणि जिल्हा बँकांचा कोणता प्रश्न निर्माण झाला की पवारांच्या नावाने खडे का फोडतात लोक ? एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे.>>> -- पूर्वी संपूर्ण भारतातून फक्त १५ ते १८ खेळाडू कसोटी आणि वन-डे निवडले जायचे. त्यामुळे प्रत्येक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पण IPL मुळेच किती तरी गुणी खेळाडू क्रिकेटला दिले आहेत. क्रिकेटचे नुकसान कसे झाले मला कळले नाही. आताचा आपला संघ प्रत्येक गोष्टीत अवल पदाचा दावेदार आहे. पूर्वी क्रिकेटचे आंतराष्ट्रीय स्टेडियम वर वर्षातून एखाद दोन सामने होत. त्यामुळे हे स्टेडियमरुपी पांढरे हत्ती पोसावे लागत होते. IPL मुळे किमान सामने प्रत्येक स्टेडियम वर होत तरी आहेत. त्यामुळे गाडी पार्किंग करणाऱ्यांपासून ते इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणाऱ्या कितीतरी जणांना रोजगार उपलब्ध झाला याची आकडेवारी नक्कीच समाधानकारक असेल. वरून कमी वेळामध्ये उत्कंठावर्धक मनोरंजन जनतेला मिळते. पूर्वी धनदांडगे नव्हते का क्रिकेटमध्ये ? बाकी कपिल, ललित मोदी हे फक्त प्यादे होते आणि त्यांची चाल देखील फक्त एक घर पुढे चालणे आणि राजा-वजिराला पाहिजे तेव्हा स्वरंक्षण देणे एवढेच असते. यावर मी बापुडा काय बोलणार. (कृषी मंत्रालयाचे काम सोडून पवारांचे क्रिकेट मध्येच जास्त लक्ष्य असते असे लोक त्यावेळेस का बरं बरळत होते ?) १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर...वगैरे वगैरे >>> -- या धाग्यात कोणीतरी खंजिराचे अंजीर करणार होते. याला आपला पास. "हाताला लकवा">> -- त्या पृथ्वी बाबा ने महाराष्ट्राचे ३ वर्ष वाया घालवले. "पेशवे-शाहू महाराज">> -- इतिहासाचा संदर्भ लावला तर स्टेटमेंट बरोबरच होते, असं मला वाटतं. आता नाही का औरंगझेब, मावळे, महाराजांचे संदर्भ देण्यात पटाईत असणारे दिसतंय टीव्ही वर. "राजू शेट्टींवर जातीवरून टीका">> -- खरंच ती जातीवाचक टीका होती का ? ब्राह्मणांवर जातीयवादी टीका>> -- ब्राह्मणांवर टीका कोठे केली दाखवून द्या. व्यक्ती सासक्षेप टीका केली असेल आणि तो ब्राह्मण जातीचा असेल तर लगेच कळवळला दाखवू नका. इशरत जहां>> -- पोलीस काय म्हणतात, कोर्ट काय म्हणतं, कोण निर्दोष सुटत एकवेळ बाजूला राहू द्या गुजरात मधील दंगे, अल्पसंख्यांकांवर झालेले अत्याचार सत्यच होते. ते किती हि झाकले तरी सत्य हे सत्य च असते. शेती- याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.>> -- त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले. ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मा. श्री. शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले ऍग्रोवन चे संपादकीय वरती चिटकवले आहेच २०१४ मधील ICAR मधील AGM मधील हे भाषण. त्यांचे मुद्दे बरोबर वाटत नसतील तर खोडून टाका आणि माझे पण ज्ञान वृद्धांगित करा. http://www.icar.org.in/files/AM-Speech-AGM-2014.pdf दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?>> -- अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुरेश धस, दत्तात्रय भरणे, उदयन राजे, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजून बरेच आहेत. स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.>> -- कुल कायद्या मध्ये मुलीचा हिस्सा, पोलीस आणि मिलिटरी मध्ये स्त्रियांची भरती, स्त्री भ्रूण हत्या संदर्भि सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन आणि प्रचार, महिला बचत गट, महिला आरक्षण , स्त्रीशिक्षणावर विशेष भर (पवार साहेब, अजित दादा , सुप्रिया सुळेंकडे कोणी एक मुलगी जाऊ द्या की शैक्षणिक मदतीसाठी, क्षणात मदत करतात)

In reply to by विशुमित

त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते?>>> -- मग साखरेचा आणि जिल्हा बँकांचा कोणता प्रश्न निर्माण झाला की पवारांच्या नावाने खडे का फोडतात लोक ?
त्याचे कारण असे की पवारांच्या पित्त्यांनी या संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून वाटोळे केले.
एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे.>>> -- पूर्वी संपूर्ण भारतातून फक्त १५ ते १८ खेळाडू कसोटी आणि वन-डे निवडले जायचे. त्यामुळे प्रत्येक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पण IPL मुळेच किती तरी गुणी खेळाडू क्रिकेटला दिले आहेत. क्रिकेटचे नुकसान कसे झाले मला कळले नाही. आताचा आपला संघ प्रत्येक गोष्टीत अवल पदाचा दावेदार आहे.
आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच. पण त्याबरोबर आयपीएलमुळे चीअर गर्ल्स, फिक्सिंग, बेटिंग, खेळाडूंचे जनावरांप्रमाणे होणारे लिलाव अशा अनेक वाईट गोष्टी घुसल्या. अनेक उद्योगपती यात घुसले व आपला संघ म्हणजे आपला एक नवीन व्यवसाय असून त्यातून येनेकेनप्रकारेण जास्तीत जास्त नफा कमविणे हेच उद्दीष्ट ठेवल्यामुळे काहीही करून सामना जिंकणे, बॅट कशीही वेडीवाकडी आडवीतिडवी फिरवून धावा मिळविणे इ. प्रकार सुरू झाले.
पूर्वी क्रिकेटचे आंतराष्ट्रीय स्टेडियम वर वर्षातून एखाद दोन सामने होत. त्यामुळे हे स्टेडियमरुपी पांढरे हत्ती पोसावे लागत होते. IPL मुळे किमान सामने प्रत्येक स्टेडियम वर होत तरी आहेत. त्यामुळे गाडी पार्किंग करणाऱ्यांपासून ते इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणाऱ्या कितीतरी जणांना रोजगार उपलब्ध झाला याची आकडेवारी नक्कीच समाधानकारक असेल. वरून कमी वेळामध्ये उत्कंठावर्धक मनोरंजन जनतेला मिळते.
हे खरे नाही. कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत. रणजी स्पर्धेत ३ गट असून प्रत्येक गटात ९ संघ आहेत. यांचे प्राथमिक फेरीत आपापसात तब्बल १०८ सामने होतात. नंतरच्या फेरीत ७ सामने होतात. अनेक स्थानिक स्पर्धा या मैदानांवर खेळल्या जातात. मैदानांवर एका वर्षांतून फक्त १-२ सामने न होता अनेक सामने होतात. आयपीएलमुळे प्रत्येक मैदानावर फार तर वर्षाकाठी ३-४ सामन्यांची भर पडली असेल.
पूर्वी धनदांडगे नव्हते का क्रिकेटमध्ये ? बाकी कपिल, ललित मोदी हे फक्त प्यादे होते आणि त्यांची चाल देखील फक्त एक घर पुढे चालणे आणि राजा-वजिराला पाहिजे तेव्हा स्वरंक्षण देणे एवढेच असते. यावर मी बापुडा काय बोलणार. (कृषी मंत्रालयाचे काम सोडून पवारांचे क्रिकेट मध्येच जास्त लक्ष्य असते असे लोक त्यावेळेस का बरं बरळत होते ?)
ते कोणाचे प्यादे होते? पवारांचे? पवार कृषी मंत्रालयाचे काम सोडून क्रिकेटमध्येच जास्त लक्ष का घालतात याची कारणे अगदी उघड आहेत. शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.
"हाताला लकवा">> -- त्या पृथ्वी बाबा ने महाराष्ट्राचे ३ वर्ष वाया घालवले.
महाराष्ट्राची का पवारांची? आय मीन राष्ट्रवादीची? "पेशवे-शाहू महाराज">> -- इतिहासाचा संदर्भ लावला तर स्टेटमेंट बरोबरच होते, असं मला वाटतं. आता नाही का औरंगझेब, मावळे, महाराजांचे संदर्भ देण्यात पटाईत असणारे दिसतंय टीव्ही वर. कसं काय बरोबर होतं? प्रत्येक ठिकाणी सगळ्यात आधी जातच बघायची का? हे स्टेटमेंट म्हणजे मराठ्यांना ब्राह्मणांविरूद्ध भडकावण्याचा प्रयत्न होता.
"राजू शेट्टींवर जातीवरून टीका">> -- खरंच ती जातीवाचक टीका होती का ?
होय. ती टीका जातीयवादीच होती. Sharad Pawar's castiest barb against Maharashtra farmer leader shocks observers हा लेख वाचावा. "Only those sugar mills which are associated with people from Shetty's caste are well but not the others," Pawar had said in Pune on Tuesday. Political observers believe that Pawar, a Maratha, is trying to instigate his community against Shetty. "Pawar can see Shetty as a potential threat to his traditional vote bank because he has launched an agitation for a genuine cause. Pawar is trying to secure his vote bank by referring to Shetty's caste," says a political observer.
ब्राह्मणांवर जातीयवादी टीका>> -- ब्राह्मणांवर टीका कोठे केली दाखवून द्या. व्यक्ती सासक्षेप टीका केली असेल आणि तो ब्राह्मण जातीचा असेल तर लगेच कळवळला दाखवू नका.
याची पूर्वी अनेकांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.
इशरत जहां>> -- पोलीस काय म्हणतात, कोर्ट काय म्हणतं, कोण निर्दोष सुटत एकवेळ बाजूला राहू द्या गुजरात मधील दंगे, अल्पसंख्यांकांवर झालेले अत्याचार सत्यच होते. ते किती हि झाकले तरी सत्य हे सत्य च असते.
इशरत जहां पा़किस्तानी अतिरेक्यांबरोबर होती. गुजरातमध्ये तिचा त्यांच्याबरोबर एनकाऊंटर झाला. ती मुस्लिम असल्याने मुस्लिम मतांसाठी अशा व्यक्तीला जाहीर निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणे हे अत्यंत अयोग्य कृत्य होते.
शेती- याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.>> -- त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले. ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मा. श्री. शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले ऍग्रोवन चे संपादकीय वरती चिटकवले आहेच
शेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही. इतक्या असंख्य योजना त्यांनी निर्माण केल्या असतील, इतके हजारो कोटी रूपये मदत म्हणून वाटले असतील, शेतकर्‍यांच्या हातात लाखो कोटी रूपये पडले असतील, शेतकरी प्रचंड समाधानी असतील तर वृत्तपत्रातून येणार्‍या शेतकर्‍यांच्या हलाखीच्या बातम्या, आत्महत्यांच्या बातम्या खोट्या आहेत हेच सिद्ध होतं.
दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?>> -- अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुरेश धस, दत्तात्रय भरणे, उदयन राजे, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजून बरेच आहेत.
यात त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त सुळे आणि अजित पवारांना पुढे आणलं. यातले बरेचसे स्वयंभू किंवा घराणेशाहीतून पुढे आलेले आहेत.
स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.>> -- कुल कायद्या मध्ये मुलीचा हिस्सा, पोलीस आणि मिलिटरी मध्ये स्त्रियांची भरती, स्त्री भ्रूण हत्या संदर्भि सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन आणि प्रचार, महिला बचत गट, महिला आरक्षण , स्त्रीशिक्षणावर विशेष भर (पवार साहेब, अजित दादा , सुप्रिया सुळेंकडे कोणी एक मुलगी जाऊ द्या की शैक्षणिक मदतीसाठी, क्षणात मदत करतात)
याविषयी हातात पुरेशी आकडेवारी याक्षणी नसल्याने आमचा तात्पुरता पास.

In reply to by श्रीगुरुजी

फायदा कमवणं हे इतकं वाईट का समजलं जातं ते समजय नाही. कमवू दे पदाधिकार्‍यांनी/टीम मालकांनी फायदा. काय प्रॉब्लेम आहे? आयपीएल नी खेळाडूंचा प्रचंड फायदा झाला आहे हे उघड आहे. आयपीएल मधलं क्रिकेट मलाही नाही आवडत पण अनेकांना आवडतं, त्यातून खेळाडुंना भरपूर पैसे मिळतात हे सत्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

त्याचे कारण असे की पवारांच्या पित्त्यांनी या संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून वाटोळे केले. -- वरती म्हणताय स्थानिक नेत्यांनी कारखाने चालू केले इथे म्हणताय पवारांच्या पित्त्यांनी वाटोळे केले. नेमके कारखाने चालवत कोण होते. आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच.>>> -- अहो जगाच्या पाठीवर क्रिकेटचे किती शॉट्स बदलले आहेत. हेलिकॉप्टर शॉट्स काय, प्याडल स्वीप काय, रिव्हर्स स्वीप काय, दिल्शानचा शॉट काय आणि इतर इम्प्रोव्हिसशन्स शॉट्स आले आहेत. चीअर गर्ल्स>>> -- त्याने काय होते? बाल मनांवरती परिणामच ना? पण आजकालचे बालके खूप ऍडव्हान्स आहेत . फ़िक्सिन्ग, बेटिंग >> -- सहमत. (भाजप ने फ़िक्सिन्ग मध्ये अडकलेल्या खेळाडूला तिकीट दिले होते केरळ मध्ये. तुच्छ लेकाचे..!!) कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत>> -- रणजी क्रिकेट बाबत मान्य पण आर्थिक उलाढाल किती असते (आकडेवारी असेल तर द्या मला माहित नाही). किती पब्लिक जाते रणजी सामने पाहायला. कोणता चॅनेल रणजीचे सामने दाखवते? लोकांना चार दिवस वेळ आहे का हो रणजीचे सामने पाहायला. शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.>>> -- शून्य जवाबदारी असते, नवीनच ऐकतोय. प्रचंड मलिदा पवारांनी घश्यात घातलेला मला तरी वाचनात नाही आला. का उगाच स्वप्नरंजन??? याची पूर्वी अनेकांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.>> -- मला माहित नाही म्हणून विचारली. तसे ही पवारांबद्दल असंख्यवेळा लिखाण झालेले असताना सुद्धा मला हा गळका लेखप्रपंच करण्यासाठी प्रोहत्सान देण्यात आले आहे. ती मुस्लिम असल्याने मुस्लिम मतांसाठी अशा व्यक्तीला जाहीर निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणे हे अत्यंत अयोग्य कृत्य होते.>> -- पवारांचं काही ही मत असो पण माझ्या मते तरी इशरत जहाँ ही निर्दोषच असावी. शेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही>>> -- काय राव मग असाच भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय का? एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली. कर्ज माफीचा आम्हाला वयक्तिक फायदा झाला आहे. त्या पासून शेतीमध्ये कधीच मागे वळून नाही पाहिले. शेती उद्योगाला वेळोवेळी टेका द्यावाच लागतो तर तो तर तो व्यवस्थित मार्गक्रमण करू शकतो.

In reply to by विशुमित

-- वरती म्हणताय स्थानिक नेत्यांनी कारखाने चालू केले इथे म्हणताय पवारांच्या पित्त्यांनी वाटोळे केले. नेमके कारखाने चालवत कोण होते.
कारखाने इतरांनी चालू केले असले तरी कालांतराने त्यात जी माणसे घुसली/घुसविली त्यांनी संस्थेची वाट लावून स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली (उदा. अनेक जिल्हा सहकारी बँका)
आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच.>>> -- अहो जगाच्या पाठीवर क्रिकेटचे किती शॉट्स बदलले आहेत. हेलिकॉप्टर शॉट्स काय, प्याडल स्वीप काय, रिव्हर्स स्वीप काय, दिल्शानचा शॉट काय आणि इतर इम्प्रोव्हिसशन्स शॉट्स आले आहेत.
मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत. आता फक्त ताकदीच्या जोरावर मारलेले फटके जास्त दिसतात. अगदी अलिकडेपर्यंत लक्ष्मण, जयवर्धने असे कलात्मक फलंदाज सामन्यात दिसायचे. आता ही कला नष्टच होईल की काय अशी भीति आहे. खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते. २०१४ मधील इंग्लंड दौर्‍यात कसोटी सामन्यात भारतीय संघ लागोपाठ ३ डावात ४५ षटके सुद्धा खेळू शकला नाही. तीनही डावात जेमतेम पावणेतीन तीन तासात भारताने सर्व १० गडी गमाविले होते. अर्थात या मुद्द्यावर आपले एकमत होणे शक्य दिसत नाही.
चीअर गर्ल्स>>> -- त्याने काय होते? बाल मनांवरती परिणामच ना? पण आजकालचे बालके खूप ऍडव्हान्स आहेत
. बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो.
फ़िक्सिन्ग, बेटिंग >> -- सहमत. (भाजप ने फ़िक्सिन्ग मध्ये अडकलेल्या खेळाडूला तिकीट दिले होते केरळ मध्ये. तुच्छ लेकाचे..!!)
न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.
कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत>> -- रणजी क्रिकेट बाबत मान्य पण आर्थिक उलाढाल किती असते (आकडेवारी असेल तर द्या मला माहित नाही). किती पब्लिक जाते रणजी सामने पाहायला. कोणता चॅनेल रणजीचे सामने दाखवते? लोकांना चार दिवस वेळ आहे का हो रणजीचे सामने पाहायला.
आयपीएल सुरू न करतासुद्धा बीसीसीआय कडे प्रचंड पैसा होता. जाहिराती, तिकीट विक्री, सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क इ. त्यांना प्रचंड पैसा मिळत होता. आयपीएल सुरू करून हा तमाशा धनदांडग्यांच्या हातात देण्याचे व त्यायोगे फिक्सिंग, लिलाव, बेटिंग, चीअर गर्ल्स इ. वाईट प्रकार सुरू करण्याचे आणि त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.
शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.>>> -- शून्य जवाबदारी असते, नवीनच ऐकतोय. प्रचंड मलिदा पवारांनी घश्यात घातलेला मला तरी वाचनात नाही आला. का उगाच स्वप्नरंजन???
बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली? भारताचे २०११ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियात अत्यंत दारूण पराभव झाले. त्याबाबत यांनी काय केले? गोव्यात व इतर काही ठिकाणी तिकीटविक्रीत भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल बीसीसीआयच्या कोणी जबाबदारी घेतली? सामन्यात फिक्सिंग, बेटिंग इ. गुन्हे अनेकवेळा उघडकीस आले? तत्कालीन बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी (उदा. श्रीनिवासन) कोणती जबाबदारी घेतली? एखादादुसरा अपवाद वगळता सर्वजण श्रीनिवासनच्या बाजूने उभे होते? कपिल, मोहिंदर सारख्या वरीष्ठ खेळाडूंना बहिष्कृत करून सूड उगविल्यानंतर कोणत्या बीसीसीआयच्या सदस्यांनी जबाबदारी घेतली? शाहरूखसारखे क्रिकेटशी संबंध नसलेले वानखेडे स्टेडियमवर जाऊन माज करतात तेव्हा बीसीसीआयसाच्या राजीव शुक्लासारखे त्याचीच पाठराखण करीत होते. मलिद्याच म्हणाल तर सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क देणे, जाहिराती, आयपीएल इ. मध्ये प्रचंड उलाढाल होते. त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.
शेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही>>> -- काय राव मग असाच भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय का? एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली. कर्ज माफीचा आम्हाला वयक्तिक फायदा झाला आहे. त्या पासून शेतीमध्ये कधीच मागे वळून नाही पाहिले. शेती उद्योगाला वेळोवेळी टेका द्यावाच लागतो तर तो तर तो व्यवस्थित मार्गक्रमण करू शकतो.
आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?

In reply to by श्रीगुरुजी

स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली>> -- किती खिसे भरले डिटेल्स द्या. आणि भरले असले असतील तर अजून सिद्ध का नाही झाले? साखर कारखान्यांची अण्णा हजारेंची आकडेवारी देऊ नका कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कृपया हवेत गोळीबार करू नका. मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत>> -- काय सांगता राव... आपल्याच संघातील मुरली विजय, चेतेश्वर पुजरा अप्रतिम कलात्मक फाटके मारताना दिसत आहेत. गुरुजी तुम्ही क्रिकेटचे एवढे जाणकार असताना देखील असे प्रतिक्रिया देता याचे आश्चर्य वाटले. खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते.>> -- आता चालू असणारा भारत-बांगलादेश सामना २ दिवस झाले पाहत होतो. बांगलादेशचे ६ गाडी बाद झाले असताना सुद्धा पहिल्या डावात काय चिवट झुंज दिली. आता ही देत आहेत. अर्थात या मुद्द्यावर आपले एकमत होणे शक्य दिसत नाही.>> -- कारण तुम्ही विरोधाला विरोध करायचा चंग बांधला असल्यामुळे असेल कदाचित. न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.>>> -- ओक म्हणजे गोमूत्र शिंपडलं वाटतं श्रीशांत वर. काँग्रेस ने केले तेच भाजप पण करणार मग पार्टी विथ डिफरेन्स ची डेफिनिशन युनिव्हर्सल करावी लागेल. बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो. त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.>>> -- खेळ कोठे बिघडलाय आणि सवंग झालाय ? बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली?>> -- प्रत्येक संस्थेमध्ये जवाबदाऱ्या ह्या वाटून दिलेल्या असतात. त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.>> -- पैसे आहेत म्हंटल्यावर मुंगळे चिकटणारच. (तो अनुराग ठाकूर का कोण चिटकून राहण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. पण लोढा समिती ने मस्त चिमटीत उचलून फेकून दिलं बिचाऱ्याला. तुच्छ लेकाचे..!! ) आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?>> -- कारण आताच केंद्र आणि राज्य सरकारच शेतकऱ्यांबाबत ना लायक आहे. शेतीतील ही स्थिती स्थायी नसते. ती वातावरण, बाजार भाव, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. शेतकरी आत्महत्या का करतात याची अनेक कारणे आहेत त्या चर्चून त्याचा पार खिस पाडला आहे. फक्त एक उत्तर द्या पश्चिम महाराष्ट्रातला खरा शेतकरी सहसा आत्महत्या का करत नसावा ? वृत्तपत्रातील बातम्या मी १००% खऱ्या मानत नाही इनफॅक्ट २० टक्के पण मानत नाही.

In reply to by विशुमित

स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली>> -- किती खिसे भरले डिटेल्स द्या. आणि भरले असले असतील तर अजून सिद्ध का नाही झाले? साखर कारखान्यांची अण्णा हजारेंची आकडेवारी देऊ नका कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कृपया हवेत गोळीबार करू नका.
अजून सिद्ध झाले नाही कारण तब्बल १५ वर्षे ही प्रकरणे काँग्रेस-राष्ट्रवादीने दडपून ठेवली होती. आता अण्णा हजारेंच्या माध्यमातून ही प्रकरणे बाहेर यायला सुरूवात झाली आहे. पूर्वी २००३ मध्ये सुद्धा पद्मसिंह पाटलाच्या तेरणा साखर कारख्यान्याने कारगिल सैनिकांकरीता मदत म्हणून शेतकर्‍यांकडून गोळा केलेले ५३ लाख रूपये कसे हडप केले हे अण्णा हजार्‍यांनी बाहेर काढल्यानंतर पद्मसिंह पाटलाने तातडीने ५३ लाखांचा भरणा करून प्रकरण मिटविले होते. सांगलीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना कसा बुडला ते सर्वश्रुत आहे. २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या खालील वृत्तांतात साखर कारखाने कसे गाळात घातले गेले या विषयी माहिती आहे. http://www.slideshare.net/iacmanupillai/sugar-scam
मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत>> -- काय सांगता राव... आपल्याच संघातील मुरली विजय, चेतेश्वर पुजरा अप्रतिम कलात्मक फाटके मारताना दिसत आहेत. गुरुजी तुम्ही क्रिकेटचे एवढे जाणकार असताना देखील असे प्रतिक्रिया देता याचे आश्चर्य वाटले.
मी आधी लिहिल्याप्रमाणे या मुद्द्यावर आपली मते वेगवेगळी आहेत.
खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते.>> -- आता चालू असणारा भारत-बांगलादेश सामना २ दिवस झाले पाहत होतो. बांगलादेशचे ६ गाडी बाद झाले असताना सुद्धा पहिल्या डावात काय चिवट झुंज दिली. आता ही देत आहेत.
न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.>>> -- ओक म्हणजे गोमूत्र शिंपडलं वाटतं श्रीशांत वर. काँग्रेस ने केले तेच भाजप पण करणार मग पार्टी विथ डिफरेन्स ची डेफिनिशन युनिव्हर्सल करावी लागेल. इथे गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्यायचा संबंधच नाही. श्रीशांत फिक्सिंगमध्ये सापडला म्हणून त्याच्यावर बंदी घातली व त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयात त्याने फिक्सिंग केले हे सिद्ध करता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले. गोमूत्र शिंपडले असलेच तर ते सर्वोच्च न्यायालयाने शिंपडले आहे, भाजपने नाही.
बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो. त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.>>> -- खेळ कोठे बिघडलाय आणि सवंग झालाय ?
पुन्हा तेच. आता किती वेळा सांगू?
बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली?>> -- प्रत्येक संस्थेमध्ये जवाबदाऱ्या ह्या वाटून दिलेल्या असतात.
बरं मग गोव्यात तिकिटविक्रीत भ्रष्टाचार झाल्याची जबाबदारी बीसीसीआयमधील कोणी वाटून घेतली होती? आयपीएलमधील फिक्सिंग व बेटिंगची जबाबदारी त्यांच्यापैकी कोणी वाटून घेतली? मी आधीच्या प्रतिसादात दिलेल्या अनेक गैरप्रकारांची जबाबदारी बीसीसीआयमधील नक्की कोणी घेतली?
त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.>> -- पैसे आहेत म्हंटल्यावर मुंगळे चिकटणारच. (तो अनुराग ठाकूर का कोण चिटकून राहण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. पण लोढा समिती ने मस्त चिमटीत उचलून फेकून दिलं बिचाऱ्याला. तुच्छ लेकाचे..!! )
मी तेच म्हणतो. बीसीसीआयमध्ये घुसलेले सर्वजण तिथे आडवा हात मारण्यासाठीच घुसले होते (अगदी तुमच्या साहेबांसहीत. ते तर इतके कासावीस झाले होते की आपलं वय न बघता, आपण हातात कधी बॅटबॉल धरलेली नसतानासुद्धा, आपण या क्षेत्रात सर्वोच्च पदावर बसून आलेलो असताना सुद्धा . . . त्यांनी अगदी खालच्या पदावर पुन्हा एकदा डेरा टाकला). बरं झालं न्यायालयाने या सर्वांना हाकलून लावलं ते.
आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?>> -- कारण आताच केंद्र आणि राज्य सरकारच शेतकऱ्यांबाबत ना लायक आहे. शेतीतील ही स्थिती स्थायी नसते. ती वातावरण, बाजार भाव, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. शेतकरी आत्महत्या का करतात याची अनेक कारणे आहेत त्या चर्चून त्याचा पार खिस पाडला आहे. फक्त एक उत्तर द्या पश्चिम महाराष्ट्रातला खरा शेतकरी सहसा आत्महत्या का करत नसावा ? वृत्तपत्रातील बातम्या मी १००% खऱ्या मानत नाही इनफॅक्ट २० टक्के पण मानत नाही.
अरेच्चा. तुम्हीच म्हणालात ना २००८ च्या कर्जमाफीनंतर शेतीची परिस्थिती एकदम सुधारली म्हणून. तुमच्याच आधीच्या प्रतिसादात लिहिले आहे की "भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय; एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली; महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून मिळाले; राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान अशा नवनवीन योजना सुरू झाल्या; ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडले; त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते . . .".

In reply to by श्रीगुरुजी

शेवटच्या मुद्द्याशी सहमत आहे. हाच मुद्दा वर विचारला होता. एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी विशाल दु:खात ओरडायचं आणि दुसरीकडे पवारांमुळे कसे शेतकरी सुखात हे गायचं. हे समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अरेच्चा. तुम्हीच म्हणालात ना २००८ च्या कर्जमाफीनंतर शेतीची परिस्थिती एकदम सुधारली म्हणून.>>> -- माझ्या वरच्या प्रतिसादात मी नमूद केले आहे, ही स्थिती स्थायी नसते. कर्ज माफी नंतर निश्चितच शेतीची परिस्थिती खूप प्रमाणात सुधारली आहे. पण आताच्या सरकारची शेतकरी विरोधी धोरणे आणि जुमल्यांमुळे शेतकऱ्यांची पुन्हा ही गत होयला लागली आहे.

In reply to by विशुमित

अजून ऐक >>> आर्थिक - साखर कारखानदारी, जिल्ला बँकांचे जाळे, सहकार, रिअल इस्टेट, IPL , हिंजेवाडी IT पार्क, MIDC विकास. ते नाव हिंजेवाडी नसून "हिंजवडी"असे आहे. हिंजवडी आयटी पार्क सुरू होण्यामागे पवारांचे योगदान शून्य आहे. साखर कारखान्यासाठी राखून ठेवलेल्या या जागेत आयटी पार्क सुरु करण्याचा निर्णय युती सरकारच्या काळात १९९८ मध्ये होऊन काही कंपन्यांना जागावाटप करण्यात आले. १९९८ मध्येच Infosys ने भूमीपूजन करून बांधकाम सुरू केले व १९९९ मध्येच Infosys येथून काम सुरू केले. हे श्रेय युती सरकारचे आहे. पवारांनी यात काहीही केलेले नाही.

शिवसेनेला मी तिच्या जन्मापासून ओळखत आहे. आता, मारे लोकं, बाळासाहेबांच्या नांवाने गळे काढून उद्धवला नांवे ठेवत आहेत. पण उद्धव हा बोलण्यांत व वागण्यांत खूपच जास्त सुसंस्कृत आहे. सध्या, प्रचारसभेत तो जी भाषा वापरतो आहे, ती त्याची नव्हे. पण ठाकरी भाषेचा फार उदोउदो झाल्यामुळे, तो ती वापरत आहे. तरीही, वर अप्पांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना यावेळेस निवडून येता कामा नये. तरच त्यांच्या घराणेशाहीला चाप बसेल. आणि कोणीही निवडून आले तरी महापालिकेचा कारभार पारदर्शी होणे शक्य नाही. - एक मुंबईकर.

In reply to by तिमा

पण उद्धव हा बोलण्यांत व वागण्यांत खूपच जास्त सुसंस्कृत आहे. सध्या, प्रचारसभेत तो जी भाषा वापरतो आहे, ती त्याची नव्हे. पण ठाकरी भाषेचा फार उदोउदो झाल्यामुळे, तो ती वापरत आहे.
बाळासाहेबांच्या तुलनेत उद्धव सुसंस्कृत आहे या मुद्द्यावर सहमत. बाळासाहेब २०१४ मध्ये असते तर त्यांनी मोदी खडसे व शहांच्या बाबतीत काय भाषा वापरली असती याची कल्पना सुद्धा करवणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काहो का कल्पना करवत नाही? बाळासाहेबांनी शेवटचं भाषण मला वाटतं २०१२ ला केले होते. तेव्हा काय भाषा वापरत होते ते? उगाच उथळ वक्तव्य करण्यापेक्षा सांगा बरं बाळासाहेब कसे कमी सुसंस्कृत होते?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

राणे २००५ मध्ये सोडून गेले तेव्हा "सामना"तून बाळासाहेब काय भाषा वापरीत होते ते एकदा अर्काईव्हमधून जुने अंक काढून वाचा. मी आधीच्या एका प्रतिसादात त्यांची काही वाक्ये दिली आहेत. तेव्हा "सामना"तून बाळासाहेबांनी इतकी घाण भाषा वापरली होती की ते वाचताना शरम वाटत होती.

In reply to by श्रीगुरुजी

सामनामधून आताही फार काही छान भाषा वापरले जाते असे नाही. ते लेख कोण लिहितं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शिवाय भाषेच्या बाबतीत मी वर एक मत मांडले होते, पटते का पहा. त्या त्या काळातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळ लक्षात घ्यायचा प्रयत्न करायला हवा. बाकी आता भाजप शिवसेना समोरासमोर आहेत आणि भाजपला वरचढ दाखवायचं म्हणून बाळासाहेबांना खाली खेचणे हास्यास्पद आहे असे मला वाटते. असो, हा या धाग्याचा विषय नाही, शिवाय बाळासाहेबांचं महाराष्ट्रातलं स्थान हि काही सांगून समजण्याची गोष्ट नाही असे माझे वैयक्तिक मत असल्याने, आपला ह्या बाबतीत पास!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आजचा सामनाचाअग्रलेखही पहा! उगाच लिहायचे म्हणून काहींच्या काही. शेज गरम करणे वगैरे फालतुपणा. म्हणे अटलजींनी इंदिराजींना दुर्गा म्हणून गौरवले होते. काहीही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मी "सामना" वाचत नाही. "सामना" हे अत्यंत टुकार प्रकाशन आहे. "सामना"चे अग्रलेख वाचण्यासाठी "सामना" वाचण्याची गरज नाही. मटा व लोकसत्ता ही दोन्ही वृत्तपत्रे व काही मराठी वृत्तवाहिन्या "सामना"च्या अग्रलेखात काय लिहिलंय, उद्धव ठाकरेंनी मोदींना कसा सणसणीत टोला हाणला, मोदींचे कसे वाभाडे काढले इ. मोठ्या मथळ्यात छापत असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे जणू काही बळवंतरावांनी लिहिलेले किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले अग्रलेख आहेत अशा आविर्भावात मटा व लोकसत्तावाले "सामना"चे अग्रलेख छापत असतात.

In reply to by विशुमित

ते विकल जात म्हणून. संजय राऊत कसेही असले तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या भाषेचा मोठा संस्कार आहे. संजय राऊत जितक शिवराळ लिहितात तितकच बाळासाहेबसुद्धा लिहित असत. पण त्यांचे विनोद किंवा त्यांनी काढलेले वाभाडे खरोखरच मर्मभेदक असायचे हे मान्य करावेच लागेल. मात्र उतार वयात त्यांचा भाषेतील शिवराळ पणा अधिकाधिक वाढत गेला. विशेषतः राणे किंवा निखिल वागळे यांचा 'पादरे पावटे' असा उल्लेख, वटवागळे फडफडली असे लिहिणे, राज ठाकरेला वेडझवा म्हणणे असे अनेक दाखले आहेत. बाळासाहेबांच्या भाषेवर अत्रे आणि टिळक यांच्या भाषेचा संस्कार असावा. सामना चे सगळे अग्रलेख टुकार असतात हे मान्य नाही. त्यांचे काही अग्रलेख टुकार असतात तसे लोकसत्ताचे पण असतात. म्रूत्युलेख लिहिण्याच्या बाबतीत सामनाचे काही अग्रलेख खरोखर नमुनेदार आहेत. इतके की हे पुंडांच्या नेत्याने केलेले लिखाण आहे हे खरे वाटत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

म्रूत्युलेख लिहिण्याच्या बाबतीत सामनाचे काही अग्रलेख खरोखर नमुनेदार आहेत. इतके की हे पुंडांच्या नेत्याने केलेले लिखाण आहे हे खरे वाटत नाही.
अर्थातच मी सामना वाचत नाही. पण समाजवादी नेते ना.ग.गोरे यांचे निधन झाल्यानंतरचा सामनामधला लेख वाचला होता. त्या लेखात नक्की काय लिहिले होते याचे तपशील लक्षात नाहीत पण त्यांचे निधन झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांच्याविषयी असे काही छापून आणणे खटकले होते हे चांगलेच आठवते . भले विचार पटत नसले तरी इतर सर्व समाजवादी नेत्यांप्रमाणे ना.ग.गोरे हे त्यांच्या तत्वांशी आणि विचारांशी प्रामाणिक होते. निदान एवढा तरी विचार करायला हवा होता हे नक्कीच.

In reply to by गॅरी ट्रुमन

ह्याच धाग्यावर आधी पण बोलोय.आज चर्चा चालू होती म्हणून सहज पाहिलं तर "जगातील सर्वाधिक चर्चिले एकमेव वृत्तपत्र " असं शीर्षकस्थानीच लिहिलं होत हसून हसून ते पाहून विंडो क्लोज करून टाकली .

In reply to by गॅरी ट्रुमन

त्या अग्रेलेखाचे शीर्षक "ढोंगाला श्रद्धांजली नाही"असे होते. ना ग गोरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल किंवा त्यांच्या समाजवादी विचारांबद्दल मी श्रद्धांजली वाहत नसून एक लेखक मी म्हणून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो असे त्यात म्हटले होते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

म्हणे अटलजींनी इंदिराजींना दुर्गा म्हणून गौरवले होते. काहीही.
हे काहीही नाही, बांगला देशाच्या निर्मीतीच्या वेळी केलेले ते भाषण खुप गाजले होते.

In reply to by मराठी_माणूस

अटलजींनी स्वतः हि गोष्ट स्पष्ट केली आहे कि ते असे काहीही बोलले नाहीत. आता त्याउपर जर तुमहाला माध्यमांवर विश्वास ठेवायचा असेल तर त्याला पर्याय नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अटलजींनी ही गोष्ट कुठे म्हणाली आहे? की बुआ मी काही दुर्गा वगैरे म्हणालो नव्हतो. असा एखादा व्हिडिओ किंवा काही उपलब्ध आहे का? असल्यास इथे द्या, तुमचा वैयक्तिक अनुभव म्हणजे अटलजींसोबत भेट वगैरे झाली आहे का , जेव्हा त्यांनी तुम्हाला हे सांगितले असावे? का तुम्हीपण माध्यमांवर (तुमच्या लेखी विश्वासार्ह असणाऱ्यावर) विश्वास ठेवता आहात साहेब?

In reply to by फेदरवेट साहेब

फेदरवेटसाहेब, आय होप धिस बिलो विडिओ क्लिअर्स द एअर! https://m.youtube.com/watch?v=I0Y41ZPGSBM. खूप वर्षांपूर्वी वाजपेयीजींचा आपकी अदालत चा हा एपिसोड पाहिल्याचं आठवत होतं. आय वॉज लकी, अटल + दुर्गा एवढंच सर्च केलं युट्युबवर आणि पहिलाच विडिओ सापडला. अवांतर : माझी वाजपेयीजींबरोबर भेट नाही झाली, मी एवढा सुदैवी नाही. त्यामुळे तुमच्या उपरोधाला आपला पास! मी वरील वक्तव्याच्या बाबतीत माध्यमांवर विश्वास ठेवण्याबाबत म्हणालो, तुम्ही बहुतेक सरसकट अर्थ काढला. मी माध्यमांवर विश्वास ठेवतो, पटते तिथे. जिथे पटत नाही तिथे, सुदैवाने इंटरनेट हे माहिती गोळा करण्याचं खूप चांगलं साधन उपलब्ध आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

व्हिडीओ पाहून, एक राजकीय मिथक असलेली गोष्ट स्पष्ट झाली. त्याबद्दल आपले आभार मानतो. दुसरे म्हणजे क्लियर्स द एअर नंतर व्हिडीओ ठीक आहे, बाकी त्या अवंताराचे प्रयोजन मला समजले नाही. अटलजींना तुम्ही भेटला आहात काय? ह्या प्रश्नात तुम्हाला उपरोध का दिसावा हे कोडे आता मला पडले आहे. अटलजी मुळात एक प्रसिद्ध कवी होते, हे तुम्हाला माहिती असेलच, त्यामुळे त्यांना भेटणाऱ्या लोकांत फक्त राजकीय कार्यकर्त्यांचीच उठबस नसून इतर अनेक सामान्य नागरिक काव्य/साहित्यरसिक मंडळी सुद्धा असत हे वेगळे सांगणे नलगे. मी स्वतः अटलजींना भेटलेलो आहे, हाती वेळ असता अटलजी बऱ्याच विषयांवर व्यासंगपूर्ण बोलतात हे तुम्हाला कदाचित लोकसभेतली भाषणे ऐकून तरी माहिती असावेच. माझ्या सारख्या संघ/भाजप सोबत दूरवर संबंध नसलेल्या मुलाला सुद्धा जर अटलजीं 5 मिनिटे देऊ शकतात, हे बॅकग्राऊंड असल्यामुळे मी तुम्हाला अतिशय सुलभतेने तो प्रश्न विचारला होता. अर्थात आता त्यामुळे प्रश्नचिन्ह तुमच्यावर लागते आहे. माझ्या प्रश्नात उपरोध शोधायचाच असे काही तुम्ही ठरवले आहे का? असल्यास का? माझ्या प्रश्नात उपरोध आहे का हे तुम्ही मला विचारू शकला असता, पण तुम्ही थेट ठरवूनच टाकले तसे, ते ही माझ्याबद्दल काडीची माहिती नसताना, असे का बुआ? मिपावरच मी एक म्हण ऐकली आहे खाई त्याला खवखवे - ह्या उक्तीनुसार एकतर तुम्ही कायम औपरोधीक बोलत असाल म्हणून तुम्हाला सतत उपरोधच दिसतोय.

In reply to by फेदरवेट साहेब

तुम्ही उपरोधिक म्हणाला नाहीत असे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद! मी अत्यंत सामान्य मनुष्य असल्यामुळे, वाजपेयीजी जरी कवी असले तरी भारताचे पंतप्रधान (माजी) आणि खूप मोठे राजकीय व्यक्तिमत्व असल्याकारणाने ते मला भेटू शकतील हे मला कल्पनेतही कधी वाटले नाही. तुम्ही संदर्भ देता का असा थेट प्रश्न न विचारता अटलजींनी मला असं प्रत्यक्ष भेटीत सांगितलं का असं विचारलंत त्यामुळे गैरसमज झाला असावा. शिवाय अटलजी मला भेटू शकले असते याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सांगा बरं बाळासाहेब कसे कमी सुसंस्कृत होते?
बाळासाहेबांची काहीकाही वक्तव्ये अशी होती की ती मी सुसंस्कृत लोकांच्या मिपासारख्या सार्वजनिक संकेतस्थळावर लिहूही शकत नाही. आणि अशी वक्तव्ये ते बिनदिक्कतपणे जाहिरपणे करत असत. अशी वक्तव्ये तुम्ही एकदाही वाचली/ऐकली नसतील तर खरोखरच आश्चर्य आहे. तुमची इच्छा असल्यास त्यातले काही मोती व्य.नि मधून कळवू शकेन. बाळासाहेबांची ती शैली होती. तेवढ्यामुळे बाळासाहेब असंस्कृत होते असे मी तरी म्हणणार नाही. मो.ग.रांगणेकर या नाट्यक्षेत्रातल्या मोठ्या दिग्गजाचे ते चाहते आणि स्नेहीही होते. रसिकपणाचा, सुसंकृतपणाचा भाग बाळासाहेबांमध्ये होताच. कदाचित शिवसेनेत गुंडपुंड एकत्र झाल्यामुळे त्यांना भावेल अशी भाषा ते वापरत असावेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

तेवढ्यामुळे बाळासाहेब असंस्कृत होते असे मी तरी म्हणणार नाही.
बास, एवढेच म्हणणे होते. शिवराळ भाषा हेच एकमेव सुसंस्कृतपणाचे लक्षण मानायचे का हा प्रश्न आहे. बाकी बाळासाहेबांची भाषणे हि शिवसेनेनंतल्या गुंडापुंडांसाठीच असायची आणि त्यामुळेच प्रसिद्ध व्हायची का? त्यांचे कुठलेही भाषण अजून काढून बघावे, "लोकांना चांगले वाटावे म्हणून" थाटाचे कधीच नसायचे आणि बहुतकरून सर्वसामान्य जनतेला रुचणारेच मुद्दे असायचे असे माझे वैयक्तिक मत आहे. अवांतर : बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा झाले आहेत हे सरसकट विधान पटले नाही. शिवसैनिक हा काय नेहमी भांडणेच करत असतो का? तो एक सामान्य माणूस असतोच की!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा झाले आहेत हे सरसकट विधान पटले नाही.>>> -- राष्ट्रवादीला पण म्हणतात राव गुंडांचा पक्ष. एकच पक्ष महाराष्ट्रात उरला आहे त्याच्यात गुंड नाहीत. ओळखा पाहू..!!

In reply to by विशुमित

म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात 'गुंड विशेष भर्ती' कार्यक्रम राबवायला सुरवात केली आहे. पहिला नंबर पिंपरी चिंचवडचा.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल होती, रंगेल होती, मार्मिक होती तशीच अगदी आचार्य अत्र्यांचीही होती. मराठातले अग्रलेख म्हणा की मथळे म्हणा ह्याची साक्ष आहेत. प्रत्यक्ष भाषणातही अत्र्यांनी बरेच कमरेखालचे, द्वैअर्थी विनोद आणि जहाल भाषेचा प्रयोग केला आहे. अत्र्यांची लेखणी त्यांच्या श्रध्दास्थानाविषयी बोलताना ज्या मनस्वीपणे फुले वाहायची तितकाच खरपूस समाचार त्यांनी विरोधकांचा घेतला होता. गांधेजी, नेहरु, कॉम्ग्रेसी, प्रजासमाजवादी, समाजवादी, जनसंघी, अगदी आंतरराष्ट्रीय नेतेही त्यातून सुटले नाही. पण तेवढेच त्यांनी लिहिलेले मृत्युलेखही गाजले. मग अत्रे काय पुण्यातल्या गुंडपुंडासाठी लिहायचे की काय? तेव्हाही पुण्यात मराठाचा खप अत्र्यांच्या अग्रलेखासाठीच होता. अत्रे म्हणा की बाळासाहेब हे जनसामान्यांच्या भावनांना वाट फोडून देणारे व्यक्तीमत्त्वे होती. जनसामान्य काही अगदीच प्रमाणभाषेत बोलत नसतात. राग आला की ते चिडतात, कधी शिवराळ भाषा वापरली जाते कधी मुक्तपणे अपशब्दांची बरसात होते. शिवसेनेला बांगला क्रिकेटची उपमा देता मग अफ्रिदीच्या आईचा गौरव तमाम भारतीयांनी केला त्यात शिवसैनिकच होते का सगळे? राग असला की तो असा बाहेर पडतोच. अगदीच सोवळेपणाची भाषा वापरुन मनातले जहर काढायला आतएक बाहेर एक असे भाजपीय नसतात सगळे. साधे काउच शो घ्या सध्याचे. चांगले चांगले म्हणवणारे कलाकार रोजच्या आयुष्यात काय भाषा वापरतात ते कळते. तेंव्हा भाषेवरुन तोलायचे प्रकार कधी अन कसे काढायचे ते भाजप्यांनी शिकवायची गरज नाही.

In reply to by अभ्या..

अगदीच सोवळेपणाची भाषा वापरुन मनातले जहर काढायला आतएक बाहेर एक असे भाजपीय नसतात सगळे.>>> -- भाषणांमधील एखादे वाक्य किंवा शब्द शोधून त्यावर पराचा कावळा करणे याच पक्षाचे यच्छेदवेक लक्षण आहे. राजू शेट्टी जात म्हणा किंवा धरणातील मूत हे पण त्यातच येते.

In reply to by विशुमित

अच्छा.. म्हणजे एका पक्षाने आक्षेप घेतला म्हणून जाहीर माफी मागून कृष्णाकाठावर आत्मक्लेश केला का..? भाजपला इतका आदर तर कट्टर संघवाले पण देत नसतील.. पण राष्ट्रवादीवाले देतात हे ऐकून आनंद झाला.

In reply to by विशुमित

अजित पवार आणि बाळासाहेब यांची तुलना म्हणजे अगदीच 'काहीही हं विशुमित'. यानिमित्ताने बाळासाहेब एकदा अजित पादा पवार असे काहीतरी म्हणाले होते ते आठवले.

In reply to by विशुमित

मला वाटतं विशुमतीसाहेब, त्यांच्या वाक्यातील वाईट शब्दांपेक्षा त्यातील बेजबाबदारपणा लोकांना जास्त बोचला होता. ५५ दिवस उपोषणाला बसणाऱ्याची अशी खिल्ली उडवणे हे टीकेचे मुख्य कारण होते. लोकांनी त्याचा अर्थ उर्मटपणा असा घेतला असावा. त्यामुळे वरील तुलना अयोग्य आहे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही अजित दादाचे ते संपूर्ण भाषण ऐकलं आहे का ? ते कोणत्या ओघामध्ये बोलले होते समजून घ्या. "धरणातच पाणी नाही तर आम्ही त्यात काय मुतायचं का?" त्या गोष्टीसाठी अजून ही ते खेद व्यक्त करत असतात. आता यापेक्षा अजून काय करायला पाहिजे म्हणजे लोकांचे समाधान होईल.

In reply to by विशुमित

लोकांचे समाधान होईल यासाठी इथे उपाय सुचवले तर नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवणार का..?

In reply to by अभ्या..

खुद्द अत्र्यांनाच बाळासाहेबांनी वरळीचे डुक्कर म्हटले होते असे व्यंगचित्र बाळासाहेबांची जुनी व्यंगचित्रे छापून आली होती त्यात पाहिल्याचे आठवते. ते जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे वगैरे नेहमीचीच मखलाशी आहे साहेब. बाळासाहेब जे बोलतात तो उभ्या महाराष्ट्राचा आवाज असा प्रोपागंडा केल्यामुळे असे गैरसमज शिवसैनिकांमधे सुद्धा पहिल्यापासूनच आहे. बाकी बाळासाहेब प्रमाण भाषेत बोलणार नाहीत, पण त्यांच्याबद्दल बोलताना अगदी प्रमाण भाषेतच बोलायचे हा शिवसैनिकांचा आग्रह थोडा अजबच नाही का ? अत्रे सुद्धा काही धुतल्या तांदलाचे नव्हतेच. ते जितके थोर साहित्यिक होते तितकेच भंपक राजकारणी होते. जसे बाळासाहेब थोर व्यंगचित्रकार आणि भंपक..... असो.

In reply to by अभ्या..

सगळ्या भाजपेयी ना कळत असतं पण कळून न कळल्यासारखं दाखवतात . शिवराळ भाषा आणि सुसंस्कृत पणाचा कोणताही संबंध नाही . नंतर मुद्दा पटवण्यासाठी वागळेंना असे बोले ,नारायण राणेंना असे बोले ,अशी हास्यास्पद उदाहरण देतात . काहीही स्टेटमेंट करतात . पार अत्र्यांना नावे ठेवण्यापासून ते ठाकर्यांपर्यंत . बाकी पवार वैग्रे ऐकलं कि तळपायाची आग मस्तकात जाते भाजपेयीच्या . पण सध्या काय बोलू नाय शकत . तरी ग्रास रूट ना बघता सोयीस्कर अर्थ लावून सगळ्यावर तोंडसुख घेतले जाते . फक्त आणि फक्त संघ आणि भाजप हेच प्रात:स्मरणीय असतं त्यांच्यासाठी . तो विषय आला कि सोयीचे निकष बदलतात .

श्रीगुरुजी भाषेच्या सुसंस्कृतपणाबद्दल बोलतात तेव्हा मौज वाटते, शय्यासोबत, चुंबाचुंबी, इ इ शब्दप्रयोग सढळ हस्ते वापरणारे दुसर्‍यांच्या भाषेबद्दल किळस व्यक्त करतात तेव्हा विसंगती शंभरदा मरत असेल....

In reply to by संदीप डांगे

मलाही मौज वाटते. बरं, "हरामखोर" शब्द वापरणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आक्षेप घेणे योग्य वाटते का? तेव्हा विसंगती कितव्यांदा मरत असेल?

In reply to by श्रीगुरुजी

मी, घटनात्मक पदावर बसून लोकशाहीचा सौदा करणारांना, तद्नुषंगिक रागातून हरामखोर म्हटले होते, ते तेवढ्यापुरते होते व तिथेच संपले. पण तुम्ही तुमची ही इतर पक्षांबद्दलची सततची शब्दांची उधळण कोणत्या रागामुळे करता तेही कळू देत की...