मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा

चिंटु · · काथ्याकूट
नमस्कार मिपाकरान्नो. मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो. माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्‍याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत. पोरासाठी चान्गल्या शाळान्च्या शोधात तो आहे. सी बी एस इ बोर्डाच्या शाळा तो शोधतो आहे. त्याच्या अपेक्षान्च्या बर्‍याच जवळ नान्देड सिटीजवळील पवार इन्टरनॅशनल स्कूल जाते, चान्दणी चौकाजवळची सन्स्क्रुती इन्टरनॅशनल स्कूलही जाते. पण तो अजूनही पर्याय बघून काय ते नक्की करु इच्छितो. माझा अनुभव आणि आवाका अभिनव, ज्ञानप्रबोधिनी, सेवा सदन , नूमवि इतपतच मर्यादित आहे. पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून म्हटलं मिपाकरान्ना विचारावं काय ते. तुम्ही काही सुचवू शकाल तर फार बर होइल मित्रान्नो.वरील शाळांच्या लायनीतल्या इतर शाळा सुचवल्यात तर बर होइल. फीस ही तशी त्याला फार मोठी अडचण वाटत नाही. तुम्ही इथे जे सुचवाल त्याबद्दल जर एखाद दोन ओळी , का चान्गला वाटतोय तो पर्याय ह्याबद्दलही लिहाव अशी विनन्ती करतो. अर्थात का चान्गली वाटते शाळा ह्याबद्दल नाही लिहिलत तरीपण चालेल. समजा इतर कुणी काही सुचवलेल्या पर्यायविषयी तुमचं मत चान्गल नाही आहे , किंवा काही तत्सम सांगायच आहे, तर व्यनिचा पर्याय निवडलेला उत्तम. नाव घेउन सान्गायचे असल्याने जाहिर सान्गताना चान्गल्या बाबी सान्गाव्यात.

वाचने 19504 वाचनखूण प्रतिक्रिया 80

In reply to by यशोधरा

चिंटु 25/05/2016 - 18:06
हो. इंटरनॅशनल. कोपी पेस्ट केल इंटरनॅशनल शब्द. मला टायपिन्ग येत एकदम चान्गल पण वेळ लागतो. म्हणून लवकर लिहिले चौकशीचे जसे येइल तसे .

चिंटु 25/05/2016 - 18:15
अरे गम्मत नन्तर करा ना.पुरेशी माहिती मिळाल्यानन्तर गम्मत-ओन्ली धागा केला तरी चालेल. सध्या मदत करा ना जमत असेल तर.

In reply to by चिंटु

यशोधरा 25/05/2016 - 18:18
चिंटुभाऊ, आंतरराष्ट्रीय शाळा खरेच नाही ठाऊक. चांगल्या शाळा म्हणून हल्ली मुक्तांगण, प्रबोधिनी वगैरे हीच नावे ऐकली आहेत.

एस 25/05/2016 - 18:33
वाबळेवाडीची झेडपी शाळा बेस्ट आहे आणि तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेल्या शैक्षणिक संकल्पना राबवल्या जातात. आंतरराष्ट्रीय शाळा नुसत्या नावाला असतात.

In reply to by एस

चिंटु 25/05/2016 - 18:45
पण मित्राने स्पेसिफिकली सान्गितले आहे इन्टरनॅशनल स्कूल हवे म्हणून. झेड पी शाळा उतम असू शकते हे मला पटते.आपल्या राज्यातच वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शाळा आहेत. मी तर त्याला अक्षर नन्दन वगैरे सारख्या किंवा परयायी शाळा असतात ना थोड्या वेगळ्या त्यापण सुचवल्यात पण सध्या त्याने कॅटेगरी पक्की केली आहे सी बी एस इ शाळा जॉइन करायची म्हणून.तर त्याच्या ठरवलेल्या कॅटेगरी नुसार काही शोधता येत आहे का ते बघतो आहे. आपण त्याला कस म्हणणार पुन्हा की एकूणातच तुझी कॅटेगरी बदल म्हणून. त्याचीही काही कारणे असतील ना. तो स्वतः गावातल्या शाळेतून शिकलेला आहे लहान असताना. झेड पी भारी असू शकतेपण.

In reply to by यशोधरा

चिगो 26/05/2016 - 15:48
खर्‍या अर्थाने 'इंटरनॅशनल' असलेल्या शाळांमधे 'सीबीएसई'चा अभ्यासक्रम नसतो.. 'आयबी'चा असतो. काही शाळा 'आयसीएसई;चा अभ्यासक्रम शिकवून स्वतःच्या नावामागे 'इंटरनॅशनल' लावतात. तेव्हा तुमच्या मित्राला नेमका सीबीएसई, आयसीएसई की आयबीचा अभ्यासक्रम हवाय, ते विचारा..

प्रचेतस 25/05/2016 - 19:00
मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल स्कूल, हिंजवडी. आमच्या हापिसच्या समोरच आहे अगदी. मुले खेळताना दिसतात बरेचदा. दाबून फी आहे. वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील. अभ्यासक्रमही सीबीएसई नै तर फ़ुल्टू इंटरन्याशनल. तुमच्या मित्राला नक्की आवडेल बघा. एकदम नामांकित.

In reply to by प्रचेतस

म्हणजे १० वर्षांत किमान दीड कोटी रुपये झाले. मग तेच बँकेत ठेवले तर १० वर्षांनी घरबसल्या दरमहा १ लाख रुपये मिळतील... असो, देवाच्या, देहाच्या, मद्याच्या बाजारा नंतर शिक्षणाचा बाजारच म्हणा की हो....

In reply to by नाखु

ज्याला शिकायची (ज्ञान मिळवायची) इच्छा आहे, तो शिकतोच. असो, आडातच नसेल तर पोहर्‍यात येत नाही आणि बापाच्या न्यूनगंडांचा मुलांना त्रासच जास्त होतो.

In reply to by प्रचेतस

शंतनु _०३१ 13/06/2016 - 18:22
शाळेची फी किती वर्षांची फी आहे ही
वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये. हॉस्टेलवर ठेवलं तिथेच तर अजून तीनेक लाख वाढतील.
कैच्या काही

विंजिनेर 26/05/2016 - 00:27
इंटरनॅशनल शाळा = सीबीएसी हे समीकरण काही कळाले नाही बुवा. प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा जानेवारीत असते तेव्हा ते ध्यानात ठेवा - शाळेच्या वेबसाईटवर माहिती मिळेलच. बाकी, शाळा सिलेक्षन क्रायटेरीया ज्याचा त्याचा वेगळा असू शकतो.

In reply to by रघुनाथ.केरकर

इरसाल 26/05/2016 - 12:32
ईट स्कुल म्हणजे विटा वापरुन बांधलेले स्कुल (कोबा किंवा शहाबादी फरशी), साधी स्कुल म्हन्जे मातीच्या भिंती असलेले स्कुल त्यात खाली शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसावे लागते( पावसाळ्यात गोणपाट टाकुन)

In reply to by इरसाल

स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.

In reply to by इरसाल

ईंटरन्याशनल स्कुल आणी बीगर ईंटरन्याशनल स्कुल ह्यात नेमका काय फ़रक असतो.. माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी बदलापुर ला मी गुरुकुल ईन्टरन्याशनल मध्ये प्रवेश घेतलाय. त्याना देखील विचारलय, पण नेमका उत्तर मीळत नाही. दगड वीटा आणी बांधकामाशीवाय काही वेगळा फ़रक असल्यास शेअर करा.

In reply to by रघुनाथ.केरकर

इरसाल 27/05/2016 - 13:43
एक लिंक देत आहे त्यावर जवळपास सगळ्या शाळांमधला फरक काय आहे त्याचे फायदे तोटे यावर नीट भाष्य केलय. (लिंकमधला मजकुर इंग्रजीत आहे). http://blog.schoolfinder.co.in/2014/02/difference-between-cbse-icse-igcse-ib.html

सुचिकांत 26/05/2016 - 11:21
आंतरराष्ट्रीय शाळा हवी असेल तर आयबी बोर्ड बघा. सीबीएसई कशाला? बाकी मराठी माध्यमात पण दाबून फी घेणाऱ्या शाळा आहेत, पण इंग्रजी शाळांची बरोबरी फीच्या बाबतीत नाही. कधी मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे जाणून घ्यायची इच्छा झाली तुमच्या मित्राला तर, majhishala.majhibhasha@gmail.com ला मेल पाठवायला सांगा. चर्चा करता येईल. - सुचिकांत ९०५२३४४४७६

माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस मध्ये गेला होता. आता आम्हीच शिफ्ट होत आहोत म्हणुन शाळा सोडली ती. पण शाळा बर्‍यापैकी आहे. तरीही चार गोष्टी सांगुन ठेवते. १. माझी अशी अपेक्षा होती की ICSE म्हणजे "घोका आणि ओका" न करता कन्सेप्ट समजावुन सांगण्यावर भर असेल. तसे काही नसते, सगळ्याच शाळा शेवटी सिलॅबस संपवायच्या मागे असतात. २. सिलॅबस जरी भारी असला तरी शिकवणारे हे सर्वसाधारण लोकच असतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षक काय निकषांवर घेतले जातात हे ठाऊक नाही. पण सरकारी शाळांप्रमाणे ते खुप अनुभवी असत नाहीत असे माझे निरीक्षण आहे. ३. जे लोक स्वतःच साधारण अभ्यासक्रम शिकले ते लोक आपल्या मुलाला काही तरी भन्नाट पद्धतीने शिकवतील हे शक्य नाही. तेव्हा शेवटी परत गाडी परीक्षेसाठी अभ्यास ह्याच रुळावर येते. ४. जवळपास सर्वच शाळांमध्ये अमुक एक ब्रॅण्डचेच खडू द्या, तमुक माणसाकडुनच गणवेष घ्या, आम्हीच वह्या-पुस्तके देणार, प्लास्टिक कव्हरच हवे असे असते. तिथुनच त्यांना पुष्कळ पैसा मिळतो. मला ह्या गोष्टीची मनस्वी चीड आहे. त्यामुळे मी परत येऊन अशा शाळेत मुलाला घालणार नाही. पण कुणाकुणाला त्यात फार मोठा इश्यु वाटत नाही. ट्री हाऊसचा टोटल खर्च आमच्या आवाक्यात होता. (नर्सरी/.केजी:- ट्युशन फीस - ३७०००/-, त्यात पुस्तके आणि शुज मिळाले, गणवेश्+बारिक सारिक स्टेशनरी - ५-७ हजार असेल, बस - ११ हजार ) ५. बस सेवा उत्तम दर्जाची आहे. आत कॅमेरे असल्याने मी ऑफिसातुन मुलाला पाहु शकत होते. ६. इतर उपक्रमही चांगले होतात. त्यातुन थोडे फार पैसे मागतात जसे की फोटो इ चे. पण ते किरकोळ आहेत. ७. पुढे जाउन स्पर्धा परीक्षा कंपल्सरी करतात म्हणे. मला ते आवडले नाही. ज्याला ज्याची आवड आहे ते करु द्यावे. ८. कँटिनची सोय आहे. त्यांनी ती सुद्धा कंपल्सरी करायचा प्रयत्न केला (प्रिस्कुलला). मी तरी जुमानलं नाही. "दमडीही भरणार नाही. मी माझ्या मुलाला डबाच देणार." असं सांगुन आले. ओके म्हणाले. ९. ओव्हरऑल फार चिकित्सक स्वभाव नसेल तर ही शाळा चांगली आहे. वेबसाईट्वर अभ्यासक्रमा विषयी माहिती मिळेल.

In reply to by पिलीयन रायडर

माझा भाचा गोखले नगरच्या साईडला जी परांजपे शाळा (भारती विद्याभवन) आहे, तिथे आहे. वहिनीचा अनुभव उत्तम आहे. पण ती शाळा एस.एस.सी बोर्ड आहे. एक शाखा शिवाजी पुतळ्यापाशी सुद्धा आहे. चौकशी करु शकता.

In reply to by के.के.

हो.. आणि तॉ आशियातली दुसर्‍या क्रमांकाची स्कुल चेन आहे असं ते १०० वेळा सांगतात. पण साध्या अ‍ॅडमिशन आणि फिस च्या पोलीसिज क्लिअर नाहित की कुठे डॉक्युमेन्टेड नाहीत. आधी संगीता रावजी होत्या मुख्यध्यापक तेव्हा चांगलं होतं जरा. आता ज्या आहेत त्यांच्यात फार निर्णयक्षमता नाही असे माझे मत आहे. मला माझ्या कामासाठी अखेर रावजींकडेच जावे लागले होते.

विवेकपटाईत 26/05/2016 - 11:54
दिल्लीत गल्लोगल्ली इंटर नेशनल शाळा आहेतच. शाळेत ac बस ac भरपूर पैसा घेणार्या. बाकी पैसा खर्च करायचा असेल तर देहरादून येथे बर्याच शाळा आहेत. आपल्या मुलाला शाळेंत घाला. काळा आंग्ल माणूस तैयार होऊन बाहेर पडेल. बाकी खरोखरच चांगले शिक्षण आणि स्वस्थ माणूस तैयार पाहिजे असेल तर पतंजलीचे हरिद्वारला आचार्यकुलं आहे. पण तिथे अडमिशन घेणे दुष्कर कार्य आहे.

चिंटु 26/05/2016 - 13:03
सगळ्यान्ना थेन्क्यू. ती हिंजवडीमधली प्रचेतस रावान्ची मर्सिडिज शाळा सप्त तारान्कित का काहीतरी म्हणता यावी अशी आहे. माझ्या मित्राला त्रितारान्कित पुरेशी आहे म्हणाला. त्यावरुन बजेटचा अन्दाज यावा. मिसळपाववरती चवकशी करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष कुणाचा कोणकोणत्या शाळेचा अनुभव कसा आहे हे समजून घ्यावयाचा आहे. म्हणजे साधारणतः पिलियन रायडर काकूंनी जसा नेमका फीडबॅक दिला तशा पद्धतीची माहिती, अनुभव ऐकण्यास आवडेल. इथे दिलेल्या वेबसाइट्स खरोखर कामाच्या आहेतच. त्याहीबद्दल थँक्यू. आणि अजून एक म्हणजे त्याला रेन्टवरती फ्लॅटही हवा आहे. त्यासाठी चान्गल्या सोसायटी तो शोधत आहे. त्याचे ओफिस कर्वेनगर कर्वे रोड वगैरे परिसरात असणार आहे म्हणाला. त्याचे प्राधान्य असे आहे -- १.सोसायटी गेटेड हवी. स्टेन्ड अलोन बिल्डिन्ग नको. २.लहान मोठ्या अ‍ॅमेनिटीज असलेल्या चान्गल्या. म्हणजे स्विमिन्ग पूल जिम्नेशियम वगैरे. २.पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळपास असावा असा आग्रह नाही. स्वतःची गाडी आहे. ३.फ्लॅटचा,सोसायटीचा प्लान चांगला हवा.हवेशीर , प्रशस्त,पुरेसा सूर्य प्रकाश असणारे हवे. ४.आसपास थोडी शांतता असलेले जास्त चांगले. गोंगाट नको. म्हणजे अगदिच रस्त्यावरचे नको. ५.ऑफिसपासून दहा पंधरा किलोमीटर पर्यंत अंतर असलेले चालेल म्हणाला. ६.पाण्याचा प्रोब्लेम नसायला हवा. फार मागे कोथ्रुड डेपो परिसरात होता म्हणतात किनारा होटेलच्या पलिकडच्या बाजूला.झालच तर खराडी विमाननगर परिसरात पण काही चान्गल्या सोसायटीत पण पाण्याचा प्रोब्लेम होता सुरुवातीला.तर तसे होयला नको आहे. त्याच्या अपेक्षा ऐकून डोळ्यासमोर वारजे नाक्याजवलच्या आदित्य गार्डन सिटीचेच नाव आले.तर अशा सोसायटी सुचवू शकाल का. कोथरुड कर्वेनगर पौड रोड वनाज ते वारजे नाका किन्वा अगदि एस बी रोड , मॉडेल कॉलोनी,आयडीयल कॉलोनी ह्या दरम्यानच्या पट्ट्यात त्याला मिळाल्यास उत्तम, असे मला वाटत आहे. पण तिकडे अशा सोसायटी आहेत का. माझे जे थोडेफार फिरणे झाले आहे त्याप्रमाणे अशा सोसायटी वाकड पिम्पळे सवदागर भागात जास्ती दिसल्या आहेत.पण वाकड पिम्पळे सवदागर शक्यतो नको आहे. बाणेर त्यातल्या त्यात चालेल. मॅजिक ब्रिक्स डोट कोम वगैरेवरती जाउन पाहणे होणारच आहे. पण इथे तुम्ही लोक स्वतःच्या अनुभवातून आणि पाहण्यातून सान्गू शकताल तर ते जास्ती कामाचे वाटते. तुम्ही स्वतः रहात असलेली जागा किन्वा जिथे तुमचे येणे जाणे झाले आहे होत असते अशा जागा हव्या आहे. सिन्हगड रोडवरती सन सिटी आहे म्हणतात. ती कशी आहे कुणी सान्गेल का.

In reply to by यशोधरा

मित्राला म्हणावे, शहर बदला नाहीतर स्वतःला बदला. >>> हा सल्ला सगळ्यात भारी होता.... पिलियन रायडर काकूं >> कॉलींग पिरा ;-)

In reply to by अभ्या..

नाखु 26/05/2016 - 15:51
त्ये त्यांच्या कुटुंबासकट पेईंग गेष्ट म्हणून ठेवणारे यजमान शोधणार आहेत तोवर थोडी कळ काढा. त्या बद्दलच्या (यजमानांनी पाळायच्या) अटी आणि शर्तींवरून शेवटचा हात फिरवायचे काम चालू आहे. "सल्ला आहे का उधारी , संपतच नाही" या लेखातून साभार :पुस्तक मिपा संपादीत :"मिपाची मानगुट आणि वेताळ" संदर्भी नाखु

In reply to by चिंटु

@ चिंटू पिलियन रायडर काकूंनी... "तुमचं नाव 'चिंटू' आहे इकडे लक्ष देऊन पिरांनी तुम्हाला माफी करावी" अशी देवाची प्रार्थना करा ! ;) =))

इरसाल 26/05/2016 - 13:19
या धाग्यावर चिंटुने पहिली ठिणगी टाकली आहे.....पिलीयन रायडर काकु म्हणुन.......भोआकफ ;)

चिंटु 26/05/2016 - 14:32
आहो मी काही पैशेवाला नाहीये. माझा मित्र त्याच्या मुलाची दर महिना जितकी फी भरतो तितका अजून इ एम आय पण भरु शकलो नाही आहे मी. आणि स्वतासाठी विचारायला आवडल असत मला. तुमचे इथले प्रतिसाद मी शुभेच्छा म्हणून स्वीकारतो की आज नसलो तरी उद्या पैशेवाला होइन म्हणून. आमचा जुना परिचय आहे; आणि विशेष कौटुन्बिक समन्ध आहे म्हणून त्याच्यासाठी विचारतो आहे. फार दिवसात भेट नसली तरी आमची दोस्ती चांगली आहे. आणि आता त्याचा इथे गावाशी टच राहिला नाही तर मदत करणे माझे काम आहे. त्याने पण आम्हला गरज असताना मदत केलेली आहे. इथे कोणी पण मधूनच प्रश्न करत राहतात. आणि प्रश्न पण सरळ अर्थाचे नसतात. किंवा "शहर बदला" वगैरे सल्ले देतात. मी ह्याआसाइटवरती नेहमी येत जात राहिलो असतो तरी असच केल असत का. मला कोणी काही विचारल आणि मला जमत असेल तर मी मदत करतो ; आणि करता येत नसेल तर निदान टवाळी करायला जात नाही. कोणता माणूस कोणत्या परिस्थितीत आहे आपल्याला माहित आसते का. आसे करणे मग बरोबर आहे का. आणि पिलियन रायडरजी मी तुम्हाला मुदाम नाही म्हणालो काकू वगैरे. आता लक्षात ठेवतो की काकू पेक्षा सगळ्यन्ना "जी" लावायचे. माफी करा. मला काही इथल्या लोकान्सारख छान छान लिहिता येत नाही. तर माझे दोस्त पण बनत नाहीत. पण मी ही साइट वाचतो. मला तुम्ही लोक चान्गले वाटले म्हणून अलो. मला वाटले की खुप सारे लोक आहेत तर ह्यान्ची मुले शाळेत जात असतील. ह्यान्च्याकडून काही सल्ला मिळेल. आदुबाळने तर किती चान्गली लिन्क दिली आहे. तर असे काही सान्गा ना.

In reply to by चिंटु

यशोधरा 26/05/2016 - 15:24
अहो दादा, तुमच्या मित्राला एकूणच सगळे आखुडशिंगी बहुदुधी हवे आहे असे दिसतेय, जे मिळणे तसे कठीणच आहे. आदुबाळ ह्यांनी दिलेली लिंक पाहिलीत का? सीबीएससी शाळांची लिंक पाहिलीत का? जे हवे आहे त्यासाठी तुम्ही/ तुमचा मित्र स्वतः काही हातपाय हलवताय का? पब्लिक फोरमवर सल्ला मागितल्यावर प्रश्न विचारले जाणार आणि सल्ले पण देणारच की. हे हनकोप,, ते ही नको मग नक्की हवेय तरी काय?

In reply to by चिंटु

"सारे मिपाकर एकमेकाचे मित्र आहेत" हा मिपावरचा एक अलिखित नियम आहे. तेव्हा इतके संवेदनाशील (पक्षी : बोली मराठीतला 'टची') होऊ नका. मित्रामित्रांत थोडिशी थट्टामस्करी आणि थोडेशी पायओढी होणारच. ते तर जीवनातले मीठ आहे, नाही का ? किंबहुना, ही विनेदाची झालरच मिपाचे खास वेगळेपण आहे. तेव्हा... दुरावा सोडा आणि मदत आणि चेष्टामस्करी दोन्हीही मित्रत्वाच्या भावनेने मजेत स्विकारा... बघा किती मजा येईल ते !

Maharani 26/05/2016 - 15:26
Mazya maitrinichi mulagi victorius kids educare ya International shalet jate.Ti shala IB abhyaskram follow karat.Shala chan aahe asa ticha abhipray aahe. http://www.victoriouskidsseducares.org/ Hi link bagha.

नितीन पाठक 26/05/2016 - 16:18
नमस्कार, Lexicon International School वाघोली, हडपसर आणि कल्याणीनगर येथे आहे. कृपया सविस्तर माहिती साठी खालील लिंक पहावी. http://www.lexicon.edu.in/# धन्यवाद.........

मला तर असे वाटते की चिंटुचे मित्र कुणा सरदार घराण्याचे वारसदार असावेत ज्यांची बडदास्त ठेवण्याचे काम या बिचार्या चिंटू साहेबांवर आले असावे

झकास 26/05/2016 - 21:24
हे बघा : www.indusschoolpune.com. दोन मित्रांची मुले आहेत ह्या शाळेत. दोघेही खुश आहेत. पण फी वगैरे माहीत नाही.

शैलेन्द्र 26/05/2016 - 23:57
Sorry, I have to write in english due to some technical problem. Mi itakyatach punyat shift jhalo, mulaga ithe ICSE la asalyaane CBSC kinva ICSE board baghat hoto- majya baghanyat aalelyaa kahi changalya shala, tyavarache remark aani varshik Fee 1) Gurukul- E Square mage, changali shala pan admission milane kathin Fee 70 hajar 2) Vidya vally- Sus Gaon- Parat changali aani majori shala admissioncha bharavasa nahi, Fee 70 hajar 3)Ryan International- Bavdhan- OK shala, mala christian vatavaran nahi aavadal- Fee 70 hajar 4)Vibgyor- OK shala, Fee 2 lakh 5) S S Ravishankar- mi ithe admission ghetali- Bhugavla aahe, English madhyamatali marathi shala, Fee 50 K Baki itar anek aahet, thodya far farakane changalya vait..

In reply to by शैलेन्द्र

सस्नेह 27/05/2016 - 14:12
Fee 70 hajar Fee 2 lakh Fee 50 K ही शाळेची फी आहे की इंजिनिअरींग कॉलेजची ?

In reply to by सस्नेह

नाखु 27/05/2016 - 14:37
है देनेवाले है, इसलीये तो लेनेवाले है!! पी एम्टी बशीतला प्रवाशी नाखु

In reply to by नाखु

सस्नेह 27/05/2016 - 15:04
पी एम्टी बशीतला
अगदी कोंडुसकरच्या बशीची फीसुद्धा कमी आसल. माझा मुलगा सीबीएसई स्कूलला होता त्याची दहावीची फी ४५ ह. होती. यात युनिफॉर्म, पुस्तके वह्या, स्पोर्ट्स ड्रेस, जेवण आणि ट्रान्सपोर्ट हे सगळं अंतर्भूत होतं.

In reply to by सस्नेह

मोजून १० वर्षांपूर्वी मी इंजिनियरींगला वर्षाला मोजून १५००० भरायचो. सहा वर्षात (२ वाय्डी ;) ) / खरंतर आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाही कसलाही क्लास/शिकवणी/ट्युशन नाही. माझा इंजिनियरींगचा एकूण खर्च २००१-२००७ एक लाखापेक्षा जास्त नसावा.

इरसाल 27/05/2016 - 10:52
परत (इथे तोंड वेंगा-डुन डोळे उर्ध्व अशी स्मायली)..... टाकलीस काडी..........!!!

चिंटु 13/06/2016 - 15:44
सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार. अखेर पवार इन्टरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश मिळाला आहे. शिवाय डोनेशन लाग॑ले नाही काहीही.तुम्ही सगळ्यान्नी दिलेल्या माहितीचा पण उपयोग झाला. चार नवी नावे समजली. निवडताना काय व कसा विचार करावा हेसुद्धा समजले.

ऋषिकेश 13/06/2016 - 16:15
इतक्या फिया ऐकल्या की मुलीला साध्याशा मराठी येस्सेस्सी शाळेत घातल्याबद्दल समाधान वाटते. वेळ पडली तर उरलेल्या पैशात तिच्याचसाठी कितीतरी गोष्टी करू शकेन!