चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा
नमस्कार मिपाकरान्नो.
मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो.
माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत. पोरासाठी चान्गल्या शाळान्च्या शोधात तो आहे. सी बी एस इ बोर्डाच्या शाळा तो शोधतो आहे. त्याच्या अपेक्षान्च्या बर्याच जवळ नान्देड सिटीजवळील पवार इन्टरनॅशनल स्कूल जाते, चान्दणी चौकाजवळची सन्स्क्रुती इन्टरनॅशनल स्कूलही जाते. पण तो अजूनही पर्याय बघून काय ते नक्की करु इच्छितो.
माझा अनुभव आणि आवाका अभिनव, ज्ञानप्रबोधिनी, सेवा सदन , नूमवि इतपतच मर्यादित आहे. पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून म्हटलं मिपाकरान्ना विचारावं काय ते. तुम्ही काही सुचवू शकाल तर फार बर होइल मित्रान्नो.वरील शाळांच्या लायनीतल्या इतर शाळा सुचवल्यात तर बर होइल. फीस ही तशी त्याला फार मोठी अडचण वाटत नाही. तुम्ही इथे जे सुचवाल त्याबद्दल जर एखाद दोन ओळी , का चान्गला वाटतोय तो पर्याय ह्याबद्दलही लिहाव अशी विनन्ती करतो. अर्थात का चान्गली वाटते शाळा ह्याबद्दल नाही लिहिलत तरीपण चालेल. समजा इतर कुणी काही सुचवलेल्या पर्यायविषयी तुमचं मत चान्गल नाही आहे , किंवा काही तत्सम सांगायच आहे, तर व्यनिचा पर्याय निवडलेला उत्तम. नाव घेउन सान्गायचे असल्याने जाहिर सान्गताना चान्गल्या बाबी सान्गाव्यात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इंटरनॅशनल का?
हो
लोल!
आनि
:)
आंतरराष्ट्रीय शाळाच का हवी
आहो
नाही हो, मी तर साध्या शाळेत
आहो
गम्मत
चिंटुभाऊ, आंतरराष्ट्रीय शाळा
ओके
walnutschool.org/
वाबळेवाडीची झेडपी शाळा बेस्ट
ओके
तुमच्या मित्राला इंनॅ
हेच..
पुण्यातील सीबीएससी शाळा.
मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल
वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये.
बापरे! काय फी म्हणायची का
मुवी लक्ष्यात
कालच एकाशी बोलणे झाले.....
बापाच्या न्यूनगंडांचा मुलांना
कैच्या काही .... :ऑ
symbiosis international
गुंता
नम्र वीनन्ती
त्याचं असं आहे बघा
हा हा हा....... पोट धरुन हसलो....
हा हा हा....... पोट धरुन हसलो....
धन्यवाद रघुनाथ
थोडक्यात ह्या पण धाग्याचं
आंतरराष्ट्रीय शाळा हवी असेल
माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस
माझा भाचा गोखले नगरच्या
ट्री हाऊस
हो.. आणि तॉ आशियातली दुसर्या
दिल्लीत गल्लोगल्ली इंटर नेशनल
थेन्क्यू
मित्राला म्हणावे, शहर बदला
मित्राला म्हणावे, शहर बदला
अगं मी पन्नाशीला आले आता..
लोकांच्या लग्न करतानाही
मीच माझा मित्र असं काही असावं
प्रतिसादांचं डिटेलिंग पाहुन
कामवाली, धुणेभांडी, कुक,
हळू हळू
अॅक्च्युअली यांनी सर्व्हिस
"मिपाची मानगुट आणि वेताळ"