Skip to main content

चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा

लेखक चिंटु यांनी बुधवार, 25/05/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरान्नो. मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो. माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्‍याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत. पोरासाठी चान्गल्या शाळान्च्या शोधात तो आहे. सी बी एस इ बोर्डाच्या शाळा तो शोधतो आहे. त्याच्या अपेक्षान्च्या बर्‍याच जवळ नान्देड सिटीजवळील पवार इन्टरनॅशनल स्कूल जाते, चान्दणी चौकाजवळची सन्स्क्रुती इन्टरनॅशनल स्कूलही जाते. पण तो अजूनही पर्याय बघून काय ते नक्की करु इच्छितो. माझा अनुभव आणि आवाका अभिनव, ज्ञानप्रबोधिनी, सेवा सदन , नूमवि इतपतच मर्यादित आहे. पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून म्हटलं मिपाकरान्ना विचारावं काय ते. तुम्ही काही सुचवू शकाल तर फार बर होइल मित्रान्नो.वरील शाळांच्या लायनीतल्या इतर शाळा सुचवल्यात तर बर होइल. फीस ही तशी त्याला फार मोठी अडचण वाटत नाही. तुम्ही इथे जे सुचवाल त्याबद्दल जर एखाद दोन ओळी , का चान्गला वाटतोय तो पर्याय ह्याबद्दलही लिहाव अशी विनन्ती करतो. अर्थात का चान्गली वाटते शाळा ह्याबद्दल नाही लिहिलत तरीपण चालेल. समजा इतर कुणी काही सुचवलेल्या पर्यायविषयी तुमचं मत चान्गल नाही आहे , किंवा काही तत्सम सांगायच आहे, तर व्यनिचा पर्याय निवडलेला उत्तम. नाव घेउन सान्गायचे असल्याने जाहिर सान्गताना चान्गल्या बाबी सान्गाव्यात.

वाचने 19532
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by सस्नेह

मोजून १० वर्षांपूर्वी मी इंजिनियरींगला वर्षाला मोजून १५००० भरायचो. सहा वर्षात (२ वाय्डी ;) ) / खरंतर आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाही कसलाही क्लास/शिकवणी/ट्युशन नाही. माझा इंजिनियरींगचा एकूण खर्च २००१-२००७ एक लाखापेक्षा जास्त नसावा.

बाकी काही असो, पिलियन रायडरला काकू म्हणालात ते महागात पडणार बहुतेक! जावा आता, काह्ही माहिती मिळणार नाही, शोधा आपले आपण!

परत (इथे तोंड वेंगा-डुन डोळे उर्ध्व अशी स्मायली)..... टाकलीस काडी..........!!!

चिंटु नक्की कुठे काकू म्हणाला ते काही सापडलं नाही... अर्थात काकूंना काकू म्हणण्याबाबत कोणी का का कू करावी काही कळेना!

सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार. अखेर पवार इन्टरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश मिळाला आहे. शिवाय डोनेशन लाग॑ले नाही काहीही.तुम्ही सगळ्यान्नी दिलेल्या माहितीचा पण उपयोग झाला. चार नवी नावे समजली. निवडताना काय व कसा विचार करावा हेसुद्धा समजले.

इतक्या फिया ऐकल्या की मुलीला साध्याशा मराठी येस्सेस्सी शाळेत घातल्याबद्दल समाधान वाटते. वेळ पडली तर उरलेल्या पैशात तिच्याचसाठी कितीतरी गोष्टी करू शकेन!