Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : बाबांनी दिवा आणला तेव्हा..

लेखक स्मिताके यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

बाबांनी दिवा आणला तेव्हा.. फिनिश भाषेतील मूळ कथा - When Father Brought Home The Lamp by Juhani Aho (1883) इंग्लिश भाषांतर - R. Nisbet Bain. मूळ फिनिश कथेचे लेखक Juhani Aho (१८६१-१९२१) या टोपण नावाने लिहिणारे Johannes Brofeldt हे फिनिश भाषेतील एक प्रसिद्ध पत्रकार, लेखक, कादंबरीकार होते. त्यांच्या लिखाणात रोजच्या साध्या...

दिवाळी अंक २०२१ : शांतित्व...

लेखक sunilkhodake यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

शांतीत्व... ------------ मी जगत आहे वर्तमानाचा भरभरून आनंद घेत भविष्यातील अत्याधुनिक स्वप्नांना निद्रिस्त पापण्यांआड रंगवत... निदान माझं एवढं तरी खरं आहे की, मी जपतो आहे मीठ-मिरची-भाकरीचा सुवर्ण भूतकाळ... म्हणूनच आज मी उभा आहे स्वाभिमानाने सुखादुखाला पचवून छातीत माती माखले पाय माझे घट्ट रोवून मातीत... - सुनील दौलत...

दिवाळी अंक २०२१ : सिगरेट

लेखक गर्दीतला दर्दी यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय ज्यातलं धगधगतं तारुण्य, कधीच विझलंय जेव्हा होतं ज्वलंत, तेव्हा कशाचीही फिकीर नव्हती मजेत धूर उडवत जगण्याची, सवय बनली होती मनातल्या विस्तवाला, मी कधीच शांत केलंय आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय जी ओढण्यात, बराच वेळ खर्च केलाय, दुभंगलेलं मन, मोजक्या जाणिवांचा खेळ सुरू झालाय...

दिवाळी अंक २०२१ : शब्द

लेखक विनायक पाटील यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

• शब्द • आज आपल्याला वाटतं की आपण हे चलन वापरतो, ते चलन वापरतो. या चलनाचं अवमूल्यन झालं किंवा त्याचा भाव वधारला. खिशात किंवा खात्यात चलन कमी झालं की आपण अस्वस्थ होतो. इतकं की चलन नसेल तर चलनवलन थांबेल, जग ठप्प होईल अशी आपल्याला भीती वाटत राहते. या धास्तीनेच कोरोना काळात बंद पडलेल्या व्यवहारांनी अनेक दुर्दैवी जिवांचं...

दिवाळी अंक २०२१ : मला दिसलेली जीवसृष्टी

लेखक MipaPremiYogesh यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

गेली काही वर्षे मी पक्षिनिरीक्षण, निसर्गात फिरणे असे करत असताना आलेले काही अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करतो. १. मी नुकताच नवीन घरी राहायला आलेलो. साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. बाल्कनीमधून बाहेर बघत असताना अचानक एक मोठ्ठा पक्षी दिसला आणि त्याच्या पायात काहीतरी होतं, पटकन खाली गेलो आणि बघितलं, तर शिक्रा...

दिवाळी अंक २०२१ : माहेरची वाट

लेखक Ramkrushn P Patil यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

माहेरची वाट माझ्या माहेरची वाट डोंगरपायथ्याची वाटेल कशी भीती ओळख बालपणाची वाटेला लागुनी झाडझुडपांची छाया देई उन्हात गारवा वाटे मायसारखी माया माय माहेरची वाट बाई चालते झपझप मायबाप येता याद डोळे पाणी आपोआप बहीण भाऊचं प्रेम पाहून दाटला ऊर भर उन्हात भाऊ उभा देखे वाट गाववेशीवर फफुटा तापला तापल्या पायवाटा सखी सोबती माहेरवाट...

दिवाळी अंक २०२१ : कवितेची जन्मकथा

लेखक kiran Dongardive यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

कवितेची जन्मकथा :- 'तुमचं काय गेलं?' - मंगेश पाडगावकर मराठी भाषेतील एक अवलिया कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. पाडगावकरांच्या अनेक कविता अजरामर झालेल्या आहेत. भावगीत गायक अरुण दाते, संगीतकार श्रीनिवास खळे, वेगवेगळे गायक-गायिका यामुळे तर भावगीत प्रांतामध्ये मंगेश पाडगावकर कायमस्वरूपी लक्षात राहणारे गीतकार कवी म्हणून ओळखले...

दिवाळी अंक २०२१ : मालमत्ता

लेखक सरिता बांदेकर यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

“आई,आपल्या नवीन फ्लॅटचं पझेशन मिळणार आहे पुढच्या महिन्यात. मग इंटिरियरचं काम चालू होईल.” समर उत्साहात मेघाला सांगत होता. “अरे इंटिरियर करणार म्हणजे? हे सामान? याचं काय करायचं?” मेघाला प्रश्न पडला. “अगं, मी ठरवलंय हे घर तसंच भाड्याने द्यायचं. म्हणजे ते फर्निचर हलवाहलवी नको. शिवाय तिकडच्या रूममध्ये ही कपाटं बसणार...

दिवाळी अंक २०२१ : सही

लेखक सरिता बांदेकर यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

छोट्या अभयला नेहमी आजोबांचा राग यायचा. आजी कशी गोष्टी सांगते, कधीकधी गाणीसुद्धा म्हणते. पण आजोबा कसले तरी कागद आणि भिंग घेऊन बसलेले असतात. आजी सांगायची, “तू नको लक्ष देऊस. तू माझ्याकडे ये, मी तुला गोष्ट सांगते.” मग अभय आजोबांशी कट्टी करायचा. पण अभय जसा मोठा झाला, तसं त्याच्या लक्षात आलं की आजोबा सगळ्यांच्या सह्या...