दिवाळी अंक २०२१ : सिगरेट
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय
ज्यातलं धगधगतं तारुण्य, कधीच विझलंय
जेव्हा होतं ज्वलंत, तेव्हा कशाचीही फिकीर नव्हती
मजेत धूर उडवत जगण्याची, सवय बनली होती
मनातल्या विस्तवाला, मी कधीच शांत केलंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय
जी ओढण्यात, बराच वेळ खर्च केलाय,
दुभंगलेलं मन, मोजक्या जाणिवांचा खेळ सुरू झालाय
संवेदनांनाही माझ्या, मी मूकबधिर ठरवलंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय
कैद या व्यसनाची, सवय म्हणून जपली
आयुष्य दुभंगलं, माझ्या मनात ती खपली
तिची वाट बघणं, हे आता रोजचंच चाललंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय
भीक आणि प्रीत, हे शब्द झालेत एकरूप
त्या मुक्या क्षणांना, मूक दिलं गेलं स्वरूप
मी एकटा, मी एकटा, हे रोजचंच रडगाणं झालंय
आयुष्य हे एक विझलेली सिगरेट बनलंय
उद्ध्वस्त झाल्यावर, पुन्हा उगवायची तयारी करतोय
तोल गेला आहे तरी, सावरायची तयारी करतोय
जगणं शापित अश्रू होतंय, आता भोगायची तयारी करतोय
फेकून जुन्या सिगरेटीस नवी पेटवायची तयारी करतोय....
पराग पाटील (गर्दीतला दर्दी...)
वाचने
4708
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
दर्दी काय दर्द आहे कवितेत
भावनात्मक काव्य.
धगधगते विचार
कविता आवडली.
छान कविता !
अर्रे जबराट
आवडली