Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : पॉलिनिशियात मानवाचे आगमन

लेखक केदार भिडे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

आपल्या सिद्धान्ताच्या पडताळणीकरता थॉर हेयरडाहल यानी पॅसिफिक महासागरात एका तराफ्यावरून आपल्या ५ सहकार्‍यांसह १०० दिवस प्रवास केला. या मोहिमेची कथा सांगण्याचा आणि त्या प्रश्नाची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. मानवाची पावले आज पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. पॅसिफिक महासागराचे एकूण क्षेत्रफळ पृथ्वीवरील उपलब्ध...

दिवाळी अंक २०२१ : पहिली रात्र!

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

पहिली रात्र! अर्थात, लग्नानंतरची पहिली रात्र. अशी रात्र, जिची अतिशयोक्त वर्णनं कथा-कादंबऱ्यांमधून, गीतांमधून वर्णिलेली असतात. अर्थात हेही खऱं की दोन विजा लखलखणार असतात. एकमेकांना टक्करणार असतात. अशा त्या रात्रीची वाट पाहण्यात रात्रीमागून रात्री लोटलेल्या असतात. प्रत्येकाची रात्र वेगळी. प्रत्येकाच्या मनातली रात्र...

दिवाळी अंक २०२१ : मन

लेखक सौ. माधुरी दशपुते यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

मनं मन माझे सैरभैर भिरभिरत जाई दूरवर कधी उंच उडे पाखरू कधी धरतीचा ठाव! मन माझे गंध सुगंध कधी दीपवात मंद कधी वेडापिसा छंद कधी मायेचे बंध! मन माझे नील आकाश कधी लख्ख ऊन प्रकाश कधी नुसताच वाटे भास कधी लडिवाळ हट्ट खास! मन माझे रातराणी कधी मैफलीतली गाणी कधी नेत्रातील पाणी कधी धावे रानोरानी! मन माझे चंचल वारा कधी स्तब्ध...

दिवा़ळी अंक २०२१ : कोर्टस्य प्रथम दिवसे

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

'पहिल्या'चे महत्त्व काही वेगळेच असते. खरे तर कुठलीही घटना, गोष्ट आपण अनुभवतो, त्या वेळी पहिलीच असते. तरीसुद्धा पहिले अमुक, पहिले तमुक अशा असंख्य 'पहिल्याचे'कौतुक असंख्यांना असते आणि बरेच जण त्या पहिल्याविषयी लिहीत असतात. कालिदासाने आषाढाच्या पहिल्या दिवसावर लिहिलेय! आता मी कोर्टातल्या पहिल्या दिवसावर! कोर्ट, जज्ज,...

दिवाळी अंक २०२१ : महाभारतातील सौंदर्यस्थळे

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्।। नारायण, नरश्रेष्ठ नर आणि देवी सरस्वती ह्यांना वंदन करुन जय ह्या ग्रंथाचे पठण करावे. महाभारतातील हा पहिला श्लोक. महाभारतातील सर्व १८ पर्वांच्या सुरुवातीला हा श्लोक येतो. नारायण म्हणजे विष्णू, नर म्हणजे अर्जुन आणि बुद्धिदेवता सरस्वती या तिघांचा...

दिवाळी अंक २०२१ : बासरी

लेखक किरण कुमार यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

बासरी ताम्र होता रंग दिव्याचा उंच खांबावरी समोर आला तत्परतेने कृष्ण सावळा हरी वस्त्र तोकडी ठिगळे आणिक पाठीवर गोणी पुढे चालता खळाळणारी खिशातली नाणी एक बासरी त्यात देखणी मनात भरलेली मुक्त सुरांना उधळत मी ती ओठी धरलेली निवडक वेळू कांताराचा गोंड्याने सजला मोह अनामिक कसा सुटावा रस्त्यावर मजला चाचपताना खिसे जरासे मेख जाणवे...

दिवाळी अंक २०२१ : हवाला

लेखक अनिंद्य यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

प्रसंग १ :- स्थळ: मुंबईतल्या अत्यंत गजबजलेल्या काळबादेवी भागातील एका जीर्ण इमारतीचा दुसरा मजला. मोडकळीला आलेल्या कुरकुरणाऱ्या लाकडी जिन्याने दोघे मित्र वर चढून आले. "जय श्रीक्रिश्ना मोटाभाई. तमारा अमुक सेठ आव्या छे. एना साथे तमने लाडवा मोकलूं छू.." समोर बसलेले झडपियाजी फोनवर कुजबुजले आणि समोरच्या टेबलावर धाड धाड...

दिवाळी अंक २०२१ : असे दुकानदार / ग्राहक येती राशीला

लेखक पियुशा यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

काही काही दुकानदार आणि आम्ही म्हणजे अस्मादिक यांचे गेल्या जन्मीचे काहीतरी वैर असावे, असे मला राहून राहून वाटते. गेल्या जन्मीचे त्यांचे किंवा आमचे भोग म्हणून ते भोग पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघांनी या भूतलावर जन्म घेतलाय,. अशी शंका येते. माझ्या शॉपिंग सेन्सचा माझ्या कुटुंबीयांना पहिल्यापासूनच धसका आहे. बाई काय घेऊन येईल...

दिवाळी अंक २०२१ : भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट कसोटी संघ

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट कसोटी संघ २५ जून - २८ जून १९३२ या कालावधीत भारत लॉर्ड्सवर आपला सर्वात पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर भारत आजतागायत ५५५ कसोटी सामने खेळलाय. त्यातील १६४ जिंकलेत, १७१ हरलेत, १ बरोबरीत सुटलाय व २१९ अनिर्णित राहिलेत. या ८९+ वर्षांच्या कालखंडात एकूण ३०२ भारतीय खेळाडू कसोटी सामने खेळले व...