Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : व्हॅम्पायर गर्लफ्रेंड

लेखक चॅट्सवूड यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

व्हॅम्पायर गर्लफ्रेंड “माझी गर्लफ्रेंड व्हॅम्पायर ए.” “काय?” “व्हॅम्पायर गर्लफ्रेंड?” गर्लफ्रेंड आगाऊ, मनमिळाऊ किंवा कामचलाऊ असू शकते, पण डायरेक्ट व्हॅम्पायर? इरा चहाचा कप खाली ठेवत म्हणाली, “निऱ्या, काही काय बोलतोयस?” तेव्हा नीरव खाली बघत म्हणाला, “मला माहितेय तुमचा विश्वास बसणार नाही..” “माझा विश्वास, बसला नाही, पण...

दिवाळी अंक २०२१ : कथा माझ्या ड्रायव्हिंग टेस्टची

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

२००४ साली अमेरिकेत, ह्युस्टनला पाय ठेवला. ह्युस्टनला पत्नीचे आई-वडील आणि एक मामा राहत होते, त्यांच्याकडे राहायला लागलो. ह्युस्टन भौगोलिकदृष्ट्या फार मोठे आणि पसरलेले शहर. त्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट अत्यंत कमी किंवा ‘न के बराबर’. स्वतःच्या गाडीशिवाय येथे पर्यायच नाही, ड्रायव्हिंग येणे कम्पल्सरी, त्यामुळे ह्युस्टनमध्ये...

दिवाळी अंक २०२१ : निदा फ़ाज़ली एका शायरचा मागोवा.

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

निदा फ़ाज़ली - एका शायरचा मागोवा. रेडिओवर गाणं लागलं होतं, कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता कहीं ज़मीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता मी विचार करत होतो, कुणी लिहिलंय हे गाणं? मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी की आनंद बक्षी? पुन्हा कधीतरी ऐकलं, तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो जहाँ उमीद हो इसकी वहाँ नहीं मिलता......

दिवाळी अंक २०२१ : 'आमृ'ताहुनी गोड

लेखक सरनौबत यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

'हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा' असे ऋतुचक्र अव्याहतपणे सुरू असते. दिवाळी आली की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे गुलाबी थंडीचे. गेल्या काही वर्षांत सर्वच ऋतूंवर पावसाळ्याने अतिक्रमण केले आहे. सध्या पुण्यात सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा असा ट्रिपल धमाका सुरू आहे. संक्रातीनंतर हवेतील गारवा हळूहळू कमी...

दिवाळी अंक २०२१ : मृगजळाची प्रतीक्षा

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

चित्रकार विशाल कामत एका रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत उभे होते. त्यांच्याबरोबर त्यांचे दोघे मित्रसुद्धा उभे होते. प्रथम दर्जाचा डबा कुठे येणार याची त्यांना हमालाने कल्पना दिली होती. त्यांच्याकडे दोन-तीन मोठ्या सूटकेसेस होत्या. थोड्याच वेळात गाडी आली. या स्टेशनवर ती फारच थोडा वेळ थांबणार होती. त्यांना जरा गडबड करावी...

दिवाळी अंक २०२१ : अतिलघुकथा अलक

लेखक मालविका यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

अलक १ ट्रेकिंगच्या निमित्ताने अनवट वाटा शोधणारा बिनधास्त असा तो सरांच्या खास मर्जीतला होता. हिची ट्रेकिंग ची पहिलीच वेळ. जरुरीपेक्षा जास्त सामान घेऊन आलेली. सरांचे वटारलेले डोळे बघताच हिचे डोळे भरून आले. मग तिचं समान घ्यायला तोच पुढे आला. कधी कठीण चढावर हात धरताना, ती मागे राहिली म्हणून तिच्यासाठी थांबायला असं करत...

दिवाळी अंक २०२१ : साकारते आहे एक अधुरे स्वप्न

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रहो, नुकताच वयाच्या सत्तरीत प्रविष्ट झालेलो आहे. जगरहाटीच्या दृष्टीने आता ‘म्हातारपण’ आलेले असले, तरी आपले हिरवेपण जपत काहीतरी शिकत राहण्याच्या प्रयत्नाला आणखी एक वळण मिळत आहे, त्याचा हा आढावा. लहान वयात सुरू झालेला माझा चित्रकलेचा छंद अजून चालत आलेला आहे. या दीर्घ काळात विविध माध्यमे हाताळत जे प्रयोग केले,...

दिवाळी अंक २०२१ : भूक

लेखक सन्जोप राव यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

जानबाच्या मिशा भल्यादांडग्या होत्या. माणूस चिमणीएवढा, पण मिशा दांडग्या. काळ्याभोर.. अगदी कलप लावल्यासारख्या. त्याला मधून मधून मिशांवरून हात फिरवण्याची सवय होती. म्हणजे मिशांना ताव दिल्यासारखं नाही, तर नुसताच हात फिरवल्यासारखं. पण त्या मिशा त्याच्या खंगलेल्या, पडलेल्या चेहर्‍यावर एकदम पिळक्या, बाहेरून लावल्यासारख्या...

दिवाळी अंक २०२१ : बेटावर एकटेपणाच्या

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

बेटावर एकटेपणाच्या ============= बेटावर एकटेपणाच्या धुमसे ज्वालामुखी स्मृतींचा ढळलेली उल्का झळझळती, अनाहूत कोसळून विझे आदिम इथली जमीन शापित हवा भारली, पाणी मंत्रित दिशा कुंठल्या, कातरवेळी घनगंभीर पडघम वाजे का धुपला नि:संग किनारा? का उसासतो जखमी वारा? अदम्य आशेचा निर्झर का क्षणैक उसळे, पुन्हा थिजे? ओथंबून बेटावर जेव्हा...

दिवाळी अंक २०२१ : थेटर!

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

"अरे, अशोकला 'आन मिलो सजना' लागलाय अन विजयला 'हाथी मेरे साथी'. काय करायचं?" - मित्र. "आन मिलो सहाचा पाहू अन तिथून विजयला जाऊ. साडेनऊचा 'हाथी मेरे साथी." मी. दहावीची परीक्षा डोक्यावर आलेली असताना लागोपाठ दोन सिनेमे पाहायचे असे बेत आखणारे केवळ मी आणि माझे मित्रच नव्हतो. 'एक ढूंढो, हजार मिलेंगे' असा तो जमाना!...