दिवाळी अंक २०२१ : मन
मनं
मन माझे सैरभैर
भिरभिरत जाई दूरवर
कधी उंच उडे पाखरू
कधी धरतीचा ठाव!
मन माझे गंध सुगंध
कधी दीपवात मंद
कधी वेडापिसा छंद
कधी मायेचे बंध!
मन माझे नील आकाश
कधी लख्ख ऊन प्रकाश
कधी नुसताच वाटे भास
कधी लडिवाळ हट्ट खास!
मन माझे रातराणी
कधी मैफलीतली गाणी
कधी नेत्रातील पाणी
कधी धावे रानोरानी!
मन माझे चंचल वारा
कधी स्तब्ध स्थिर किनारा
कधी रिमझिम पाऊसधारा
कधी गंध मातीचा सारा!
मन माझे अल्लड वेडे
कधी न सुटणारे कोडे
कधी आयुष्याचे धडे
कधी आनंद चोहीकडे!!!!..
By -सौ. माधुरी दशपुते /भामरे
वाचने
3803
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
आवडली कविता.
फारच सुरेख
आवडली
मनातलं मनाविषयी
सुंदर
सुरेख !मन माझे रातराणी
मन माझे रातराणी कधी मैफलीतली गाणी कधी नेत्रातील पाणी कधी धावे रानोरानी!हे छानच !