मनातील विचार : सकारात्मक आणि नकारात्मक
समुद्रात जेवढ्या लाटा उसळत नाहीत, त्याहून कितीतरी अधिक विचारतरंग मानवाच्या मनात सदैव उसळत असतात. सृष्टिकर्त्याच्या मनात एक विचार आला आणि या विशाल ब्रह्मांडाची रचना झाली. आपले प्राचीन ऋषी सांगतात, "जे काही ब्रह्मांडात आहे, तेच पिंडामध्येही आहे." म्हणजेच जे तत्त्व या विराट सृष्टीत कार्यरत आहे, तेच तत्त्व मानवी शरीरातही कार्यरत आहे.
मिसळपाव