वांग्याचे थालीपीठ आणि भरीत!
प्रेरणा : कर्नल साहेबांचा 'थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ' हा धागा आणि त्यावरचा गविंचा हा प्रतिसाद!
दोन-तीन महिन्यांतून करावी लागणारी फार्मच्या रेग्युलर मेंटेनन्सची कामे तिन-चार दिवस चालणार असल्याने नेहमीप्रमाणे शुक्रवारी न येता ह्यावेळी मंगळवारी संध्याकाळीच पेण मुक्कामी येऊन थडकलो. आता पुढचे तीन-चार दिवस रोजच्यापेक्षा अधिक फावला वेळ मिळेल तेव्हा रखडलेल्या 'कोकण, तळ कोकण, गोवा' मालिकेचा पुढचा भाग लिहिता येईल ह्या विचारात होतो पण काल सकाळी-सकाळी मिपावर येणे झाले आणि सगळा मनसुबा बोंबलला 😀
कर्नल साहेबांच्या थालीपीठवाल्या धाग्यावरच्या चर्चेत गवि साहेबांनी 'वांग्याचे थालीपीठ' हा ही भारी प्रकार असल्याचे आपल्या प्रतिसादात म्हंटलेले वाचले आणि (अगदी शब्दशः अर्थ घेऊ नये पण) "मेरे मन को भाया... मैं कुत्ता कांट के खाया" टाईप मानसिकता असल्याने हा पदार्थ आजच दुपारच्या जेवणासाठी बनवून खावा ह्या विचाराने मला पछाडले 😂
वांग्याच्या थालीपिठासाठी नेहमीच्या भाजणीच्या थालीपीठापेक्षा काही वेगळे बदल/ऍडीशन्स कराव्या लागतील का ह्याची विचारणा करायला दिलेल्या प्रतिसादावर मिळालेले "फार वेगळी प्रक्रिया नाही. भरताचे मोठे भाजलेले वांगे, किंवा तयार पण उरलेले भरीत किंवा काहीवेळा उकडलेले वांगे, कांदा इत्यादि मिसळून भाजणीचे पीठ भिजवावे." हे गविंचे उत्तर वाचले आणि कामाला लागलो!
लॉकडाऊनच्या मेहेरबानीमुळे बरेच खाद्यपदार्थ आता चांगल्या प्रकारे बनवता येऊ लागलेत, त्यात भाजणीच्या थालीपिठाचा आणि वांग्याच्या भरीताचा समावेश आहेच. मग एका पंटरला फोन करून बाजारातून भारीताचे वांगे मागवले.
रोजच्या राहत्या घरी असतो तर गॅस किंवा मायक्रोवेव्हमध्ये वांगे भाजावे लागले असते पण सुदैवाने पेणला आलो असल्याने इथे पारंपारिक पर्याय उपलब्ध होते. मग वर्क फ्रॉम होम मधुन थोडी उसंत मिळाल्यावर, जवळच पेण-खोपोली हायवे वरच्या एका परिचिताच्या धाबा टाईप खानावळीत जाऊन चुलीवर ते वांगे मस्त पैकी खरपूस भाजून आणले.

मग एका भांड्यात सोललेल्या वांग्याचे छोटे छोटे तुकडे करून ते चिवडून घेतल्यावर त्यात बारीक कापलेला कांदा, मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून त्याचे चांगले मिश्रण केले.




हे सर्व होईपर्यंत पावणे पाच वाजले, आता हा पदार्थ संध्याकाळी उशिरा बनवण्याचा निर्णय घेतला आणि हा कच्चा माल सरळ फ्रिजमध्ये ठेऊन दिला.
मग आठ-सव्वा आठच्या सुमारास हा ऐवज फ्रिजमधून काढून रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाहेर ठेवला.
साधारण तासाभराने त्यातला अर्धी वाटी माल भरीतासाठी एका वाटीत वेगळा काढून ठेवला आणि भांड्यात उरलेल्या मिश्रणात माध्यम आकाराची दोन थालीपीठे होतील अशा अंदाजाने आईने तीन-चार दिवसांपूर्वीच बनवलेली खमंग अशी ताजी भाजणी आणि चमचाभर ओवा घालून मस्तपैकी मळून घेतले आणि दोन गोळे तयार केले!

पावणे दहाच्या सुमारास नॉनस्टिक तव्याला थोडे तेल फासून (शक्यतो गोलाकार होईल असा प्रयत्न करून) त्यावर एक थालीपीठ थापले. ह्या पहिल्या थालीपिठाचा वापर एका विशिष्ट उद्देशाने करायचा असल्याने ते शक्य तेवढे पातळ थापले जेणेकरून ते छान कडक आणि क्रिस्पी होईल 😀

एकीकडे तव्या खालचा गॅस पेटवला तर दुसरीकडे भरिता साठी फोडणी बनवायला घेतली. चमचाभर साजूक तुपात थोडे जिरे, हिंग आणि बारीक कापलेली मिरची घालून एकदम खमंग फोडणी बनवली आणि वाटीत काढून ठेवलेल्या ऐवजावर ओतून त्यात थोडे दही घालून छान ढवळून घेतल्यावर एकदम टेस्टी वांग्याचे भरीत तयार झाले.

९० मिली स्मर्नऑफ व्होडका, त्यात एक उभी चीर दिलेली तिखट चवीची हिरवी मिरची आणि लिंबाचे दोन स्लाईस (त्यातला एक ग्लासच्या आत तर एक डेकोरेशनसाठी ग्लासच्या कडेवर 😀) आणि थंड पाणी असा जामानिमा एकीकडे तयार करून झाल्यावर त्याच्या जोडीस खरपूस भाजलेले 'वांग्याचे थालीपीठ' साजूक तूप, दही, अमूल बटर आणि अर्धी वाटी वांग्याचे भरीत चाखायला घेतले!

खरपूस भाजलेले वांग्याचे थालीपीठ आणि वांग्याचे भरीत चवीला उत्तमच झाले होते! वांगे चुलीवर भाजल्याने त्याला झकास स्मोकी फ्लेवर आला होता.
गविशेठ हा चविष्ट पदार्थ सुचवल्या बद्दल धन्यवाद "यु मेड माय लास्ट इव्हिनिंग" 🙏
(सोललेले वांगे)
वाचने
16698
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
मेरे मन को भाया...
In reply to मेरे मन को भाया... by तुषार काळभोर
"मेरे मन को भाया... मैं
वाह.. फोटो आणि वर्णन बघून,
मस्तच
In reply to मस्तच by कर्नलतपस्वी
(सर्वश्री) गवि आणि कर्नलतपस्वी :)
आपला हात जगन्नाथ
In reply to आपला हात जगन्नाथ by कंजूस
आमची आजी भाजणी पीठ भिजवून
In reply to आमची आजी भाजणी पीठ भिजवून by टर्मीनेटर
ह्याच्या जवळ जाणारा पदार्थ
In reply to ह्याच्या जवळ जाणारा पदार्थ by प्रचेतस
BTW 'उकडपेंडी' म्हणजे कोणता पदार्थ? तांदुळाचे पीठ, आंबट ताक
In reply to BTW 'उकडपेंडी' म्हणजे कोणता पदार्थ? तांदुळाचे पीठ, आंबट ताक by टर्मीनेटर
तीच ती.
In reply to आमची आजी भाजणी पीठ भिजवून by टर्मीनेटर
चव आणण्यासाठी फोडणी
In reply to चव आणण्यासाठी फोडणी by कंजूस
ढोकळ्यावर ओततो तशी फोडणी यावर घातली की चव येते.
वांगे आवडत नसल्याने
In reply to वांगे आवडत नसल्याने by प्रचेतस
पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी
In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
क्या बात है...
In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
पूर्वी मी देखील वांगं खात नव्हतो
In reply to पूर्वी मी देखील वांगं खात नव्हतो by विजय_आंग्रे
(मेटलने झालेल्या जखमा लवकर बर्या होत नाहीत) अशी बहुतेक
😂
अशा बऱ्याच 'अफवा' असतात, 'धूम्रपान करणारे लोकं लोणचे खात नाहीत' ही देखील त्यापैकीच एक अफवा! माझा एक मित्र शेकड्यांनी सिगरेट्स ओढतो आणि किलोंनी लोणची खातो 😀In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
हैद्राबादी जेवणात चार पदार्थ मुख्य असतात
In reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो. घरी (सुकी) भरली वांगी by टर्मीनेटर
पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Ranjithame - Varisu (Tamil) | Thalapathy Vijay | Rashmika | :- VarisuIn reply to पूर्वी मी पण वांगं खात नव्हतो by मदनबाण
पण हल्ली माझ्यात बदल झाला आहे, वांगी भाजी आता घरात देखील खातो
In reply to पण हल्ली माझ्यात बदल झाला आहे, वांगी भाजी आता घरात देखील खातो by टर्मीनेटर
एवढंच काय स्तुतीही करू लागलो . . .
In reply to एवढंच काय स्तुतीही करू लागलो . . . by कंजूस
भेंडीचं काय करता फार्मा -शेतातल्या?
सुरेख!खमंग भाजलेले वांगे,खमंग
वाह.
कातील!
In reply to कातील! by चांदणे संदीप
भक्ती । प्रा.डॉ.दिलीप बिरुटे । चांदणे संदीप
वांग्याच्या भरीताचे
अहाहा
एक नंबर!
वा !
छान
In reply to छान by सरिता बांदेकर
अरेरे... माझ्या आईलाही वांगे प्रिय पण मध्यंतरी तिलाही वांग्याची
श्वेता व्यास । रीडर । सोत्रि । कुमार१
कृती आवडली. हा प्रकार एकदा मी
ह्यापेक्षा.......
झकास
विवेकपटाईत | शानबा५१२ | नंदन
वाह वा: !
In reply to वाह वा: ! by आलो आलो
ह्याचा अचूक निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे पण दोन्ही
वाह