✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एकदा टारझन अंगात आला

ख — खिलजि, Tue, 04/24/2018 - 13:09
एकदा टारझन अंगात आला काढून टाकले कपडे सर्व पायपुसण्याचा लंगोट केला अन जंगल प्रवास सुरु झाला कुणीही ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले बाहेर येताक्षणी घराच्या भरपूर सारे कुत्रे मागे लागले वाट मिळेल तिकडे धावत सुटलो पारंब्या अन वेली शोधू लागलो नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून उड्या मारू लागलो आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता स्टेमिनापण संपत आला होता टारझन अंगातून कधीच निघून गेला होता लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट टारझन बनण्याच्या नादात पुरता झालो होतो चेकमेट सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
37019 वाचन

💬 प्रतिसाद (57)

मी पयला

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 04/24/2018 - 13:21 नवीन
कसं सुच्तं राव तुम्हाला ? रोजच्या स्वप्नात येणार्‍या गोष्टींवर सकाळी कविता लिहिता काय ?
  • Log in or register to post comments

:D:D:D:D

खिलजि
Tue, 04/24/2018 - 13:33 नवीन
धन्यवाद मेहेंदळे साहेब . या कल्पनेला अभिप्रायाचा प्रसाद दिल्याबद्दल सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

कसं सुच्तं राव तुम्हाला ?

श्वेता२४
Tue, 04/24/2018 - 13:34 नवीन
मला पण हाच प्रश्न पडलाय. (: )
  • Log in or register to post comments

वाह

जेम्स वांड
Tue, 04/24/2018 - 13:49 नवीन
टमरेल प्रहरी सुचलेली कविता (?) का?
  • Log in or register to post comments

पोट दुखायला लागलं हसून हसून!

बिटाकाका
Tue, 04/24/2018 - 13:58 नवीन
पोट दुखायला लागलं हसून हसून! कमल आहे बुआ कल्पनाशक्तीची!
  • Log in or register to post comments

कमल नाही कै, कमाल, कमाल!

बिटाकाका
Tue, 04/24/2018 - 13:59 नवीन
कमल नाही कै, कमाल, कमाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

कमल पण चालेल kaka

mayu4u
गुरुवार, 04/26/2018 - 10:35 नवीन
२०१९ मध्ये पुन्हा उमलणार आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

अवघड आहे :))

माहितगार
Tue, 04/24/2018 - 14:54 नवीन
अवघड आहे :))
  • Log in or register to post comments

गाड्या वेड्यावाकड्या चालवनार्‍यांनो सावधान :)

माहितगार
Tue, 04/24/2018 - 14:58 नवीन
हेल्मेट घालून गाड्या वेड्यावाकड्या चालवनार्‍यांनो ; टारझ्न किंवा ते जमले नाहीतर तशी कविता करणारे खिल्जी ही कदाचित तुमच्याही अंगात येऊ शकतील , सावधान :)
  • Log in or register to post comments

मला उगिच णिंबाळकराच्या टार्

अभ्या..
Tue, 04/24/2018 - 15:05 नवीन
मला उगिच णिंबाळकराच्या टार्‍याचि आटवन आली. म्हनलं हे कस काय ह्येंच्या अंगात आलं. असो. वाचाल तर लिहाल . सत श्री अकाल. ............ टारेश्वर झालास मटणकर
  • Log in or register to post comments

टारू

जेम्स वांड
Tue, 04/24/2018 - 15:12 नवीन
आजकाल स्वतःच्या अंगात मावत नाही म्हणे, ह्यांच्या अंगात काय मावणार, परत अंगात आला अन ह्यांनी ह्यांच्याच त्या दोन भिकारी कवितेप्रमाणे काही केले तर त्याची वाईट लागेल, वाट म्हणतोय मी!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मलापण तोच टारझण आटवला... :P

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/25/2018 - 21:22 नवीन
मलापण तोच टारझण आटवला... :P :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लै आटवू नकोस, चारजण चा एकजण

अभ्या..
Wed, 04/25/2018 - 22:01 नवीन
लै आटवू नकोस, चारजण चा एकजण होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

ट्रॅफीक पोलिसांनी

श्वेता२४
Tue, 04/24/2018 - 15:27 नवीन
ट्रॅफीक पोलिसांनी शिक्षा म्हणून वेड्यावाकड्या बाईक चालवणाऱ्यांच्या अंगावर या टारझनला सोडावे म्हणजे त्यांना कळेल सामान्य माणसाचे दुख
  • Log in or register to post comments

मिपाकाव्यक्षितिजावर

अनन्त्_यात्री
Tue, 04/24/2018 - 15:36 नवीन
सांप्रत उमललेल्या इतक्या _चाट काव्यप्रतिभेने दिपून काही वाचकांस तोंडात _ट घालावेसे वाटत असेल काय?
  • Log in or register to post comments

नक्कीच.

अभिजीत अवलिया
Tue, 04/24/2018 - 22:48 नवीन
नक्कीच. 'कविता करणे हे केवळ प्रतिभावान लोकांचे काम' हा माझा आतापर्यंतचा समज खिलजिंनी दूर पॅसिफिक महासागरात नेऊन बुडवला. सही —> आयुष्यात एक चारोळी लिहीणे देखील न जमलेला एक अभियंता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

बालगीत आहे.

कंजूस
Tue, 04/24/2018 - 21:19 नवीन
बालगीत आहे. चॅाकलेटचा बंगला असतो, बसवर उड्या मारणारा रितिक असतो तर हेल्मेटवाला टालझन का नसावा?
  • Log in or register to post comments

=))

जव्हेरगंज
Tue, 04/24/2018 - 22:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments

आवरा ! ;-)

दुर्गविहारी
Tue, 04/24/2018 - 22:40 नवीन
आवरा ! ;-)
  • Log in or register to post comments

हमारी तरफसे ये तोहफा

चित्रगुप्त
Wed, 04/25/2018 - 00:39 नवीन
चित्रकराने एकादी कल्पना सुचताच पटकन एकादे स्केच करावे तसे हे शीघ्र-काव्य आहे. यात अ‍ॅक्युरेटत्व, बारकावे, तपशील, थोर विचार असले काही नसण्यातच त्याची गंमत आहे. जियो खिलजी और हमारी तरफसे ये तोहफा कुबूल करो: Image removed..Image removed. Image removed..Image removed. Image removed..Image removed. Image removed..Image removed.
  • Log in or register to post comments

:D:D:D:D

खिलजि
Wed, 04/25/2018 - 18:16 नवीन
तोहफा कबुल हय आणि अच्छा भी हय . चित्रगुप्त साहेब सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लहानपणी आम्ही टारझन चित्रपट

प्रसाद गोडबोले
Wed, 04/25/2018 - 01:06 नवीन
लहानपणी आम्ही टारझन चित्रपट पाहिला होता , त्याचा अठवणी जाग्या झाल्या ! आजही पुलाखालुन इतके पाणी वाहुन गेल्यानंतरही टारझन हाच आमचा आवडता नंबर एक चित्रपट आहे . स्ट्ग्नेटीचा बदला हा त्या खालोखालचा आवडता चित्रपट म्हणता येईल पण त्यालाही टारझन ची तोड नाही ! ;)
  • Log in or register to post comments

स्ट्ग्नेटीचा बदला

mayu4u
गुरुवार, 04/26/2018 - 10:36 नवीन
याचा आधीचा भाग "सागरी लुटारू" हा पण चांगला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

टारझनचा नेमका कोणता चित्रपट ?

चित्रगुप्त
Wed, 04/25/2018 - 02:24 नवीन
@मार्कसपंत,
लहानपणी आम्ही टारझन चित्रपट पाहिला होता
हा नेमका कोणता चित्रपट होता ? साधारणतः कोणत्या सालचा असावा ? टारझनची भूमिका कुणी केली असावी ? (कदाचित जॉनी वेसमुल्लर किंवा गॉर्डन स्कॉट असेल) Image removed. (टारझन च्या भूमिकेत गॉर्डन स्कॉट : पुस्तकाचे मुखपृष्ठ) माझ्या लहानपणी वरील चित्र कव्हरवर असलेले इंग्रजी पुस्तक एका दुकानात शोकेस मधे ठेवलेले होते. माझा मोठा भाऊ कॉलेजला जाता-येताना त्या दुकानासमोर सायकल थांबवून बराच वेळ ते चित्र बघत उभा रहायचा, पण ते विकत घेण्याची ऐपत नव्हती. शेवटी एकदा हिम्मत करून त्याने दुकानदाराला विचारले की पुस्तकाचे फक्त कव्हर मला हवे आहे, ते केवढ्याला देशील ? तर दुकानदाराने लगेचच ते कव्हर काढून भावाला विनामूल्य दिले. आम्हा सगळ्या भावंडांना खूपच आनंद झाला. फ्रेम करण्याएवढेही पैसे तेंव्हा नसत, मग भावाने खोक्याच्या फळ्या कापून, घासून , रंगवून स्वतःच फ्रेम बनवली. ते चित्र बरीच वर्षे आमच्या घरात होते. आज जालावर हे चित्र मिळालेले बघून खूप आनंद झाला आणि या सर्व आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments

हा नेमका कोणता चित्रपट होता ?

प्रसाद गोडबोले
Wed, 04/25/2018 - 07:28 नवीन
हा नेमका कोणता चित्रपट होता ? साधारणतः कोणत्या सालचा असावा ? टारझनची भूमिका कुणी केली असावी ? >> हा हा हा . तेव्हा काहीही नोटीस केले नव्हते , कारण घाबरत घाबरत पाहिलेला पहिला चित्रपट ;) Image removed. असो आता आठवण आलीच आहे तर शोधणे आणि परत पहाणे आले ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तुम्ही म्हणताय तो टारझन

प्रचेतस
Wed, 04/25/2018 - 09:36 नवीन
तुम्ही म्हणताय तो टारझन चित्रपट एकेकाळी लैच पापिलवार होता. तो चित्रपट म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईतच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आत्ताच परत पाहिला ! इथे

प्रसाद गोडबोले
Wed, 04/25/2018 - 10:45 नवीन
आत्ताच परत पाहिला ! इथे पहाणे लीगल आहे ; #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा अप्रतिम आहे ! बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ;) सगळे केलेले जुगाड आणि सेटिंग्स आठवले , त्यात काही तरि वेगळे थ्रिल होते ! आता म्हणाजे सगळे नुसत्या क्लिक च्या अंतरावर आहे , ते थ्रिल कुठे तरी हरवली ह्या इन्टरनेटच्या युगात ! त्या चित्रपटात कसे शेवटी टारझन शहरी जीवनाला , त्यातल्या "धकाधकीच्या" "धावपळीच्या" जीवनाला कंटुनुन शेवटी कपडे फाडुन परत जंगलात निघुन जातो , तसे काहीतरी करायची सोय असली पाहिजे ! ख्या ख्या ख्या ! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लीगल असलेले पाहण्यापेक्षा

प्रचेतस
Wed, 04/25/2018 - 13:27 नवीन
लीगल असलेले पाहण्यापेक्षा इल्लीगल असलेले पाहण्यातच जास्त मजा होती असे नै वाटत का तुम्हास मार्कस सर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

क्या बात है!

जेम्स वांड
Wed, 04/25/2018 - 14:25 नवीन
तुम्ही आज लैच कंदारिया महादेव मंदिर संकुल मूड मध्ये दिसताय प्रचेतस भाऊ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जुन्या आठवणी हो, बाकी कै नै =

प्रचेतस
Wed, 04/25/2018 - 14:58 नवीन
जुन्या आठवणी हो, बाकी कै नै =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

लीगल इल्लीगल पेक्षा...

mayu4u
गुरुवार, 04/26/2018 - 10:38 नवीन
तेव्हा एक्सेस कठीण असल्यानं ध्येयप्राप्तीचा आनंद अधिक असायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्या चित्रपटात कसे शेवटी

आदूबाळ
Fri, 04/27/2018 - 14:13 नवीन
त्या चित्रपटात कसे शेवटी टारझन शहरी जीवनाला ...
शेवटपर्यंत पाहिला आणि कथावस्तू लक्षात ठेवली या ध्येयनिष्ठेची कमाल आहे! भार्ताला आज तुमच्यासारख्याच नऊ जवानांची गरज आहे. सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अहो चित्रगुप्त शुक शुक

जेम्स वांड
Wed, 04/25/2018 - 09:49 नवीन
मार्कसपंतांसी बहुतेक हेमंत बिरजे अन किमी काटकर असलेला ऍडव्हेंचर्स ऑफ टारझन सिनेमा अभिप्रेत असावा, कालानुरूप बऱ्यापैकी गरम दृष्ये असलेला हा सिनेमा पोरांना चोरुनमारुनच पहावा लागे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तो हा नव्हेच :)

प्रचेतस
Wed, 04/25/2018 - 09:54 नवीन
तो हा नव्हेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

तो पण ठावकी हाय प्रचेतस भो ;)

जेम्स वांड
Wed, 04/25/2018 - 10:25 नवीन
फक्त फट म्हणता सायलेंट (संपादक) अटॅक येऊन आयडी उडू नये म्हणून हा 'मध्यमार्ग प्रतिपाद' शिनुमा चिकटवलाय इथे, त्यो पिच्चर अन त्यातले कलाकार (!) नीट ठाऊक आहेत Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Wed, 04/25/2018 - 10:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

शेवटपर्यंत कुणीही टारझनच्या

अभिजीत अवलिया
Fri, 04/27/2018 - 19:31 नवीन
शेवटपर्यंत कुणीही टारझनच्या 'त्या' चित्रपटाचे नाव सांगितले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

खाली दिलंय

mayu4u
Fri, 05/04/2018 - 09:44 नवीन
https://www.misalpav.com/comment/993085#comment-993085
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

कवर श्टुरी झकास!!

कंजूस
Wed, 04/25/2018 - 07:20 नवीन
कवर श्टुरी झकास!! जंगलात प्राण्यांनी वाढवलेली मुलंमुली इंग्रजी च कसे बोलतात? शकु (शकुंतला) इंग्रजी बोलायची का टकाटक/फाडफाड/कूल?
  • Log in or register to post comments

पारंब्या अन वेली शोधू लागलो

मार्मिक गोडसे
Wed, 04/25/2018 - 08:17 नवीन
पारंब्या अन वेली शोधू लागलो अख्ख्या शहरात पसरलेल्या केबलच्या जाळ्याची एकही केबल दिसली नाही का टारझनला ? केबल पकडून प्रत्येक घराघरात पोचला असता 3D अवतारात.
  • Log in or register to post comments

वा वा वा

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 04/25/2018 - 12:50 नवीन
प्रतिसाद वाचायला परत परत या धाग्यावर फेरी मरुन जातोय :) त्य निमित्ताने बर्‍याच लोकांच्य बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हेही छानच
  • Log in or register to post comments

सर्व रसिकांचे/वाचकांचे

खिलजि
Wed, 04/25/2018 - 18:17 नवीन
सर्व रसिकांचे/वाचकांचे/प्रसादकांचे मनापासून आभार सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Wed, 04/25/2018 - 20:07 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Wed, 04/25/2018 - 20:07 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

कंपूबाजीचा टीव्र णिषेढ

चित्रगुप्त
Wed, 04/25/2018 - 22:08 नवीन
अरे काय लावलंय काय हे, आँ ?? ....'घाबरत घाबरत पाहिलेला पहिला चित्रपट काय, लैच पापी-लवार तरुणाईच्या गळ्यातील ताईतच" काय, कंदारिया महादेव मंदिर संकुल मूड काय, पोरांना चोरुनमारुनच पहावा लागणे काय, त्यो पिच्चर अन त्यातले कलाकार (!) नीट ठाऊक असणे काय, असले कंपूबाहेरच्या जन्तेला अगम्य प्रतिसाद....?? आम्ही आपले सज्जनपणाने जॉनी वेसमुल्लर का गॉर्डन स्कॉट असे विचारले, त्यावर एवढा शिमगा? आम्हाला मार्कस ओरालियस म्हणजे 'मार-कंस, उरेल यश' असे काहीतरी सात्विक,पौराणिक, मराठमोळे वाटत होते, पण आता ते 'मार-कश, ओरल यस' असे बेंगरूळ हिंग्लीश आहे की काय, असे वाटू लागले आहे. तेंव्हा आतातरी कुणीतरी 'त्या' टारझनपटाचे नाव सांगा बरे.
  • Log in or register to post comments

आतातरी कुणीतरी 'त्या'

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/26/2018 - 02:07 नवीन
आतातरी कुणीतरी 'त्या' टारझनपटाचे नाव सांगा बरे. Tarzan - Shame of Jane १९९४ टारझन च्या भुमिकेत रोक्को सिफ्रेदी आणि जेन च्या भुमिकेत रोसा कॅरास्सिओलो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हाय हाय!

जेम्स वांड
गुरुवार, 04/26/2018 - 08:29 नवीन
हे हे हे हे हे हे, रोजा म्हणजे काय हे आपलं ते हे हे हे हे हे हे हे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सदरहू

नाखु
Wed, 04/25/2018 - 22:44 नवीन
टारझन महाशयांनी लक्ष्मी रस्त्यावर चक्कर मारली असती तर नवीन कपड्यांचा वापर करता आला असता अखिल मिपा विविध भारती "बाळाराम मार्केट"मधुमालती कार्येक्रम श्रोते संघ सामान्य सदस्य नाखु
  • Log in or register to post comments

लोल! नाखुचाचा!

चांदणे संदीप
गुरुवार, 04/26/2018 - 00:28 नवीन
अय्या टारझन! तो पण बाळाराम मार्केटमध्ये! "सुटाकाना, शर्टाकाना, सफारीकाना! लोल! =)) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

?

माहितगार
गुरुवार, 04/26/2018 - 16:12 नवीन
बाकी सर्व ठिक - अभिव्यक्ती स्वातंत्र्य योग्यच हो मंडळी , पण कविता (धागा लेखातलीच ) कविता म्हणून कशी वाटली ? ते भाबड्या कवि महोदयांना कुणि मोकळेपणाने सांगाल की नाही .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा