तुमच्या देशात....
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नाही हो गवि! तो ही देश चांगला
तुम्ही वीतभर कपडे घालून
तुझा घोळ होतोय. Boys talk
आपणांस मुद्दा समजलेला नाही*
या विषयावर माझ्या या (जाने
पण तरीही ओव्हरॉल बायकांकडे
=============================
निकषांमध्ये पाहणाऱ्यांची
एमएमएस
स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन
मेरा भारत महान वगैरे भ्रम मला
साशंकता
देशाभिमान बाळगत २४*७ अत्याचार
देशाभिमान शिल्लक असेल किंवा
मेरा भारत महान वगैरे भ्रम मला
खरा देशाभिमान असलेले अत्याचार
एक मिनीट नीट लक्ष द्या
मला असे वाटते
कवयित्रीच्या भावना समजावून न
@ प्रचेतस , भावनांच्या
माहीतगारसाहेब डोंट माइंड, पण
चर्चा तुलने सोडून कन्स्ट्रक्टीव्ह सुधारणांकडे न्यावी
कन्स्ट्रक्टिव्ह सुधार्णा अशा
Very Shameful These pictures
व्हेरी चीप स्ट्रॅटेजी
धागा लेखिकेच्या भावना समजू
परफेक्ट इन पॉलीटीकल करेक्टनेस
मानसिकता
शेवटच्या वाक्यासाठी सहमती
चर्चा ही भारतातली स्त्रियांची
+१
माझा आक्षेप कशाला आहे?
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'. यातून एका अडनिड्या वयातल्या शाळकरी मुलीच्या मनात काय प्रतिमा निर्माण होत असेल? एक स्त्री म्हणून तुम्हाला आलेली उद्विग्नता मान्य आहे पण म्हणून संपूर्ण देशाला आणि पर्यायाने समस्त भारतीय पुरुष स्त्रियांवर अत्याचार करतात असं चित्र उभं करण्यावर आक्षेप आहे. भारतात किती परदेशी पर्यटक दर वर्षी येतात याचे स्टॅटिस्टिक्स या रिपोर्ट मध्ये आणि या बातमी मध्ये बघा. रिपोर्ट प्रमाणे ८-१० मिलियन परदेशी लोक भारतात दर वर्षी येतात. यात अगदी ३०-३५ टक्के स्त्रिया धरल्या तरी या सगळ्या स्त्रियांवर बलात्कार होतात काय? जरा इंटरनेट वर ट्रॅव्हल ब्लॉग्स धुंडाळलेत तरी सोलो फिमेल ट्रॅव्हलर्सचे भारतातले अनुभव वाचायला मिळतील. काही अपवाद वगळता बहुतेक स्त्रिया म्हणतात की त्यांना चांगला अनुभव आला आहे. अर्थात टॅक्सीवाले फसवतात किंवा गाईड मागे लागतात हे आहेच पण ते बहुतांशी आर्थिक फायद्यासाठी असतं. या स्त्रियांच्या मते लोक त्यांच्याकडे बघत बसतात किंवा त्यांच्याबरोबर फोटो काढायला येतात, पण त्यात त्या स्त्रियांना फार काही वावगं वाटत नाही. अर्थात बार किंवा पब मध्ये गेल्यावर सावध राहावं असा सल्ला पण या स्त्रिया देतात. पण बार/ पब सारख्या ठिकाणी हे प्रकार तर कुठल्याही देशात घडतात. इतर ठिकाणी होणाऱ्या sexual abuse बद्दल नुकतेच झालेले #metoo campaign बघा. अमेरिकेसारख्या देशात हायस्कुल आणि कॉलेजमध्ये एकदा जाऊन बघाच. या देशांमध्ये तरी सेक्स हा taboo मानला जात नाही तसेच स्ट्रीप क्लब वगैरेसारख्या ठिकाणी लोक्स हौस भागवून घेऊ शकतात तरीही बलात्काराचे, कुमारी मातांचे तसेच अल्पवयात झालेल्या लैंगिक आजारांचे स्टॅटिस्टिक्स बघा. बाकी देशांची तुलना होणं स्वाभाविक आहे कारण धागालेखिका दुसऱ्या देशातील मुलीला भारताबद्दल सांगत आहेत. बरं कौतुक कशाचं तर दगडाने ठेचून किंवा हात पाय तोडून मारतात याचं? तिथे तर स्त्रीने बलात्कार झाला हे स्वतः सांगून मानत नाहीत, त्यासाठी २ पुरुषांची साक्ष लागते. वर ती सिद्ध करू शकली नाही तर दगडाने ठेचून मरण तिच्या वाट्याला पण येऊ शकतं. त्यामुळे असं सरसकट विधान करण्यापेक्षा त्या मुलीला खालील प्रमाणे सांगणं उचित ठरलं असतं - - भारतात बहुतेक सर्व ठिकाणी गर्दी असते, त्यामुळे चुकामुक होण्याची शक्यता आहे. तरी सतत आपल्या कुटुंबाबरोबर रहा. - आईवडिलांना सोडून एकटं कुठेही जाऊ नकोस. - प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गोष्टी स्वीकारू नकोस/ खाऊ नकोस. - जर आपल्या कुटुंबाबरोबर चुकामुक झालीच तर काय करावं. या आणि अश्या सारख्या सूचना दिल्या असत्या तर योग्य ठरलं असतं. भारतात सगळं आलबेल आहे असं मुळीच म्हणणं नाहीये पण म्हणून अगदी सरसकट सगळ्या मुलींवर बलात्कार होतात किंवा सगळे पुरुष वासनांध आहेत आणि संधी मिळेल तेव्हा लैंगिक अत्याचार करतात हे सांगणं पण चुकीचंच आहे. माझ्या आधीच्या प्रतिसादात युरोपात आणि अमेरिकेत घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्याचं कारण हेच होतं की स्त्रियांवर अत्याचार या प्रगत देशातही होतातच. अमेरिकेत तर इतकी मस्त गोंडस लहान मुलं दिसतात सहज नुसता गालाला हात लावायची इच्छा होते. पण नुसतं बोट जरी लावलं तरी पेडोफाईल म्हणून तुमच्यावर संशय घेतला जातो. हे काय अकारण होतं का? तशी लोक होती आणि आहेत म्हणून तर असे कायदे बनवलेत. पण म्हणून काय अश्या लोकांची संख्या आणि असे गुन्हे कमी झाले का? तुमच्या आसपास कुठले गुन्हे घडले आणि किती गुन्हेगार राहतात याची माहिती देणारी मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. न्यू यॉर्क, जर्सी सारख्या भागात पहिल्यांदा जेव्हा मी ऍप डाऊन्लोड केलं तेव्हा मला धक्का बसला. बरं अमेरिकेत तर काय गन सहज मिळते आणि वापरता येते. पण म्हणून अजून तरी कुठल्या अमेरिकनाने त्याच्या देशात फिरायला येऊ पाहणाऱ्याला माझा देश असुरक्षित आहे आणि तू येऊ नकोस असं सांगितल्याचं ऐकिवात नाही. इंग्लंड मधली उदाहरणं दिली आहेत, संपूर्ण एका काउंटी मधल्या वय ८ ते ५० मधल्या एकूण एक मुली/ स्त्रिया लैंगिक अत्याचाराच्या बळी आहेत. नुसता एकदा एका नराधमाने केलेला बलात्कार नाही, तर वर्षानुवर्षे सतत होणारे गँगरेप आणि त्यातून या मुलींना लावलेली ड्रग्सची सवय. जवळपास १५ वर्ष हे चालू होतं आणि पोलिसांनाही माहित असून त्यांनी काही केलं नाही. कुठल्या ब्रिटिश व्यक्तीने, वर्तमान पत्राने किंवा न्यूज चॅनेलने ब्रिटन महिलांसाठी धोकादायक आहे असं सरसकट विधान केलं? या उलट निर्भयाच्या केसच्या वेळेला BBC ने India's Daughter प्रसारित केली. या अश्या घटना जश्या उद्विग्नजनक आहेत त्याचप्रमाणे अश्या घटनांचा कुठल्यातरी अजेंड्यासाठी होणारा वापरसुद्धा उद्विग्नजनक आहे. तुम्ही तसा वापर करताय असं म्हणणं नाहीये पण या अश्या विधानांनी त्या अजेंड्याला पुष्टी कशाला द्यायची?बहुतेक मुद्द्यांशी सहमत!!
एक अनुभव --
प्रत्येक स्त्रीच्या मनात "आपल्यावरसुद्धा" केंव्हाही बलात्कार होऊ शकतो हा विचार असतो. हा विचार ८ ते ८० वयाच्या स्त्रीमध्ये कायम असतोच.
या विचारामुळेच कदाचित अशा मुलीशी अतिशय सहानुभूतीने ( सह + अनुभूती) वागत होत्या. त्याच जागी माझ्या मनात असा कोणताच विचार( आपल्यावरसुद्धा" बलात्कार होऊ शकतो ) नव्हता त्यामुळे मी तिला दाखवत होतो ती एक "कणव" म्हणता येईल. व्याख्येप्रमाणे "सहानुभूती" म्हणता येणार नाही. अशा प्रसंगी स्त्रिया या "आपण आणि ते (पुरुष) असा भेदभाव नैसर्गिक रीत्या करत होत्या. याबद्दल वाचन करत असताना असाच अनुभव पाश्चात्य देशातील अनेक पुरुष डॉक्टरांना आल्याचे वाचनात आले. या धाग्यावर मला हा फरक परत एकदा स्पष्टपणे जाणवतो आहे. स्त्रिया बलात्काराबद्दल आणि एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूती ने लिहीत आहेत. त्यात परत आपण आणि ते( पुरुष) यातील फरक जाणवतो आहे. येथे आपला बाप भाऊ आणि मुलगा याबद्दल भवन कशा व्यक्त कराव्या याची शंका दिसते आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते. पहा विचार करून परत एकदा.अभारतीय स्त्रीयांच्या वेदना, वेदना नसतात ? !
त्यांच्या वेदना वेदना नसाव्यात ? !
वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे
सॉरी आपल्या खालच्या
लय राडा होउ शकतो या
पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव
न्यायव्यवस्थे बाबतची रचनात्मक चर्चा आवडली
वस्तुनिष्ठत्व जास्त कारण की ....
मी काय करू शकतो ?
स्वतःपासून सुरुवात करा
+१
* ती व्यक्ती पुढे मुख्यमंत्री
+१.............. नूसता भीती,
स्त्री नेच स्त्री ला मदत
+१००००.
माहितगारा.ची गल्ली पुन्हा चुकली.