✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुमच्या देशात....

श
शिव कन्या यांनी
Fri, 04/13/2018 - 13:33  ·  लेख
लेख
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं. मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.' मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.' मी दरवाजे लावून बसते. .....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
बातमी

प्रतिक्रिया द्या
60073 वाचन

💬 प्रतिसाद (212)

प्रतिक्रिया

अगदी सहमत.

पुंबा
Mon, 04/16/2018 - 12:24 नवीन
अगदी सहमत. आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो. आज, कठुवा रेपबद्दल ज्या निर्विकारपणे, निर्लज्जपणे पिडितेच्या मुस्लिम असण्याबद्दल आनंद व्यक्त होतो किंवा विरोध करणार्‍यांबद्दल पाकिस्तानचे हस्तक असल्याचे आरोप केले जातात त्यावरून अ॑अम्ही जो देश आपला मानतो तो हा नाही अशी भावना मनात येणे अस्वाभाविक नाहीच. निर्भया हत्याकांडातील आरोपींचा निषेध करणारे आज 'नाही पण या प्रकरणात दुसरी बाजू असू शकते' असा कांगावा करतात तेव्हा यांना 'न्याय' होण्यापेक्षा धर्म-र्धर्म खेळण्यातच रस आहे हे सिद्ध होतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आपल्या देशाला नावे ठेऊ नका

प्रसाद_१९८२
Mon, 04/16/2018 - 13:18 नवीन
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो. -- एक वेळ असे मानून चालू की देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांनी देशात सुधारणा घडवण्यात काहीच हातभार लावला नाही, बर मग तुम्ही देशाला नावे ठेवणार्‍यांनी देशात सुधारणा घडवायला किती हातभार लावलाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

रेप हा फिजकली दिसतो, पण

मार्मिक गोडसे
Mon, 04/16/2018 - 00:42 नवीन
रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. ह्यापेक्षा अधिक पुरावा कोणता असू शकेल?
  • Log in or register to post comments

दरडोई संख्या

गामा पैलवान
Mon, 04/16/2018 - 02:27 नवीन
मा.गो. भारतात बायकांना वावरणं उत्तरोत्तर कठीण होत चाललंय हे खरं! मात्र तरीही भारतातल्या बलात्कारांची दरडोई संख्या उर्वरित जगाच्या मानाने नगण्य आहे. अर्थात हे भारतातल्या अनागोंदीचे समर्थन नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं. आ.न. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस

मार्मिक गोडसे
Mon, 04/16/2018 - 11:26 नवीन
सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? कुलाब्या पासून फोर्ट पर्यंतच्या फुटपाथवर परदेशी स्त्रियांना किंचाळताना व त्यांच्याकडून आपल्या देशबांधवांना मिळालेला प्रसाद प्रत्यक्ष बघितला आहे. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये आपल्याबरोबर स्त्रीला घेवून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य प्रकार असतो. प्रत्येक घटनेची नोंद होतेच असं नाही.तुलनेनं बलात्कारांच प्रमाण कमी आहे म्हणून ह्या देशात स्त्री सुरक्षित आहे असं म्हणणाऱ्यास दंडवत! विकृत पुरुषांपासून मुबईत फक्त स्त्रीच नव्हे , तर तरुण मुलंही सुरक्षित नाहीत. हां, मुंबई भारतात येत नसेल तर गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

भावना व चर्चा

गामा पैलवान
Mon, 04/16/2018 - 12:23 नवीन
मा.गो., 'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही. जे तुम्ही बघितलंय तेच मीही बघितलंय. पण चर्चा करतांना भावनांच्या आधारे करता येत नाही ना. त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना? जेणेकरून सत्वर तोडगा निघेल. अशी आकडेवारी जमवतांना प्रस्तुत स्त्रीकडे वैयक्तिक लक्ष देणं जमणार नाही. पण तो काही मलीन हेतू नव्हे. तसंच स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्याच्या दरडोई आकडेवारीनुसार भारतात जास्त सुरक्षितता आहे हे देखील मलीन विधान धरण्यात येऊ नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

त्यासाठी ठोस आकडेवारी लागते.

मार्मिक गोडसे
Mon, 04/16/2018 - 13:44 नवीन
त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना? हे काम कोणाचे आहे? करताहेत का ते काम जबाबदारीने?का आमच्या आयाभगिनींनी रोज घरातून बाहेर पडलं की कामावर पोचण्यापूर्वी आणि कामावरून घरी परतन्यापूर्वी पो. स्टे. तक्रार नोंदवावी अशी आपली अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये CCTV लावा आपोआप डाटा मिळेल. 'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही. उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

उपकार कोण करतोय?

गामा पैलवान
Mon, 04/16/2018 - 18:25 नवीन
मा.गो.,
उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.
मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. त्याबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

मला नेमकं हेच बरळायची इच्छा

मार्मिक गोडसे
Tue, 04/17/2018 - 18:42 नवीन
मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. मला तुमच्या सापळ्यात अडकवल्याबद्दल तुमचे अभिनंदन! मला वाटलं होतं महिला अत्याचार आकडेवारी संकलन ह्यावर तुम्ही काहीतरी उपाय सुचवाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लेखातल्या वेदना पोचल्या.

अंतरा आनंद
Mon, 04/16/2018 - 06:33 नवीन
लेखातल्या वेदना पोचल्या. लेखात कुठेही ठराविक कोणावर दोषारोप नसतानाही ’अल हिंद’ वरून देशभक्त लोकांच्या भावना दुखावलेल्या दिसता आहेत. थोडा ललित अंगाने लिहीलय हे लक्षात न घेता लेखिकेनं आपल्या राष्ट्राची मुस्लीम देशातल्या लहान मुली जवळ बदनामी केली ह्यावर दु:ख, संताप व्यक्त करणारी मेंबरं बघून वाईट वाटलं. आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना. एवढंच दु:ख लोकांना, " हिंदू एकता मंच" आरोपींना पाठिंबा देण्यासाठी तिरंगा फडकवत निदर्शनं करते, या मोर्च्यात सरकारमधील दोन मंत्री सहभागी होतात, हे बघून होतय की नाही? जबाबदार अधिकारपदावर (राजस्व अधिकारी) , पोलीस यासारख्या व्यक्ती या घटनेत आरोपी-सहअरोपी आहेत याचं वाईट वाटतय की नाही? अर्थात, मुलीचं चित्र आणि नाव उघड होणं हे मिडीया किती नीच पातळीला पोहोचू शकतो याचं उदाहरण आहे, यात वाद नाही. आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला. अर्थात उनाव, कथुआ आणि आता सूरत या सारखा अनेक घटना , मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा करण्या ऐवजी विचारी नागरीकही कथुआ प्रकरणी हिंदू -मुस्लीम धुळवडीत ज्या हिरीरीनं सहभागी झालेय ते बघून आपण आपलं ध्येय्य लवकर गाठू खात्री पटतेय .
  • Log in or register to post comments

अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते.

माहितगार
Mon, 04/16/2018 - 09:05 नवीन
@ अंतरा आनंद दुसर्‍यांकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्या बाजूला आहेत का ? हे तपासण्याची आपणास आणि धागा लेखिकेस गरज असावी असे प्रांजळ मत आहे . जिथ पर्यंत अत्याचाराची निंदाकरणे असो की स्त्रीयांना सामोरे जावयास लागणार्‍या वीषमते बाबत या पुर्वी वेळोवेळी लिहून झाले आहे -धर्मावरुन या विषयात फरक करु नये या विषयावरही यशस्वीपणे बाजू मिपावर यापुर्वी मांडून झाली आहे, ते प्रतिसाद शोधावयास वेळ लागेल- तसे ते इतर मिपाकरांनी ही लेखन केले असणार आहे. याच धाग्याला समांतर सुधीर देवरेंचा धागा आला आहे आणि इथे ज्या साशंकता व्यक्त केल्या जात आहेत त्या देवरेंच्या लेखावर अद्यापतरी केल्या गेलेल्या दिसत नाहीत.
आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला.
आणि धागा लेखिका
'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
या लेखनातील आपलेच अंतरंग धार्मीक फरक विवादात आणणारे आहेत आणि आपणच उपस्थीत केलेल्या वादाच्या विरोधात ससंदर्भ असंख्य पुरावे उभे करता येतात . आणि तसे पुरावे उपस्थित केले की "मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " मुद्याच्या आधारे गोलपोस्ट शीफ्ट केला जतोय किंवा कसे ? मला वाटले ओमान मधलीच उदाहरणे पुरेसे ठरावे पण तेवढ्याने विरुद्ध बाजूच्या धर्मांधांचे डोळे उघडलेले दिसत नाहीत, सौदी अरेबीयाच्या राजदूतांवर आरोप झाले आहेत त्यांच्यावर झालेल्या आरोप बद्दल सौदी अरेबीयाने कोणत्या शीक्षा दिल्या ? हा प्रश्न तुमचे मुद्दे खोदण्यास पुरेसा असावा नसेल तर सांगा ईस्लामिक देशातील स्त्रीयांची स्थिती हा वेगळा धागा लेख असंख्य पुरावे आणि संदर्भांच्या आधारावर उभा करुन दाखवेन . मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " एवढ्या मुद्यावर चर्चा करावयाची असेल तर धागा लेख तेव्ढ्याच मुद्यावर काढावा , ईस्लामीक अथवा अगदी युरोमेरिकी किंवा इतर देशांशी तुलना अस्थानी आहे. तुलना आपण चालू केली तर प्रतिवाद झेलण्यास तयारही असावे . अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

शिक्षा होते...'

अंतरा आनंद
Mon, 04/16/2018 - 10:25 नवीन
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का? लेखिकेनं कोणतही धार्मिक दृष्टओकोन व्यकत केलेला नाही पण इतर प्रतिक्रिया मात्र विनाकारण तो रंग देतायत याचा खेद वाटतो. "हे इथे नाही का होत? " असं विचारण्यापेक्षा "हे असं माझ्या देशात होतय याची मला लाज वाटते ' यावर सहमत का असू नये? इतर राजकारण करत आहेत असं म्हणत " मुस्लिम देशांकडे बघा" असं म्हणताना घटनेकडे बघण्याचा दूषित नजर देतोय असं नाही का वाटत? हे करताना आपण राजकारण्यांपेक्षा ( कारण त्यांना मतं तरी मिळवायची असतात आपण कुठलेही हेतू नसताना हे करतो ते) चुकीचं करत आहोत असं नाही का वाटत? कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त

माहितगार
Mon, 04/16/2018 - 10:37 नवीन
कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?
१) आपणच चुकीचा गोलपोस्ट उभा केला तर गोल करणारे त्या दिशेने येतात त्यावर टिका केली तरी तार्कीकता शिल्लक रहत नाही. योग्य गोल पोस्टचा नवा चर्चा धागा मी काढला आहे तिकडे चर्चा सहभागाचे स्वागत आहे . २) भावनांचा आदर न करणारे इथे कुणीच नाही. भावना आहेत म्हणून त्यातील अज्ञान आणि चुकीच्या माहिती आणि चुकीच्या दृष्टीकोणांची चिकित्सा एकदा पब्लिक फोरम मध्ये होणार नाही होऊ नये अशी अपेक्षा चुकीची असावी . सदर लेखिका स्ट्राँग चर्चांना तोंड देऊ शकणार्‍ञा जुन्या मिपाकर आहेत तेव्हा चिकित्सेत काहीही गैर नाही.
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का?
लेखिका अप्रत्यक्सपणे अवजवी शिक्षांचे आणि अवाजवी स्त्रीयांवर अन्याय्य संस्कृती आणि ग्रंथाचे समर्थन करत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

@अंतरा आनंद,

प्राची अश्विनी
Mon, 04/16/2018 - 10:51 नवीन
@अंतरा आनंद, जे घडलंय त्याबद्दल सात्त्विक संताप, लाज वाटणं सगळं मान्य. तुमच्या भावनाही पोचलेल्या. पटल्या. पण जेव्हा तुलना होते तेव्हा ती योग्य अयोग्य अशा प्रतिक्रिया येणारच. " कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?" हेका नाहीच. पण त्याविरोधात कुणी बोलूच नये असाही हेका नसावा. इथे तर या घटनेबद्दल, आपल्या समाजाला सुधारणेची अत्यंत गरज आहे इ.वर कुणाचेही दुमत नाही. तुलना चुकीची आहे असं म्हणणं आहे. उदा. " तुमच्या गावात दारू पिऊन नव-याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यापेक्षा आमच्याकडे बरं , दारू पिऊन नवरा बायकोला मारझोड करतो, कोंडून ठेवतो पण जीव नाही घेत हो." असं म्हणण्यासारखं आहे. तेही भयंकर पण हेही भयंकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

होय, मला, माझ्या कुटुंबाला

अंतरा आनंद
Mon, 04/16/2018 - 11:20 नवीन
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा.
हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही आपल्या आणि त्या देशाच्या लोकसंख्येची तुलना करणे, ओमानच्या कट्टरतेची मापे काढणे, यातून काय साध्य होणार ? धागाकर्तीनं एखाद दुसर वावगं वाटणारं लिहीलंही असेल तरी या घटनेत कोणत्याही कारणास्तव एका अजाण मुलीचा असा घृणास्पद वापर, आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ? त्याऐवजी घटनेला कोणत्याही तुलनेकडे वऴवून आपण या प्रकरणी सुरू असलेल्या राजकारणातलं एक अगदी नगण्य का होईना प्यादं बनतोय हे लक्षात घ्यायला नको का? या अश्या भावनाप्रधानतेमुळेच राजकारणी आपाआपली पोळी भाजून घेतात आणि देश्यातल्या कायदासुव्यवस्था असूनही नसल्यासारख्या अवस्थेत काहीही बदल होत नाहीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

तीन बोटे आणि चुकीच्या गोलपोस्टास सांभाळत बसणे

माहितगार
Mon, 04/16/2018 - 11:41 नवीन
...भावनाप्रधानतेमुळेच ..... पुन्हा तीन बोटे आपल्याकडे आहेत. ( इथे राजकरण्यांच्या तमाशांचे स्वागत कुणीच करत नाही हे वे सानल )
....तुलनेकडे वऴवून ....
पुन्हा तीन बोटे , चुकीचे गोलपोस्ट उभारण्याची जबबदारी किती नाकारली तरी तर्क सुसंगत ठरत नाही.
....आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ?
आपण स्वतः ह्या चर्चा मुद्यावर चर्चा मर्यादीत ठेवल्ली तर चर्चा तिकडे जाण्याच्या सम्धी वाढल्या असत्या . अपणही लेखिकेच्या चुकीच्या गोलपोस्ट जवळ अजून एक चुकीचे गोलपोस्ट उभे करता आणि गोल दुसरी कडे करा म्हणता याला काय अर्थ आहे ? इथेही तीन बोटे आपल्या स्वतःकडे आहेत
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. ....हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही
ओमान मधल्या आणि भारतातल्या कायद्याच्या बडग्यात फारसा फरक नाही हे संदर्भासहीत सिद्ध करुनही चुकीच्या इंप्रेशन मध्ये रहाण्याचा आणि तुलना नको म्हणत तुलना ओढवून घेणारे प्रतिसाद आणि उपप्रतिसाद देत चुकीचा गोलपोस्ट सांभाळत बसणारी बोटे आपलीच आपल्याच दिशेस निर्देश करतात किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

कोणता कायदा?

भंकस बाबा
Fri, 04/20/2018 - 23:27 नवीन
शरीयतनुसार दंड देणार असतील तर एका स्त्री ची साक्ष प्रमाण मानण्यात येणार नाही आहे, म्हणजे पीडित स्त्रीने तक्रार करताना साक्षिदार पण घेऊन जावा मुस्लिम देशात स्त्रियावर अत्याचार म्हणजे लाहोलबिलाकुवत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

ताई, तुम्हारा चुक्याच..

यशवंत पाटील
Mon, 04/16/2018 - 08:38 नवीन
ताई, तुम्हारा चुक्याच.. तुम्हाला काय वाटल तरी मेरा देश महान असच बोलायला पाहिजे - अस सांगणारे आयडी थोर आहेत. औघड आहे. तुम्ही लिहिल ते पोचल आणि पटल. बायांची आबाळ पाहिलेला...
  • Log in or register to post comments

प्रॉब्लेम काय झालाय माहिती का

विशुमित
Mon, 04/16/2018 - 11:45 नवीन
प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, या प्रकरणात भाजपचे २ आमदार, हिंदू एकता मंच, आरोपी हिंदू, नरेंद्र मोदींचे बराच वेळ धरलेले मौन (उपोषण) आणि तुम्ही म्हणता तसे "मेरा राष्ट्र (?) महान" या सर्व गोष्टींना डिफेन्ड करायचे म्हंटल्यावर तुलनात्मक (?) मतमतांतरं होणारच. (हिंदू आरोपीना डिफेन्ड करतात हे म्हणणे अतार्तीक होईल पण विरुद्ध बाजूला बकरवाल आहेत म्हंटल्यावर चर्चा तर होणारच ना पाटील)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील

मेरा देश महान

माहितगार
Mon, 04/16/2018 - 11:55 नवीन
मेरा देश महान अयोग्य तुलनेने देशाच्या नावे बोटे मोडणारे अधिक शहाणे असतात किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील

साहेब, जरा थंड घ्या.

यशवंत पाटील
Mon, 04/16/2018 - 13:43 नवीन
साहेब, जरा थंड घ्या. मनात आलं ते त्यांनी लिहिलं ते कुणाला पटल, कुणाला नाही. लगे त्यांना नागरिक शास्त्र शिकवायला लागले लोकं... अहो, त्यांना बी कळत असणार की. तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी? तुमच्यावाणी काय मला जास्ती लिहता येत नाही. समजुन घ्या जराशीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी

माहितगार
Mon, 04/16/2018 - 14:12 नवीन
तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी?
अंशतःच बरोबर , सार्वजनिक मंच आहे, प्रतिसाद सुविधा समीक्षेसाठीच दिलेली आहे . आमचा आक्षेप नसलेला स्वतंत्र धागा चर्चा सुद्धा चालू केली आहे . आक्षेप तुलनेचा चुकीचा मुद्दा लावून धरण्यावर आहे . लेखिका चर्चेत अनुभवी आहेत ज्यांना तुलनेचा मुद्दा लावून धरायचा आहे त्यांच्या मुद्याची योथोचीत चिकित्सा ओघाने येतेच . आज माझ्या घरातील स्त्रिया बाहेर सुरक्षित पाने वावरून आल्या आहेतच बाकीच्यां कोट्यावधी स्त्रिया बाहेर या क्षणी भारतात सुरक्षित पाने वावरत असतील , काळजीच्या गोष्टी भारतात नाही असे नाही पण काळजीच्या गोष्टींची काळजी सुरक्षे विषयी चर्चा करून करणार कि stereotype तयार करून भीती चे वातावरण वाढवण्यात हात भार लावणार नेमके काय तर्क सुसंगत आहे ? हे आपणच सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील

" मी दरवाजे लावून बसते.

वीणा३
Mon, 04/16/2018 - 09:22 नवीन
" मी दरवाजे लावून बसते."तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते. ८ वर्षाच्या मुलीचे (खरंतर कोणाचेही) हाल करणाऱ्याची "जनावर" हि एकाच जात / धर्म असतो. मीडिया वर असले फोटो दाखवण्यासाठी अतिशय स्ट्रिक्ट नियम केले पाहिजेत, विचारही करवत नाहीये त्या मुलीचा आणि तिच्या घरच्यांचा, माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले. "त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे. " अतीवेळा सहमत. मध्ये एक बातमी अली होती कि लो वेस्ट जीन घालून बाईक वर बसलेल्या एका मुलीच्या जीन्स मध्ये जळती सिगारेट टाकली. ओळखीतल्या कित्येक "बायकांची" प्रतिक्रिया होती कि असे कपडे घातले कि असंच होणार, नीट कपडे घालावे. काय बोलावं कळत नाही.
  • Log in or register to post comments

+१

अंतरा आनंद
Mon, 04/16/2018 - 10:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

आपण आपल्या मुलावर सुयोग्य संस्कार नेमके कसे कराल ?

माहितगार
Mon, 04/16/2018 - 11:52 नवीन
...माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले.
आपण आपल्या मुलावर सुयोग्य संस्कार नेमके कसे कराल ? की पुढेचालून तो योग्य मार्गावर राहील
...मी दरवाजे लावून बभित"तुम्हाल काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते.
.. लेखिका आणि लेखिकेचे समर्थक चर्चा सुरक्षा कशी वाढवता येईल एवजी स्वतःला आणि इतरांना भितीच्या वातवरणात गुरफटवत तर नाही आहेत. आपण वर्णन केलेल्या कपडे कसे घालावे सांगणार्‍या स्त्रीयाही भितीच्या वातावरन निर्मितीत गुरफटवून घेत नाही किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

देशाची बदनामी

गामा पैलवान
Mon, 04/16/2018 - 12:26 नवीन
अंतरा आनंद,
आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना.
खरंय हे. देशात बायका सुद्धा येतात. त्या स्त्रियांचीही नाहक बदनामी होतेय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

भावनेच्या भरात काहीसा आमिर

गवि
Mon, 04/16/2018 - 12:52 नवीन
भावनेच्या भरात काहीसा आमिर खान इफेक्ट (देशात असुरक्षित वाटतं, देश सोडण्याविषयी) घडून गेला असावा. त्यात उद्वेगाचा भर हा फॅक्टर जास्त असावा. भावना समजल्या.
  • Log in or register to post comments

म्हात्रे काका, आपल्या देशाची

पिलीयन रायडर
Mon, 04/16/2018 - 13:35 नवीन
म्हात्रे काका, आपल्या देशाची बदनामी परदेशी लोकांसमोर करु नये हे तत्वतः मान्य असलं तरी जर एखादी परदेशी स्त्री भारतात येणार असेल तर मी तिला ह्या वास्तवाची नक्कीच जाणीव करून देईन. ह्याचं कारण सध्या सतत कानावर येणाऱ्या ह्या रेपच्या बातम्या इतकं मर्यादित नाही. भारतात सगळीकडेच स्त्रियांना निर्धोक फिरता येत नाही. परिस्थिती कमी अधिक प्रमाणात वाईट असेल पण वाईट आहे हे नक्की. एकंदरीतच स्त्रियांना कमी लेखणे पासून ते निव्वळ उपभोगाची वस्तू समजणे ह्या सर्रास घडणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याची नोंद ठेवून आकडेवारी तयार केली जाते का ते माहीत नाही, पण हे सत्य आहे. म्हणजे बाईशी बोलताना नजर कुठे असावी इतके साधे संकेत सुद्धा सहज मोडले जातात, अगदी चकचकीत कॉर्पोरेट मध्ये सुद्धा. ही गोष्ट कुणी रिपोर्ट करणार नसलं तरी ती किती किळसवाणी आहे हे स्त्री झाल्याशिवाय कळणार नाही. (पण अंदाज येऊ शकतोच). पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तर मन निगरगट्ट करूनच जावं लागतं. अगदी शाळकरी पोरं सुद्धा वाट्टेल तसे हात लावतात. मुळात आपण कोणत्याही बाईला कुठेही हात लावू शकतो असं वाटणं हेच किती विकृत आहे.. आता मी फक्त अमेरीका हा देश पाहिला आहे. तो ही फार थोडासा. किमान न्यू यॉर्क मेट्रो मध्ये तरी, कितीही गर्दी असली तरी तुम्हाला किळसवाणे स्पर्श होत नाहीत. तुम्ही वीतभर कपडे घालून फिरलात तरी कुणी नजरही वर करून बघत नाही. स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल. तेच तिथे भारतीय पुरुष असेल तर एका क्षणात माझे सेन्सेस अलर्ट व्हायचे. सरसकटीकरण करायच नाहीये मला, पण एकुणात परिस्थिती अशी आहे... असावी.. तिथेही रेप होतात ना, पण बायका ते खुले आम सांगतात की माझ्यावर रेप झाला होता. समाज त्यांना वेगळं वागवत नाही. अर्थात भारत आणि अमेरिकेत फार फार फरक आहेत. संस्कृतीच वेगळी. पण उद्या एखादी अमेरिकन बाई भारतात येणार असेल तर स्त्री म्हणून मी तिला ह्या फरकांची जाणीव करून देईनच. देशाच्या वगैरे पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या. मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही नाहीचेत, आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे. तेव्हा ओमान बद्दलचे तांत्रिक मुद्दे चुकले असतीलही, पण भावना नीट समजल्यात मला लेखातल्या.
  • Log in or register to post comments

चर्चेचे केन्द्र कोणते हवे आहे ?

माहितगार
Mon, 04/16/2018 - 13:58 नवीन
आपल्या भावना लक्षात घेऊन अपल्याच विधाना वर आधारीत वेगळा चर्चा धागा भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... ... काढला आहे, आपले त्या चर्चेत स्वागत आहे. तुलनेचा गोलपोस्ट वर चर्चा केंद्रित करणे आपली प्रायोरिटी असेल ससंदर्भ तर्कसुसंगत अभ्यासपूर्ण चर्चेची तयारी आहेच . पण आधीच्या सदस्यांप्रमाणे तुलनेच्या गोलपोस्ट ला का फोकस केले म्हणू नका, ते गोलपोस्ट आपणण स्वत: उभे केलेले आहेत आणि आपण त्या गोलपोस्ट ला सांभाळू इच्छित आहात हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिलियन रायडर

श्वेता२४
Mon, 04/16/2018 - 14:34 नवीन
आपल्य मताशी मीही सहमत आहे. चर्चा करणाऱ्यांनी दुसऱाय देशासमोर आपल्या देशाची बदनामी, आकडेवारी इ. पोकळ चर्चेत न पडता देशात जे भयानक घडत आहे त्यावर लक्ष देणे अधीक महत्वाचे. मिपावर बऱ्याच स्त्रिया कामानिमित्त घराबाहेर पडत असतील तशाच या देशातीलही कामानिमित्त रोज घराबाहेर वावरतात याचा अर्थ बाहेरचे वातावरण सुरक्षित आहे म्हणून त्या बाहेर पडतात असे नाही. बाहेर पडताना त्यातील किती जणींना बिनधास्त वाटत असेल याचा विचार करणे ही खरी गरज आहे. आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

वेगळा चर्चा धागा

माहितगार
Mon, 04/16/2018 - 16:29 नवीन
आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.
अगदी पिलीयन रायडर यांच्याच विधानावर आधारीत भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... हा धागा फिअर मॉन्गरीन्ग न करता रचनात्म्क चर्चा व्हावी म्हणून काढला आहे . त्या धाग्यात आपल्या उपरोक्त विधाना संदर्भाने चर्चेत स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

+111

राही
Mon, 04/16/2018 - 14:47 नवीन
प्रतिसाद आवडला. पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते. भारतात मात्र ती सतत वखवखलेली असते. कुलाबा फोर्ट भागात फेरीवाले टॅक्सीवाले परदेशी बायकांशी किती विकृत वागतात ते पाहिले आहे. एक तर कुठल्याही महिलेशी सभ्य रीतीने वागावे ही इथली संस्कृतीच नसावी किंवा असलीच तर ती धुडकावण्यात काही गैर वाटत नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पाश्चात्य देशांत महिलांशी

टवाळ कार्टा
Mon, 04/16/2018 - 17:58 नवीन
पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते.
हे फार चुकीचे वाक्य आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो....बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते...अर्थात परस्पर संमतीशिवाय अथवा समोरच्या व्यक्तीला uncomfortable काहिहि करणे हे चूकच आहे त्यामुळे "पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते." हे सरसकटीकरण करुन काळ्या-पांढर्यात विभागणी करणे चूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

काही अंशी सहमत. पण मुळात ते

बिटाकाका
Mon, 04/16/2018 - 19:19 नवीन
काही अंशी सहमत. पण मुळात ते पण तेच करतात असं म्हणणं तितकंच चूक आहे जितकं इथले पुरुष करतात असं म्हणणं आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. -------------------------------- ही अशी सरसकटीकरण आणि एक प्रकारचा उपहास यांनी भरलेली वाक्ये ऐकली की वाटतं "इतर स्त्रियांकडे, माझा भाऊ फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझे वडील फार वखवखलेल्या बघतात, माझा नवरा फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझा मुलगा फार वखवखलेल्या नजरेने बघतो" वगैरे वाक्ये सर्रास कानावर पडू लागतील की काय. आणि मग एक खिन्नता आणि उदासीनता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझा भाऊ बघतही असेल, उद्या

पिलीयन रायडर
Mon, 04/16/2018 - 20:40 नवीन
माझा भाऊ बघतही असेल, उद्या मुलगा विचित्र वागेलही. नाही कोण म्हणतंय? हे बलात्कारी लोक कुणाचे न कुणाचे नातेवाईक आहेतच की! बिटकाका, बहुतांश वेळा घरातच असे प्रसंग घडतात. एखादा अनामिक सर्व्हे घेऊन पहा, अनेक जणी कबूल करतील की घरातल्याच कुणीतरी त्यांना त्रास दिलेला आहे. अगदी मुलीवर अत्याचार करणारे बाप ह्या जगात आहेत. माझं असं मत आहे की बायकांना बाप, भाऊ, नवरा हे कसे आहेत हे नीट माहिती असतं. फक्त त्या बोलायला घाबरतात. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं कुणी बोलताना सापडणार नाही, पण घडत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

त्याचं प्रमाण नावाची गोष्ट

बिटाकाका
Mon, 04/16/2018 - 21:48 नवीन
त्याचं प्रमाण नावाची गोष्ट असेलच की? ******************** स्टेरिओटाइप करताना थोडाही विचार केला जाऊ नये? माझ्या आजूबाजूच्या लोकांपैकी ०.५ टक्केही अशी वखवखलेली नजर घेऊन फिरत नाहीत. तुमचेही प्रमाण हेच असावे असे मत नाही, पण वरील वक्तव्य १००% प्रमाण गृहीत धरतंय आणि ते अतिशय खेदजनक तर आहेच शिवाय संतापजनकही आहे असे मला वाटते. माझ्या सज्जनपणावर असा सरसकट हल्ला करण्याचा अधिकार (किंवा स्वातंत्र्य) कोणी का घ्यावा? मला माझी सज्जनता आणि माझे संस्कार कुणासमोरही सिद्ध करण्याची तिळमात्रही गरज वाटत नाही. आणि माझ्यासारखेच बहुतेक सगळे वडील, भाऊ, नवरा मुलगा बाजूला असतात. कुठल्या मोजक्या नतद्रष्ट नीच लोकांसाठी सगळ्या पुरुषजातीवर आसूड उगारणे अजिबात योग्य नाही. याउपरही कोणी, कदाचित वैयक्तिक अनुभवांमुळे, असे स्वातंत्र्य उपयोगी आणत असल्यास अशा वक्तव्यांना फाट्यावर मारण्याशिवाय काय पर्याय उरतो? ************************* माझ्या मतातून कोणाला उद्धटपणा किंवा महिलांबद्दल अनादर भासत असल्यास, फारफारतर मी आगाऊ दिलगिरी व्यक्त करू शकतो, तसा हेतू असणे कदापि शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुम्ही वैयक्तिक का घेताय हे?

पिलीयन रायडर
Mon, 04/16/2018 - 22:08 नवीन
तुम्ही वैयक्तिक का घेताय हे? आपण जनरल मानसिकतेबद्दल बोलत आहोत. भारतात स्त्रियांना कमी लेखले जाते असं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा माझ्या घरातल्या स्त्रियांना तर मी मनाने वागवतो ह्या प्रतिवादाला अर्थ नसतो. हे विधान स्त्रिया करतात तेव्हा त्याला अनेक अनुभवांची जोड असते आणि त्यातून त्या हे बोलतात. आम्ही जेव्हा म्हणतोय की भारतात पुरुष स्त्रियांकडे विचित्र नजरेने बघतात तेव्हा सगळेच्या सगळे भारतीय असेच आहेत असा अर्थ नसतोच. पण बहुतांश जागी स्त्रियांना हा अनुभव येतो. चांगल्या घरातले, एरवी सभ्य वाटणारे पुरुषही विचित्र वागू बोलू शकतात. पण ह्याचा अर्थ तमाम जनता अशीच आहे आणि तमाम बायका अत्यन्त पवित्र आणि सात्विक आहेत असाही होत नाही. हे चर्चेचे अध्याहृत संकेत आहेत असं मला वाटतं. भारतात कठुआ, उन्नव, आसाम, सुरत अशा अनेक ठिकाणी पाशवी बलात्काराच्या बातम्या एकत्र कानावर येत असताना स्त्रियांनी त्यांचा उद्वेग मांडला तर त्यात असे तांत्रिक मुद्दे का काढले जावेत? आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा चिंतेचा विषय आहे हे मान्य करायला इतका त्रास का होत असावा? इतर देशातल्या ह्या संदर्भातल्या काही चार दोन भल्या गोष्टी इथे मांडल्या तर त्याचा त्रास का व्हावा? इथे कुणी कुणावर वैयक्तिक बोट दाखवत नाहीये आणि चांगले सभ्य पुरुष जगात नाहीतच असंही म्हणत नाहीये. पण दैनंदिन आयुष्यात "ट्रॉमा" वाटावा इतका त्रास मुली रोज सहन करतात. मनोरुग्ण माणसाने वागावं तसे विकृत बलात्कार भारतात होतात, घरातल्या माणसानेच वर्षानुवर्षे त्रास दिल्याच्या घटना सुद्धा इथे घडतात. काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा इतका महत्वाचा वाटतो तिथे ह्या मुलींचा त्रास नगण्य आहे का? मी भारताबद्दल देशप्रेमाची भावना समजू शकते, पण ह्या नादात आपण प्रचंड शाररिक आणि मानसिक त्रासाला सामोऱ्या गेलेल्या स्त्रियांना विसरत आहोत का? चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

वुमेन आर फ्रॉम व्हीनस'

माहितगार
Mon, 04/16/2018 - 22:20 नवीन
चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?
मॅडम, तुमचंच बरोबर आहे , आपल्याशी चर्चा करताना 'वुमेन आर फ्रॉम व्हीनस'चा अनुभव आला आणि अधिक शहाणा झालो. खाली सुखी माणूसचा प्रतिसाद सुद्धा बरोबर आहे की काय अशी भावना होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

१. माझी वाक्ये तुम्ही तरी का

बिटाकाका
Tue, 04/17/2018 - 08:00 नवीन
१. माझी वाक्ये तुम्ही तरी का वैयक्तिक म्हणून घेताय? मी भारतातील एक पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय असं समजा की! २. आपण मुद्द्याभोवती गोल गोल फिरक्त आहोत. किती टक्के पुरुष तुम्ही म्हणता तसे आहेत? ही टक्केवारी अजिबात महत्वाची नाही असे गृहीत धरून वारंवार "सर्व पुरुष" असा उल्लेख अत्यंत खटकणारा आहे. काही पुरुष म्हणण्यात नेमकी अडचण काय? ३. इथे स्त्रियांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय नाहीये असं म्हणणारा कुठल्या आणि कुणाच्या प्रतिसादाचा संदर्भ आपण देताय? मला तरी असं सुचवणार कुठला प्रतिसाद दिसला नाही, तुम्ही दाखवून देता का? ४. काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा? तुम्ही मुद्दा सोडताय. माझा मुद्दा काही मोजक्या लोकांचा नतद्रष्टपणा आहे. मुलींचा त्रास नगण्य वगैरे कोणालाच वाटत नसतो पण म्हणून सरसकट पुरुषांवर का दोषारोप? आणि यात देशभक्तीचा काय संबंध? स्त्रियांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांवर पण असेच लेबल लावले जाते का? ५. माझं तर उलट मत आहे की भारतातील पुरुष हा दिवसेंदिवस स्त्रियांबद्दल अतिशय संवेदनशील बनत चालला आहे आणि हे चांगले लक्षण आहे. त्याबरोबरच स्त्रियाही सेल्फ डिपेंडंट आणि कॉन्फिडन्ट होत चालल्या आहेत. यामुके खरतर काही दशकांपूर्वीपेक्षा अतिशय आशादायक चित्र आहे. हे सगळं बाजूला ठेवून वारंवार हा समाज स्त्रियांसाठी धोकादायक आहे म्हणणं अजिबात पटत नाही आणि खासकरून यासाठी समस्त पुरुषवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे क्लेशदायक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अगदी बरोबर

nanaba
Tue, 04/17/2018 - 12:18 नवीन
ज्याच जळत त्यालाच कळत ही म्हण आठवतेय इथले प्रतिसाद वाचून. जे चा न्गले आहेत त्यान्नी विरो धी पक्शात न जाता , आम्हाला ज्या मानसिक त्रासातून जाव लागतय असल्या सततच्या बातम्या वाचून त्याबद्दल तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुम्ही स्वतः चा न्गले असल्याने असे वागणार नाही. ़ऊनी क वागताना दि सले तर यथा शक्ती ते वू थाम्बवू , असे म्हणायला काय हरकत आहे. आअपण विरोधी पक्शात असण्याची गरज नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझा भाऊ बघतही असेल, उद्या

arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 15:26 नवीन
माझा भाऊ बघतही असेल, उद्या मुलगा विचित्र वागेलही. नाही कोण म्हणतंय?
इन द स्पिरीट ऑफ ओरिजनल सेंटेंस - माझा भाऊ बघतो. मुलगा बघणार. ------------------- बी फेअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आमेरीकेतले स्विमींग आणि तुलनेचा चुकीचा गोलपोस्ट

माहितगार
Mon, 04/16/2018 - 16:00 नवीन
दुसर्‍या धाग्याचे आमंत्रण देऊन , विषय थांबवणार होतो पण राहींनी तुलनेचा गोलपोस्ट सांभाळायचे ठरवले आहेच तर स्टिरीओ टायपींगचा विरोध म्हणुन हा तुमच्या लाडक्या आमेरीकेतील स्विमींग क्षेत्रातल्याच बातमीचा दुवा स्पृहणीय नक्कीच नसावा 100s of USA swimmers were sexually abused for decades and the people in charge knew and ignored it, investigation finds बातमीची तारीख PUBLISHED: February 16, 2018 at 10:59 am | UPDATED: February 20, 2018 at 8:27 am आणि आमेरीकन मरिन्सच्या उद्योगांच्या यादीचे स्मरण पुरेसे असावे दुव्यांची आवश्यकता नसावी. आपल्यातील वाईटाचे हे समर्थन नाही पण तुलनेचा गोल्पोस्ट सांभाळणे अनावश्यक पोकळ आधारावर आहे . तुलनेचा गोलपोस्ट वर चर्चा अजूनही केंद्रीत ठेवायची असेल तर गोलपोस्ट सांभाळणे चालू ठेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

"तुमच्या लाडक्या अमेरीकेत"

पिलीयन रायडर
Mon, 04/16/2018 - 17:35 नवीन
"तुमच्या लाडक्या अमेरीकेत" ..... बाकी आपण स्विमिंग आणि अमेरिका असं गुगलल की झालं असं वाटत असेल तर मुद्दा काय हे समजून घेण्याचे अजून कष्ट घ्यायचा स्कोप आहे. तुमचे इतर धाग्यावरचे निमंत्रण सस्नेह नाकारत आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

परिस्थिती बदलण्यासाठी आपण नेमके काय कराल ?

माहितगार
Mon, 04/16/2018 - 20:27 नवीन
...मुद्दा काय हे समजून घेण्याचे अजून कष्ट घ्यायचा स्कोप आहे.
ठिक आहे, भारतीय सोडून बाकी सगळ्या जगातले पुरुष वेगळे पाणि पीत असल्या मुळे शुकासारखे वैरागी आहेत, त्यामुळे बाकी जगाची लोक्संख्या अत्यंत रोडावली आहे ;) भारतातील सर्व सरसकट पुरुष वर बिटाकाकांनी म्हटल्यासारखे वखवखलेल्या नजरेचेच आहेत. आता समजा भारताची तुम्हाला सर्व आधीकाराम्ची हुकूमशाहाचे आधीकार दिले तर परिस्थिती बदलण्यासाठी आपण नेमके काय कराल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आपण अत्यंत मुद्द्याचं आणि

पिलीयन रायडर
Mon, 04/16/2018 - 20:36 नवीन
आपण अत्यंत मुद्द्याचं आणि लॉजिकल बोलतो, त्यात कोणताही पूर्वग्रह नसतो, भावनिक मुद्दे नसतात.. असतात ती केवळ तथ्ये! हा मुखवटा गळून पडला की मग असे प्रतिसाद येतात तर.. चर्चेला ना नसतेच कधीच माझी.. पण तुमच्यावर वेळ वाया घालवणार नाही. यदाकदाचित पूर्वग्रह गळून पडला आणि नसलेले अर्थ न काढता प्रतिसाद वाचता आले, तर जरूर प्रयत्न करा. फक्त मला सांगायला येऊ नका. जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अभिनंदन हं अभिनंदन :) , पण आता पुढे काय मग ?

माहितगार
Mon, 04/16/2018 - 21:13 नवीन
लवकर जिंकलात की अभिनंदन हं अभिनंदन :) पण आता पुढे काय मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

! , उद्गार चिन्हाची भेट !

माहितगार
Mon, 04/16/2018 - 21:15 नवीन
की नण्तरच उद्गारवाचक चिन्ह राहीले होते , ती उद्गार चिन्हाची भेट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

एक प्रश्न

अभिदेश
Mon, 04/16/2018 - 16:41 नवीन
मग तसंच भारतातून अमेरिकेत येणार्याना तुम्ही सांगता का , की इकडे कोणीही , कुठेही बंदूक घेऊन गोळीबार करतो . शाळेत , कॉलेज मध्ये तर नक्कीच होतो. प्रबोधन हे दोन्ही बाजूनी व्हावे. भारतात जाणार्या आणि अमेरिकेत येणार्याना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अर्थातच! गोळीबार, रेसिझम,

पिलीयन रायडर
Mon, 04/16/2018 - 17:31 नवीन
अर्थातच! गोळीबार, रेसिझम, ड्रग्ज इ मुद्द्यावर मी भारतात कायम बोलते आणि स्पेसिफिकली ह्या न्यूज फॉलो सुद्धा करते. बादवे मी भारतात रहाते. उगाच कुणाला मुद्दा नको की तिथे बसून भारताची बदनामी करतेय वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

बादवे मी भारतात रहाते.

गवि
Mon, 04/16/2018 - 18:11 नवीन
बादवे मी भारतात रहाते.
परत आल्याबद्दल धन्यवाद. आनंद आहे. आधीचे कट्टा इ. धागे वाचताना असा समज झाला होता की तिकडे जाऊन तिकडचेच कायमचे होणाऱ्या 99% पैकी तुम्हीही आहात की काय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा